(प्रसिद्ध मराठी अभिनेता)
--------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
20 जून 2020
--------------------------------------
आज वैभवचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐
----------------------------------------
आम्ही SY ला असताना...अचानक कॉलेज कट्टयावर बातमी आली.. बाहेरच्या कॉलेज सोबत सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत आणि आपल्या कॉलेजचे इव्हेंट बसवायचे आहेत तर सायन्सच्या वैभव मांगले सोबत काम करायचं आहे. बिपीन शिवलकर पटकन म्हणाला ...कोण वैभव ..तो नटसम्राट(FY ला वैभवने नटसम्राट चा एकपात्री करून दांडेकर मानचिन्ह स्पर्धा जिंकली होती) ..ए नको तो लय शाना हाय ...आपलं जमायचं नाय त्यांच्या सोबत..
आपलं NSS बरं आहे. मी म्हटलं जाऊन तर बघूया .. काहीतरी विशेष असणार ...कारण पण तसंच होत...
1994 साली म्हणजे मुंबई विद्यापीठाचा 28 वा युवा महोत्सव.पहिल्यांदाच झोनल (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) सांस्कृतिक स्पर्धा होणार होती. विशेष म्हणजे आमच्या गोगटे कॉलेजमध्ये होणार होती. सांस्कृतिक विभागाचे विजयकुमार रानडे सरांनी जबाबदारी घेतली होती. आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंटला गेलो ..वैभव व्हाईट ऍप्रन घालून प्रॅक्टिकल वरून आला होता.
चर्चा सुरू झाली....
मुकाभिनय बसवायचा होता..रानडेसरांची कल्पना होती त्यावर्षी 'तंदुरकांड हत्याकांड' झाला होता त्यावर बसवुया ... आम्हाला पथनाट्य आणि एकांकिका या पलीकडे काहीच माहिती नव्हतं. वैभव पट्टीचा ऍक्टर होता ..पण जुळून घेणं मुश्किल होतं. रानडे सर असल्याने ते मुश्किल काम सोपं झालं होतं.
मी ,बिपीन,वैभव, सोनाली बापट(आताची सावंत तेव्हा पण ती सावंत होती पण अधिकृत नव्हती.. तिचा मित्र असल्याने नाटकात काम करणं सोपं जायचं ...नाहीतर नाटकात काम करायला मुली कुठे भेटायच्या) केवळ नाटकात काम करण्याच्या तयारीमुळे शक्य झालं.
गंमतच तशी होती..
मुकाभिनयमध्ये असा सीन होता ....
बायकोचा तिच्या प्रियकरासोबत रोमान्स बघून तिचा नवरा संतापतो आणि तिचा खून करतो ..इतका क्रूर पणे की , तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून तंदूरभट्टीत टाकतो ...
बायको..सोनाली
नवरा ..वैभव मांगले
प्रियकर..मी
सोनालीसोबत तो रोमान्स सिन सरांना पाहिजे होता तसा माझ्याकडुन होत नव्हता आणि दुसरीकडून वैभव अभिनयाने आग ओखत होता...
वैभव मला म्हणाला मेल्या कसला लाजतोस ...
शेवटी सोनालीनेच पुढाकार घेऊन मला कम्फर्ट केलं.
मग सरांनी सीन ओके केला ..शेवटी
प्रॅक्टिस पूर्ण केली आणि मुंबईत यायची वेळ आली. ट्रेन नव्हती.. एसटीतुन प्रवास करत मुंबई गाठली ...पण मुंबईत गेल्यावर आम्ही किती मागास आहोत याची जाणीव झाली होती ..मेडल सोडा आमच्या माईम इव्हेंटच्या टेक्निकल बाजूची खुपच चर्चा झाली होती.
वैभवने B.sc नंतर D.Ed केलं आणि नगरपरिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याशाळेत बीपीन शिवलकरची आई शिक्षिका होती...त्यावेळी बिपींनची अचानक भेट झाली ...
वैभव शिक्षकाची नोकरी करत असताना स्टार थिएटर मधून चांगल्या एकांकिका करण्याची सुरुवात केली. तिथे मनोज कोल्हटकर, अप्पा रणभिसे,समीर इंदुलकर, प्रफुल्ल घाग यांची चांगलीच भट्टी जमली .. त्या काळात रत्नागिरीला उत्तम एकांकिका बघायला भेटायच्या मी 1999 पासूनच गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून हजर झालो होतो ...रानडेसरांनी आवर्जून सांस्कृतिकमध्ये सामावून घेतले ....आणि मग कधीही थिएटर मध्ये न मिळालेलं मेडल मिळविण्यासाठी सांस्कृतिक मंडळाची जमवाजमव सुरु केली.... पुढे पुढे कल्चरलवाले आंबेकरसर अशीच ओळख झाली. त्यावेळी वैभवच्या एकांकिका बघायला नक्की यायचो. अचानक वैभवने शिक्षकाची नोकरी सोडून कलाकार म्हणून काम करण्यासाठी मुंबईत गेला.
तेव्हा आम्ही त्याला वेड्यात काढलं.
चांगली शिक्षकाची नोकरी सोडून जाण धाडसाचं होतं.
पण कायम त्याची प्रगती बघून कॉलेजमध्ये त्यांच्या सोबत घालवलेले दिवस आठवायचे
...वैभव सुंदर गातो म्हणून ..मिडियामध्ये त्याचं कौतुक व्हायचं..
पण आम्हाला त्याच गाणं माहीत होतं .."उधळीत शतकिरणा" स्फुर्ती गीत एकत्र गायलं होत त्यामुळे त्याची गायकी माहीत होती. पण लॉकडाऊन मध्ये वैभवनी काढलेली सुरेख चित्र बघून थक्क झालो ...म्हटलं हे अजबच व्यक्तमत्व आहे. जसं अभिनयामध्ये कोणत्याही शेडचा रोल करतो तसच कलेमध्ये सर्वोत्तम करतो. म्हणूनच रत्नागिरीतील पहिलं प्रॉडक्शन म्हणून झी मराठीवर प्रफुल्ल घाग नी जबाबदारी घेतलेले "एक गांव भुताचा " ही सिरीयल केवळ वैभवने पुढाकार घेतल्याने साकार होत आहे..नाहीतर कोणीही स्वप्नात सुदधा पाहिलं नव्हतं की, रत्नागिरीतुन प्रॉडक्शन होऊ शकतं.
वैभवला अशीच चॅलेंजिंग काम करण्यासाठी मनापासून शुभेच्छा !!!!
४६ टिप्पण्या:
छान लिहिलं आहेस,
पण लेख अर्धा सोडलास असं वाटलं,
अधिक लिही
सोनेरी आठवणींचे सुंदर विवेचन.
वैभव माझा विद्यार्थी होता.
मुंबईत कधीतरी भेट होते.
अतिशय सुरेख लिहिले मला आमच्या कॉलेजचे दिवस आठवले असेच लिहिणे चालू ठेव
वैभव म्हणजे एक अजब व्यक्तिमत्व.त्याच्याशी पाहिली भेट कॅप्सुल कंपनीमध्ये झाली,दोघांचाही पहिलाच जॉब होता. पण ह्या पठ्ठयाचा जन्म नोकरी करण्यासाठी नाही हे त्याच्याबरोबर काम करताना जाणवलं होतं.
आणि पुढे झालंही तसचं.
तो मुंबईला गेल्यानंतर त्याच्याशी संपर्क नसला तरी माझ्या शुभेच्छा कायम त्याच्यासोबत आहेत.
कैलास चव्हाण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव मांगले एक गाव भुताचा छान सिरीयल आहे आम्ही पाहिलेला सुंदर वाटला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा आम्हाला सांगायला आनंद वाटतो तू गोगटे कॉलेज मध्ये आमच्या बॅच चा आहेस
सुंदर लेखन व मैत्रीचे आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. राहुल आठल्ये.
नेहमीप्रमाणे अप्रतिम लेखन आनंद सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव जी
सागर कोळी
अप्रतिम लेखन सर ,सर काळ आणि त्यामधल्या गमती जमती डोळ्या समोर उभ्या झाल्या , काळ फक्त लोटला आहे बाकी ठिकाण आणि भावना त्याच आहेत. आम्हीही त्याच काळातून जातोय. युवा महोत्सव किव्वा गोगटे हे समिकरण आयुष्यभर प्रेरणा देत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव सर
मस्त लिहिलंयत सर 👌 👌 👌
आनंद तुझे अभिनंदन 👍
छानच लिहिले आहेस. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष वैभव मांगले च संघर्ष पाहिला आहे. आपले स्थिर स्थावर आयुष्य सोडून कलेच्या प्रेमापोटी आत्मविश्वासाने मुंबई ला पोचलेल्या वैभव ला शुभेच्छा
खुप सुंदर लिहिले आहेस आनंद. काॅलेजमध्ये असताना पतितपावन मंदिरात एका गाण्याच्या स्पर्धेत वैभवला पेटीवर साथ दिली होती. मध्ये दापोलीत दौर्यावर आला असताना त्याला भेटलो होतो.
वैभव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
-घनःशाम साठे
Khup chan sir
Such stories should inspire new artists in the future because of the beautiful stories in the college world
Chup chan sir
Ekdam mast sir. Raicha parvat ekankika Ani keleli dhamal aathvali
आनंद सुंदर लेखन झाला आहे हे काही नव्याने सांगायला नको. वैभव मांगले आपल्याबरोबर कॉलेजला होता असं जेव्हा मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो त्यावेळी त्याचा अभिनय कसा होता याबद्दल नेहमीच चर्चा होते.पण आज तू त्या सर्व आठवणी नव्याने जाग्या केल्यास. वैभव एक उत्तम चित्रकार आहे हे या लॉकडाऊन काळातच आम्हाला पाहायला मिळालं. मित्रा वैभव आणि तुझी मित मैत्री म्हणजे दोन अभिनेत्यांची मैत्री दोन चांगल्या माणसांची मैत्री अशीच चिरकाल राहो. वैभवने केलेली मालिका आम्हाला युट्युब वर बघायला मिळाली तर अधिक बरं होईल. आपल्या या ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या बरोबर असलेल्या असंख्य मित्र-मैत्रिणींच्या आठवणी उजळून निघतात खरंच तुझे फार धन्यवाद, योगेश ठाकूर, रत्नागिरी सध्या दोडामार्ग.
खूप छान
खूपच छान शब्दांची बांधणी केलीय.. अप्रतिम सर..
होय बरोबर आहे लेख अर्ध्यावर सोडल्यासारखा वाटला
आनंद तू लिहिलेल्या या लेखामुळे पुन्हा कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या तुला शतशः धन्यवाद तसे आपण एकत्र होतो कॉलेजमध्ये दंगामस्ती करायला वैभवला त्याकाळी खूप जणांनी त्रास दिला होता त्याच्या अशा या वेगवेगळ्या भन्नाट बोलण्याने आणि नखरेल कॉमेडी करण्याने सगळ्यांना वाटायचं काय हा पण आज हाच वैभव मोठा कलाकार आणि कलाकार झालेला आहे हे पाहून खूप आनंद होतो आज मी जेव्हा माझ्या कुटुंबासमवेत आणि मित्र-मैत्रिणींनाही सांगतो की वैभव हा माझा मित्र आहे खरं सांगतो सगळ्यांना अभिमान वाटतो म्हणून अजून असाच काही गोष्टी लिही
खूप अप्रतिम लेखन सर..!
रत्नागिरी च्या कला विकासाला न्याय देण्यासाठी आपल्याच रत्नागितिचे कलाकार सुपुत्र च पुढाकार घेतील यात शंकाच नाही..!!
Well done sir..
आनंद सर..खुप..सुंदरलेख..
वैभव मांगले...एक उत्तम कलाकार होते ते त्यानी कॉलेज लाइफ मधेच दाखवून दिले होते..अणि पुर्ण खात्री होती की..पूढे ते स्टार होणार..अम्हाला..त्यांचा आपला एक मित्र म्हणून विशेष अभिमान आहे..
खुप सुंदर आठवणी आहेत कॉलेज चे दिवस विसरूशकत नाही.
मनिष लाखण
Sir khup masta lihlay tumcha ani vaibhav sirancha athavani aikun khup bara vatla tumchi tyavelchi gamat jamat aikun masta vatla and Happy Birthday Vaibhav sir olakh nhi kaiman blog vr mala wish karayla ek sandhi milali tyabadal khup khup abhar
वैभवला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा
वैभवला मी कॉलेजमध्ये शिकवलं आहे. कोणतीही नवीन गोष्ट करणार असला की डिपार्टमेंटमध्ये येऊन सांगून जात असे, अगदी कॉलेजच्या गदरिंगमधे काय करणार आहे इथपासून ते त्यावेळी कोणते कपडे घालायचे आहेत हे सुद्धा.
कधीच त्याच्यात परकेपणा नव्हता. एवढंच काय अजूनही नसतो. मध्यंतरी 8-9 वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या सांस्कृतिक झोनल आपल्या कॉलेजमधे झाली होती त्यावेळी त्याला बोलावले होते. त्या वेळीही डिपार्टमेंटमध्ये येऊन सर्वांना भेटून गेला होता.
मस्तच
प्रत्येक घटनेतील बारकावे पध्दतशीरपणे मांडण्याचा आपला प्रयत्न अप्रतिम आहे. प्रसंग यथोचित शब्द प्रभावी आहेत. कुठलाही बिभस्सपणा नाही. साधी सोपी मांडणी मनाला आल्हाद देते.छान लिहलेत. अभिनंदन आणि शुभेच्छा
खूपच छान...
छान लेखन, वैभव ला वाढदिवसाच्या शुभेच्छा....
रत्नागिरीत मालिकेची निर्मिती आणि चित्रीकरण होणे हा कोरोना ने जुळवून आणलेला योग आहे...
इथल्या कलाकारांना जास्तीत जास्त exposure मिळो...
आपल्या कोकणात कलाकारांची कमी निश्चीतच नाही....
शुभेच्छा....
छान लेख मामा..
Great, You are really multi talented..
Happy birthday Vaibhav Mangle Sir.
खूप छान
खूपच छान सर, वैभव मांगले सर माझे आवडते कलाकार आहेत
अप्रतिम ...मस्त
Khup chan.... charming.,
������������
Buddha bless you....dear☺
Sayali surve
���� chan kissa hota tumchya ekankiketla .....your detail describtion shows how all the memories are deeply rooted .... even I am feeling nostalgic ... keep sharing your beautiful memories with us
खूप छान
वैभव मांगले यांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. .. आनंद सर, पुन्हा एकदा सुंदर लेख... धन्यवाद... वैभव मांगले सोबतच्या आठवणी खूप छान... असेच लिहिण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
रत्नागिरी च्या "वैभवात" अशीच भर होऊन "आनंद" मिळत राहो या सदिच्छेसह...
राईचा परवात संघ सदस्य.
Khup chhan Anand
Khup chhan Anand
आनंद असाच लिहीत रहा ...मस्त आहे
बिपिन बंदरकर
खूप छान लिहिलं आहे सर .....
आनंद जुन्या आठवणी जाग्या झाल्या... वैभवने त्या स्पर्धेला माझा मेक केला होता. जो फार भयानक झाला होता मग तो धुवून मी पुन्हा मेकअप करून घेतला. आपले साधे ड्रेस ही एकसारखे नव्हते. केवळ काळ्या रंगाचे एकसारखे कपडे डीबीजे कडे होते म्हणून त्यांचा no आला होता. वैभव, आरती लेले आणि मी विवीधा च्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावर्षी काठाकथनला मला सिल्व्हर मेडल मिळालं आणि तो करंडक सलग तिसऱ्या वर्षी सांघिक बक्षीस प्रथम क्रमांक म्हणून आपण कायमस्वरूपी मिळवला.अशा खूप आठवणी आहेत. त्यानिमित्ताने तुम्ही काही ठराविक मित्र म्हणून मला मिळालात.
आनंद खूप छान लिहिलंस आहे तुम्ही ऐ ने से स ला होता परंतु आपला सर्वचा एकमेकाशी संपर्क होतो आज हे वाचुन कॉलेजचे दिवस आठवले मित्रा असच लिहीत रहा आम्ही वाचत राहू धन्यवाद महेंद्र बोरकर
टिप्पणी पोस्ट करा