मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

नागपुरातील क्रिकेटवाले आंबेकर - एक राष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थापक



नागपुरातील क्रिकेटवाले आंबेकर - एक राष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थापक 


लेखक - डॉ.आनंद आंबेकर 

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 

दिनांक - 25 नोव्हेंबर 2025

__________________________________


     सिताराम आंबेकर म्हणजेच..अण्णांचा आज स्मृतिदिन.. आमच्यातून जाऊन २ वर्षे झाली पण कधी विस्मृती झाली असे झाले नाही.नात्याने काका 

….पण आयुष्यातील आयडॉल म्हणून ज्यांना पाहून मी अनेक गोष्टी अनुकरण केल्या. अण्णा एक..सर्वोत्तम व्यावसायिक.. कुशल संघटन .. उत्तम क्रिकेटर…उत्तम सामाजिक संघटक …उत्तम कुटूंब वत्सल..उत्तम मित्र करण्याची कला (मग तो कोणत्याही वयाचा असो) अण्णा सर्वांचे फेव्हरेट.

      आंबेड गावी तीन वर्षांनी भवानी देवीचा गोंधळ असतो..सहज आणि आवर्जून चौकशी व्हायची ती फक्त अण्णा कधी येणार आहेत. 

लहानपणी आम्ही रस्त्याला डोळे लाऊन बसायचो.. लहान भाऊ महेश अबोल (लहानपणी होता आता नाही ) सतत सोबत असायचा.. कोणीही व्यक्ती आईशी चौकशी करताना आनंद महेश कशे आहेत.. अशी एकत्रित चौकशी होते.. दोनच वर्षापूर्वी अण्णाच्या काय मनात आले कुणास ठाऊक ? रुबीला सांगितले आनंद महेश यांना मला  टी-शर्ट घ्यायचे आहे आज ती एक छोटीशी गिफ्टमुळे त्यांची आठवण  येते आम्ही फॅमिली नागपूरला तीन वर्षापूर्वी गेलो तेव्हा काकूने नागपूरमध्ये जिथे अण्णा खादी शर्टपिस घेतात तसे मला शर्ट पीस घेतले आणि सेम अण्णासारखे  शर्ट शिवून घे असे सांगितले या छोट्या गोष्टीत त्यांचे प्रेम  मनाला हळुवार बनवते..

   आंबेडमध्ये आमच्या  शेजारी जवळ जवळ 70 ते 80 मुस्लिम घरे आहेत सर्वांशी अगदी घरचे संबंध .. त्यातील बरेच जण गल्फ मध्ये कामाला आहेत.गावातील आवडता विषय म्हणजे मे महिन्यामध्ये क्रिकेट मॅच व्हायच्या मी  चौथी मध्ये असेल. गावात पहिल्यांदाच गल्फ मधून पैसे पाठवून सीझन बॉल क्रिकेट सुरू झाले …ते हेल्मेट .

पायाला पॅड आणि तो जड बॉल हे सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा पाहिले . एक मैत्रीपूर्ण सामना झाला त्याच्यामध्ये अण्णांनी उत्तुंग मारलेल्या षटकार आजही डोळ्यासमोर आहे.अण्णा त्यावेळी साधारण 45 वयाचे होते. त्यावेळी त्यांचे पहिले क्रिकेटप्रेम आम्हाला दिसले आणि संपूर्ण गाव त्यांचा फॅन झाला .परंतु हा माणूस राष्ट्रीय इंडियन क्रिकेटसाठी काम करतो हे कोणाच माहित नव्हते. लेडीज क्रिकेटसाठी 1995 च्या दरम्यान वुमन्स क्रिकेट टीमचे राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणून विदर्भ भागातून काम करत होते . अण्णांचा नागपूर मध्ये स्वतःचा क्लब आहे.तो आजही चालू आहे.त्यांचे अनेक क्लबचे क्रिकेटर नंतर भारतासाठी खेळले .त्यावेळी अनेक इंटरनॅशनल टूरमध्ये व्यवस्थापक म्हणून अण्णा वुमन्स क्रिकेट सोबत जायचे. आज महिला वर्ड क्लब जिंकला तेव्हा अण्णा हवे होते असे वाटते.

     क्रिकेट क्लबचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी शरद पवार क्रिकेट राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर काम केले त्यांच्या समितीमध्ये सिताराम आंबेकर म्हणजे  अण्णा  सदस्य होते लेडीज व पुरुष क्रिकेटर साठी निवृत्त झाल्यानंतर वयाच्या 50 व्या वर्षी दहा हजार पेन्शन सुरू करण्याच्या निर्णयांमध्ये अण्णांचा सक्रिय सहभाग होता आणि तो निर्णय शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना झाला .अण्णांचे क्रिकेटप्रेम आणि व्यवस्थापनाचा जवळून अनुभव घेतला होता .

   

     मी कॉलेजला आल्यानंतर स्वतःचा महाराजा ग्रुप त्यांच्याच कल्पनेतून मेंटेन्ड केला. आज ३५ वर्षे मैत्री आहे केवळ अण्णांचा आदर्श घेऊन . अण्णांचा ग्रुप दर रविवारी रात्री एकत्र भेटायचे विचार विनिमय करायचे यातूनच अनेक संघटन अण्णांनी नागपूर मध्ये केली .. क्रिकेट क्लब स्थापन केला त्यांचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाले. महिला क्रिकेट मध्ये भरीव कामगिरी केली. गरजू लोकांना एक पतसंस्था स्थापन केली .. लोकांना स्वतःचे घर मिळावे म्हणून बिल्डर डेव्हलपर म्हणून नावलौकिक मिळवला.. सामाजिक बांधिलकी म्हणून देवरुख विठ्ठल मंदिरात मूर्ती साठी देणगी दिली .. महापुरुष मंदिर बांधताना सक्रिय सहभाग होता.. अशा केवळ मला माहीत असलेल्या गोष्टी. नागपुरमध्ये क्रिकेटवाले आंबेकर त्यांची ख्याती आहे.त्यांच्या ख्यातीची प्रचिती १९९७ मध्ये आली. 

     माझा मित्र बिपीन शिवलकर यांची मांडवी रत्नागिरी मध्ये घराजवळ कुळ म्हणून जागा होती ते जमीन मालक नागपूर मध्ये स्थायिक आहेत. खुळेफाटक नावाचे कुटुंब.. बिपीनच्या घरातून गेली तीन पिढ्या ती जागा नावावर होण्यासाठी प्रयत्न करत होते. बिपिन माझा चांगला मित्र असल्यामुळे त्याची अडचण कळल्यावर लगेच अण्णांना फोन केला आणि बिपिनच्या कामाबद्दल बोललो महिन्याभरात अण्णांनी त्याची माहिती काढली आणि आम्हाला नागपूर मध्ये बोलावले तीन पिढ्या न झालेले काम तीन दिवसात झाले.त्या खुळेफाटक  व्यक्तीने त्या जागेचे  मुखत्यार पत्र माझ्या नावाने केले अतिशय अल्प दरात ती जागा बिपिन शिवलकरच्या नावावर झाली . हे केवळ अण्णांच्या क्रिकेट ओळखीमुळे शक्य झाले.

    माणस जोडण्याचा छंद असल्याचा आनंद काही वेगळाच असतो तो अण्णांनी जगल्यामुळे माझ्याही स्वभावामध्ये आला.संघटन करताना कितीही प्रसंग आले तरी माणसे जोडण्याचा छंद कमी होत नाही ..हे केवळ अण्णांच्या कृतीचे अनुकरण केल्यामुळे होऊ शकते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नागपुरातील क्रिकेटवाले आंबेकर - एक राष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थापक

नागपुरातील क्रिकेटवाले आंबेकर - एक राष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थापक  लेखक - डॉ.आनंद आंबेकर  गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी  दिनांक - 25 नोव...