● जय जीवदानी परिवार
( जीवाला जीव देणारी माणसं )
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
24 जुलै 2020
----------------------------------------------------
●...आज काल नोकरी किंवा चांगले शिक्षण घेण्यासाठी लोक शहरात जाऊन राहिले आहेत . मग अश्या वेळी आपली घरची माणसं सोबत नसतात आणि सोबत असतात तेव्हा माणसाच्या मनाने...भावनेने एकत्र नसतात ...मनाची जागा व्यवहारने .. आणि भावनांची जागा भांडणानी घेतली. ….पण असं का होतं ...जो तो आपल्या समोर असणाऱ्या माणसाला दोष देतो आणि स्वतःच्या जबाबदारीच खापर दुसऱ्यावर फोडतो. आणि बोलत राहतो ...पहिल्यांदा दादा असा नव्हता ...काका एव्हढे रुक्ष पहिले नव्हते … पुतण्याला तर आपुलकीच नाही … असे डायलॉग घरोघरी ऐकायला मिळतातमग गणपती ...शिमगा ...गोंधळ अश्या वेळी गावी एकत्र येणारी माणसं प्रेमाने वागण्यापेक्षा परक्यासारखी वागायला लागतात.
मी समाजशास्त्राचा विद्यार्थी(प्राध्यापक व्यवसाय असलातरी शिक्षण सुरूच असतं) असल्याने आणि संघटन करण्याची आवड असल्याने लांब लांब राहणाऱ्या घरच्या माणसात आपुलकी कशी आणायची यासाठी एक प्रयोग केला आहे. सद्या आपली संयुक्त कुटुंब पद्धती नसली तरी संयुक्तिक कुटुंब पद्धती कशी करता येईल याचे प्रयत्न केले आहेत आणि गेली पाच वर्षात कधी विचारही केला नव्हता एव्हढा सक्सेस मिळाला आहे (प्रयोजन एव्हढेच आपणही असा प्रयत्न करावा) ... आणि त्यातूनच जय जीवदानी परिवार निर्माण झाला.
जिवाभावाची ..रक्ताची नाती का भांडतात ?
आणि एव्हढे कोणते व्यवहार समोर येतात की स्वतःची तब्बेत काळजीत ...भीतीत नष्ट करतात.
याचं मूळ कारण ….योग्य वेळी ...योग्य टोन मध्ये संवाद न होणे.
आपण जेव्हा सण-समारंभात भेटतो तेव्हा त्यावेळच्या व्यवहारातच गुंतून असतो ...काय ?कसा ? आहेस यापुढे बोलणंच होत नाही.
एकत्रित ट्रिप काढली तर ट्रिपच्या मूड मध्ये असतो..
खरा मनातून संवाद होतच नाही.
… मग यांना एकत्र आणून मनापासून बोलण्याची ..व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे ... कसं आणायचं हा विचार खूप दिवस मनात होता …
...ती वेळ आली … आणि जय जीवदानी परिवाराची मुहुर्तमेढ रोवली गेली….
●...25 मार्च 2015 च्या मध्यरात्रीची वेळ होती..
निमित्त होतं माझा लहान भाऊ महेशचा वाढदिवस .. होळी निमित्त आंबेड गावी एकत्र होतो. त्याचा वाढदिवस सरप्राईज सेलिब्रेशन करण्यासाठी सळसळत्या उत्साहाची गंगोत्री गायत्रीने तयारी केली होती. आंबेडला गेल्यावर गप्पांचे फड लागले होते त्यामुळे ..रात्री 12 कधी वाजले समजलेच नाहीत जोरात फटाक्यांचा आवाज झाला.महेश अचिंबीत झाला आणि भारावून गेला होता.हल्ली बर्थडे सेलिब्रेशन होतात ...पण लगेच पार्टी कधी आणि कुठे देणार असा प्रश्न जोडूनच येतो ..पण रक्ताच्या नात्यात असा पार्टी देण्याचा व्यवहार नसतो… केक कापून झाला आणि अनिलदादाच्या घरी गप्पा सुरु झाल्या. सर्वच भारावलेले होते ...जो तो बोलायला लागला अस आपण एकत्र यायला पाहिजे ….खूप गप्पा झाल्या पाहीजे.. लग्न झाली नव्हती तेव्हा किती मस्त होत असं ही कुणीतरी बोलून गेलं तितक्यात प्रकाशची (चुलत भाऊ चिपळूणला वडिलांचं घर पण स्वतः पुण्यात राहतो आणि गावं आंबेड) बायको जयश्री बोलली ..असं काही नाही.. भावजयी आहोत पण मैत्रीचंच नातं आहे की.. तिच्या बोलण्यात तथ्य होतं.मुळात गावी आले की इथला व्याप कसा आवरायचा या व्यस्ततेत ...आणि कामाच्या ठिकाणी गेलो की तिथले व्यवहार सुरू होतात ...त्यात बायको मुलांमध्ये सुद्धा व्यवस्थित संवाद होत नसल्याने डोकं व्यस्त असतं .
खुप गप्पा झाल्या ...आणि ठरलं एकत्र यायचं आणि खुप गप्पा मारायच्या.
मग माझ्या अनेक वर्षे डोक्यात जो प्लॅन होता तो सुरू झाला … सर्वांच्या डोक्यात एकच उद्देश होता तो म्हणजे रिलॅक्स होणे ...पण माझ्या डोक्यात वेगळेच उद्देश होते तो म्हणजे जुन्या काळासारखी मजबूत फॅमिली सपोर्ट सिस्टीम तयार करणे होती.
काम खुप कठीण होतं …
ग्रुपमध्ये कोण घ्यायचं इथून सुरुवात झाली
2002 ला माझं लग्न झाल्यानंतर
आम्ही वसईला जीवदानी देवीच्या मंदिरात फिरायला गेलो होतो ...आणि ते दोन दिवस यादगार होते ...ते सर्व लोक घ्यायचे ठरले आणि म्हणूनच जय जीवदानी परिवार असं नांव दिलं गेलं. त्यादिवशी राजेश सनी सोबत होते मग तेही जय जीवदानी परिवारात सामील झाले.आम्ही आहोत म्हणून माझ्या दोन बहिणींचे (बेबी आणि माई )परिवार घ्यायचं ठरलं.
●...2011 ला पीएचडी रजिस्ट्रेशन झालं आणि 2012 ला वडील देवाघरी गेले 2013 ला मोठया बहिणीचे पती अचानक ऑफ झाले ...जबाबदारी घेण्याची सवय असल्याने प्रचंड ताण आला होता ..पीएचडीचं स्वप्न आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबरच अजून दोन ठिकाणची जबाबदारी आली होती ..त्यामुळे जीवदानी पॅटर्न सक्सेस करणे मुळात माझीच मोठी गरज होती.
एकत्र येण्याला मी " चिंतन शिबीर " असं नांव दिल म्हणजे पिकनिकला जातोय हाच फील कमी करून टाकला.
मुंबई -वसई आणि रत्नागिरी-खेड-चिपळूण अश्या दोन आयोजनासाठी समित्या तयार केल्या. पहिलं शिबिर रत्नागिरी समितीने घ्यायचं ठरलं साहजिक सनी आणि माझ्यावर जबाबदारी होती.लोकांना स्वतःच्या आयुष्याबद्दल चिंतन करायला लावणे आणि तेपण घरच्या माणसांना घेऊन खुप कठीण काम होत.
महेशसोबत बोलून दोन दिवसांच वेळापत्रक तयार करून घेतलं ...सनी सोबत हॉटेल कोहिनूर ला राहण्याची व्यवस्था केली.
जुलै 2015 चा दुसरा शनिवार आणि रविवार असं प्लॅन केलं
शनिवारी सकाळच मुंबईतुन महेश,पूर्वा,ओम आणि गायत्री आली. पण संकटं काही कमी नव्हती मोठी बहीण माईची तब्बेत जास्तच सिरीयस होती त्यामुळे माई, प्रीती आणि आई यायचं रद्द झालं.
●...पहिलं ओळखीचं सत्र सुरू झालं ..आणि सख्या भावाशीच पहिला मतभेद झाला तो मुंबईत MSEB मध्ये मॅनेजर पोस्टवर आहे आणि त्याच्या पिकनिक तोच अरेंज करत असतो ..तो पिकनिक स्टाईलने सत्र सुरू करत होता आणि मला एकमेकांची माहिती समजणं अपेक्षित होतं. तो नाराज झाला आणि मी फस्ट्रेशनमध्ये आलो ...मी सनीला समजून सांगितले मला काय अपेक्षित आहे ते आणि माझं म्हणणं समजून सांगण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि सर्वजन रिलॅक्स झाले ...महेश बोलला तुला काय करायचे आहे ते कळल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आणि इथेच चिंतन शिबिर 90% सक्सेस झालं होतं ...दोन सख्या भावांमधील मतभेद चुलत भावाने मध्यस्थी करून सुरळीत केले ...यालाच जुन्या काळातील संयुक्त कुटुंब पद्धती म्हणतात वाडीतील विषय वाडीतच मिटविण्याची "भावकी" ही सपोर्ट सिस्टीम होती ...तीच चिंतन शिबिरातून जीवदानी परिवारातून पुन्हा सुरू झाली होती. एकमेकांमधला "संवाद" वाढला..
( सहभोजनाचा आनंद )
●...सुनीलदादाचा मुलगा(अक्षत) डिग्री झाल्यावर नोकरी करणार होता कारण वडिलांची आर्थिक स्थिती ..पण शिबीराच्या "भविष्यातील योजना" सत्रात हे मुलाचे विचार कळल्यावर सुनीलदादाने पुढील शिक्षणासाठी तयारी दाखवली आणि अक्षत पुढील शिक्षण विशाखापट्टनमला घेत असताना जपानला जाऊन आला आणि आता अक्षत मोठ्यापगाराची नोकरी दुबईमध्ये सुरू करून आता भारतात आहे.
●...राजेशच्या राजकीय पायाभरणीसाठी सनीने आंबेडच्या ग्रामस्थांशी बोलण्यासाठी शाम आणि मला घेऊन गेला आणि केवळ 18 मतदार असूनही 20 वर्षांनंतर आंबेकरवाडीचा पहिल्यादाच ग्रामपंचायत सदस्य झाला आणि आज तो गावचा उपसरपंच आहे.राजेश ग्रॅज्युएट आहे आणि आम्ही सोबत आहोत म्हणूनच मुस्लिम मोहल्याने स्वतःची 100 एक मत असून सुद्धा आपला उमेदवार उभा नकरता ग्रामपंचायत निवडणूक नहोता उमेदवार बिनविरोध निवडून आले.जीवदानी संवादामुळे गावची शान वाढली.
●...गौरी,पूर्वा,दीप्ती (तिघी नर्स)यांच्या मेडिकल अवेरन्स लेक्चरमुळे अनेकजण आरोग्य संदर्भात अंतर्मुख झाले आहेत…
..गणेशचा योग ...जिज्ञासाच्या झुंब्बा ट्रेनिंगने शिबिराची रंगत येते आहे ..साक्षी, आर्या,सौरभ मदत करतात.
माझ्या इन्व्हेस्टमेंट (पैसा आणि माणसं) याचा मेळ घालणाऱ्या चर्चासत्राची अजूनही सर्वजण फॉलो करतात म्हणून सांगितात तेव्हा समाधान होते.
●...लता,बेबी,संध्या,अनिता,(या बहिणी)
गायत्री वहिनी ,गौरी, पूर्वा,सानिका,पूजा(या जावा)
दिपू ,प्रीती, (या भाच्या)
साक्षी,जिज्ञासा,सिद्धी,(या पुतण्या) आर्या मुलगी या सर्व महिलांचे मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले ही सर्वात मोठी गोष्ट होती.
●...पेवेकर भाऊनंतर माईचा (मोठी बहीण)मृत्यू झाल्यानंतर प्रितीचं लग्न करताना संपूर्ण जीवदानी परिवार यजमान झाला होता आज दोन्ही भाच्याचे नवरे शिबीर संवादातून मित्रा सारखे राहतात देवळेकरभाऊ,दिनेशदादा,अनिलदादा,सुनीलदादा यांचे प्रशांत-निलेश या नवीन जावयांशी आपुलकीचे संबंध झाल्याने दिपू प्रीतीचे मी आणि महेश पालक म्हणून त्यादोघी सासरी कश्या असतील असा येणारा ताण कमी झाला.
( संवादातुन चिंतनाकडे )
●...कधी कधी निर्माण झालेल्या जिव्हाळ्यामुळे मजेशीर गोष्टी होतात..एकमेकांची मने जपण्यासाठी स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेऊन समोरच्या मन राखण्यासाठी आवडी-निवडी स्वीकारतो ….
अशीच एक मजेशीर घटना ….
कार घ्यायची होती ..पहिली कार फारच काम काढायला लागली होती त्यातील दर्दी म्हणून सनीला बोललो ...सनी म्हणाला दादा माझी ड्रीम कार आहे मारुती सुझुकी ची सियाज ती घेऊया ...पण मला तर SVU मध्ये घ्यायची होती आपल्याकडील रोड आणि डस्टर रुबाबदार दिसते म्हणून मनात भरली होती ...सनी म्हणाला डस्टर म्हणजे दादा तो मला तर ट्रॅक्टर वाटतो ….सियास एकदम भारी आहे ...कारची मला अजिबात क्रेज नाही ...एक गरज म्हणून वापरायची म्हणून कोल्हापूरचा मित्र नंदू याला पीएचडी काम सुरू असताना बोललो होतो एखादी जुनी डस्टर बघ ...नंदूचा मित्र माने तो गाड्यांमध्ये दर्दी मॉडीफाय करून वापरण्यामध्ये एक्सपर्ट ….पण हा कोल्हापूरचा असाच पेंडिंग होता.
तो पर्यंत सनीने जोर धरून स्वतः च्या आवडीची सियास घ्यायला लावली आणि एक महिन्यानंतर नंदूच्या मित्राने डस्टरला मॉडिफाय केलेले फोटो पाठवले सनीला म्हणालो बघ काय नशीब ...आता डस्टर आली ...सनीची नवीन कार पेट्रोल असल्याने आणि त्याचा बांधकाम व्यवसाय असल्याने त्याची कार बदलायची होती ...मग मी जोर धरला सनी ही डस्टर घे मला खूप आवडली आहे ….आणि तो तयार झाला.. सनीचा फायनान्शियल प्रॉब्लेम माने आणि त्याने सोडून आज माझ्या आवडीची डस्टर सनीने घेतली आणि त्यांच्या आवडीची सियाज मी घेतली.
संवाद साधला की आपल्या आवडी निवडीही ऍडजेस्ट करतो हेच यातुन दिसते
पण संवाद नसेल तर गरज असूनही आपण ऍडजेस्ट करत नाही…
नोव्हेंबर 2015 च्या वसई येथे दुसऱ्या जीवदानीचे शिबिर सूरु असतांना एक चुलत भाऊ फायनांनशील प्रॉब्लेम असल्याने व्यथित असतांना दिसला…"भविष्यातील योजना" या आमच्या चर्चेत आर्थिक पाठिंबा विषयक चर्चा सुरू झाली आणि देवळकर भाऊ RDC बँकेत मॅनेजर असल्याने बचत गट तयार करण्यासाठी सल्ला दिला आणि बघता बघता आज " जीवदानी बचतगट " आमच्या परिवाराचे आधाराने ठिकाण झाले आहे. गणेश त्याचा चोख हीशोब ठेवतो आज एख्यादया कुटुंबाला 1 लाख तातडीने मिळू शकतात अशी व्यवस्था तयार झाली आहे.
( बचतगटाचा लेखा-जोखा )
विषेश म्हणजे गेल्या पाच वर्षात एकही आर्थिक व्यवहारातून ताण तयार झाला नाही ...कारण आम्ही ते व्यवहार बॅंकेच्या नियमात करतो ...तिथे अजिबात भावनिक विषय आणत नाही ...म्हणूनच सुरुवातीला ज्यांच्या आर्थिक अडचणी दिसत होत्या ते बचतगटाचे मेम्बरच झाले नाही आणि आम्ही आग्रह केला नाही
म्हणूनच आज जय जीवदानी ...जीवाला जीव देणारा परिवार तयार झाला आहे.
अजून खुप मोठी स्वप्न बघायला आता जीवदानी परिवाराचा सदस्य अजिबात घाबरत नाही ….कारण आहे जीवदानी तर का घाबरायचे.
अशी आहे ...नवीन जमान्यातील नवीन कुटुंब व्यवस्था .
..मग तुम्हीही प्रयत्न करा आम्ही नक्की मार्गदर्शन करू.
|| जय जीवदानी ||