बुधवार, २१ मे, २०२५

समुपदेशन - एक अनुभव कथन - प्रभाकर

क्षितिजापलीकडले डोकावताना 

             सोळाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर मुलांच्या मनात प्रत्येक गोष्टींमध्ये विचार आणि भावनांचे थैमान उडालेले असते. या वयात त्या मुलांना खेळायच असत, कुटुंबात कमी पण मित्रमैत्रिणींसोबत बागडायच असत. अशा परिस्थितीतही शिक्षणाचे उभारलेले वेगवेगळे स्तंभ आणि उंबरठे जिद्‌दीने चढायचे असतात. या अवस्थेत काही मुले मनाने खचून कोलमडतात, काही मुले विचारांच्या जात्यात पत्त्यासारखी गडगडून कोसळतात ती न उठण्यासाठी... तर काही मुले स्वतःचा आत्मविश्वास आणि पालकांचे पाठबळाचे जोरावर यशस्वी होतात. परंतू काही मुले विचार आणि भावनांच्या चक्रव्यूहातून सहज बाहेर पडत नाहीत तर एखाद्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता यशाला सहज गवसणी घालतात.
              परंतु हे कधी शक्य होते जेव्हा डॉ. आनंद आंबेकरसारखा गुरु स्तंभ बनून त्यांना पुढे जाण्यासाठी सढळ मार्गस्थ होण्यासाठी भेटतो.  त्या मुलांचे आत्मपरिक्षण करून, त्यांच्यातील गुण-अवगुण ओळखून एक वेगळ्या धाटणीत त्या मुलांना घेऊन जातो.  आणि ही मुले आत्मविश्वासाचा बाळकडू मिळाल्याने तेवढ्याच जिद्दीने, ताकदीने पुढे सरसावतात.
               आरुश आणि आर्या ही दोन्ही मुले इयत्ता दहावीमध्ये अडखळणार होती. पालकांना प्रश्न पडला होता की, या मुलांना कसे आणि काय केल्यावर यांचे विचार आणि भावना उंचावून भयमुक्त होतील.  परंतू डॉ. आनंद मित्र डोळ्यासमोर आला आणि ह्या भयाच्या कोळिष्टातून या दोन्ही मुलांचे समुपदेशन केल्याने, चांगले मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास बलाढ्य झाला.  यामुळे त्यांनी दहावी आणि बारावीच्या परिक्षेमध्ये यश सहज गाठले. आरुशने दहावीत आणि बारावीत घवघवीत यश संपादन केले तर आर्या दहावीच्या परिक्षेत डिस्टिंक्शन मध्ये येऊन सुयश हासिल केले.
            हे लिहिण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच आहे की, पाल्यांनी आपल्या मुलांना ओळखले पाहिजे, त्यांचे गुण आणि आत्मविश्वास डॉ. आनंद आंबेकर सारख्या पारखी आणि अनुभवी प्राध्यापकाकडून पारखून घेतले पाहिजेत. त्यामुळेच पाल्य आणि पालक रथाच्या चाकाप्रमाणे चालून एकसारखी हमखास पुढे जातील. उगाचच का भगवान बुध्दांनी अत्त दिप भव: चा नारा प्रत्येकांचे अंगी आहे असे सांगितले. फक्त हा नारा प्रत्येकाने अंगिकारणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि इतर महामानवांसारखा शिक्षणाचा अग्निपंख अंगी चेतवायला हवा.

*आयुष्यात कष्ट-मेहनतीने मिळवायचे आहे ।*
*हे जाण तुला जीवनात यशस्वी व्हायचे आहे ।।*

           अपघाती दुघटनेमुळे मला डॉ. आनंद आंबेकरकडे प्रत्यक्ष जाऊन भेटता आले नाही.  परंतू आज माझा परिवार या मित्राचे घरी जाऊन पुन्हा भेटला, त्याचे प्रती आदर व्यक्त केला.  तसेच आरुश, आर्या आणि सर्वांनी स्वतः बरोबरच या मित्राचेही तोंड गोड केले.  तर अजून माझी तीन नातवंडे यशाची शिखरे गाठण्यासाठी डॉ. आनंद जवळ हितगुज करुन आली.  या सर्वांनी या मित्राला भेटून त्याच्याकडून ते ध्येय, ती इच्छाशक्ती, तो उत्साह आणि ती उर्जा घेऊन आली कायम स्वतःमध्ये टिकविण्यासाठी....!! 
            मित्रा डॉ. आनंद असाच तुझ्या गाढया अभ्यासाने नवे अंकुर फुलवत रहा, त्यामुळे तुझे, विद्यार्थ्यांचे आणि इतरांचे आयुष्य बहरत राहिल.  मित्रा तुला आणि संपूर्ण परिवाराला मंगल कामना.

लेखन :- प्रभाकर रुक्मिणी राजाराम कांबळे, रत्नागिरी.
दिनांक :- 19-05-2025

समुपदेशन - एक अनुभव कथन - प्रभाकर

क्षितिजापलीकडले डोकावताना               सोळाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर मुलांच्या मनात प्रत्येक गोष्टींमध्ये विचार आणि भावनांचे थैमान उडालेले ...