95 ..एक मैत्रीचा महाकुंभ (सामाजिक संबध बदलणारी क्रांतिकारी व्यवस्था)
------------------------------------
आनंद आंबेकर
------------------------------------
95 म्हणजे नेमकं काय ?
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी मधील 1995 साली 11 ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असणारा ...
एक मैत्रीचा ग्रुप ... रत्नागिरीतील सोशल रिलेशन इंजिनिअरिंग करणारी व्यवस्था ... जीवनाची सपोर्ट सिस्टीम ... मैत्रीची हेल्पलाइन ... काय नेमकं काय आहे 95
हे मला पण अजून कळलं नाही..
अनेक कॉलेज आहेत त्यांचे असंख्य विद्यार्थी दरवर्षी कॉलेजचे माजी विद्यार्थी होतात ... असंख्य नवीन विद्यार्थी कॉलेजला येतात ... असंख्य विद्यार्थी कॉलेज पूर्ण करून जीवनाचा कॅनव्हास आपआपल्या परीने रंगवतात.काहींचे रंग साता समुद्रापलीकडे जातात ..तर काही सातांमध्येच (लिमीटेड मैत्रीत) सीमित राहतात तर काही साडेसाती (स्वतःच्याच प्रॉब्लेम)मध्ये अडकतात. महाविद्यालय संपल्यानंतर अशा किती बॅच पुन्हा एकदा नव्या उमेदीने ..उत्साहाने एकत्र येण्यासाठी आतुर असतात हे सगळीकडेच होतं. पण सातत्याने एकत्र येण्यासाठी आतुर असणारी 95 एकमेव जी फक्त स्नेहसंमेलन पुरती मर्यादित नराहता एकत्र येत राहतात ब्लड डोनर क्लब .. व्यावसायिकनी सवलत देणारे 95 मैत्री कार्ड ..सोशल डोनेशन ...आरोग्य शिबिर.. बिझनेस हेल्पलाईन.. आजी विद्यार्थी मार्गदर्शक व्यवस्था अश्या कायम नवीन आयाम घेऊन येते . मी गेल्या 20 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत असताना अशी ही एकमेव 95 बॅच .
*असं का होतं हे मला अजून नाही कळलं* .
95 खरंतर एका वर्षाचे.. एका शाखेचे ...एका ऍक्टिव्हिटीचे.. विद्यार्थी नव्हे .. खरं म्हणजे हे कॉलेजमध्ये असताना मित्र सुद्धा नव्हते .पण आज 95 ही प्रत्येक मेम्बरची जणू काही हेल्प लाईनच झाली आहे. 95 मध्ये ऍक्टिव्ह असणारा प्रत्येक मेम्बर स्वतःच्या जीवनात कितीही व्यस्त असो ..पण 95 चा विचार दिवसातून एकदातरी निघतोच .. म्हणून तर इतर उपहासाने म्हणतात तुमच्या 95 वाल्यांच मस्त चालू असतं .. मग ते राजकीय क्षेत्रातील असो ...की कॉलेजचा 18 वर्षाचा विद्यार्थी असो .
95 वाले केवळ मजेसाठी एकत्र भेटण्याच्या वेळेपुरतेच फक्त एकत्र येतात असं नाही ... तर सर्वच जीवनाच्या क्षणाचे सोबती झाले आहेत.
*95 वाले असे का वागतात ..हे अजून नाही कळलं.*
..पण एव्हढं बाकी नक्की झालं आहे की ... जीवन जगत असताना ..अनेक प्रसंगातुन जात असताना 95 जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.
म्हणूनच ....
*95 जिंदगीके साथभी जिंदगीके बाद भी*
