●बापू ....समर्पित व्यक्तिमत्त्व
●प्रा.आनंद आंबेकर
●गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
१ ऑगष्ट २०२०
-------------------------------------------------
💐💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
मी 1990-91 ते 19995-96 गोगटे कॉलेजचा विद्यार्थी
1999 ते आज तागायत गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक
या काळात बापू कधी सोबत नव्हता
असा विचार करून सुद्धा सापडणार नाही
मी प्राध्यापक आणि बापू ऑफिसचा माणूस
ही खरी आमची पगारी ओळख
..पण या व्यतिरिक्त कामातच आम्ही दोघे जास्त बिझी
बापू कॉलेजच्या मॅनेजमेंट(सर्व) मध्ये ...
मी कॉलेजच्या इव्हेंट मॅनेजमेंट (फक्त) मध्ये
…...केवळ हाच आमच्या दोघातील कॉमन फॅक्टर
काम आणि त्यातील समर्पन हे मी बापू कडे बघून बघून पचवतो ...हा समर्पन पचवावच लागत ...नाहीतर सगळीकडेच बोंब
सर्वात महत्त्वाचे प्रिया (बापूची पत्नी) … बापूच्या समर्पनाला प्रियाची साथ नसेल तर दोलायमान स्थिती झाली असती ...काही दिवसांपूर्वीच अनुष्काने (बापूच्या मुलगी) SSC ला 97% मार्क मिळून दोघांनाही आयुष्यभराच खूप मोठं समाधान दिलं ….आवर्जून बापूने फोन करून सांगितले यांचा आनंद खुप झाला.
आनंदात सहभागी करून घेण्याचा मनाचा मोठेपणा बापूचा नेहमीचा स्वभाव. नवीन गाडी घेताना आम्ही अनेक मित्र सोबत होतो ….घर घेताना तर आम्ही 3 वर्ष रत्नागिरी पालथी घातली ...शेवटी आम्ही दोघे नाचण्यात एकाच ठिकाणी रहायला आलो.बापूला गाड्यांची विशेष आवड असल्याने चांगली गाडी दिसली की लहान मूलांसारखा त्या गाडी सोबत फोटो काढणार
म्हणूनच मी 10 वर्षांनी लहान असून सुद्धा त्यांच्या सोबत मित्रासारखा राहू शकतो ...मनातील सर्व शेअर करू शकतो...
काळजी घेणारा माणूस सर्वांचीच काळजी घेत असतो ...समर्पित असणारा व्यक्ती सगळीकडेच समर्पित असतो कारण त्याचा तो स्थायी स्वभाव असतो.
बापू त्याला अपवाद नाही.
कॉलेजमध्ये जितका बापू आपला वाटतो तितकाच त्याच्या कॉलेज मित्रांसोबत सोबत सुद्धा बापू घरचा वाटतो. कोणत्याही मित्राला बर नसेल तर बापू तिथे हजर असतोच ….इतकंच काय कोल्हापूर ...पुणेमध्ये जाताना स्वतः ड्रायव्हिंग करून जाणार
म्हणूनच बापू जेव्हा डेंगूने आजारी होता तेव्हा डेरवण हॉस्पिटलमध्ये लोकांची मोठी रांग लागली होती
बापूला रक्त देता आलं नाही म्हणून वाईट वाटून घेणारे मित्र होते ….कारण बापूसाठी रक्त देणारे भरपूर झाले होते. माणसं कमविण्याची कला बापूकडे अफलातुन आहे. लोकांच्या प्रसंगात धावून जाण्यासाठी बापूची एक सिस्टीमच बनवलेली आहे.
बापूच्या आयुष्यातील आदराचे स्थान म्हणजे अरुअप्पा जोशी 1995 ते 2008 पर्यंत अप्पांच्या प्रत्येक नियोजनात बापू नाही असं कधीच झालं नाही
कॉलेजचा विकासाचा विषय असेल ….कुसुमताई पतसंस्था काढायची असेल ...भाजप पक्ष विस्तार असेल… सगळीकडे अप्पाच्या सोबत बापू असायचाच
म्हणूनच 2008 नंतर बापूच्या कामात हक्काचं ….आदराचं स्थान गमावल्या सारखं कायम त्याला वाटत असतं. पण तरीही संस्था म्हणून कोणीही अधिकारात व्यक्ती आला तर बापू सोबत असतोच हीच त्याच्या कामातील समर्पित वृत्ती दिसून येते.
बापूचे आणखीन एक विशेष कौशल्य म्हणजे त्याचे लिखाण कर्माने क्लार्क परंतु स्वभाव धर्माने कलाकार म्हणूनच नाटक ..संगीत ..यामध्ये कायमच रमणारा स्वतःच्या काळबादेवी गावाच्या अनुभवाची लेखणी सर्वानाच भावते ...विषेश भंडारी भाषेतील त्याचं लिखाण आपलंसं करत ….
बापूला कधीकधी मतलबी माणसं भेटतात तेव्हा नाराज असतो ...पण नाराजी सुद्धा त्या मतलबी व्यक्तीच्या आयुष्यात वाईट दिवस येतील तेव्हा त्यांच्यासोबत कोण असणार या काळजी पोटी असते …
म्हणूनच मी सुद्धा माझ्यावर असे प्रसंग आले की बापूकडे मन हलकं करायला जातो.
असाच एक प्रसंग …2013 साली
माझ्या मोठया बहिणीच्या घराचा प्रश्न होता
बापूला सहज बोललो भावजीनी मला विश्वासात घेतलं असत तर मोठा प्रसंग टळला असता (घराच्या व्यवहारातच भावजीची ठेथ झाली होती ) सर्वच जबाबदारी माझ्यावर आली होती ..एकीकडे पोलीस तपास ...दुसरीकडे बहिणीची तब्बेत ….तिसरीकडे घराच्या परवानगीचा प्रश्न ...मन सैरभैर झाले होते
बापू म्हणाला आपण संपाला बोलू ...संपा म्हणजे नाचणे गावचं आदराच व्यक्तिमत्त्व म्हणजेच संतोष सावंत
आम्ही गेलो ...संतोषनी मलाच वेड्यात काढलं अगोदर का आला नाहीस ...म्हटलं भावजीनीच मला विश्वासात घेतलं नाही तर तुला मी काय सांगणार …
भावजी अनेक बड्या लोकांकडे जाऊन आले होते
..पण घोळ काही सुटत नव्हता
बापू म्हणला झालं ते झालं आता आनंद टेन्शनमध्ये आहे त्याच्यावर सर्व जबाबदारी आली आहे ...म्हणून मी आलोय
...संतोषनी लक्ष दिल्यावर सर्व गोष्टी सुरळीत झाल्या
या दोघाच्या मैत्रीमुळे मला रिलॅक्स होता आलं होतं
माझ्या दोन्ही भाच्या म्हणतात मामा तू होतास म्हणून आज आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला येऊ शकतो ….पण बापू नसता तर संतोषनी लक्ष दिलं नसतं आणि संतोषनी मनापासून लक्ष दिलं नसतं तर आज हक्काचं घर मिळालं नसतं बापूच्या या मनापासून मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्यासारखे किमान शेकडो लोकं तरी निर्धास्त आपले प्रश्न त्याच्यासमोर घेऊन जाऊन बापू आपले स्वतःचे वैयक्तिक संबंध मध्ये घालून लोकांचे प्रश्न सोडवत असतो अशा समर्पित बापूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!