बेस्ट मोटिव्हेटर.. कै.प्रा.संजय जोशी
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
7 जून 2020
----------------------------------------
गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरीच्या अनेक आघाड्यांवर अग्रेसर नांव असायचं म्हणजे कै. प्रा.संजय जोशी. महाविद्यालयात ते उपप्राचार्य ..समाजशास्त्र विभागाचे प्रमुख ..NSS चे कार्यक्रम अधिकारी.. रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक ..अश्या अनेक भूमिकेत जोशीसर भेटले.
... पण माझ्यासाठी ते माझे मोटिव्हेटर म्हणूनच जास्त भावले. FY ला महाविद्यालयात प्रवेश घेतल्या नंतर अनेक Extra ऍक्टिव्हिटी चे प्रवेश सुरू झाले होते. 8 वी ते 10 वी स्काऊट चा विद्यार्थी असल्याने NSS मध्ये भाग घ्यायचं नक्की केलं. 12 वीला याच कॉलेजमध्ये असल्याने आणि त्यात 12वीला असताना 3 दिवसांची गोवा ट्रिप यशस्वी आयोजन केल्याने आत्मविश्वास जबरदस्त वाढला होता.nss ऍडमिशन होण्यासाठी वेगवेगळ्या रूममध्ये बोलण्यात आलं मी रूम नंबर 15 मध्ये होतो. समोर जोशी सर होते ..सर म्हणाले इकडे ये नवीन आहेस ना ...बोल काय येत तुला मी म्हटलं सर मी रूम नंबर 2 मध्ये बोर्ड लिहिण्याचं दाखवून आलो आहे. बर ठीक आहे ...एका दुसऱ्या मुलाला उठवलं तो TY चा राजेश सुर्वे होता (अगोदर ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता) सर म्हणाले तुम्ही दोघे भाऊ आहात असं समजा आणि तुमचं भांडण सुरू आहे असं ऍक्टिग करून दाखवा.... ऍक्टिग आणि मी अंगावर काटा आला होता ..मी 5 वीत असताना गुरुजींचा मुलगा म्हणून कृष्ण होऊन मोठया मुलींच्या (शाळेत असताना माझ्या उंचीच्या मुली नसल्याने कायमच मला मी लहान असल्यासारखं वाटायचं आणि गुरुजींचा मुलगा म्हणून लाड करून घ्यायचो )मध्ये बासरी घेऊन उभं केलं होतं..एव्हढाच काय तो स्टेजचा अनुभव पण आज जोशीसरांनी विचार करायलासुद्धा वेळ दिला नव्हता...
आमची वेळ आली आणि आम्ही दोघांनी काय केलं ते केलं ...डोळ्यासमोर पांढरा पडदा आला होता..टाळ्या वाजायला लागल्यावर संपलं वाटत याची जाणीव झाली ...बाकी विद्यार्थी भारी केलात रे असं म्हणत होते...पण माझी काय अवस्था झाली होती ते मलाच माहीत. सर्वांच्या मुलाखती झाल्या आणि जोशीसरांनी मला nss कलापथक ग्रुपचा प्रमुख केला. जोशीसरांनी त्यावेळी माझ्यात काय पाहिलं कुणास ठाऊक पण तोच विश्वास घेऊन गेली 12 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी जिल्ह्यातील सर्व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात मोटिव्हेट करायचे काम करत आहे.
जिल्ह्यातील इतर कॉलेजमध्ये काम करण्याची संधी सुद्धा जोशीसरांनीच सर्व प्रथम दिली होती. Nss चे जनजागृती अभियान मुंबईमध्ये होणार होते .. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये 2 ते 3 विद्यार्थी सहभागी करून एक जनजागृतीचा कार्यक्रम करायचा होता .
मी TY ला होतो ..आमच्या कॉलेजची 2 मुलं मलाच सिलेक्ट करायची होती. FY ला विद्यार्थी निवडणूका झाल्या होत्या माझ्या विरुद्ध 11 जण उभे होते. खूप राडे ..भानगडी.. धमक्या..आमिष ....शेवटी मी निवडून आलो होतो
यामुळे स्वतःचा महाराजा ग्रुप तयार झाला होता...ग्रुपला सांभाळण्यात जास्त वेळ जायचा..माझ्यासमोर धर्मसंकट होतं त्यातील बरेचशे कलाकार मित्र SY आता nss ला आले होते ...पण मला व्हर्सटाईल आणि हुकमी कलाकार निवडायचे जाते . मी अजिबात मागे पुढे नबघता कार्यक्रम ऊत्तम होण्यासाठी गाणारा..ऍक्टिग करणारा आणि ढोलकी वाजवणारा सचिन लांजेकरची निवड केली आणि ऍक्टिग चा हुकमी एक्का गुरू शिवलकर येणार होता.जोशीसरांची विश्वास टाकण्याचा गुण जबरदस्त होता ..तो आम्हाला प्रामाणिक रहायला भाग पाडायचा.. आणि प्रेशर सुद्धा यायचे.
ती रात्र आठवते ...
माणगांवला सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी एकत्र आले होते ..ओळख सुद्धा नव्हती .. जोशीसरांनी स्क्रिप्ट दिल ...रात्री 10 वाजेपर्यंत काहीच जमत नव्हतं ..सरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं सर नाराज होते ..नंतर सर निघून गेले रात्री मी जाबडत उठलो ..गुरू म्हणाला काय झालं .. नाही रे सर नाराज आहेत आपल्याला काय जमत नाही. मग आम्ही सर्व मेन रोल आमच्या तिघांकडे घेतले आणि नझोपता प्रॅक्टिस सुरू केली.
दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स होता .. आमचा शेवटून 2 नंबर होता ..मुंबईच्या पोरांचे कॉन्फिडन्स बघून आमची गावठी पोरं बिथरली होती. जोशीसरांचा नाराज चेहरा डोळ्यासमोर सतत येत होता .. जिल्यातील सर्व पोरांना एकत्र केलं आणि नाटकाच्या भाषेत जोरात पेटवलं ..परफॉर्मन्सच्या अगोदर सर आले ...जोरात करा ..घाबरू नका... मी सरांना म्हटलं ..सॉरी सर थोडे बदल केले आहेत... सर म्हणाले आता त्याचा विचार करू नका बिनधास्त करा..., बास सर भेटून गेले होते.. पोरं एकदम पेटली होती
..., आणि जो काही परफॉर्मन्स झाला ... जोरदार टाळ्या ..शिट्या
दुसऱ्या दिवशी तर कलाम झाली होती मुंबई सकाळ पेपर ला आमच्या परफॉर्मन्सचा फोटो आला होता (अजून जपून ठेवला आहे).मुंबई मधील पेपर सुद्धा जोशी सरांनी आणून दिला होता.
...जोशीसरांची विश्वासाने विश्वास वाढविण्याची हिम्मत आज ही अनुकरण करायला लावते.
आज जोशीसर हयात नाहीत ..पण एक मोटिव्हेटर म्हणून सतत सोबत असल्याची जाणीव होते ...आणि नकळत त्यांच्या सारखं मोटिव्हेटर होण्याची प्रेरणा मिळते.
१३ टिप्पण्या:
आनंद,मस्त.खूपच सुंदर सोप्या भाषेत अनुभव कथन केला आहेस. आपणच तेथेअसल्याचा भास होतो.
अतिशय सुंदर लेखन केले
खूप छान... सहज सुंदर
खूप सुंदर लिखाण आनंद, आम्हालाही जोशी सरांच्या हाताखाली काम करण्याचे भाग्य लाभले...
खुप छान आठवण आणि अनुभव सर,
जोशी सरांसारखे मोटीव्हेटर आणि गुरु तुम्हांला लाभले हे तुमचे भाग्य आहे.
आनंद तू सुरू केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.तुझ्या लिहिण्यामुळे जोशी सरांचे स्मरण झाले.
धन्यवाद....
आनंद फारच सुंदर तू वर्णन केलेल्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या जोशी सरांचा आम्हालाही सहवास लागला टेनिस मुळे अंगात धीर आला चारचौघांच्या पुढ्यात उभे राहून आपले मांडणे खंबीरपणे मांडण्याची ताकद आली मित्रा असाच सुंदर सुंदर लिखाण करत रहा माझ्या शुभेच्छा
आनंद मित्रा...
खूप छान लिहिलंयस.
मित भाषी व संयमी सर म्हणुनच कालकथित जोशी सरांकडे पहात आलो.
आणि महाराजा ग्रुपचा राडा आजही डोळ्यासमोर येतो. अंजाम(शाहरुख-माधुरी) सारखे तुझ्या डोळ्याच्यावरुन रक्त ओघळत होते. त्यावेळी राजू ब्लॅक बेल्टधारी मित्र तुझ्या समवेत होता...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
आंनद
जोशी सर प्राध्यापक कमी मित्र म्हणून जास्त जवळचे वाटायचे.त्यांच्या मार्गदर्शना खाली मी 1995 साली रांगोळी मध्ये गोल्डमेडल मिळवले होते. त्यांच्यामुळेच माझी नॅशनल कॅम्प साठी निवड झाली होती.तुझ्या लिहिण्यामुळे जोशी सरांचे स्मरण झाले.
आनंद, अतिशय छान लिहिलंय, लिहित रहा, डॉक्युमेंटेशन होईल. तू गुणग्राहकता, विद्यार्थीप्रियता आणि कामाचा उरक याबाबत जोशी सरांचाच वारसा पुढे चालवत आहेस, यात शंका नाही. अनेक शुभेच्छा!💐
सरांनी एकदा शाबासकी दिली होती TY ला असताना. त्यानंतर कधी भेट झाली नाही. मग ते गेल्याच कळल.����
खुपच सुंदर लिहिलयं,सर
आनंद दादा...(सर) बाबांबद्दल वाचून छान वाटले..त्यांचा तुम्हाला जास्त आणी मुलगी म्हणून मला कमी वेळ देण्याचा लहानपणी मला फार राग येई. घरी येऊ नका तिकडेच रहा असे सुद्धा सांगून झाले तरी तुमचे सर्वांचे महत्व तेवढेच राहिले. पण आठवण म्हणून सांगण्या सारखी एक गोष्ट आहे माझाकडे जी कदाचित तुम्हा कोणाला माहित नसेल... जेव्हा बाबा गेले तेव्हा ते P. hd करत होते. त्यांना माहित होते त्यांच्याकडे फार कमी दिवस आहेत तरीही त्यांचा विद्यार्थी कागल दादा त्यांच्या P. Hd चा थेसीस पुर्ण करण्याचे राम करत होता. आणी हे दर आठ दिवसांनी काय झालं किती झालं त्यात काय बदल ह्यावर त्याचाशी बोलायचे पुढचं काम द्यायचे... शेवटचे काही गिवस होते आणी गप्पा मारताना म्हणाले माझी P. Hd ची इच्छा अपूर्ण राहिली.. जमल तर पूर्ण करा. तेव्हा ह्या बद्दल काही समजायचे नाही. पण आता सगळे चढ ऊतार पाहताना चिकाटी आणी ईच्छाशक्ती म्हणजे काय ह्याचे हेच एकमेव ऊदाहरण डोळ्यासमोर आहे माझा... दादा त्यांच्या त्याच मोटिव्हेशन ची आठवण परत मला करून दिल्या बद्दल थँक्स... आणी खरच आज तू एवढे सुरेख काम करतोस हे पाहून त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यावर अभिमान वाटला असता त्यांना...
टिप्पणी पोस्ट करा