शुक्रवार, २६ जून, २०२०

परिचारिका ...एक अनमोल सेवा

परिचारिका ( नर्स )..एक अनमोल सेवा 
--------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
26 जून 2020
--------------------------------
आरोग्य सेवा..पोलीस खाते ..सफाई सेवा यांना 
.. हल्लीच आपण कोरोनायोद्धा म्हणून घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवल्या. 
यामध्ये हॉस्पिटलमध्ये सतत कार्यक्षमपणे कार्यरत असणाऱ्या परिचारिका यांचे कार्य अनमोल आहे.
माय लाईफ ...यामाझ्या ब्लॉग मध्ये आज लिहीत आहे.
 नर्सचा माझ्या जीवनाशी खुप जवळचा संबंध आहे. एक माझ्या जन्मापूर्वीपासूनचा संबंध असलेली *अंबुताई* ... आई-अण्णाच्या खुप जवळचे संबंध असलेली .... गावामध्ये टीका लावणे ..आरोग्यविषयक तपासणी करणे .. पण या पेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून घरात सतत अंबुताईचा उल्लेख व्हायचा. गावमळा येथे रहायची. आंबेड पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ...पण नेहमी चालत यायची कोळंबे.. सोनगिरी.. नंतर आंबेड ..मग आमच्या घरी आल्यावर पान खाणे आणि गप्पांचा कार्यक्रम असायचा. खरं म्हणजे आजही आरोग्यसेविका आहेत पण अंबुताई सारखी सेवाभावी नर्स पाहिलीच नाही.
माझ्या जन्माची कथा मी आई कडून खुप वेळा ऐकली आहे. 
माझा जन्म होण्याची दिवशीची घटना .....
पहाटे 3 वाजले होते आईच्या पोटात दुखु लागलं होतं ..एव्हढ्या  रात्री अंबुताईला बोलवायचं कसं ? असा मोठा प्रश्न अण्णांच्या फक्त मनात आला ..तो पर्यंत रघुतात्या आणि मोतीराम तात्या (मी दादाच म्हणतो त्याला कारण आईच्या नात्याकडून मावशीचा मुलगा म्हणून )  लगेच तयार झाले. काही गाडी वैगेरे नव्हती 
...दोघांचा पायी प्रवास सुरु झाला 
त्यांची  चर्चा एकच.. एव्हढया रात्री अंबुताईला उठवायच कसं ..
घराच्या दारात पोहचले तर घरात आवाज येत होता पहाटेचे  ४ वाजले होते . दार उघडे तर लगेच अंबुताई म्हणाली हे बघा आंबेकर गुरुजींनी माणसं पाठवली आहेत. ताई जागी झाली ती तिच्या स्वप्नामुळे ..त्यामध्ये माझी आईची डिलिव्हरी ची वेळ झाली आहे आणि ती अडचणीत आहे असं तिच्या स्वप्नात आलं होतं आणि ती दचकून उठून घरात बोलत होती .. आंबेकर गुरुजींच्या पत्नीची डिलिव्हरी ची पण तारीख जवळ आली आहे ...आणि तितक्यात माझे दोन्ही तात्या दारात उभे होते . 
...एक नर्स म्हणून  मनापासून आरोग्य सेवा  केल्याने तिची तळमळ दिसून येत होती .
...आणि तो पाई प्रवास करून  अंबुताई आमच्या घरी आली. माझा जन्म झाला. 
... पण जन्म झाल्यावर तेव्हा माझी हालचाल होत नव्हती.
दोन मुलीनंतर मुलगा झाला म्हणून आनंद होता ..पण हालचाल नव्हती म्हणून पूर्ण घरात सन्नाटा होता.त्यावेळी केवळ अंबुताईने प्राथमिक उपचार केले ..म्हणून आज मी आहे ...माझ्या रडण्याचा आवाज आला  
...आणि स्तब्ध झालेल्या घरामध्ये आनंदाची उत्सव सुरू झाला.
त्यामुळे अंबुताई ही माझ्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व असणारी नर्स आहे. 

दुसरी नर्स म्हणजे माझी पत्नी *गौरी
तिच्यामुळे आयुष्यात आरोग्यविषयक खुपच शिस्त आली आहे.(अनेक वेळेला ती शिस्त जाचक वाटते) ..पण घरातील अनेक आरोग्यविषयक घटनांमुळे संपुर्ण घर तिला फोल्लो करत असत. वडिलांना 2007 ला ब्रेन इन्फ्राक्ट झाला होता ...पण केवळ तिच्या समयसुचकतेमुळे अर्धांगवायु होण्यापासून वाचले आणि 2012 पर्यंत स्वतः चालत फिरत होते.2012 लाच आईला अचानक घशाखाली दुखु लागलं गौरीच्या लक्षात आलं की हे दुखणं नेहमीच वाटतं नाही ...हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन गेल्यावर कळलं की तिला लुडविंग अन्जायना झाला आहे ...आता या रोगाचा नांव मी कधी आयुष्यात ऐकलं नव्हतं ..पण हे न ऐकलेल्या रोगाने आईच आयुष्य धोक्यात आणलं होत. घश्यातील ग्रंथींना इन्फेक्शन होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. आणि हे इन्फेक्शन वाढत जाऊन जीव धोक्यात आला असता ..
आईचा पूर्णजन्मच म्हणावा लागेल कारण नॉनमेडीलक व्यक्तींना तो जीवघेणा श्वसनाचा आजार आहे हे कळलेच नसते.
...आणि म्हणूनच घरामध्ये केवळ नर्स असल्याने आज मला जन्म देणारी आई 80 वर्षापर्यंत उत्तम जीवन जगत आहे.

आयुष्य परत देणारी अंबुताई (आज त्या हयात नाहीत ) आणि आयुष्यभर सोबत राहणारी पत्नी गौरी ..या दोन्ही नर्समुळे  परिचारिका यांचे कार्य स्पेशल वाटते
...आणि म्हणूनच पी.एच.डी. च्या अभ्यासाचा विषय *परिचारिका* घेऊन अतिशय आत्मियतेने गेली ९ वर्ष अभ्यास करीत होतो

परिचारिका .... एक अनमोल सेवा  ..

४३ टिप्पण्या:

योगेश हळदवणेकर म्हणाले...

सर....खरं तर परिचारिका हीच जास्त मेहनत घेत कोणत्याही रुग्णालयात आणि डॉक्टरचे आभार मानतो आपण! खरतर परिचरिकांचे आभार मानायला हवेत! आज कोरोना असताना त्या किट घालून सेवा करत आहेत, कोणतीही किटकिट न करता! तुमचा लेख हृदयस्पर्शी आहे!

prasanna म्हणाले...

खूप सुंदर लिहलयस आनंद.

sonali kadam म्हणाले...

खूपच हृद्य अनुभव. सर्व परिचारिकांना मानाचा मुजरा.
डॉ. सोनाली संतोष कदम

Unknown म्हणाले...

खरोखरच हे खूप मोठं कार्य आहे. सर्व परिचारिकांना सलाम. आनंद मोजक्या शब्दात छान लिहिलय.

कैलास चव्हाण

Dhananjay kshirsagar म्हणाले...

खूप छान लेख आहे तसेच परिचारिका रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे कोरोकाळात खूप मदत झाली आहे

Surendra Jadhav म्हणाले...

खूप छान मांडलं आहे सर.... स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांना मानाचा मुजरा

utpal म्हणाले...

Aarogya karmachari mhnje khare devdoot aahet. Aapla lekhan prapanch stutya aahe. Shubheccha!💐💐

Sanket म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Sanket म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Sanket म्हणाले...

Nice !
Sanket Ghag

Unknown म्हणाले...

प्रिय मित्र आनंद अंबुताई ज्या एक उत्तम परिचारिका होत्या आणि तू लिहिल्या प्रमाणे आज आनंद या नावाने तू सर्व घराला आनंद देत आहेस. आज वहिणीही एक एक कुशल परिचारिका आहेत. समाज शास्त्राचा अधिव्याख्याता आणि एक एक सामाजिक भान असलेली व्यक्ती म्हणून नेहमीच समाजात वावरत असतोस. मित्रा तुझं कार्य असेच चालू ठेव. आणि सर्वांचे जीवन आनंदी करत राहा. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी सतत सेवेत तत्पर असलेल्या सर्व परिचारिकांना माझा मानाचा मुजरा - योगेश ठाकूर

Sociological thoughts म्हणाले...

लेख खूपच छान आहे. अनुभवावर आधारित हा वास्तवदर्शी आहे .परिचारिका ही एक स्त्री आहे आणि त्यासाठी तिचा सन्मान होणे गरजेचे आहे पण एक स्री म्हणून पण तिला मानाने वागवले पाहिजे. केवळ तात्पुरती सहानुभूती न दाखवता कायम स्वरूपी तिच्या बद्दल आदर वाटणे. हे आवश्यक आहे.

Unknown म्हणाले...

Khup chhan sir

Rahul Athalye म्हणाले...

ह्या योध्य्यामुळे आपण आज सुखरूप व निध्रस्त आहोत. समाजसेवेचा वारसा असाच तुझ्या परिवारात चालू राहू दे. राहुल आठल्ये

Unknown म्हणाले...

महेश मिलके :- आनंद खरच खूप छान अनुभव शेअर केलास ,

तुझ्या लेखणीत आता परिपक्वता आली , त्यात तू gjc चा प्रोफेसर ,
खरच तुझ्या ह्या विचारांचा व परिपक्वतेचा कॉलेज च्या शिकणाऱ्या मुलांना निश्चितच फायदा होईल ,
आणि तुझ्या हातून चांगले विद्यार्थी तयार होतील ,अन ते तू करणारच याची खात्री आहे .

सुंदर लिखाण अन शुभेच्या ......👍💐

Unknown म्हणाले...

Wa.... good one again..

Unknown म्हणाले...

एक अप्रतिम अनुभव....
उत्तम शब्दांकन...
शब्द चित्रांनी प्रत्यक्ष दृश्य चित्र उभी राहतात. स्वतः तुम्ही एक कलाकार असण्याचा अनुभव असाही उपयोगी पडतोय सर...
💐💐💐💐💐
असेच सुंदर सुंदर ब्लॉग लिहिलेत की शेअर करत जा आनंदाचे ब्लॉग वाचयला आनंद वाटेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉ राहुल मराठे ,लांजा

Unknown म्हणाले...

एक अप्रतिम अनुभव....
उत्तम शब्दांकन...
शब्द चित्रांनी प्रत्यक्ष दृश्य चित्र उभी राहतात. स्वतः तुम्ही एक कलाकार असण्याचा अनुभव असाही उपयोगी पडतोय सर...
💐💐💐💐💐
असेच सुंदर सुंदर ब्लॉग लिहिलेत की शेअर करत जा आनंदाचे ब्लॉग वाचला आनंद वाटेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉ राहुल मराठे लांजा

Deepak म्हणाले...

Kupe chan kaka

Unknown म्हणाले...

खुप सुंदर लेख लिहिला आहेस आनंद. Is really rare to appreciate our wife. Well done Dear Guari you r lucky (like me). There is a women behind in every successful man but in this case good husband like Anand is not behind but with सोबत you in every situation. His bless both of you.

Unknown म्हणाले...

आपण या जगात यायला या परिचरियकेच खूप मोठ योगदान असत ..... सलाम आपल्या या कार्याला
आनंद खूप छान लिहिलंस 👌

Umesh Ganesh Chiplunkar म्हणाले...

परिचारिका एक अनमोल सेवा उत्तम लेखन..... खरेच खूप अनमोल कार्य आहे परिचारिका यांचे आता जी महामारी आली आहे त्यात तर त्यांची खरी कसोटी लागली आहे आणि त्या आपली जबाबदारी उत्तम रित्या न डगमगता पार पाडत आहेत, सलाम त्यांच्या ह्या अदभुत कार्याला🙏🙏🙏

Unknown म्हणाले...

खुप खुप शुभेच्छा मित्रा

अमृता नार्वेकर म्हणाले...

सर खरच तुमच्या लेखणीला आणि लेखणीतून उतरलेल्या परिचारिका यांना माझा प्रणाम तुमच्या लिखाणातून टिपलेला अनुभव वाचताना डोळ्यासमोर उभा राहतो

अमृता नार्वेकर म्हणाले...

सर खरच तुमच्या लेखणीला आणि लेखणीतून उतरलेल्या परिचारिका यांना माझा प्रणाम तुमच्या लिखाणातून टिपलेला अनुभव वाचताना डोळ्यासमोर उभा राहतो

My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...

सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून लिखाणासाठी अजून बळ मिळाले
मनापासून सर्वांचे धन्यवाद

गौरी आनंद आंबेकर म्हणाले...

उत्तम लिखाण

ARYA AMBEKAR म्हणाले...

मस्त

ARYA AMBEKAR म्हणाले...

मस्त

गौरी आंबेकर म्हणाले...

लिखाणासाठी शुभेच्छा

KIRAN BHATKAR म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
KIRAN BHATKAR म्हणाले...

KHUP CHAN LIHILES ANAND

Unknown म्हणाले...

सुंदर लेखाची निर्मीती. भारतीय समाजात जन्म देणारी आई आणि त्याची सुश्रृषा करणारी दायी या महत्त्वपूर्ण मानल्या गेल्या आहेत.आईवर बरेचजन लिहतात मात्र दायी आजवरही उपेक्षीत राहीली आहे.आपण लिहलेत यातून कांहीजन प्रेरणा घेतील.छान. अभिनंदन.

शेखर शेंडे म्हणाले...

खूप सुंदर व वास्तववादी लेखन! माझी पत्नीसुघ्दा परिचारिका असल्यामुळे मी हे जवळून अनुभवत आहे. सर्व परिचारिकांना मनापासून सलाम व धन्यवाद...

My view म्हणाले...

सर,
खुपच सुंदर आणि वास्तव्याची जाणिव करुन देणारा लेख आहे. तुमच्या लिखाणासाठी अभिनंदन आणि पुढच्या लिखाणासाठी खुप सार्‍या शुभेच्छा.
-विनायक सावर्डेकर

जान्हवी दुदवडकर म्हणाले...

जान्हवी दुदवडकर
परीचारिकांबद्दल आत्मीयतेने लिखाण करणारे फारच थोडे जण असतील त्या थोड्यांधील तुम्ही एक...कदाचित घरातील अनुभवातून लिखाण करण्याची इच्छा प्रबळ झाली असावी ...
तरीही लिखाण सुन्दर ...अंबु ताई गौरी सिस्टर ह्यांच्याबद्दल ची भावना हळूवारतेने मांडली आहे
असेच लिहीत राहा ...
आमच्या शुभेच्छा आहेतच...

My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...

Prof Anand just read ur blogg i m v happy u hv very crrectly put up real picture facts regarding Nuring carreer life infront of society they r real backbone in patient recovery with same attittude thoughts i am working till today almost 42 years v successfuly in my medical profession so Nurse stand first in my life with great respect to them Human being born in her presence and leave also in her presence I always stand behind nursing cadre in all there problems Once again wishing n congrates to u

Dr. Dilip more , Ratnagiri
👌👌🙏🙏

धन्यवाद डॉक्टर मोरे सर तुम्ही व्हाट्सएप वर पाठवलेला अभिप्राय ब्लॉगवर प्रकाशित करत आहे

My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...

आनंद..नावा प्रमाणे हसतमुख..सदैव आनंदी..1993 पासुन आपली एक वेगळी छाप नेहमीच पाडायचा एक दुर्मीळ गुण माझ्या या मित्राकडे आहे...B.A. ला असुन देखील आमचा खुप जवळचा मित्र..कॉलेज मधे cultural..NSS..खुपच active..त्यामूळेच..अनेक हौसी कलाकार त्याच्याआजुबाजूला नेहमीच असायचे...सध्या ब्लॉग लेखनतील हा पैलू आता आम्हाला कळला..आनंद मित्रा..खुपच छान लिहितोस..ही वाटचाल चालू ठेव...नवनवीन विषय..वाचयला आम्ही उत्सुक आहोत.आमचा तू नेहमीच मार्गदर्शक राहशिल...

From straight to my heart..

डॉ. राजेंद्र मोरे
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज दापोली.

फेसबुकवर दिलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित करत आहे
धन्यवाद राजा

Unknown म्हणाले...

Chan ahe

Unknown म्हणाले...

सर..खूप छान लेख आणि अनुभव तुम्ही लिहला आहात. आता परिचारिका या खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या विषयी खूप छान मत तुम्ही तुमचं इथे व्यक्त केलात. छान वाटलं हा अनुभव आणि लेख वाचून.असच छान लेख लिहा.खूप खूप शुभेच्छा!

Unknown म्हणाले...

सर खूपच सुंदर लिखाण. सर रत्नागिरीला गोगटेला असताना तुमच्यातले अनेक पैलू आम्हाला जवळून पहायला मिळत होते. आणि आता ब्लाॕग लेखन सुरु केल्याबद्दल प्रथम सर आपले अभिनंदन.!
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच नाही तर आपल्या सर्वांच्या जिवनात परिचारिकेचे अनन्यसाधारण महत्व आहे. माझीही पत्नी परिचारिका असल्याने त्यांचे काम, त्यांची रुग्णसेवा मलाही आधिक जवळून पहायला मिळत आहे. सर आपण या लेखात त्यांचे महत्त्व अधोरेखीत केले आहे त्याबद्दल धन्यवाद. असेच छान छान विषय आपल्या माध्यमातून आम्हाला वाचायला मिळो. सर आपल्याला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...!
राकेश आंबेरकर.
rramberkar@gmail.com
संचालक, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरी.

Unknown म्हणाले...

सर खूपच सुंदर लिखाण. सर रत्नागिरीला गोगटेला असताना तुमच्यातले अनेक पैलू आम्हाला जवळून पहायला मिळत होते. आणि आता ब्लाॕग लेखन सुरु केल्याबद्दल प्रथम सर आपले अभिनंदन.!
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच नाही तर आपल्या सर्वांच्या जिवनात परिचारिकेचे अनन्यसाधारण महत्व आहे. माझीही पत्नी परिचारिका असल्याने त्यांचे काम, त्यांची रुग्णसेवा मलाही आधिक जवळून पहायला मिळत आहे. सर आपण या लेखात त्यांचे महत्त्व अधोरेखीत केले आहे त्याबद्दल धन्यवाद. असेच छान छान विषय आपल्या माध्यमातून आम्हाला वाचायला मिळो. सर आपल्याला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...!
राकेश आंबेरकर.
rramberkar@gmail.com
संचालक, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरी.

My Life (Dr.Anand Ambekar) म्हणाले...

राकेश धन्यवाद
तुझ्या घरीही परिचारिका असल्याने तुला जास्त भावलं असेल
लिखाण गंम्मत म्हणून लिहायला सुरुवात केली आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचून अजून लिहिण्याची उमेद तयार होते आहे

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...