●बापू ....समर्पित व्यक्तिमत्त्व
●प्रा.आनंद आंबेकर
●गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
१ ऑगष्ट २०२०
-------------------------------------------------
💐💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
मी 1990-91 ते 19995-96 गोगटे कॉलेजचा विद्यार्थी
1999 ते आज तागायत गोगटे कॉलेजमध्ये प्राध्यापक
या काळात बापू कधी सोबत नव्हता
असा विचार करून सुद्धा सापडणार नाही
मी प्राध्यापक आणि बापू ऑफिसचा माणूस
ही खरी आमची पगारी ओळख
..पण या व्यतिरिक्त कामातच आम्ही दोघे जास्त बिझी
बापू कॉलेजच्या मॅनेजमेंट(सर्व) मध्ये ...
मी कॉलेजच्या इव्हेंट मॅनेजमेंट (फक्त) मध्ये
…...केवळ हाच आमच्या दोघातील कॉमन फॅक्टर
काम आणि त्यातील समर्पन हे मी बापू कडे बघून बघून पचवतो ...हा समर्पन पचवावच लागत ...नाहीतर सगळीकडेच बोंब
सर्वात महत्त्वाचे प्रिया (बापूची पत्नी) … बापूच्या समर्पनाला प्रियाची साथ नसेल तर दोलायमान स्थिती झाली असती ...काही दिवसांपूर्वीच अनुष्काने (बापूच्या मुलगी) SSC ला 97% मार्क मिळून दोघांनाही आयुष्यभराच खूप मोठं समाधान दिलं ….आवर्जून बापूने फोन करून सांगितले यांचा आनंद खुप झाला.
आनंदात सहभागी करून घेण्याचा मनाचा मोठेपणा बापूचा नेहमीचा स्वभाव. नवीन गाडी घेताना आम्ही अनेक मित्र सोबत होतो ….घर घेताना तर आम्ही 3 वर्ष रत्नागिरी पालथी घातली ...शेवटी आम्ही दोघे नाचण्यात एकाच ठिकाणी रहायला आलो.बापूला गाड्यांची विशेष आवड असल्याने चांगली गाडी दिसली की लहान मूलांसारखा त्या गाडी सोबत फोटो काढणार
म्हणूनच मी 10 वर्षांनी लहान असून सुद्धा त्यांच्या सोबत मित्रासारखा राहू शकतो ...मनातील सर्व शेअर करू शकतो...
काळजी घेणारा माणूस सर्वांचीच काळजी घेत असतो ...समर्पित असणारा व्यक्ती सगळीकडेच समर्पित असतो कारण त्याचा तो स्थायी स्वभाव असतो.
बापू त्याला अपवाद नाही.
कॉलेजमध्ये जितका बापू आपला वाटतो तितकाच त्याच्या कॉलेज मित्रांसोबत सोबत सुद्धा बापू घरचा वाटतो. कोणत्याही मित्राला बर नसेल तर बापू तिथे हजर असतोच ….इतकंच काय कोल्हापूर ...पुणेमध्ये जाताना स्वतः ड्रायव्हिंग करून जाणार
म्हणूनच बापू जेव्हा डेंगूने आजारी होता तेव्हा डेरवण हॉस्पिटलमध्ये लोकांची मोठी रांग लागली होती
बापूला रक्त देता आलं नाही म्हणून वाईट वाटून घेणारे मित्र होते ….कारण बापूसाठी रक्त देणारे भरपूर झाले होते. माणसं कमविण्याची कला बापूकडे अफलातुन आहे. लोकांच्या प्रसंगात धावून जाण्यासाठी बापूची एक सिस्टीमच बनवलेली आहे.
बापूच्या आयुष्यातील आदराचे स्थान म्हणजे अरुअप्पा जोशी 1995 ते 2008 पर्यंत अप्पांच्या प्रत्येक नियोजनात बापू नाही असं कधीच झालं नाही
कॉलेजचा विकासाचा विषय असेल ….कुसुमताई पतसंस्था काढायची असेल ...भाजप पक्ष विस्तार असेल… सगळीकडे अप्पाच्या सोबत बापू असायचाच
म्हणूनच 2008 नंतर बापूच्या कामात हक्काचं ….आदराचं स्थान गमावल्या सारखं कायम त्याला वाटत असतं. पण तरीही संस्था म्हणून कोणीही अधिकारात व्यक्ती आला तर बापू सोबत असतोच हीच त्याच्या कामातील समर्पित वृत्ती दिसून येते.
बापूचे आणखीन एक विशेष कौशल्य म्हणजे त्याचे लिखाण कर्माने क्लार्क परंतु स्वभाव धर्माने कलाकार म्हणूनच नाटक ..संगीत ..यामध्ये कायमच रमणारा स्वतःच्या काळबादेवी गावाच्या अनुभवाची लेखणी सर्वानाच भावते ...विषेश भंडारी भाषेतील त्याचं लिखाण आपलंसं करत ….
बापूला कधीकधी मतलबी माणसं भेटतात तेव्हा नाराज असतो ...पण नाराजी सुद्धा त्या मतलबी व्यक्तीच्या आयुष्यात वाईट दिवस येतील तेव्हा त्यांच्यासोबत कोण असणार या काळजी पोटी असते …
म्हणूनच मी सुद्धा माझ्यावर असे प्रसंग आले की बापूकडे मन हलकं करायला जातो.
असाच एक प्रसंग …2013 साली
माझ्या मोठया बहिणीच्या घराचा प्रश्न होता
बापूला सहज बोललो भावजीनी मला विश्वासात घेतलं असत तर मोठा प्रसंग टळला असता (घराच्या व्यवहारातच भावजीची ठेथ झाली होती ) सर्वच जबाबदारी माझ्यावर आली होती ..एकीकडे पोलीस तपास ...दुसरीकडे बहिणीची तब्बेत ….तिसरीकडे घराच्या परवानगीचा प्रश्न ...मन सैरभैर झाले होते
बापू म्हणाला आपण संपाला बोलू ...संपा म्हणजे नाचणे गावचं आदराच व्यक्तिमत्त्व म्हणजेच संतोष सावंत
आम्ही गेलो ...संतोषनी मलाच वेड्यात काढलं अगोदर का आला नाहीस ...म्हटलं भावजीनीच मला विश्वासात घेतलं नाही तर तुला मी काय सांगणार …
भावजी अनेक बड्या लोकांकडे जाऊन आले होते
..पण घोळ काही सुटत नव्हता
बापू म्हणला झालं ते झालं आता आनंद टेन्शनमध्ये आहे त्याच्यावर सर्व जबाबदारी आली आहे ...म्हणून मी आलोय
...संतोषनी लक्ष दिल्यावर सर्व गोष्टी सुरळीत झाल्या
या दोघाच्या मैत्रीमुळे मला रिलॅक्स होता आलं होतं
माझ्या दोन्ही भाच्या म्हणतात मामा तू होतास म्हणून आज आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला येऊ शकतो ….पण बापू नसता तर संतोषनी लक्ष दिलं नसतं आणि संतोषनी मनापासून लक्ष दिलं नसतं तर आज हक्काचं घर मिळालं नसतं बापूच्या या मनापासून मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्यासारखे किमान शेकडो लोकं तरी निर्धास्त आपले प्रश्न त्याच्यासमोर घेऊन जाऊन बापू आपले स्वतःचे वैयक्तिक संबंध मध्ये घालून लोकांचे प्रश्न सोडवत असतो अशा समर्पित बापूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!
३७ टिप्पण्या:
Happy Birthday Dear Bapu Saheb, U Have Always Supported Me In My College Days In Various Situation. Thank You Very Much Nice To See You.
सुंदर आणि आकर्षक मांडणी.
आनंद, सुंदर लिहिल आहेस,
सेवा भावी बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सुंदर व्यक्ती वणऀन
Happy birthday sir
सुंदर लेखन केलय सर
आनंद छान लिहितोस रे
खूप छान लिखाण सर. बापू साहेब हे एक ऊत्तम वक्ती महत्त्व आहे. हा माझा स्वताचा अनुभव आहे.
छान प्रयत्न ! अफलातून बापूच्या व्यक्तिमत्वाचा परामर्श मोजक्या शब्दात घेणे खूप कठीण आहे.
आपला सांगाती.......प्रसाद (बापू)
कॉलेज म्हणजे....बापू......असं जणू समिकरणचं आहे..... वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐🎂💐💐
मस्त। Happy birthday Gawankar saheb
ओघवती लेखनशैली.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
खुप छान व्यक्तिमत्व सादर केलात आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
खूप छान.गवाणकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लहानपणी माझ्या ऐकण्यात फार वेळा येणारं नाव आहे हे... सतत घरी गोगटेचेच विषय.. आणी त्यात बापू काकांचं नाव नाही असं झालेल मलाही आठवत नाही.. असो.. लहानपणी च्या त्या आठवणी फार रम्य होत्या... त्यातलं नाव वाचून छान वाटलं...आणी आठवणी जाग्या झाल्या... वाढदिवसाच्या शुभेच्छा... काका...
बापू या व्यक्तीवर बरेच लिहण्यासारखे आहे हे खरे त्यातल्या आपल्या एका विधानाचा अनुभव मी सहकारचे काम पहाताना घेतला आहे.सहकारसाठी कांही लिहा म्हटल की दुसऱ्या दिवशी यांचा लेख तयार. बर गडबडीत लिहायचे म्हणून लिहले असे नाही.म्हणून मी कितीतरी वेळा म्हटलय की,वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचे सारखी लिखान शैली त्याचे लिखाणात पहायला मिळते.दुसरे बापू वैचारीक विरोधाला ते व्यक्तीगत पातळीवर घेत नाहीत.मग ते वैचारिक मतभेद सामाजिक राजकीय धार्मिक किंवा प्रादेशीक असोत .आणि हे अपवादानेच आढळते.कदाचीत आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामुळेच बापूचा मित्रपरिवार मोठा आहे.प्रसंगात धावून जाण्याच्या वृत्तीबाबतच्या त्यांच्या अनेक कहाण्या आहेत.त्या आपण समर्पकपणे वर्णिल्या आहेत. इतर लेखाप्रमाणे हाही लेख छानच.अप्रतिम ........तुळशिदास रोकडे .
मित्रा आनंद
खूप छान. मांडणी मस्तच.
आणि बापू साहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
प्रभाकर कांबळे
खुप सुंदर व्यक्तीमत्व... वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर..😊🌹
खूप छान मुद्देसूद लिखाण आहे...एक जीवनपट साकारणारे लिखाण...बापू गवाणकर एक मितभाषी व्यक्तिमत्व कॉलेज लाईफ मध्ये खूपवेळा सहाय्य केलं... अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या खूपखूप मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐🥞
Samidha sawant.
Sir khup chan😊👍🏼
बापूच्या व्यक्तिमत्वाचे माहीत असलेले विविध पैलू आपण सोडून दाखवले Thank you Ananda - Dr.Sudhir Yevle, Research Guide and Head,Dept.Of sociology,Beed
बापूच्या व्यक्तिमत्वाचे माहीत असलेले विविध पैलू आपण उलगडून दाखवले Thank you Ananda - Dr.Sudhir Yevle, Research Guide and Head,Dept.Of sociology,Beed
Bapu 🙏💐
Mitra khup Chan lihilus Mazya mitabaddal!
Aruappancha varsa chalavnarya mojakya Ratnagiri karan madhe la ha Aapla Mitra yevdhach pures aahe......Sunil
सुंदर... प्रत्येक जण जसा भावला तस खरं... लिहिता
खूप छान.सरांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू छान पणे मांडले आहेस. अशा व्यक्ती फार कमी आहेत की ज्या कोणताही स्वार्थ न ठेवता इतरांना मदत करतात.सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप छान.सरांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू छान पणे मांडले आहेस. अशा व्यक्ती फार कमी आहेत की ज्या कोणताही स्वार्थ न ठेवता इतरांना मदत करतात.सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
सुंदर लेख..एखाद्या व्यक्ती विषयी कृतज्ञपूर्वक लिहिणे.. आनंद हा तुझा स्वभावच...सर्वांच्या मनात तुला मोठा बनवतो.या लेखातून आणखी एक कळते की , जीवनात कोणतीही अपेक्षा न करता, निस्वार्थीपणे क्षदत केली पाहिजे, त्याची परतफेड कोणत्याही प्रसंगी होऊ शकते. बापूंना वाढदिवसाच्या सुभेच्छा...! आनंद असेच छान लिखाण कर..
बापू ! नावतच सर्व काही, एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व, आणि आनंद ने वरील ब्लॉग मध्ये सर्व काही डिटेल मध्ये लिहले आहे त्यात दुमत नाही, अति सुंदर वर्णन.
बापू तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थाना.🎂💐
खूप सुंदर एखाद्या व्यक्तीच व्यक्ती चित्र रेखाटन फारच छान करता सर त्यामुळे ते वाचताना संपूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते
खूप सुंदर एखाद्या व्यक्तीच व्यक्ती चित्र रेखाटन फारच छान करता सर त्यामुळे ते वाचताना संपूर्ण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते
समर्पित असणारा व्यक्ती सगळीकडेच समर्पित असतो कारण त्याचा तो स्थायी स्वभाव असतो,,
सुरेख व्यक्तिचित्रण केले आहे,
आनंद... बापु यांचे नांव तुझ्या तोंडून खुप वेळा ऐकलं आहे. मात्र, आजच्या तुझ्या लिखाणातून संपूर्ण व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभं राहिले. ज्या आपुलकीने त्यांचा बद्दल लिहिलं आहे. त्यावरून असं वाटतं की, अशी व्यक्ती सर्वांच्या जीवनात असायला हवी... श्री. बापुंना वाढदिवसाच्या (थोडया उशिरा ) शुभेच्छा.....
नमस्कार
गवाणकर सर तुम्हाला वाढदिवसाच्या उशिरा शुभेच्छा देते, मी गोगटे ला शिकत असताना गवाणकर सर नेहमी आपुलकीने माझी चौकशी करायचे, आंबेकर सर खूप छान लिखाण करत आहात, keep it up.
आनंद तुझं लेखन नेहमी प्रमाणेच भावल....लेख वाचताना .....अभिप्राय वाचताना....बापूवरच प्रेम अधिकच द्रुढ झाल...मालवणीत एक म्हण आहे....नशिबान घो गावता..
गवाणकर सरांशी प्रत्यक्ष तशी भेट नाही. पण एक कर्तृत्ववान व cooperative सर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.त्यांना माझ्याकडून शुभेच्छा ! आणि संख्या शास्त्रा नुसार ते स्वकर्तृत्ववान आहेतच!
Excellent 🌹🌹 always feeling inspired by your writing..
टिप्पणी पोस्ट करा