आई
---------------------------------
आनंद आंबेकर
---------------------------------
किती वेगवेगळ्या रुपात दिसली असेल कुणास ठाऊक ...प्रत्येक वेळेस नउलघडलेले कोडच जणू. त्यामुळे तीच आणि माझं अनेक वेळा खटकतंच...कारण मी फक्त माझी आई म्हणून तिच्यावर हक्क गाजवायला जातो ..पण तिचा गाजावाजा तर सगळीकडे असतो
....पुतण्यांची काकू हवी असते
....भाच्यांची मावशी/अक्का हवी असते
....वाडीची/गावाची मास्तरीन (वडील शिक्षक असल्याने आईला मास्तरीन म्हणायचे) हवी असते
....तर संगमेश्वर तालुक्यात आणि त्याबाहेर आंबेकरबाई (मी लहान असताना ग्रामपंचायत सदस्य आणि मी कॉलेजला असताना पंचायत समिती सदस्य असल्याने 'आंबेकरबाई म्हणायचे ) हवी असते.
...मग बोला आम्हाला आई म्हणून कधी भेटणार ...
मग खटकणारच ना
..पण त्या खटकण्यात आकस..मत्सर किंव्हा राग नसतो आम्हाला हवंहवंसं वाटणार प्रेम (ती फक्त आमची असावी म्हणून ) असतं.
पण आईच भारी ... तिथं असते त्यांची ती असते म्हणून ती नाबाद 80 वर्षाची आहे.
माझा जन्म दोन बहिणींच्या नंतर झाला ..सरकारने दोन मुलांमधील आदर्श अंतर 3 वर्षाचं सांगितलं..पण माझा जन्म होईपर्यंत दोन मुलांमधील अंतर 6-6 वर्षाचं होतं म्हणजे माझी मोठी बहीण माई आणि माझ्यात 12 वर्षाचं अंतर होतं त्यामुळे मी घर आणि बाहेर (आई वडील यांचे सामाजिक संबंध खुप असल्याने)फेव्हरेट.माझ्या जन्माची आणि बालपणाच्या गोष्टी गांव.. नातेवाईक..मित्र अगदी माझ्या मुलांनाही आईने तिखटमीठ लावून चांगल्याच रंगऊन सांगितलेल्या.
माझ्या जन्माची गोष्ट सांगतो म्हणजे माझ्या आईच्या स्वभावाचे अनेक पैलू उलघडतील.
दोन मुली आणि नंतर मी सुद्धा 6 वर्षाने झालो तेव्हा घरात (घर म्हणजे सख्ये चुलत 11 काका) तेव्हा असच कुटुंब असायचं आणि निर्णय सुद्धा एकत्र घ्यायचे (यांच संस्कारामुळे आजही आंबेडबाबत आम्ही 21 भाऊ एकत्र आहोत) ..घरी काका काकूंमध्ये चर्चा सुरू झाली मास्तरला आपल्या मुलांपैकी कोणाचातरी मुलगा दत्तक द्यायचा.
...मग काही माझें चुलत भाऊ आईला मस्का लाऊ लागले ए काकू मला घे ना गं .(..मग इतर काकूं म्हणायच्याच मास्तरीन आमच्या पोरांवर काय जादू करते कुणास ठाऊक ) मुळात व्हायचं असं.. माझे मामा गुरू पंथातील असल्याने प्रवचन करायला गावोगावी जायचे आणि आई लहान असल्याचे सोबत जायची त्या ऐकलेल्या सर्व कथा या पोरांना सांगायची म्हणून काकू सर्वांची फेव्हरेट.
आई म्हणायांची तुम्ही सर्व माझेच आहात. सुदैवाने मी जन्माला आल्याने कोणाला दत्तक घ्यायचे हे धर्म संकट टळले.
मामा मंत्रालयात कामाला होता खुप लवकर मृत्यु झाल्याने आजोळी सुद्धा अक्का शिवाय पान हलायचे नाही .
मी सातवीत असताना वडील मुख्याध्यापक होऊन खेड मध्ये सापीर्ली गावात रहायला गेले त्यामुळे घर, वाडी, गांव सगळीकडेच आई लक्ष द्यायला लागली.
अतिशय प्रेमळ पण तेव्हढीच कणखर लीडर अनेक वेळा पाहिली आहे.
......अचानक वाडीत मोठ्याने आवाज ..रडारड सुरू झाली आम्ही जेवायला बसलो होतो. एक बाई धावत धावत घरी आली मास्तर्ने ---- (मुद्दामच नांव घेत नाही कारण ती व्यक्ती आता अजिबात दारू पित नाही) मेल्याने बायकोच्या मानेवर कोयती ठेवली आहे.. वाडीत एका सराईत दारू पिणाऱ्या बेवड्यांने कांड केला होता.. चल लवकर नाहीतर आज खुन पडणार .. ताटावची आई लगेच उठली आणि मी पण.. (10 वर्षाचा असेन) आईला बघिल्यावर तो बऱ्यापैकी शांत झाला पण मानेवरची कोयती काय काढायचं नांव घेत नव्हता ..आईने उलट केलं त्याला समजवल नाही त्याच्या बायकोला ठेवणीतील चार पाच शिव्या हासडल्या त्याची आक्रमकता कमी झाली बोलताबोलता त्याच्या हातातील कोयती आईने कधी काढून घेतली कोणालाचं कळलं नाही ...पण कोयती आईच्या हातात आल्यावर बेवड्याच्या कानाखाली जोरदार मारलेला आवाज सर्वांनीच ऐकला होता.... आणि तो थरार संपला होता.
मी 11 वी ला असताना पंचायत समितीमध्ये आई एकतर्फी निवडून आली ..मी मतदान मोजायला सुद्धा देवरुखला होतो. ते आईचे रूप वेगळेच असायचं निवडणूक लढे पर्यंत काँग्रेसची आणि प्रथमच सत्ता शिवसेनेची आली होती. आईचा सर्वसमावेशक स्वभाव असल्याने आणि लोकांची कामे सर्वांकडून व्हायचीत आणि तिला आदरही मिळायचा.
2012 ते 2016 या काळात वडील ..चुलतभाऊ.. बहिणीचे पती नंतर बहीण हे सर्व आम्हाला सोडून देवाघरी गेले आयुष्यात कधीही भरून निघू शकत नाही अशी पोकळी झाली आहे ....
पण प्रत्येकवेळी आई इतकी खणखर आणि संयमी राहल्या मुळ्येच हे सर्व प्रसंग पेलू शकलो.
*आयुष्यभर माणसं जोडत राहण्याने आयुष्यात कधी आलेल्या प्रसंगात कोणासमोर हात जोडावे लागत नाहीत* ...हेच आईकडून शिकलो.
-------------------------------------------------------------------
English Translation....
Mother
---------------------------------
Anand Ambekar
---------------------------------
Who knows how different it may look ... it's like a code unfolding every time. So she and I have to fight many times ... because I only go to claim her as my mother..but her noise is everywhere
.... I want a nephew's aunt
.... nieces want aunts / uncles
.... Wadichi / Village Masterin (Mother is called Masterin as father is a teacher)
.... So in Sangameshwar taluka and beyond I want Ambekarbai (I was a Gram Panchayat member when I was young and a Panchayat Samiti member when I was in college).
... then tell me when will you meet us as a mother ...
Then don't worry
..But there is no jealousy or anger in the fight .. we have the love we want (just because it should be ours).
But the mother is heavy ... they have her there, so she is unbeaten 80 years old.
I was born after two sisters..the government said the ideal distance between two children was 3 years..but when I was born the distance between two children was 6-6 years so my elder sister Mai and I were 12 years apart so I was at home and out (parents) Since there are a lot of social connections) Favorites. My birth and childhood stories of the village .. Relatives .. Friends even my children were told by my mother with salt and pepper.
Telling the story of my birth means that many aspects of my mother's nature will unfold.
Two daughters and then when I was 6 years old, there was a family in the house (house is number of cousins 11 uncles) and we used to make decisions together (due to this rite we still have 21 brothers together about Ambedkar). Someone used to adopt a son.
... Then some of my cousins started making fun of my mother. Auntie, don't take me. My aunt used to tell these kids all the stories I heard when my mother was young.
Mother, you are all mine. Fortunately, since I was born, the religion crisis over who to adopt has been averted.
Mama was working in the ministry and died very early.
When I was seven, my father became the headmaster and moved to Sapirli village in Khed, so my mother started paying attention to my house, wadi and village.
Very loving but just as strong leader seen many times.
...... Suddenly there was a loud noise in the village .. Radar started we were sitting down to eat. A woman came running to the master's house ---- (deliberately does not take the name because the person does not drink alcohol anymore). ..Tatav's mother got up immediately and so did I. No one knows when his mother took the scythe out of his hand ... but when the scythe came into his mother's hand, everyone heard a loud banging sound under Bewda's ear .... and the tremor was over.
When I was 11th, my mother was elected unilaterally in the Panchayat Samiti. I was also in a hurry to count the votes. The mother's form was different. Until the election, the Congress and for the first time, the Shiv Sena came to power. Because of her inclusive nature, she was respected and respected by all.
Between 2012 and 2016, father, cousin, sister's husband, then sister left us all and went to God's house. There is a void that can never be filled in life ....
But every time my mother was so strong and patient, we were able to play all these events.
* By connecting people all their lives, they don't have to join hands in front of anyone in any event in their life * ... This is what I learned from my mother.