(प्रसिद्ध मराठी अभिनेता)
--------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
20 जून 2020
--------------------------------------
आज वैभवचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐
----------------------------------------
आम्ही SY ला असताना...अचानक कॉलेज कट्टयावर बातमी आली.. बाहेरच्या कॉलेज सोबत सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत आणि आपल्या कॉलेजचे इव्हेंट बसवायचे आहेत तर सायन्सच्या वैभव मांगले सोबत काम करायचं आहे. बिपीन शिवलकर पटकन म्हणाला ...कोण वैभव ..तो नटसम्राट(FY ला वैभवने नटसम्राट चा एकपात्री करून दांडेकर मानचिन्ह स्पर्धा जिंकली होती) ..ए नको तो लय शाना हाय ...आपलं जमायचं नाय त्यांच्या सोबत..
आपलं NSS बरं आहे. मी म्हटलं जाऊन तर बघूया .. काहीतरी विशेष असणार ...कारण पण तसंच होत...
1994 साली म्हणजे मुंबई विद्यापीठाचा 28 वा युवा महोत्सव.पहिल्यांदाच झोनल (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) सांस्कृतिक स्पर्धा होणार होती. विशेष म्हणजे आमच्या गोगटे कॉलेजमध्ये होणार होती. सांस्कृतिक विभागाचे विजयकुमार रानडे सरांनी जबाबदारी घेतली होती. आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंटला गेलो ..वैभव व्हाईट ऍप्रन घालून प्रॅक्टिकल वरून आला होता.
चर्चा सुरू झाली....
मुकाभिनय बसवायचा होता..रानडेसरांची कल्पना होती त्यावर्षी 'तंदुरकांड हत्याकांड' झाला होता त्यावर बसवुया ... आम्हाला पथनाट्य आणि एकांकिका या पलीकडे काहीच माहिती नव्हतं. वैभव पट्टीचा ऍक्टर होता ..पण जुळून घेणं मुश्किल होतं. रानडे सर असल्याने ते मुश्किल काम सोपं झालं होतं.
मी ,बिपीन,वैभव, सोनाली बापट(आताची सावंत तेव्हा पण ती सावंत होती पण अधिकृत नव्हती.. तिचा मित्र असल्याने नाटकात काम करणं सोपं जायचं ...नाहीतर नाटकात काम करायला मुली कुठे भेटायच्या) केवळ नाटकात काम करण्याच्या तयारीमुळे शक्य झालं.
गंमतच तशी होती..
मुकाभिनयमध्ये असा सीन होता ....
बायकोचा तिच्या प्रियकरासोबत रोमान्स बघून तिचा नवरा संतापतो आणि तिचा खून करतो ..इतका क्रूर पणे की , तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून तंदूरभट्टीत टाकतो ...
बायको..सोनाली
नवरा ..वैभव मांगले
प्रियकर..मी
सोनालीसोबत तो रोमान्स सिन सरांना पाहिजे होता तसा माझ्याकडुन होत नव्हता आणि दुसरीकडून वैभव अभिनयाने आग ओखत होता...
वैभव मला म्हणाला मेल्या कसला लाजतोस ...
शेवटी सोनालीनेच पुढाकार घेऊन मला कम्फर्ट केलं.
मग सरांनी सीन ओके केला ..शेवटी
प्रॅक्टिस पूर्ण केली आणि मुंबईत यायची वेळ आली. ट्रेन नव्हती.. एसटीतुन प्रवास करत मुंबई गाठली ...पण मुंबईत गेल्यावर आम्ही किती मागास आहोत याची जाणीव झाली होती ..मेडल सोडा आमच्या माईम इव्हेंटच्या टेक्निकल बाजूची खुपच चर्चा झाली होती.
वैभवने B.sc नंतर D.Ed केलं आणि नगरपरिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याशाळेत बीपीन शिवलकरची आई शिक्षिका होती...त्यावेळी बिपींनची अचानक भेट झाली ...
वैभव शिक्षकाची नोकरी करत असताना स्टार थिएटर मधून चांगल्या एकांकिका करण्याची सुरुवात केली. तिथे मनोज कोल्हटकर, अप्पा रणभिसे,समीर इंदुलकर, प्रफुल्ल घाग यांची चांगलीच भट्टी जमली .. त्या काळात रत्नागिरीला उत्तम एकांकिका बघायला भेटायच्या मी 1999 पासूनच गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून हजर झालो होतो ...रानडेसरांनी आवर्जून सांस्कृतिकमध्ये सामावून घेतले ....आणि मग कधीही थिएटर मध्ये न मिळालेलं मेडल मिळविण्यासाठी सांस्कृतिक मंडळाची जमवाजमव सुरु केली.... पुढे पुढे कल्चरलवाले आंबेकरसर अशीच ओळख झाली. त्यावेळी वैभवच्या एकांकिका बघायला नक्की यायचो. अचानक वैभवने शिक्षकाची नोकरी सोडून कलाकार म्हणून काम करण्यासाठी मुंबईत गेला.
तेव्हा आम्ही त्याला वेड्यात काढलं.
चांगली शिक्षकाची नोकरी सोडून जाण धाडसाचं होतं.
पण कायम त्याची प्रगती बघून कॉलेजमध्ये त्यांच्या सोबत घालवलेले दिवस आठवायचे
...वैभव सुंदर गातो म्हणून ..मिडियामध्ये त्याचं कौतुक व्हायचं..
पण आम्हाला त्याच गाणं माहीत होतं .."उधळीत शतकिरणा" स्फुर्ती गीत एकत्र गायलं होत त्यामुळे त्याची गायकी माहीत होती. पण लॉकडाऊन मध्ये वैभवनी काढलेली सुरेख चित्र बघून थक्क झालो ...म्हटलं हे अजबच व्यक्तमत्व आहे. जसं अभिनयामध्ये कोणत्याही शेडचा रोल करतो तसच कलेमध्ये सर्वोत्तम करतो. म्हणूनच रत्नागिरीतील पहिलं प्रॉडक्शन म्हणून झी मराठीवर प्रफुल्ल घाग नी जबाबदारी घेतलेले "एक गांव भुताचा " ही सिरीयल केवळ वैभवने पुढाकार घेतल्याने साकार होत आहे..नाहीतर कोणीही स्वप्नात सुदधा पाहिलं नव्हतं की, रत्नागिरीतुन प्रॉडक्शन होऊ शकतं.
वैभवला अशीच चॅलेंजिंग काम करण्यासाठी मनापासून शुभेच्छा !!!!