सोमवार, ८ जून, २०२०

एक अनामिक प्रेम

एक अनामिक प्रेम...
(तू आयुष्यात आल्याच 10 वं वर्ष )
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
8 जून 2020
----------------------------------------
आज तुला माझ्या आयुष्यात येऊन 10 वर्ष पूर्ण झाली. तू माझ्या आयुष्यात यावी म्हणून 
मी अनेक वर्ष तुझी स्वप्न पाहिली. रात्र रात्रभर तुझीच स्वप्न रंगवली. तू अशी दिसायला हवीस...तुझी उंची एव्हढी असावी .. तू आयुष्यात आलीस ...आणि सर्व आयुष्यच व्यापून गेलीस.माझ्या सवयी बदलल्या ..छंद बदलले .मी खूप वेळ तुझ्यासोबत घालवायला लागलो. 
तू 10 वर्षापासून अगदी वेडं केलंस . तुझे फोटो फेसबुकवर बघून माझ्याकडे कधीही नयेणारी  माणसं सुद्धा म्हणायला लागली.. तुला बघण्यासाठी तरी माझ्याकडे यायला पाहिजे.असं तुला महत्व देऊन बोलतात तेव्हा मला अजिबात तुझ्याबद्दल आकस वाटत नाही ...कारण तुझं सौंदर्य अजून खुलाव म्हणून मीच प्रयत्न करत असतो. दिवसातून तासन्तास तुझ्यासोबत घालवत असतो...तेव्हा माझी बायको खूप रागावते ...म्हणते ही यांच्या आयुष्यात येऊन मला जणू काही सवतच आली आहे. तुझं सौदर्य खुलाव म्हणून पैसे खर्च करतो तेव्हा तर बायकोचा पाराच चढतो. ...मग होतं  भांडण ...पण तुझ्या प्रेमापोटी सुवर्णमध्य काढतो. बायको घरी असताना तुझ्या सहवासात येत नाही ...तुझ्यावर खर्च करण्यासाठी बायकोपासून लपून बाजारात जातो. तुझ्यावर खर्च केलाच तर किंमत कमी करून सांगतो ...  
तू आयुष्यात आल्यामुळे माझं बालपणापासूनच गार्डनिंगच स्वप्न पूर्ण झालं.. 
आंबेडला (माझं गांव)बालपणी गार्डनिंगची हौस म्हणून लोकांच्या पडक्या घराच्या चौथर्यावर झाड लावली होती.
अभ्यासाला गार्डनमध्ये बसणं...कधी कधी आंघोळ करणं असा आनंद घेत होतो .अचानक एकदा घरच्या चौथऱ्याचा मालक गावी आला आणि आई वडिलांशी जोरात भांडण केलं ...ही झाड लावून आमची जागा हडप करायची आहे का ? मास्तर असून असं तुम्हाला शोभत नाही ....वगैरे ...वगैरे.. आयुष्यभर लोकांना मदत करणाऱ्या वडिलांना माझ्यामुळे बोलणं खावं लागलं होतं ... अण्णा (वडील) रागारागाने गार्डन मध्ये आले आणि सर्व झाडं उपटून टाकली. माझा जीव जीव तीळ तीळ मरत होता.. मी अडवयला गेलो ...पण अण्णांचा पारा चढलेला होता. मला चांगलाच चोप दिला. खरं म्हणजे शोभेच्या झाडाने आणि केळीच्या झाडांनी काही त्यांचा चौथरा फुटणार नव्हता ...पण सर्व भानगडीत माझं गार्डनिंगच स्वप्न उद् वस्थ  झालं होत 
...आता तू आयुष्यात आल्याने माझं हे स्वप्न पूर्ण झालं होतं. फेसबुक.. इन्स्टाग्राम...व्हाट्सअप वर गार्डनिंग सोबत माझ्या फोटोग्राफीची ही हौससुद्धा पूर्ण होत आहे.
मला गोतावळ्यात राहण्याची खुप सवय आणि आवड आहे. पण 10 वर्षापूर्वी मला मित्र ..नातेवाईक.. माझे विद्यार्थी यांना बोलवायचं म्हणजे अडचण असायची पण आता तू असल्याने निसंकोच हा गोतावळा येतो...आयुष्य जगल्यासारख वाटतं. आयुष्यात जीवाभावाची माणसं नसतील तर काय मजा नाही. 
10 वर्षा पूर्वी तू फडक्यांची होतीस. तुला माझ्या स्वाधीन करून पुण्याला जाता जाता फडके काकी म्हणाल्या ...आमची मुलगी देतोय तुम्हाला ...आता तुम्ही सांभाळा 
... 2010 ला फडक्याकडून तू माझ्या आयुष्यात आलीस  तरीही तुझ्या प्रेमापोटी एक दोन वर्षांनी फडके कुटुंब खास तुला बघण्यासाठी येतच राहील ... 2015 ला तुझं सौदर्य बदललं तेव्हा ..फडके काकी आल्या होत्या तेव्हा त्यांना मी  विचारलं तूम्ही मला दिलेली मुलगी आता कशी दिसते ... काकी म्हणाल्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे तुम्ही तिची काळजी घेत आहात. 
मी काकींना म्हणालो ...
सुंदर वास्तू असावी हे माझं स्वप्नं होत म्हणूनच एव्हढं तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. 
असं हे माझ्या वास्तूवरील अनामिक प्रेम.

२२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Khup chhan

Unknown म्हणाले...

Khoop Mast

निखिल म्हणाले...

सुंदर.. तुमच्या या अनामिक प्रेम प्रकरणाची 10 ची 100 वर्ष होवो. या सदिच्छेसह...

Unknown म्हणाले...

आनदमठ स्वरुपी घरातील आनंदाचे आनंदी जिवन असेच बहरत राहो.

Rahul Athalye म्हणाले...

अनामिक ओढीने लिहिलेले अप्रतिम.

Unknown म्हणाले...

आनंद
खूप छान. असच लिहित रहा.

प्रा.डाँ.बाळासाहेब लबडे म्हणाले...

खुप छान लिहीत रहा

Shrupada kadam म्हणाले...

आनंद भरारी

अनामित म्हणाले...

Anand khupach chan

Umesh Ganesh Chiplunkar म्हणाले...

मामा तुझ मामी च्या सवती वरील प्रेम उत्तुंग आहे😀😀 तुझं गारडेनिंग चे वेड अफाट आहे तुझे फोटोझ पण सुरेख असतात मन प्रसन्न होते, ब्लॉग मधील लिखाण उत्तम आहे,

Sandesh keer म्हणाले...

आनंद खूपच छान.लगे रहो

अनामित म्हणाले...

आनंद मामा तुम्ही लिहिलेले हे लेख अतिशय सुंदर आहे. एखादी निर्जीव वास्तूला तुम्ही सजीव असण्याचे भासवले, तुमची ही कला अत्यंत कौतुकास्पद आहे व मी कधीच कोणताच लेख पूर्ण वाचत नाही पण तुम्ही लिहिलेले लेख मात्र हौसेने व आतुरतेने वाचतो.
असंच तुमच्या कल्पनेला पालवी फुटू देत राहो हीच शुभेच्छा..

Nilesh Kadwadkar म्हणाले...

आनंद मामा तुम्ही लिहिलेले हे लेख अतिशय सुंदर आहे. एखादी निर्जीव वास्तूला तुम्ही सजीव असण्याचे भासवले, तुमची ही कला अत्यंत कौतुकास्पद आहे व मी कधीच कोणताच लेख पूर्ण वाचत नाही पण तुम्ही लिहिलेले लेख मात्र हौसेने व आतुरतेने वाचतो.
असंच तुमच्या कल्पनेला पालवी फुटू देत राहो हीच शुभेच्छा..

Priti म्हणाले...

जबरदस्त ! लिहित रहा . निर्जिव वास्तू सजीव पणे उभी राहिली डोळ्यासमोर. माई च घर सुध्दा याच वास्तूची देण आहे जिने माहेरपण जपलय आमच.

सिध्दार्थ बेंडके म्हणाले...

खरच खुपच सुंदर आहे फडके काकुंची लेक. फडके काकु पुर्वी आमच्या शेजारी असल्याने मी काकुंची लेक बघीतलेलीच आह. आता त्या लेकीला तु ही खुपच सुंदर ठेवलयस...

Vaidehi Kadwadkar म्हणाले...

Mama tu ek jabardast teacher aahesch pan ek Uttam lekhak Sudha ashes, kiti kautuk karav tevdhe kami aahe.
Tuzyakadun shikav tevdhe kamich ahe. Mama tu Ghar ekdam sajiv Karun thaklas. Well done mama, keep it up 👌👌👌👍👍👍

Unknown म्हणाले...

हो...

Unknown म्हणाले...

निसर्गप्रेमी व वास्तू प्रेमी .

Shailesh ingle म्हणाले...

Waa सर अप्रतिम ,तुमच्यातील हा लेखक बघून खूप सकारात्मक वाटलं नेहमी तुम्ही आणि तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रेरणादाई असते खूप छान सर

अनामित म्हणाले...

खूप छान मामा....

Prashant Nevrekar म्हणाले...

खूप छान मामा

Unknown म्हणाले...

तुम्हाला मुलगी रुपी लाभलेल्या वास्तूला दिर्घायुष्य लाभो व तुम्ही तीचे सौंदर्य असेच खुलवत राहोत हिच सदइच्छा.

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...