वाय फा (Y'faa) ..कलाकारांचे संघटन
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
6 जुलै 2020
----------------------------------------
कालच गुरू पौर्णिमा झाली.
दोन दिवस अगोदर लोकमत मधून अतिशय अभ्यासू पत्रकाराचा फोन आला. तुम्ही प्राध्यापक म्हणून खुप कमी वर्षात तुमच्या विद्यार्थ्यांचा आदर मिळवला आहे. तुमच्याबद्दल 'गुरू' म्हणून भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांचे नंबर द्या.लोकमत गुरूपौर्णिमा निमित्त एक स्वतंत्र पेज तयार करत आहे . थोडा विचार केला आणि फोन नंबर दिले... पहिला विद्यार्थी होता... श्रीकांत (रत्नागिरीत वकील म्हणून विश्वासाचं नांव कमावलं आहे )...
माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी.. मी 1999 ला दिवाळी सुट्टीनंतर गोगटे कॉलेजमध्ये जॉईन झालो.. त्यापूर्वी "आठल्ये सप्रे कॉलेज" देवरुख येथे होतो. FYBA च्या वर्गात श्रीकांत होता ...पण खरी ओळख सांस्कृतिक मध्ये झाली ..योगेश चव्हाण ..संतोष सुतार आणि इतर मंडळी थिएटर करायचे...श्रीकांत अतिशय स्पष्टव्यक्ता असल्याने लगेजच जुळलं.. त्यामुळे SYला असताना त्याला सांस्कृतिकचा CR केला. त्यावेळी कॉलेजमध्ये डेज व्हायचे.. पण ते युथफेस्टिव्हल साठी काहीच उपयोगी नव्हते. मग मी स्किट स्पर्धा घ्यायचं ठरवलं तर प्रायोजक म्हणून श्रीकांतनी स्वतः तयारी दर्शवली ...आणि 'भाटवडेकर चषक' सुरू झाला ...सांस्कृतिक मंडळाची सुरुवात झाली ..आणि आजही माजी विद्यार्थी संघटना मध्ये कार्यरत आहे.
दुसरं नांव होत ते योगेश कुंभारचं (झी टीव्ही मराठी मध्ये कार्यकारी निर्माता )ज्याला मी.. तो 12 वी ला असताना 'शामराव करंडक' एकांकिका स्पर्धेत परीक्षक असताना पाहिलं होतं....जबरदस्त काम करण्याची आग होती म्हणूनच कॉलेजसाठी अनेक किर्तीमान निर्माण केले ...महाराष्ट्राचा गोल्डन बॉय झाला ...कोंकणात प्रथमच थिएटर ट्रॉफी मिळून देण्यात त्याचं विद्यार्थी नेतृत्व होतं ...म्हणूनच तो 'झी' च्या बॅनर मध्ये मोठ्या पडद्यावर काम करत आहे.
सायली सुर्वे (इंटरनॅशनल स्कुलची जनसंपर्क अधिकारी म्हणून मुंबईत काम करते ) घरची अतिशय बेताची परिस्थिती ...पण टॅलेंट जबरदस्त ...पण इतरांना जुळवून घेताना कठीण यायचं ... पण ती सांस्कृतिक टीम मध्ये काम करण्याचा अनुभव घेतल्याने आज ती जनसंपर्क अधिकारी होऊन टीम सांभाळायच करीयर करत आहे हे बघून आनंद होतो.
विदीशा म्हसकर (यशस्वी tv अभिनेत्री) SYBsc च्या वर्गात FC च्या क्लास मध्ये आळस देऊन बसलेली विदिशा अजून आठवते ..भिऊ(आसामी लोकनृत्य) डान्स साठी परफेक्ट मुलगी होती म्हणून क्लास झाल्यावर भेटायला बोलावलं ...आणि कलाकार म्हणून प्रवास सुरु झाला.
शैलेश इंगळे(डबिंग आर्टिस्ट आणि साउंड रेकॉर्डिस्ट) भेटला तेव्हा अतिशय बुजरा मुलगा म्हणून भेटला ...त्याच्या मित्राने चुगली केली.. सर हा .....सरांची जबरदस्त नक्कल करतो ..घाबरतच करून दाखवली ... आणि त्याचा प्रवास सुरु झाला.
या सर्वांवर स्वतंत्र ब्लॉग लिहायचा आहे म्हणून थोडक्यात लिहीत आहे.
गुरूपौर्णिमेला विद्यार्थ्यांच्या भावना वाचून आनंद झाला ...
पण का कुणास ठाऊक मनात एक अस्वस्थता होती .
मी ज्या विद्यार्थ्यांचे नंबर दिले ते एक सक्सेस विद्यार्थी होते. ...त्यांनी माझ्या सहकार्याबद्दल खूप आदरपूर्वक विचार मांडले ...पण गेली 21 वर्ष माझे अनेक विद्यार्थी क्लोज झाले ते केवळ कलाकार म्हणून झाले ...परंतु काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या सक्सेसवर मी समाधान मानने योग्य आहे का ? ..असा प्रश्न भेडसावत होता ..आणि महत्वाचे.. त्यांचा सक्सेस केवळ माझ्यामुळेच नाही तर ...त्यांची गुणवत्ता ...त्यांची मेहनत ...त्यांच्या सपोर्ट सिस्टीम वर आहे.
आणि ते विद्यार्थी आपल्याला का आदर देतात तर आपण सपोर्ट दिला म्हणून ...पण तो सपोर्ट आपण किती वर्षे देतो तर 3 ते 5 वर्ष . पण खरी लढाई नंतरच होते .
यामुळेच पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी आवडतील अश्या भावना व्यक्त केल्यातरी... अस्वस्थ आहे.
आज कलाकार म्हणून व्यवसाय अनेक आहेत पण सपोर्ट सिस्टीम नसल्याने अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता कमी करण्यासाठी आपण एक संघटन उभं केलं पाहिजे असं सतत वाटत होतं.
अनेकांशी गेली 5 ते 6 वर्ष याबद्दल बोलत आहे त्यांना ही कल्पना आवडली...कायम प्रोत्साहन दिले... 'तुम्ही करा आम्ही या चळवळीत सोबत आहोत'. परंतु सुरूवातच होत नव्हती. काल म्हणजे गुरुपौर्णिमेलाच आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ....कलाकारांसाठी एक अनोखे संघटन सुरू करावे म्हणून Y'faa नांवाने फेसबुक पेज तयार केले आणि बघता बघता 90 मेम्बर झाले.
Y'faa (वाय फा) म्हणजे Youth Festival Artists Association
हे संघटन सर्वच कलाकारांना प्रोत्साहन ...प्रेरणा.. सहकार्य देणार आहे..... युथ फेस्टिव्हल कलाकार संघटन करण्याची मुख्य दोन कारणे.. एक म्हणजे मोठ्या स्पर्धेत कसून तयारी करण्याचा अनुभव गाठीशी असणार आहे आणि दुसरं म्हणजे या कलाकारांशी वेगळंच भावनिक नातं आहे. 3 ते 5 वर्ष 'कलाकार' म्हणून युथ फेस्टिव्हल मध्ये काम केल्यानंतर सर्वांनाच 'कलाकार' म्हणून करियर करता येत नाही.. परंतु त्यांच्या अंतर्मनात असलेल्या कलाकाराला पुन्हा प्रोत्साहित करण्यासाठी Y'faa नक्की आपले योगदान देईल. त्यामुळे अगदी शालेय विद्यार्थी ते रिटायर्ड व्यक्ती कलाकार म्हणून जगत असेल तर या Y'faa च्या क्वालिटी मार्गदर्शनाचा ...दर्दी लोकांचा सहवास वाढेल... अजून काही शिकता येईल ... याच अपेक्षेने हे नवीन संघटन सुरू करत आहे.
तर मग चला आयुष्यभर कलाकार म्हणून एकत्र राहू.....
४८ टिप्पण्या:
Shailu बद्दल अगदी बरोबर लिहिलं तुम्ही sir ...
खुप छान प्रत्येकामध्ये कलेचा एक निद्रिस्त ज्वालामुखी असतो त्याला गरज असते फुंकर देण्याची आणि ते काम तू केले आहेस तू एक उत्तम मार्गदर्शन करणारा गुरू आहेस अभिनंदन
मानसी नेवरेकर
अतिशय अभिमानास्पद ,,,,,,Keep it up
आनंद सर मस्त लिहिले ....नेहमीप्रमाणे ब्लॉग वाचायला छान वाटले ...मी पण तुमचे अनुकरण करत होते कॉलेज मध्ये असताना .....आपल्या गप्पा होतात तेव्हा कायम ह्या विषयावर बोलणे होते ....तुमच्यातील कलाकार ओळखण्याच्या कलेला सलाम ����
प्रज्ञा
खूप छान प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचे निरीक्षण करून त्यांना त्यांच्या गुणांना बाहेर काढून सादरीकरण करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केले आज माझ्या मध्ये सुद्धा तुमच्या मुळे सांस्कृतिक चे गुण निर्माण झाले़ एक उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या सारखे गुरू लाभले तर प्रत्येक क्षेत्रात कोकणातील विध्यार्थी झळकतील
Good initiative y'faa! All the best sir.
संघटनात्मक बळाच्या जोरावरच आयुष्य सुसह्य होते हेच खरे. आपण अतिशय मार्मिकपणे हे मांडण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. आपल्या पूर्विच्या दोन लेखाप्रमाणेच हा लेखही अभिनंदणीय आहे. छानच ! तुळशीदास रोकडे.
जबरदस्त अनुभव!!
Keep it up sir , great
Sagar koli
होतकरू आणि भरपूर प्रतिभा असलेल्या विद्यार्थ्यांना असे व्यासपीठ हवेच. आनंद सर आपण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यायचं उत्तम कार्य करताय. मनःपूर्वक शुभेच्छा 💐
तुम्ही मार्ग दाखवला आम्ही परिश्रम घेतले म्हणून आज आम्ही चांगल्या मार्गाने घडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शिकत आहोत
वरील सर्व आठवणींचा मी साक्षीदार आहे. स्तुत्य उपक्रम! कलाकार एकत्र करण्याच्या या प्रयत्नांमधून उत्तम सांस्कृतिक चळवळ होईल यात शंका नाही! पुढील वाटचालीस सर्व कलकारांना हार्दिक शुभेच्छा!!
उत्पल वाकडे, रत्नागिरी.
वा आनंद अतिशय छान उपक्रम ,तुझे सकारात्मक विचार बघत होती आणि ते विचार तू आमलात आणत आहेस या गोष्टीचा मित्र म्हणून सार्थ अभिमान आहे, काही मदत लागली तर मित्र म्हणून हाक मार मी तुझ्या सोबत नेहमी आहे,
महेश मिलके
आनंद खुप सुंदर सुनील आंबेकर
खरचं सर,आयुष्यभर एक कलाकार म्हणून रहायला नक्कीच आवडेल..त्यासाठी मी नक्की परत येईन..फक्त थोडे दिवस.— संतोष सूतार.
तुझ्या या संघटनेमुळे कलाकार मुलांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलास तुझा या कार्याला शुभेच्छा ............... महेंद्र बोरकर
सर, अप्रतिम लेखन.विविध विषय तुम्ही हाताळत आहेत.
सर, अप्रतिम लेखन.विविध विषय तुम्ही हाताळत आहेत.
Sir Khup sundae ashmita shinde
आंबेकर सर म्हणजे उत्साहाचा झरा. नेहमी हसतमुख राहून कुठलेही दबाव तंत्र न वापरता मुलांकडून कल्चरलची कामे ते सहज करून घेतात. इतकी वर्ष कल्चरल व युथ चांगल्या पद्धतीने करून घेताना बघण्याचा मी एक साक्षीदार आहे. सतत अॅक्टिव राहणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य.
Ya purvi aapala ek blog vachala hota. Chan likhan kele hote. He sudha eka arthane vegle parantu kam karanaryansathi urja denare likhan aahe..
🙏🏻 सर मागील सर्व ब्लॉग वाचले. सगळेच खुप छान जमलेत. प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही मोकळेपणे व्यक्त झाला आहात(म्हणजे जसे आहात तसेच)
विशेष करून **अनिल दादा, यादव सर, आणि आजचा युथ वरचा* ब्लॉग खुप जवळचे वाटले. कारण ते ब्लॉग नात्यांवर - मानवी संबंधांवर बोलतात. सर तुमचा प्रवासही मी जवळून पाहीला आहे; पाहतो आहे. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत कस लढाव याचा उत्तम परिपाठ म्हणजे प्रा. आनंद आंबेकर सर तुमच्यामुळेच कॉलेज स्पर्धक, आयोजक, नेतृत्व ते स्पर्धा परिक्षक इतके वेगवेगळे अनुभव मी घेऊ शकलो. खर तर तुमच्या मुळेच गुणी कलाकाराना योग्य मान मिळू शकला अस म्हणता येईल. हे सर्व करताना कोणताही स्वार्थ न ठेवता निरपेक्ष हेतुने तुम्ही फक्त करत राहिलात. हे करताना तुमच वैयक्तिक आयुष्य देखील समृध्द केलत. समृध्द म्हणजे फक्त अैहिक सुख नाही. पत्नी, मुलं यांच्यातल नात दृढ केलत. सर्व activity करत असताना घराकडे दुर्लक्ष होतं पण तुमच्या पूर्व पुण्याईने त्यातही तुम्हाला अर्धांगिनीची उत्तम साथ मिळाली. तुमच्या यशाचा तराजू तुमच्या बाजूनं झुकता ठेवण्यात त्यांची साथ मोलाची आहे. तुम्ही देखील कुटूंबाला तेवढाच न्याय दिला आहात आणि द्याल.
तुमच्याकडून संय्यम, आत्मविश्वास, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी मला लाभू दे. तुमचं प्रेम, साथ, मार्गदर्शन, आयुष्यभर लाभू दे एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻
श्रीकांत तू या कलाप्रवासातील सोबती आहे त्यामुळे तुला जवळून सर्व माहीत आहेस ....भविष्यात अजून काम करू
धन्यवाद. तुम्ही कायम माझ्यासाठी खूप काही आहात. मला सकारात्मकता दिलीत आत्मविश्वास दिलात. धीर दिलात . चुकलो कधी तर हक्काने मायेने दम सुद्धा दिलास . कॉलेज हे घरासारख झालं तिथे आम्ही कधीही येऊ शकत होतो मनाप्रमाणे काम करत होतो .तुम्ही, बापू सर यांनी हक्काने कायम जबाबदारी दिलीत . एखाद्या प्राध्यापकाला असेल तितकेच स्वातंत्र्य तुमच्यामुळे मिळालं तुम्ही एकदा एक मोठं वाक्य मी fy ला असताना म्हटलं होतत , , कॉलेजला असं नाव करा की तुम्हाला गेट वर कधी ID नाही विचारलं पाहिजे तीच तुमची पात्रता आणि सन्मान असेल. खरं तर याला खूप प्रतिष्ठा आहे , BUT मी हेच वाक्य डोळ्यासमोर ठेऊन काम करत गेलो . आणि त्या मुळेच कॉलेजमध्ये नाव झालं. भले आजवर कुठले नियम सुद्धा तोडले नाहीत कॉलेज चे करण त्यावर निष्ठा ठेवायला तुम्हीच शिकवळत. जे कधीही विसरणं शक्य नाही . Love u सर असेच कायम पाठीशी राहा .तुम्ही कायम गुरू स्थानी आहात ।🌹🌹🌹🌹😇😇😇🌷🌸💐🌸🌷🌸🌷🌸🌹🌺🌹🌷🍄💐🍄💐🍄💐🍄🍀🍁🍀🍁🎍🌴🌵🌴🌵🌴🌵
सुंदर शब्दांकन सर अगदी बरोबर....
उत्तम कल्पना. आनंद अभिनंदन आणि शुभेच्छा.
Kharch khup khup abhinandan aani tula shubhechya aanand
खूप छान..👍👍
Vaibhavi Bane-Kamble.
खूप छान सर💐💐 अभिनंदन.तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करता...
खूप छान सर खूप आवडतं तुमचं लिखाण
- तन्मय सावंत
खूपच छान सर...!
खुप सारे कलाकार गोगटे मधून तुमच्या मार्गदर्शनाखाली घडले.. प्रत्येकाच टॅलेन्ट तुम्ही शोधून तसा त्याला तुम्ही मार्गदर्शन केलंय...आणि तुमचं मार्गदर्शन कुठे कमी नाही की चुकल नाही...एक अनुभव...
Unknown६ जुलै, २०२० रोजी ९:३३ म.उ.
खुप सारे कलाकार गोगटे मधून तुमच्या मार्गदर्शनाखाली घडले.. प्रत्येकाच टॅलेन्ट तुम्ही शोधून तसा त्याला तुम्ही मार्गदर्शन केलंय...आणि तुमचं मार्गदर्शन कुठे कमी नाही की चुकल नाही...एक अनुभव...
उत्तर द्या
"हिय्या"एकांकिकेतील गणप्या तुला केला तेव्हा अनेक लोक नाराज होते पण..पुरुषोत्तम करंडक मध्ये पारितोषिक मिळवुन देऊन तू तुझी निवड सार्थ ठरवली होतीस ....धन्यवाद निलेश गोपनारायनला
सर, हा ब्लाॅग वाचून एका कलाकाराला घडवण्यासाठीची तुमची तळमळ लक्षात येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतः मध्ये असलेली सुप्त कलेचा विसर पडत चाललाय,नि उत्तम करियर, पैसे मिळवण्याच्या हेतूने एकाच दिशेने धाव घेण्याच्या प्रयत्नात असतात, कारण समाजालाही हे अपेक्षित असत.... 🤷🏻♀️मग स्वतः मधील कलेची जाणिव असूनही, ती लोप पावत जाते नि राहीली तरी एक passion म्हणून अस्तित्वात असते, कारण कलेला वाव देण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. मग एकीकडे शिक्षण नि दुसरीकडे कला याची सांगड घालत असताना एक उत्तम मार्गदर्शक लाभणेही भाग्याचे ठरते, मित्रांनो आपल्यालाही सरांच्या रूपात एक उत्तम मार्गदर्शक लाभले आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.🙏 मग त्यांना उत्तम प्रतिसाद देणे आपले कर्तव्य आहे... 🤟🏻😊
अतिशय सुंदर कार्य चालू आहे आनन्द सर ...आमच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी नेहमी आहेत
खूपच छान, lockdown चा काळात वाचायला मिळालेल्या सुखद गोष्टींपैकी एक, या कार्यात आम्ही तुमचा सोबत आहोत....🎭🎭
VERY NICE ANAND
खुप छान लेख मित्रा असाच लिहत रहा
खूप छान. आजच्या कलाकारांना Y'faa सारख्या संघटनेची गरज आहे. यातून त्यांना सकारात्मकतेने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. मी कॉलजमध्ये असताना तुझ्यामुळे मला एकांकिकेत काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे आज मी कितीही लोकांसमोर आत्मविश्वासाने बिनधास्त बोलू शकते. तुझ्या Y'faa या नवीन उपक्रमाला खूप शुभेच्छा.
छान उपक्रम
आनंद सर खूप छान उपक्रम आहे. असेच चांगले उपक्रम राबवत रहा. त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार याबद्दल शंका नाही. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आनंद छान उपक्रम
असाच कलाकारांच्या मागे कायम उभा रहा.
तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
Very nice blog on Gurupornima,you are very nice person as well as good teacher,son,a loving husband,careing father, supporting brother & overall that a helping friend, all the very best for ur page yfaa.
दादा... सर... गुरू म्हणजे काय ह्याच सुंदर उदाहरण आहेस तू .. सुरेख लिखाण आहे....
टिप्पणी पोस्ट करा