बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

सनी आंबेकर ...बेधडक व्यक्तिमत्त्व

सनी आंबेकर... बेधडक व्यक्तिमत्त्व


प्रा.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

19 ऑगस्ट 2020

________________________________________




एखादया फिल्ममध्ये 14 वर्षाचा हिरो बांधकाम क्षेत्रात एखादया बिल्डरकडे काम करत असतो कष्ट करत असतो ...पण नोकरी त्याला केवळ काम शिकून घेण्यासाठी करायची असते मग हिरो नोकरी सोडून देतो

मोठं होण्यासाठी मोठं मोठ्या लोकांच्या सानिध्यात रहायला सुरुवात करतो  ...कारण त्यांच्या मनात कायम स्वतः बॉस व्हायचं असतं ...मग यासाठी 20 वर्षानंतर स्वतः बांधकाम कंपनी स्थापन करतो … ज्यालोकांच्या इथे नोकर म्हणून काम करतो तिथे स्वतःच्या कष्ठाने त्यांच्या सोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम करायला सुरुवात करतो. ….वाटला की नाही एखादा अभिताभ बच्चनची फिल्म बघत आहात. ...पण ही फिल्म नाही फिल्म सारखं जीवन जगणाऱ्या सामान्य घरातील असामान्य स्वप्न पाहणाऱ्या सनी आंबेकरची स्टोरी आहे 

वडिलांचा जॉब सरकारी ...पण सतत बदलीचा असल्याने बारा गावचं पाणी पिऊन खूप लहान वयातच मोठा झालेला सनी …

माझं कॉलेज संपून एम ए साठी कोल्हापूर येथे शिकण्यासाठी जाण्याची माझी धडपड सुरू होती तोपर्यंत कर्ल्यात सुनीलदादाकडे रहात होतो ...तर हे महाशय देसाई हायस्कुलमध्ये शिकण्यासाठी थिबा पॅलेस घाटातून चालत जायचे ...पण धड कुठे ...बॉस असल्यासारखं समवयस्क पोरांवर दादागिरी करत जायचे ...पण वडीलधाऱ्या व्यक्तीशी कायमच आदराने पण मित्रासारखे वागायचे ...एकदम बिनधास्त स्वारी ...कसली तमा नाही ...चिंता नाही ….पण नेहमी काहीतरी वेगळं करण्याच्या थाटात असायचा. शिकण्याच्या नावाने बोंब असायची ..पण दुसऱ्याला शिकवण्यात अग्रेसर असायचे यामुळे अनेकांना उर्मट वाटायचा ...अजूनही वाटतो ...पण माझं रिडींग एखादा व्यक्ती कर्तृत्ववान असेल तर त्याच्यासाठी सनी कधीही काहीही करायला तयार असतो ...पण कर्तृत्ववान आहोत असं कोणी त्याच्यासमोर भासवायचा प्रयत्न केला की ...हा गेला त्यांच्या अंगावर ...मग शांत बस म्हटलं तरी गप्प बसणार नाही.

काही काळ राजकारणात स्वतःला अजमायचा प्रयत्न केला ...पण त्याच्या स्वतःच लक्षात आलं की आपल्या सारख्या देधडक माणसाचं इथे काम काम नाही ...आणि स्वतःच थांबला आणि स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ...पण त्यांचे भाई जठार ...सुदेश मयेकर यांच्या बद्दल त्याच्या मनात खूप आदर आहे. आणि कधीही या दोघांनी हाक मारली की, सनी नाही बोलू शकत नाही … 

वरकरणी तापट वाटणारा सनी भावना विवष होऊन रडतानाही ही मी पाहिला आहे … त्याच्या आईचा विषय आला की खूप हळवा होतो तिचा मृत्यु तो आजही पचऊ शकला नाही. ...आणि मग सहज डोळ्यातून त्यांच्या अश्रू यायला सुरुवात होते ….कोणतीतरी खंत असते ती त्याला सतत बोचत असते … आणि मग हलवा होतो

शाम आंबेकर हे एक अजब व्यतिमत्व होत... शामच त्याच्या सख्याभावाशी सुदधा कधी सूर जमले नाहीत पण सनीसोबत दिवस दिवस त्यांच्याकडे येऊन रहायचा ...या दोघांमध्ये एक कॉमन धागा म्हणजे ….मोठी मोठी सामाजिक स्वप्न बघणे ….पण लोकांच्या डोक्याच्या वरून यायचं 

शाम अचानक हार्ड अटॅक आला आणि आम्हाला सोडून गेला तेव्हा सनीची अवस्था अतीशय बिकट होती …..एव्हढा भावना विवष व्यक्ती आज तागायत व्यक्ती पाहिला नाही ... त्यांची भावना विवष अवस्था बघून त्याची पत्नी सानिका मी सोबत जावं म्हणून विनवणी करत होती ...केवळ सनीला सांभाळण्यासाठीच मी शामच्या प्रेताला सोबत गेलो होतो.. 

सनीच्या इमोशनला आधार देण्याचं कारण सुद्धा तसच होत ...माझी मोठी बहीणीचा मृत्यु झाला तेव्हा मी खुप खचलो होतो ...आणि भाचीच्या लग्नाची जबाबदारी होती … प्रीतीची अवस्था बघून खूप वाईट वाटतं होतं

...आणि प्रीतीचे लग्न ठरलं ...सनीने मग माईच्या घराचे नूतनीकरण करणं करायचं ठरवलं ...आणि जोकाही धडाका लावला ….माईच घर कोणालाच ओळखता येणार नाही असं अप्रतिम केलं ….आणि ते पण प्रीतीची हलदकाढणी नवीन घरात करायची हा त्याने केलेला पण पूर्ण केला ….कोण एव्हढं कोणासाठी करत ...स्वतःची काम सोडून आवडत्या व्यक्तीसाठी जीवाच रान करणारा सनी …..हा माझ्या आयुष्यात एकमेव आहे ...म्हणूनच त्यांचे स्थान माझ्या आयुष्यात खुप महत्वाचे आहे …. त्याची सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना 



७ टिप्पण्या:

Prashant Nevrekar म्हणाले...

छान??

Unknown म्हणाले...

आंनद भाऊ खुप छान लिहीलात याच्या विषयी
मी सानिका सनी आंबेकर

प्रिया नेवरेकर म्हणाले...

सनी मामा बाबत लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. खर तर तो खूप भावनिक आणि कोणाच्याही मदतीला कधीही धाऊन जाणारा आहे पण तेवढाच दिलखुलास,एन्जॉय करणारा आहे.मम्मी आजारी असताना मुंबईत डॉक्टरकडे नेण्यासाठी त्याची खूप मदत झाली होती.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

प्रिया नेवरेकर म्हणाले...

सनी मामा बाबत लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. खर तर तो खूप भावनिक आणि कोणाच्याही मदतीला कधीही धाऊन जाणारा आहे पण तेवढाच दिलखुलास,एन्जॉय करणारा आहे.मम्मी आजारी असताना मुंबईत डॉक्टरकडे नेण्यासाठी त्याची खूप मदत झाली होती.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Geeta Ganesh Ambekar म्हणाले...

Anand bhau, khup mast lihilat sunny baddal, kharach to khup changla vyakti ahe, happy birthday sunny, god bless you

Geeta Ganesh Ambekar म्हणाले...

Anand bhau, khup mast lihilat sunny baddal, kharach to khup changla vyakti ahe, happy birthday sunny, god bless you

Umesh Ganesh Chiplunkar म्हणाले...

सनी च्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेला हा ब्लॉग खूप छान आहे, सनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐🎉🎉🎊🎊

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...