2004 मध्ये महाराजा करंडक इव्हेंट मॅनेजमेंट करंडक सुरू करत होतो ...इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे वेगळीच कल्पना होती ...पण तेव्हा ही उदय सोबत होता सायन्स विभागाचा कॉमेडी शो चा इव्हेंट एरेंज केला होता … प्रत्येक राऊंडला त्याराउंड चा विजेता सांगत होतो ..तीन राऊंडला मिळून अंतिम विजेता जाहीर करायचा होता...विद्यार्थ्यांना उत्सुकता वाढली होती...रिझल्ट तयार करायला उशीर होत होता ..उदय रिझल्ट करायला बसला होता ...माझ्या लक्षात आलं की ऑडियन्स गडबड करायला लागला आहे ...मी थेट स्टेजवर जाऊन ...आणि अंतिम विजेता आहे …. योगेश चव्हाण असं जाहीर केलं... रिझल्ट तयार करीत असलेला उदयने तिखट नजरेने माझ्याकडे पाहिलं... माझ्या लक्षात आलं की ...याचा पारा चढला आहे ...पण माझा रिझल्ट चुकला नव्हता ... आम्ही दोघेही विरुद्ध स्वभावाची असलो तरी एकमेकांच्या क्षमतेला आम्ही रिस्पेक्ट घ्यायला लागलो होतो ….
2006 मध्ये उदयने गोगटे कॉलेज सोडून डी बी जे कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला ...खुप वाईट वाटत होतं पण उदय स्वतःच्या घरात जाणार होता... आपला आवडता मित्र म्हणून आपल्या सोबत राहावं असं वाटत होतं ... त्याला ही इच्छा नव्हती .. खरं म्हणजे उदयची जन्मभूमी आणि कर्मभूमी रत्नागिरी... आजही गोगटे बाबत उदय हळवा आहे ...मध्ये मध्ये म्हणतो की परत मला रत्नागिरीत यायचं आहे. महत्वाचे म्हणजे आज उदय स्वतःच्या फॅमिली(आई आणि भाऊ) सोबत आहे हाच आनंद आहे. तो चिपळूणला गेला पण मैत्रिमधील ओलावा अजिबात कमी झाला नाही ....अनेक महत्त्वाच्या प्रसंगात आम्ही एकत्र असतोच ...
2007 ला मी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवाच्या जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त झालो ... आणि पहिलेच व्यवस्थापन डीबीजे कॉलेजला..उदय डीबीजेत असल्याने मी रिलॅक्स होतो आणि परत एकदा माझ्या आयुष्यातील नवीन जबाबदारीची सुरुवात उदय सोबतकरणार होतो ...उदय सोबत असल्याने मला अनेक गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावं लागायचं नाही ...आणि माझी काम सुरळीतपणे होत होती ...आज जिल्हा समन्वयक म्हणून 14 झाली पण..व्यवस्थापनाची सुरुवात उदय सोबत केली होती. समवयस्क पण विद्यापीठ जबाबदारीच्या कामात भिन्नता असली तरी आमच्या मर्यादा सोडून कधीच वागलो नाही ... चिपळूण ला असेल तर हक्काने उदच्याच घरी रहतो ... मग खूप गप्पा होतात ...मनापासून शेअरिंग होतं ..पुन्हा एकदा ताजे व्हायला होते.
उदयच लग्न पूजा सोबत झालं.. अतिशय साधी सरळ आणि सेंसिटीव्ह पत्नी त्याला मिळाली होती..उदय वर वर सनकी दिसला तरी उदय आतून किती हळवा आहे हे आम्ही खूप चांगले अनुभव घेतले होते त्यामुळे पूजा सारखी पत्नी मिळून तो अतिशय चांगले जीवन जगत आहे... मधल्या काळात संजू जाणं (त्याचा भाऊ) मृत्युमुखी होणं मनाला खूप चटका लागला होता... मी त्याला भेटायला गेलो होतो ...आणि आम्ही सोबत आहोत असा मी आवर्जून सांगितलं होतं … त्याप्रसंगातुन सावरायला खुप वर्षे गेली होती ...उदय आणि पूजाच्या आयुष्यात अभिराज(त्याचा मुलगा) येणं आयुष्यात पालवी येण्यासारखं आहे.
2016 ला युवा महोत्सवाचा ताण वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयाचे विभाजन केलं आणि दोन जिल्हा समन्वयक तयार करायचे होते ..उत्तर रत्नागिरीसाठी आवर्जून उदयच नाव सहसमन्वयक म्हणून हक्काने सुचवलं... किती विश्वास तयार झाला होता आणि एकमेकांमध्ये यायचा प्रत्यय होता ..आणि उदय ती जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभासळत आहे ...अगदी नजरेत एकमेकावर विश्वास ठेवणाऱ्या मित्रांचा अनमोल ठेवा जपण्यासाठी एक मित्र मला मिळाला त्याबद्दल देवाचा मी खूप आभारी आहे... तुम्ही बोलून व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या कृतीतुन फॉलो करणारी माणसं आपल्या आयुष्यात असतील तर जीवन जगताना खूप मजा येते आणि अशा मित्राचा आज वाढदिवस आहे.... त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा!!!
आज 2022 ...
उदय चा वाढदिवस साजरा करताना एक आगळा आनंद होत आहे स्वभावाने ओपन नसलेला माझा मित्र ओपन हार्ट सर्जरी करून आज पुन्हा नवीन आयुष्य जगत आहे.... खरं म्हणजे उदयच्या आयुष्यात चढउतार खूप जवळून पाहिले आहेत ...त्याचा हळवेपणा त्याची ..स्थिरता खूप खोलवर चटका लावणारी असते. उदय आजारी आहे अशी बातमी आली त्यावेळी सर्व मित्रांतर्फे फक्त मीच फोन करावा असे डॉ.घन:शाम साठेने आवर्जून सांगितलं .. वरवर खूप मोठ मॅनेजमेंट करतो.. कणखरपणा दाखवतो ..परंतु यावेळी उदयची चौकशी करताना प्रत्येक फोनच्या वेळी काय बोलायचं ...कसं विचारायचं यावेळी काय रिप्लाय येईल ...याची प्रचंड भीती मनात असायची परंतु त्याचे भाऊ कणखरपणे पाठीमागे होते परंतु आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे यावेळी उदय ची बायको म्हणजेच पूजा ही वेगळीच कणखर भूमिकेत असताना दिसत होती ... याचे मनस्वी खूप समाधान झाले आणि यामुळेच आज उदय ओपन हार्ट सर्जरी होऊन सुद्धा जबरदस्त कमबॅक केले आहे त्याच्या जोडीला अभिराज त्याचा मुलगा टॉनिक चे काम करीत आहे.उदय परत कॉलेजला हजर झाला याचा खूप आनंद झाला.
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवासाठी उदय ची जबाबदारी तशीच राहू द्या तो पुढच्या वर्षी 100% चांगली जबाबदारी सांभाळेल असे निलेश सावेना मी आणि डॉक्टर राजेंद्र मोरे (आमचा मित्र उत्तर रत्नागिरी झोनचा जिल्हा समन्वयक) आम्ही विश्वास व्यक्त केला. मित्रा सोबत एवढं आत्मविश्वासाने राहणं म्हणजे 50 शीच्या उंबरठयावर मैत्रीतील ओलावा असण्याचं जिवंत उदाहरण होतं. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी उदयला उदंड शुभेच्छा देऊन थांबतो पुन्हा एकदा उदयची मस्ती.. तोच मिश्किल पणा आणि हळवेपणा आयुष्यात अनुभवता येणार आहे हीच परमेश्वराची कृपा आहे.