गोगटे कॉलेजमधील माझे मोटिव्हेटर प्रा. कै.संजय जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोगटे कॉलेजमधील माझे मोटिव्हेटर प्रा. कै.संजय जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ७ जून, २०२०

बेस्ट मोटिव्हेटर.. कै. प्रा.संजय जोशी

----------------------------------------
बेस्ट मोटिव्हेटर.. कै.प्रा.संजय जोशी
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
7 जून 2020
----------------------------------------
गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरीच्या अनेक आघाड्यांवर अग्रेसर नांव असायचं म्हणजे कै. प्रा.संजय जोशी. महाविद्यालयात ते उपप्राचार्य ..समाजशास्त्र विभागाचे प्रमुख ..NSS चे कार्यक्रम अधिकारी.. रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक ..अश्या अनेक भूमिकेत जोशीसर भेटले. 
... पण माझ्यासाठी ते माझे मोटिव्हेटर म्हणूनच जास्त भावले. FY ला महाविद्यालयात प्रवेश घेतल्या नंतर अनेक Extra ऍक्टिव्हिटी चे प्रवेश सुरू झाले होते. 8 वी ते 10 वी स्काऊट चा विद्यार्थी असल्याने NSS मध्ये भाग घ्यायचं नक्की केलं. 12 वीला याच कॉलेजमध्ये असल्याने आणि त्यात 12वीला असताना 3 दिवसांची गोवा ट्रिप यशस्वी आयोजन केल्याने आत्मविश्वास जबरदस्त वाढला होता.nss ऍडमिशन होण्यासाठी वेगवेगळ्या रूममध्ये बोलण्यात आलं मी रूम नंबर 15 मध्ये होतो. समोर जोशी सर होते ..सर म्हणाले इकडे ये नवीन आहेस ना ...बोल काय येत तुला मी म्हटलं सर मी रूम नंबर 2 मध्ये बोर्ड लिहिण्याचं दाखवून आलो आहे. बर ठीक आहे ...एका दुसऱ्या मुलाला उठवलं तो TY चा राजेश सुर्वे होता (अगोदर ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता) सर म्हणाले तुम्ही दोघे भाऊ आहात असं समजा आणि तुमचं भांडण सुरू आहे असं ऍक्टिग करून दाखवा.... ऍक्टिग आणि मी अंगावर काटा आला होता ..मी 5 वीत असताना गुरुजींचा मुलगा म्हणून कृष्ण होऊन मोठया मुलींच्या (शाळेत असताना माझ्या उंचीच्या मुली नसल्याने कायमच मला मी लहान असल्यासारखं वाटायचं आणि गुरुजींचा मुलगा म्हणून लाड करून घ्यायचो )मध्ये बासरी घेऊन उभं केलं होतं..एव्हढाच काय तो स्टेजचा अनुभव पण आज जोशीसरांनी विचार करायलासुद्धा वेळ दिला नव्हता...
आमची वेळ आली आणि आम्ही दोघांनी काय केलं ते केलं ...डोळ्यासमोर पांढरा पडदा आला होता..टाळ्या वाजायला लागल्यावर संपलं वाटत याची जाणीव झाली ...बाकी विद्यार्थी भारी केलात रे असं म्हणत होते...पण माझी काय अवस्था झाली  होती ते मलाच माहीत. सर्वांच्या मुलाखती झाल्या आणि जोशीसरांनी मला nss कलापथक ग्रुपचा प्रमुख केला. जोशीसरांनी त्यावेळी माझ्यात काय पाहिलं कुणास ठाऊक पण तोच विश्वास घेऊन गेली 12 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी जिल्ह्यातील सर्व  कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात मोटिव्हेट करायचे काम करत आहे. 
जिल्ह्यातील इतर कॉलेजमध्ये काम करण्याची संधी सुद्धा जोशीसरांनीच सर्व प्रथम दिली होती. Nss चे जनजागृती अभियान मुंबईमध्ये होणार होते .. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये 2 ते 3 विद्यार्थी सहभागी करून एक जनजागृतीचा कार्यक्रम करायचा होता . 
मी TY ला होतो ..आमच्या कॉलेजची 2 मुलं मलाच सिलेक्ट करायची होती. FY ला विद्यार्थी निवडणूका झाल्या होत्या माझ्या विरुद्ध 11 जण उभे होते. खूप राडे ..भानगडी.. धमक्या..आमिष ....शेवटी मी निवडून आलो होतो  
यामुळे स्वतःचा महाराजा ग्रुप तयार झाला होता...ग्रुपला सांभाळण्यात जास्त वेळ जायचा..माझ्यासमोर धर्मसंकट होतं त्यातील बरेचशे कलाकार मित्र SY आता nss ला आले होते ...पण मला व्हर्सटाईल आणि हुकमी कलाकार निवडायचे जाते . मी अजिबात मागे पुढे नबघता कार्यक्रम ऊत्तम होण्यासाठी  गाणारा..ऍक्टिग करणारा आणि ढोलकी वाजवणारा सचिन लांजेकरची निवड केली आणि ऍक्टिग चा हुकमी एक्का गुरू शिवलकर येणार होता.जोशीसरांची विश्वास टाकण्याचा गुण जबरदस्त होता ..तो आम्हाला प्रामाणिक रहायला भाग पाडायचा.. आणि प्रेशर सुद्धा यायचे.
ती रात्र आठवते ...
माणगांवला सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी एकत्र आले होते ..ओळख सुद्धा नव्हती .. जोशीसरांनी स्क्रिप्ट दिल ...रात्री 10 वाजेपर्यंत काहीच जमत नव्हतं ..सरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं सर नाराज होते ..नंतर सर निघून गेले  रात्री मी जाबडत उठलो ..गुरू म्हणाला काय झालं .. नाही रे सर नाराज आहेत आपल्याला काय जमत नाही. मग आम्ही सर्व मेन रोल आमच्या तिघांकडे घेतले आणि नझोपता प्रॅक्टिस सुरू केली. 
दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स होता .. आमचा शेवटून 2 नंबर होता ..मुंबईच्या पोरांचे कॉन्फिडन्स बघून आमची गावठी पोरं बिथरली होती. जोशीसरांचा नाराज चेहरा डोळ्यासमोर सतत येत होता .. जिल्यातील सर्व पोरांना एकत्र केलं आणि नाटकाच्या भाषेत जोरात पेटवलं ..परफॉर्मन्सच्या अगोदर सर आले ...जोरात करा ..घाबरू नका... मी सरांना म्हटलं ..सॉरी सर थोडे बदल केले आहेत... सर म्हणाले आता त्याचा विचार करू नका बिनधास्त करा..., बास सर भेटून गेले होते.. पोरं एकदम पेटली होती
..., आणि जो काही परफॉर्मन्स झाला ... जोरदार टाळ्या ..शिट्या  
दुसऱ्या दिवशी तर कलाम झाली होती मुंबई सकाळ पेपर ला आमच्या परफॉर्मन्सचा फोटो आला होता (अजून जपून ठेवला आहे).मुंबई मधील पेपर सुद्धा जोशी सरांनी आणून दिला होता.
...जोशीसरांची विश्वासाने विश्वास वाढविण्याची हिम्मत आज ही अनुकरण करायला लावते.
आज जोशीसर हयात नाहीत ..पण एक मोटिव्हेटर म्हणून सतत सोबत असल्याची जाणीव होते ...आणि नकळत त्यांच्या सारखं मोटिव्हेटर होण्याची प्रेरणा मिळते.

परिचारिका ...एक अनमोल सेवा

परिचारिका ( नर्स )..एक अनमोल सेवा   -------------------------------- प्रा.आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 26 जून 2020 ------...