भाई ते भाई ते भाई ...एक जन्म तीन आयुष्य
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
20 डिसेंबर 2020
________________________
आंबेडला एकत्र कुटुंब असल्याने सख्ख.. चुलत असा भेदभाव कधी समजलाच नाही आणि मोठ्या माणसांचे व्यवहार अगदी सख्ख्या सारखे असले तर अजिबातच समजत नाही ..भाई मोठ्या काकांचा दोन नंबरचा मुलगा ... पण कधी चुलत भाऊ वाटलाच नाही त्याच्या मोठ्या भावाला भाऊ म्हणायचं आणि याला भाई म्हणायचं ...माझी मोठी बहीण आणि तो जवळपास एका वयाचे असल्याने त्याचा आदरच असायचा... मुळात भाई हा कलाकार स्वभावाचा माणूस लहानपणापासून त्याची पेंटिंग्स मी बघत आलो आहे ..इतके अप्रतिम असायच्या की आम्ही फॅन होतो त्याचे गणपती आले की भाई हवाच असायचा कारण त्याच्या डोक्यातून अतिशय कल्पकतेने दरवर्षी नव्या पद्धतीची डेकोरेशन साकार व्हायची… भाई रत्नागिरीत हॉस्टेल मध्ये शिकायला होता ….रत्नागिरी 30 किलोमीटर अंतरावर असलेले शहर पण आमच्यासाठी खूप लांबवर असल्यासारखं वाटायचं ….सगळ्यांनाच लहानपणी एखाद्या घराचे ….प्रवासाचे अंतर खूप मोठे वाटतात ...तसेच आम्हाला वाटायचे ….कालांतराने तेच अंतर किती छोटसं आहे असे वाटायचे...वडील पहिल्यापासून ट्रिप काढण्यात एक्सपर्ट लहान मुलांना सोबत घ्यायचे ...एखाद-दुसरा शिक्षक सोबत असायचा ….त्यावेळी आम्ही अतिशय छोटुकले दुसरीत असु…. आमची सर्कस बघायला ट्रीप करायची ठरलं ...रात्री उशीर झाला की भाईच्या शाळेत रहायचं ...भाई दहावीला शिवाजी हायस्कूलला होता…. त्याने त्यावेळेच्या वॉर्डनला पटवून आमचे एका रूम मध्ये राहण्याची व्यवस्था केली … त्यामुळे भाई आम्हाला खुप मोठा वाटायचा ...आंबेड मध्ये भाईची ओळख चांगल्या क्रिकेटर म्हणून होती ...अनिल आणि सुनील दोघेही त्यांना मोहल्ल्यातील लोकांना खेळायला हवे असायचे ...उक्षी ...कुरधुंडा... मध्ये ट्रॉफी असायच्या त्यावेळेला सुनील आणि अनिल त्यांच्या सोबत असायचे... त्या वयातील मुलाना ते दोघे हवेसे वाटायचे
….असा हा आमचा पहिला भाई कुटुंबवत्सल कलाकार आणि मित्रांचा मित्र
...आता दुसरा टप्पा सुरू म्हणजे मुंबईत गेल्यावर... जॉब आरे डेअरीमध्ये लागला ...मुंबईतील चाकरमानी गावी एस टी च्या प्रवासातून थकलेले ...आंबलेले चेहरे करून बाहेर पडायचे ...आप्पा (मोठे काका)असतील तर अर्धा दिवस फक्त प्रवास कसा झाला याच्याच गप्पा असायच्या ...पण भाईला मातीची ओढ कायम असायची आणि मग तो आला की,आम्ही त्यांच्या मागे मागे फिरायचं
….अचानक एकदा घरात एकदम स्मशान शांतता झाली कोणीतरी माणूस जात तसं घरात वातावरण होतं ..आई पहिल्यापासूनच आम्ही लहान जरी असलो तरी सगळे मनातून बोलायची समजून सांगायची ...आमचे भावविश्व समृद्ध करायची ही तिची खासियत ...तिच्याकडूनच कळलं की भाईला अटक झाली आहे … पोलिसांनी पकडले आहे कारण त्याच्या हातून अपराध झाला होता ….असं कळल्यावर आम्हाला असं वाटलं ..असं होऊ शकत नाही ….भाईसारखा माणूस असं करू शकत नाही …काही वर्षांनंतर भाई गावी आला ...पण त्याचं बसण्याचे ठिकाण आमच्या घरात कमी असायचं समोरच्या काकांच्या घरात कुठल्यातरी कोपऱ्यात बसलेला असायचा...आमची उत्सुकता असायची... परंतु भाई खूप कमी बोलायचा... लोकांमध्ये खूप कमी वावरायचा…. आणि नंतर लक्षात आलं की दिवस दिवस तो दारू पिऊन असायचा …. आई खूप समजवायची ...पण आमच्यासमोर आईने त्याच्याबद्दल कधीच वाईट इमेज तयार केली नाही …
इथे दुसऱ्या भाईचा जन्म झाला होता ….
गणपतीचे डेकोरेशन करणे .. पेंटिंग काढणे त्यांनी पूर्णपणे बंद केलं होतं ….एकटाच रहात असल्याचे दिसायचे त्याला खूप वाईट सवयी लागल्या होत्या…
जगात काही वाईट नाही .. पण पोरांनो चांगल्या संगतीत राहूनच चांगलं होतं ...अशी आई बोलायची ..पण आमचे अण्णा प्रॅक्टिकल कामात रस ...भाई आंबेडला आलेला असताना ...भाईला म्हणलाने या भिंतीवर चित्र रंगव ..., हे घे रंग आणले आहेत ...आमच्या घराच्या भिंतीवर शंकराचे चित्र आणि एक सरस्वतीचे चित्र खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलेले आठवते ….हळू हळू मुंबईत नाकारलेल्या भाईला गावी सन्मान मिळू लागला ...पेवेकर भाऊ खुप आदर करायचे… त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तयार होत होता ... थोड्या दिवसांनी अण्णा आणि आईने त्याचे लग्न करायचं ठरवलं भाई म्हणाला तुम्ही सांगाल तसे होईल आणि त्यांनी एका अतिशय साध्या स्वभावाच्या मुलीशी लग्न झाल्यावर तिसरा भाई जन्माला आला ...हळू कुटुंबवत्सल व्हायला लागला त्याचा भुतकाळ सोडू लागला आणि मुख्य प्रवाहात आल्यावर वेगळाच भाई दिसू लागला ... मला लिहिता येतं की नाही ते मला माहिती नव्हतं परंतु भाईला मी म्हणायचो तुझ्यावर एक पुस्तक लिहायचं आहे … भाई एक असं चुंबकीय व्यक्तिमत्व आहे ….त्याच्याबद्दल खूप आपुलकी आणि आपलेपणा वाटतो … मी कॉलेजला आल्यानंतर मी भाईला म्हटलं मी इलेक्शनला उभा राहत आहे … भाई म्हणाला असल्या फालतू गोष्टीत पडू नकोस... त्यातूनच भानगडी सुरू होतात … गोरेगावच्या सगळ्या कॉलेजला केवळ माझं नाव सांगून पोर निवडणूकीत निवडून येतात ... मी म्हटलं मला तसं काहीच करायचं नाही ….खूप चांगलं काम करायचा अनुभव घ्यायचा आहे. असा हा भाई मला वाईट अनुभव येऊ नयेत म्हणून काळजी घ्यायचा.
आमच्यावर सामाजिक संस्कार होते त्यामुळेच पुढें भाई सामाजिक... राजकीय क्षेत्रात अग्रेसर असायचा…. झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम जोरात सुरू झाल्यावर लोकांना समजून सांगाने ..तोंडाने समजून सांगायचं … नाही समजला तर भाई स्टाईल होतीच … पण कोणाचे वाईट केले नाही ... गोरेगाव स्टेशन जवळ एकदम हुकमत आहे ...पण आश्चर्याची गोष्ट साध्या साध्या लोकांच्याही मनाचा विचार करणारा भाई फेव्हरेट आहे… झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये सगळी लोकं नवीन रूममध्ये राहायला गेले ... पण भाईने आपला जुना रूम सर्वात शेवटी सोडला …. 2004 मध्ये आंबेडमध्ये महापुरुष मंदिराचे नूतनीकरण करायचं ठरलं त्यावेळेला मी आंबेड जीर्णोद्धार अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली होती ... आपल्याला मंदिराला दोन ते तीन लाखाचे सामान म्हणजे ..मार्बल ...लादी ..जैन मंदिरासारखे कोरीव खांब असे एक टेम्पोभरून सामने पाठवून दिले होते ...पण भाईने कधीच त्याचा गवगवा केला नाही …. हजार रुपये देणारा माणूस सुद्धा पुढे पुढे करत होता परंतु भाई स्टेजवरती कधी आला नाही असा हा आमचा तिसरा भाई सगळ्यांना हवा हवासा वाटतो.
पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
१० टिप्पण्या:
खूप छान लेख लिहिला आहे
सर , व्यक्तिचित्रण हा आत्ता तुमचा हातखंडा झालेला आहे व्यक्ती अगदी डोळ्यासमोर उभी राहते. अशीच व्यक्तिचित्रे चितारत रहा. व्यक्ती आणि वल्ली निर्माण होतील.👍
खुप चांगला लेख आहे आपल्या लिखाणातूनच व्यक्तिमत्व प्रकट होते
सुनील मामा सारख्या व्यक्ती फार कमी असतात ज्या निर्स्वार्थी भावनेने स्वेच्छेने कोणाच्याही मदतीला कधीही तयार असतात. मला कायमच तो ग्रेट वाटतो.तो कधी भावनिक तर कधी खंबीर असतो.माझ्या डिलिव्हरीच्या वेळी त्याची धडपड बघितली आहे .आजही पप्पांची आठवण काढून त्याच्या डोळ्यात पाणी येत तो म्हणतो माई माझी बहिण असूनसुद्धा तिच्यापेक्षा भावोजी गेल्याच दुःख मला जास्त झाल. lockdown च्या निमित्ताने त्याच्याकडे 3 महीने राहण्याचा योग आला खूप आपलेपणा वाटला माहेरी राहिल्याच सुख मिळाल. वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री12.00वाजता विडिओ कॉल केला तर tvisha ला बघून त्याच्या डोळ्यात पाणी आल एवढंच नाही गंमत म्हणजे tvishache डोळे पण पाणावले होते मला आर्श्चर्य वाटल कदाचित यालाच भावनिक ऋणानुबंध म्हणत असावेत. मी लहानपणापासून बघत आले की तो आंबेडला आला की सगळ्यांनाच आनंद होतो मग तो अगदी शंभू वडापाव का असेना.तो उत्तम चित्रकार आहे आजही त्याने आंबेडच्या घरात पडवीच्या भिंतीवर काढलेले शंकर आणि पार्वतीचे चित्र आठवते.खूप काही लिहिण्यासारखं आहे शब्द अपुरे पडतील .त्याला सुखी, निरोगी दीर्घायुष्य मिळु दे ही देवाजवळ प्रार्थना.
आनंद खूप सुंदर
सुनील आंबेकर
मामा सारखी व्यक्ती मी आयुष्यात कधी पाहिली नाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांना उत्तम आरोग्य लागो हीच सदिच्छा.
आनंद खुप छान लेख. एकत्र कुटुंब पद्धतीतील लेख वाचताना मन भरून येते. कुटुंबातील व्यक्तिचित्रणाचे पैलू छान रेखाटतोस. हि नाती अशीच टिकून राहो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
छान
कविता किशोर आंबेकर (ऊर्मिला काजरोळकर)
आंबेडचा सुनील मामा म्हणजे एक आगळी वेगळी आसामी.गुन्हा घडल्यानंतरचा मामा मला आठवतो कदाचीत तो गावी असल्यामुळे ओळखत नव्हते, आईच्या मामाचा मुलगा एव्हढ मात्र माहित होते.पहिल्यांदा मी पाहिले तर तो गुन्हेगार वाटला नाही पण मनात भिती मात्र होती. तो नेहमी हाक मारायचा आणि मी मात्र घाबरुन फक्त smile करायची.पण हळूहळू तो किती वेगळा आहे हे समजायला लागला. कुटूंबवत्सल, मनमिळाऊ, जबाबदार व्यक्ती दिसू लागला. आता तर मी त्याची भावजय(वहिनी) पण अजुनही मामा भाचीचे नाते सोडले नाही. बिनधास्त बोला तो कधीच अडवत नाही पण चुकीचे असल्यास रोखतोही.असा हा मामा cum दीर. मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.असाच नेहमी हसतमुख रहा. डॉ.आनंद आंबेकर आपण मामा बद्दल खूप छान च्लॉग लिहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा