95 ..एक मैत्रीचा महाकुंभ (सामाजिक संबध बदलणारी क्रांतिकारी व्यवस्था)
------------------------------------
आनंद आंबेकर
------------------------------------
95 म्हणजे नेमकं काय ?
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी मधील 1995 साली 11 ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असणारा ...
एक मैत्रीचा ग्रुप ... रत्नागिरीतील सोशल रिलेशन इंजिनिअरिंग करणारी व्यवस्था ... जीवनाची सपोर्ट सिस्टीम ... मैत्रीची हेल्पलाइन ... काय नेमकं काय आहे 95
हे मला पण अजून कळलं नाही..
अनेक कॉलेज आहेत त्यांचे असंख्य विद्यार्थी दरवर्षी कॉलेजचे माजी विद्यार्थी होतात ... असंख्य नवीन विद्यार्थी कॉलेजला येतात ... असंख्य विद्यार्थी कॉलेज पूर्ण करून जीवनाचा कॅनव्हास आपआपल्या परीने रंगवतात.काहींचे रंग साता समुद्रापलीकडे जातात ..तर काही सातांमध्येच (लिमीटेड मैत्रीत) सीमित राहतात तर काही साडेसाती (स्वतःच्याच प्रॉब्लेम)मध्ये अडकतात. महाविद्यालय संपल्यानंतर अशा किती बॅच पुन्हा एकदा नव्या उमेदीने ..उत्साहाने एकत्र येण्यासाठी आतुर असतात हे सगळीकडेच होतं. पण सातत्याने एकत्र येण्यासाठी आतुर असणारी 95 एकमेव जी फक्त स्नेहसंमेलन पुरती मर्यादित नराहता एकत्र येत राहतात ब्लड डोनर क्लब .. व्यावसायिकनी सवलत देणारे 95 मैत्री कार्ड ..सोशल डोनेशन ...आरोग्य शिबिर.. बिझनेस हेल्पलाईन.. आजी विद्यार्थी मार्गदर्शक व्यवस्था अश्या कायम नवीन आयाम घेऊन येते . मी गेल्या 20 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत असताना अशी ही एकमेव 95 बॅच .
*असं का होतं हे मला अजून नाही कळलं* .
95 खरंतर एका वर्षाचे.. एका शाखेचे ...एका ऍक्टिव्हिटीचे.. विद्यार्थी नव्हे .. खरं म्हणजे हे कॉलेजमध्ये असताना मित्र सुद्धा नव्हते .पण आज 95 ही प्रत्येक मेम्बरची जणू काही हेल्प लाईनच झाली आहे. 95 मध्ये ऍक्टिव्ह असणारा प्रत्येक मेम्बर स्वतःच्या जीवनात कितीही व्यस्त असो ..पण 95 चा विचार दिवसातून एकदातरी निघतोच .. म्हणून तर इतर उपहासाने म्हणतात तुमच्या 95 वाल्यांच मस्त चालू असतं .. मग ते राजकीय क्षेत्रातील असो ...की कॉलेजचा 18 वर्षाचा विद्यार्थी असो .
95 वाले केवळ मजेसाठी एकत्र भेटण्याच्या वेळेपुरतेच फक्त एकत्र येतात असं नाही ... तर सर्वच जीवनाच्या क्षणाचे सोबती झाले आहेत.
*95 वाले असे का वागतात ..हे अजून नाही कळलं.*
..पण एव्हढं बाकी नक्की झालं आहे की ... जीवन जगत असताना ..अनेक प्रसंगातुन जात असताना 95 जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.
म्हणूनच ....
*95 जिंदगीके साथभी जिंदगीके बाद भी*
३० टिप्पण्या:
मस्त सर
आपण आपल्या प्रतिक्रिया दिलात तर नक्की प्रोत्साहन मिळेल
सुंदर लेखन
सुंदर लेखन
खरं आहे ९५ ग्रुप हा कुटुंबाचा एक भाग बनला हे नक्की
Gjc 95, बिपीन बंदरकर आणि आनंद आंबेकर या दोघांनी खुप मेहनत घेऊन बांधलेली एक मजबूत मोट आहे. इथं समाजातील सर्व थरातले लहान मोठे फक्त मित्रत्वाचे नाते जोडून एकत्र आलेत. वर्षभर काही न काही सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम या ग्रुपतर्फे चालूच असतात. गोगटे जोगळेकर कॉलेज चे प्रा. आनंद आंबेकर सरांचा या कार्यक्रमात सर्वात मोठा सहभाग असतो.
Gjc 95 असाच अनेक चांगल्या गोष्टींचा साक्षीदार होवो हीच सदिच्छा.
आनंद शुभेच्छा...!!GJC95बद्दल लिखाण करायला शब्द पुरेसे नाहीत...गोडी गुलाबी मदत हसत खेळत रुसवे फुगवे गोडवे करून आनंदी जीवन जगण्याची पद्धत म्हणजे आपले कुटुंब ज्याला आपण
Gjc95..गंमत मजा मस्ती रुसवे फुगवे सामाजिक बांधिलकी आरोग्यविषयक काळजी सहल व्यवसाय मदत असे एक मजबूत पॅकेज जे 22 वर्षानंतर पण मजबूत आहे ..आणि स्लोसल अधिक माजबित होईल..शुभेच्छा..!!
Very nice blog
मामा.... 95 मैत्रीचा महाकुंभ खूप सुंदर ब्लॉग आहे, खरी मैत्री कशी असावी ह्याचे खूप सुंदर उदाहरण आहे तुमची ही मैत्री अशीच कायम राहो
95 म्हणजे जीव की प्राण झालेला आहे सद्या आनंद लेखनात धार येतेय माझ्या भरपूर शुभेच्छा.. आवड छंद साहित्यात यायलाच हवेत...मिलींद मिरकर
Anand khup chan jai 95
95 मुळे आज एक वेगळाच आनंद मिळतो व एक कौटुंबिक सहवास मिळत आहे प्रत्येक जण आपलं मन मोकळे करतो टेन्स कमी होते सुख दुःखा मध्ये समाविष्ट होतो ग्रेट 95 आनंद सर आपल्या लेखनी मध्ये आनंद फुलत जावो
🤔
*"मैत्री" म्हणजे कुंडली न पाहता, ज्योतिषाला न विचारता,*
*किती गुण जमतात याचा विचार न करता, साध्य असाध्य न बघता गुण व दोषासहीत स्विकारलेल आणि कुठलाही गैरसमज न करता आजीवनअबाधित राहणारे अतुट स्नेह बंधन होय.*
*"मैत्री" म्हणजे अडचणीत नेहमी भक्कम पाठीशी उभ राहणार आणि*
*"मी आहे ना" अस नात व आनंदी राहण्यासाठीच मैत्रिच हे एकच औषध होय..*
❤️ *फ्रेंडशिप डे च्या माझ्या सर्व ९५ च्या मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..* ❤️
संदेश कीर
Gjc 95 असाच अनेक चांगल्या गोष्टींचा साक्षीदार होवो हीच सदिच्छा
Gjc 95 असाच अनेक चांगल्या गोष्टींचा साक्षीदार होवो हीच सदिच्छा
मुळात हाताच्या बोटावर मोजण्याइतके मित्र असलेल्या मला पुन्हा एकदा त्या सर्वांना भेटता आलं ज्यांच्यासोबत मी कॉलेजमध्ये काम केलं होतं.तेव्हाच स्नेहसंमेलन असुदे किंवा नाटक असुदे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काही नवीन ओळखी झाल्या..खरं तर आनंद आता प्राध्यापक आहे..त्याचा हुद्दा, काम मोठं आहे. पण तरीही खूप वर्षांनी या मित्राला खास माझ्या पद्धतीने हाक मारता आली. बाकी उपक्रम, भेटीगाठी यात मी फारशी सहभागी नसते पण तरीही ती सगळी आपली माणस, मित्र मैत्रिणी भेटली त्यामुळे खूप मजा आली. थँक्स आनंद...नावाप्रमाणेच आनंद वाटत राहा...
खरं तर वेगवेगळ्या दिवसांची यादी माझ्या लक्षात नसते कधीच..पण आज फ्रेंडशिप डे आहे..सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा..
सुखाच्या क्षणी एकत्र येणारे
अडचणीच्या वेळेला धाऊन येणारा
हा छानसा चमू आहे .
मैत्री दिनाच्या सर्वाना शुभेच्छा !!
खूप छान। जय 95 । Happy friendship day.
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे "मैत्री"
हे 95 ला तंतोतंत लागू आहे
95 हा एक ग्रुप राहिलेला नसून आज एक आपल्या कुटुंबा चा भाग आहे
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे "मैत्री"
हे 95 ला तंतोतंत लागू आहे
95 हा एक ग्रुप राहिलेला नसून आज एक आपल्या कुटुंबा चा भाग आहे
"मैत्री दिना" निमित्त पाठवलेला लेख अप्रतिम. मित्रत्वाचे नाते आणि आठवणी जपणारा हा ग्रुप आहे. आनंद सरांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या 95 ग्रुप चे कार्य आजही उल्लेखनीय आहे. या ग्रुपचे कार्य आणि नातं असेच वृद्धिंगत व्हावे हिच सदिच्छा.
"मैत्री दिना" निमित्त पाठवलेला लेख अप्रतिम. मित्रत्वाचे नाते आणि आठवणी जपणारा हा ग्रुप आहे. आनंद सरांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या 95 ग्रुप चे कार्य आजही उल्लेखनीय आहे. या ग्रुपचे कार्य आणि नातं असेच वृद्धिंगत व्हावे हिच सदिच्छा.
हा ग्रुप म्हणजे मोत्याची माळ...
खरच कळत नाही कुठून कुणाशी कशी जूळून जाते नाळ..
सर्व सदस्य आहेत मोती...
अशीच टिकून राहोत आपली नातीगोती...
अँडमिन म्हणजे सर्वांना एकत्र ठेवणारा सोन्याचा धागा...
असेच सर्वांशी प्रेमाने, मायेने
आणि आपुलकीने वागा....
GJC 95 Family!
It's a package of feelings. Friendship, affection, sharing, caring and yeah...sometimes arguments too��. All necessary to strengthen the bonds.
Indeed, it's a golden family package- Full of energy.
Long live GJC95 and may it's family members stay blessed, always ..��
Rashmi
95 ही आम्हा मित्रांकरीता फार मोठी ओळख झाली आहे. खुप मोठा मित्र परिवार यानिमित्ताने एकत्र आला आहे. महाविद्यालयीन जीवनात असल्याचा कधीतरी आजही भास होत असतो.
आनंद छान लेखन, शुभेच्छा!💐💐
Casino Finder (Google Play) Reviews & Demos - Go
Check gri-go.com Casino Finder (Google Play). A look https://tricktactoe.com/ at some poormansguidetocasinogambling.com of the best gambling sites in the world. They offer a full game ventureberg.com/ library, 토토 사이트 코드
टिप्पणी पोस्ट करा