अप्पा - कौटुंबिक शिक्षक
डॉ. आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
दिनांक : ५ सप्टेंबर २०२१
----------------------------------------------------------------
योगायोगाचा आज शिक्षक दिन आणि आजच अप्पांचा स्मृतीदिन अप्पा म्हणजे माझे मोठे काका. त्यांचं अस्तित्व कायमच सामाजिक आणि कौटुंबिक एकतेकडे राहिलेले आहे. लहानपणापासून त्यांनी दिलेले अध्यात्मिक आणि सामाजिक धडे अजूनही गिरवत आहे…. अप्पा म्हणजे बाळकृष्ण धोंडू आंबेकर माझ्या वडिलांचे तीन नंबर भाऊ राहायला विक्रोळी पार्क साईट,मुंबई नोकरीनिमित्त हिंदुस्तान फेरेडो कंपनी मध्ये कार्यरत होते.त्यांचे जीवन चार भावांच्या कुटुंबा एवढेच न राहता संपूर्ण आंबेकर कुटुंब एकत्र ठेवण्याची नेहमीच धडपड होती. त्याचबरोबर मुंबईमध्ये राहत असताना विक्रोळी पार्क साईट मध्ये गुरुदत्त मंडळाची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम केले. ऐंशीच्या दशकात एखाद्या मंडळांमध्ये व्यायाम शाळा काढणं ...नियमित अध्यात्मिक कार्यक्रम राबवणे ...महिलांसाठी कार्यक्रम राबवणे असे मी जवळून पाहिलेला उपक्रम होते. हिंदुस्तान फेरेडो कंपनी मध्ये काम करत असताना कामगारांच्या प्रश्नांसाठी युनियनचे कार्यकर्ते म्हणून सतत कार्यरत राहिलेले आप्पा दिसत होते. अगदी जिवावर बेतणारे प्रसंग आले होते. गावामध्ये अंधश्रद्धे मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेणारे अप्पा कायमच डोळ्यासमोर येतात आणि विस्कटलेल्या कुटुंबाला एकत्र करण्यासाठी सतत झटत असणारे अप्पा सर्वांनाच आपल्या निर्णयांमध्ये असावेत असा आग्रह असायचा.अशा आदर्श कुटुंब शिक्षकाला मनापासून आदरांजली!!!
1984 च्या दरम्यान आंबेकर कुटुंबाची आधार व्यक्ती म्हणून अप्पांकडे पाहिलं जायचं ...महापुरुष मंदिर हे सर्वांच्याच श्रद्धेचे ठिकाण परंतु अनेक वर्ष फक्त चौथऱ्यावर उत्सव व्हायचे. लोकांमध्ये एक मोठा अंधश्रद्धेचा पगडा होता की महापुरुष मंदिर जो कोणी बांधायला घेतो तो या जगात राहत नाही.. त्याचा मृत्यू होतो अप्पांनी आपल्या वैयक्तिक थारली गुरुजी यांचे मार्गदर्शन घेऊन मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला अनेक लोकांनी घाबरवलं ...परंतु अप्पांसोबत राजाराम आंबेकर ..पांडुरंग आंबेकर आणि माझे वडील यांचा कायम नैतिक पाठिंबा असायचा असे मला लहानपणी दिसायचे कदाचित या पलीकडेही लोक होते ही असतील परंतु माझ्या दहा बारा वर्षाच्या वयानुसार हीच मंडळींसोबत मंदिर बांधण्याच्या गप्पा मारताना दिसायचे. मंदिराला मूर्त रूप आणताना खूप अंधश्रद्धेची अनाकलनीय भीती होती त्याच्यावर मात करत 1985 ला मंदिर बांधून झाले.
2003 मध्ये जेव्हा मोठं आणि स्लॅपची मंदिर बांधकाम करायचे ठरले त्यावेळेला मी स्वतःहून आंबेड स्थानिक जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्षपद घेतले यापूर्वी किंवा त्यानंतर नंतर मी कधीच आंबेकर मंडळांमध्ये जबाबदारीचे काम घेतले नाही. परंतु अप्पांच्या निस्वार्थी नेतृत्वाची मनावरती खोलवर भावना होते म्हणूनच ही जबाबदारी घेऊ शकलो आणि उत्तम समाधानकारक नेतृत्व केल्याचे सर्वांकडून शब्बासकी मिळाली हा माझ्या कौटुंबिक शिक्षकाकडून घेतलेला सामाजिक पहिला वसा.
1987 च्या दरम्यान शिवसेना युनियन कामगार युनियन जोरदार काम करायला सुरू झालं होतं त्यामध्ये अग्रेसर असणारे जनार्दन निवळेकर म्हणजेच माझ्या आत्तेचे पती यांच्यासोबत सतत पाठिंबा देणाऱ्या अप्पा कायम दिसायचे. युनियनचा लढा एवढा तीव्र झाला की जनार्दन निवळेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला सोबत असणाऱ्या अप्पांच्या पायावरती वार झाले ..अप्पानी युनियनच्या कामाला राम राम ठोकला म्हणूनच की काय मनसेची स्थापना झाल्यानंतर सामाजिक राजकीय काम करण्याची ऊर्मी असताना मित्रांचा आग्रह असतानाही कधीच जवाबदारीचे पद घेतले नाही ..फक्त काम करत राहिलो म्हणून कधीच राजकीय पेचप्रसंगात अडकलो नाही की कुठल्या राजकीय पक्षांशी वैर झाले नाही उलट चांगले संबंध ठेवून राहण्यासाठी कायमच सगळ्यांना आग्रह करण्याची मानसिकता तयार झाली.. कारण अप्पांच्या प्रसंगातून हा कायमच धडा घेतला होता.
1990 मध्ये अप्पांनी स्वतःच्या अनिल, बबन आणि अरुण या तीन मुलांसाठी नोकरीऐवजी व्यवसाय करण्याच्या आग्रहाने अप्पांनी विक्रोळी पार्क साईडला एक दुकान बांधले आणि व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 1991 ला जागतिकीकरण झाल्यानंतर सर्वांनाच कळले की आता नोकरी मध्ये आयुष्याची स्थिरता मिळणार नाही तर व्यवसायामध्येच आहे. आपण व्यवसायामध्ये उतरले पाहिजे अप्पांच्या या दूरदृष्टी निर्णयाचा आता खूप अभिमान वाटतो. परंतु तेव्हा कोणालाच कळत नव्हते अप्पांनी गुजरातींच्यासमोर मसाल्याचे दुकान काढून कशी काय स्पर्धा करू शकतात असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण आज व्यवसाय करणे काळाची गरज आहे हे सर्वांनाच पटले आहे. अप्पानी व्यवसायिक दृष्टीचा दिलेला धडा कायमच मी कुटुंब आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बिंबवत असतो.
एकदा घरामध्ये धार्मिक कार्य होते मला समईची वात करण्यासाठी अप्पांनी सांगितलं मी त्यांचे अनुकरण करून बनवली. वात दोन वाती एकत्र करून समईमध्ये लावायची असते कारण त्याला एक आध्यात्मिक कथा सांगितली होती... कथा मला आठवत नाही पण दोन वाती एकत्र करून समई लावायचा धडा अजूनही पप्पांची आठवण करून देतो. धार्मिक कार्य सुद्धा अंधश्रद्धा बाळगून करू नये असे त्यांचे नेहमी म्हणणे असायचे. कुटुंबाचे अकरा भाऊ एकत्र ठेवण्यासाठी त्यानी केलेली धडपड कायम दिसायची म्हणूनच 2002 ला अप्पाचे निधन झाल्यानंतर 2005 पासून 21 भावांना एकत्र घेऊन काम करायचे धाडस करू शकलो यावर्षी घराचे नूतनीकरण करण्याचे धाडस सुद्धा केवळ अप्पांनी दिलेल्या कुशल आणि पारदर्शक नेतृत्वचा धडा आयुष्यभर समोर येतो अशा आयुष्यव्यापी शिक्षकाला मानाचा मुजरा !!!!
६ टिप्पण्या:
अप्रतिम व सुस्पश्ट
सर्व प्रथम आजोबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वंदन आजोबा फार उत्साही व्यक्तिमत्त्व होते सगळ्यांना मानाने वागणूक द्यायचे, मामा तुझा ब्लॉग फार छान आहे.
आनंद तुला शिक्षकांचा वारसा आहे. मुळात कुळ आहे. म्हणून वारस घट्ट आहे. योगायोग मस्त जमला लिखाण मस्त. तुला आणि अण्णा आप्पांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
आपल्सा सातत्यपूर्ण लेखनप्रपंचासही शुभेच्छा!
छान!
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!🌹
great job 🙏
टिप्पणी पोस्ट करा