निलेश सावे ...उत्तम मोटिव्हेटर
डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
दिनांक : 9 एप्रिल 2021
------------------------------------------–--------------------
"माय लाईफ" या माझ्या ब्लॉग मधील आज सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल आज लिहिण्याची संधी मिळत आहे. ही व्यक्ती आयुष्यात आली नसती तर कदाचित मी इतक्या सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगू शकलो नसतो. खरं पाहिलं तर निलेश सावे हे आयुष्यात खूप वेगवेगळ्या रोलमध्ये माझ्या समोर आले... त्यामुळे त्यांना विद्यापीठाचा अधिकारी.. मित्र ...सहकारी असं काय म्हणावं असा एक मोठा प्रश्न आहे. पण मला निर्विवादपणे आणि नम्रपणे असं सांगायचं आहे की निलेश सावे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे मोटीव्हेटर आहेत. त्यांचे मोटिव्हेशन मिळाले नसते तर मी फारच लिमिटेड आयुष्यामध्ये राहिलो असतो.
पहिली भेट आमची प्रतिस्पर्धी म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये 1995 मध्ये झाली. जेव्हा मी गोगटे कॉलेजचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करत होतो आणि सावे सर विद्यापीठाचे नॅशनल टीमचे मेंबर म्हणून अतिशय आत्मविश्वासाने आमच्या समोर आले होते.
त्यानंतर 2001 मध्ये मी गोगटे कॉलेजचा प्राध्यापक प्रतिनिधी आणि सावे सर मुंबई विद्यापीठाचे समन्वयक म्हणून समोरासमोर भेट झाली. फारशी ओळख नव्हती परंतु त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीला प्रभावित झालो होतो.
त्यानंतर अतिशय महत्वाचे वळण आयुष्याला दिले ते वर्ष म्हणजे 2006 जेव्हा आबासाहेब मराठे महाविद्यालय राजापूरमध्ये युथ फेस्टिवलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आदेश बांदेकर आले होते..रयत संस्थेचे महाविद्यालय असल्याने उद्घाटन सोहळा फारच दिमाखदार पद्धतीने सुरू होता... पाहुणे यायला उशीर होत होता ..तस तशी सावे सरांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता वाढत होती ..कारण 17 एकांकिका एका दिवसात होणार कशा ? तसेच 23 स्किट होणार कशी ? अशे मोठे प्रश्न समोर होते . मी स्वतः जाऊन सरांना विनंती केली तुमची हरकत नसेल तर स्किट स्पर्धा दुसऱ्या क्लासमध्ये वेगळ्या रूम मध्ये घेऊया का ... गरज असेल तर मी मॅनेजमेंट करतो.. सरांनी लगेच होकार दिला .. जवळजवळ बारा वाजता उद्घाटन समारंभ संपला त्यानंतर स्पर्धा सुरू झाली आणि सरांच्या योग्य निर्णयामुळे सहा वाजता स्पर्धा संपली ...तिथेच मॅनेजमेंट संदर्भात सावे सर आणि माझे संबंध विश्वासाचे वाढायला लागले.
दुसऱ्याच वर्षी 2007 मध्ये सरांचा फोन आला आणि जिल्हा समन्वयक म्हणून काम कराल का अशी विचारणा केली... मला तर भर दुपारी चांदणे पाहिल्यासारखे वाटत होते ... मी लगेच हो म्हणून टाकले आणि जिल्हा समन्वयक म्हणून कारकीर्द सुरू झाली. ही जबाबदारी मिळणे, माझ्या आत्मसन्मानासाठी अत्यंत गरजेचे होते. कारण 1993 ते 1996 मध्ये विद्यार्थी असताना एफ वाय ला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर ते टी वाय ला एन एस एस चा बेस्ट लीडर ऍवॉर्ड मिळाला होता... म्हणजे अतिशय सन्मानाने महाविद्यालयीन जीवन गेले होते. पण 1999 ला महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर वेगळेच महाविद्यालय दिसू लागले. काम तर खूप करत होतो विद्यापीठांमध्ये बक्षीस सुद्धा लेखक-दिग्दर्शक म्हणून मिळाला लागली होती. त्याच धर्तीवर 2004 ला महाराजा करंडक सुरू करून विद्यापीठ स्पर्धांमध्ये स्पर्धा जिंकण्याची व्यवस्था सुरु केली... परंतु महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी घ्यायला 2012 पर्यंत वाट पाहायला लागले. त्यामुळे माझ्या कल्पना राबवण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागायचे ..आमची स्पर्धा मुंबईच्या मुलांसोबत असायची आणि माझ्या कॉलेजच्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये ते स्पिरीट तयार करण्याचं मोठं काम होतं ...यामध्ये महाविद्यालयातून सहकार्य घेणे कठीण व्हायचे अशा वेळेला अनाहूतपणे सावे सरांनी जिल्हा समन्वयक जबाबदारी दिल्याने एक आत्मसन्मान वाढला आणि आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.
2008 मध्ये ज्या शाहीर अमर शेख हॉलमध्ये आदराने स्पर्धा करायचं स्वप्न होते त्या स्टेजवरती आयोजक म्हणून बसण्याचा सन्मान सावे सरांनीच मिळवून दिला….कॉलेज सुरू होताच पहिली मिटिंग होती ..आम्ही स्टेजवर होतो सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रतिनिधी आमच्या समोर बसले होते.
सावे सर माईक वरती होते ...मी स्टेजवरती होतो तरीसुद्धा त्यांच्याकडे आदराने बघत होतो ते काय बोलत आहेत….. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना कसे मोटिव्हेट करत आहेत शांतपणे ऐकत होतो. सोबत संचालक मृदुल निळे होते. प्रत्येक झोनचे जिल्हा समन्वयक जाहीर केले रायगड जिल्हा समन्वयक जाहीर झाल्यानंतर ….
सरांनी आणखी एक परत मोठा धक्का दिला …सरांनी डायरेक्ट जाहिर केलं
या वर्षापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणून प्राध्यापक आनंद आंबेकर म्हणून काम बघतील. मी तर शॉक झालो... पण सावे सरांची शॉक देण्याची पद्धत मला माहिती असल्यामुळे छोटी स्माईल केली आणि गप्प बसलो. सभा संपल्यानंतर शांतपणे म्हणाले... सगळं जमेल तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका ...मी काहीही प्रश्न विचारले नाही आणि त्यानंतर पुढील तीन वर्ष दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळत होतो.असा विश्वास ठेवणारा व्यक्ती म्हणून सावे सर माझ्या आयुष्यात सहाजिकच मोठी देणगी आहे.
2017 ला सुद्धा मुंबईतून असाच फोन आला आणी म्हणाले ...या वर्षाचे इंटरनॅशनल युथ फेस्टिवल साठी तुम्हाला टीम मॅनेजर म्हणून जायचं आहे.. विशेष म्हणजे आम्ही कोणी नसणार आहोत. विद्यार्थी ..विद्यापीठ स्टाफ आणि तुम्ही असणार आहात.
सरांची शॉक देऊन जबाबदारी देण्याची सवय झाली होती म्हणूनच आशियातील सर्व देशातील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसमोर मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सावे सरांचे खूप मोठे योगदान होते. सावे सरांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे ते कधीच दुसऱ्याच्या कमजोरीचे कधीच भांडवल करत नाहीत उलट पुढच्या व्यक्तिमध्ये कोणता गुण आहे त्याला मोटिव्हेट करतात. कोणी आत्मविश्वास तोडला तर माफ करायच आणि पुढे जायचं हा त्यांचा जबरदस्त गुण आहे. अतिशय उत्तम मोटिव्हेटर म्हणून... आयुष्यभर सहकारी म्हणून ... उत्तम माणूस मित्र लाभणे माझे भाग्य समजतो... सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. भावी वाटचालीसाठी शुभेच्छ !!!!!!
1 टिप्पणी:
आनंद, निलेशबद्दल छान लिहिलं आहेस.
त्याचं व्यक्तिमत्त्व उतरवण्यात तू बऱ्यापैकी यशस्वी झालास
टिप्पणी पोस्ट करा