Y'faa म्हणजे ....
Youth Festival Artist Association
संपूर्ण भारतभर युथ फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणाऱ्या फक्त विद्यार्थी नव्हे तर सपोर्ट करणाऱ्या प्राध्यापक, पालक, कलाकार या सर्वांसाठी Y'faa हे व्यासपीठ आहे. हौशी कलाकार आणि व्यावसायिक कलाकार या बरोबरच दैनंदिन शिक्षण घेत असताना ..नोकरी व्यवसाय करत असताना ...आपली कला जपण्यासाठी ..जोपासण्यासाठी ही सांस्कृतिक चळवळ सुरू केली आहे ...नाट्य ,नृत्य, संगीत,वाड्मय, ललित कला , हस्तकला ..लोककला यांचे संवर्धन आणि वृद्धी करण्यासाठी Y'faa तुमच्या सोबत असणार आहे. वाय फा चे संघटक अतिशय निस्वार्थी पणे काम करत आहे....
एक शिस्तबद्ध सांस्कृतिक संघटन करूया ...
सांस्कृतिक महाराष्ट्र घडवूया….
यातूनच पहिला कार्यक्रम गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली ....
युथ फेस्टीव्हल आर्टीस्ट असोसिएशनच्या गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेला महाराष्ट्रामधून 271 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पहिला किल्ला सर केल्या सारखे वाटले मालवण पासून गोंदिया पर्यंत आणि मुंबई-पुण्यापासून कराड- साताऱ्यापर्यंतचे स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रसंग होता...
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या विरोधात संपूर्ण देश लढा देत आहे. कोरोना कालावधीत कलाकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी युथ फेसिव्हल आर्टीस्ट असोसिएशन (Yfaa) ने राज्यस्तरीय गणेशोत्सव फोटोग्राफी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पी ए एस फाऊंडेशन, पारिजात फाऊंडेशन, मुंबई तसेच महाराजा फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून...
स्पर्धेचे गुगल फॉर्मच्या माध्यमातून हे फोटो अपलोड करण्यात येत होते. राज्यभरातून आलेल्या विविधांगी आकर्षक 271 फोटोंमधून 30 नंबर निवडण्यात आले. यामध्ये
प्रथम क्रमांकास 1000/- रू व सर्टिफेकेट,
द्वितीय क्रमांकास 700/- रु. व सर्टिफिकेट,
तृतीय कमांक 500 रुपये व सर्टिफिकेट तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग ई-सर्टिफिकेट देण्यात आले.
यामध्ये प्रथम कमांक- राजेश प्रभाकर वराडकर, दादर,
द्वितीय कमांक - शैलेश इंगळे, रत्नागिरी,
तृतीय कमांक - शरद पाटील, इचलकरंजी
यांना देण्यात आले सुपर 30 चे परिक्षक म्हणून परेश राजीवले आणि अंतिम स्पर्धेचे परिक्षक श्री. समाधान पारकर यांनी उत्तमरीत्या काम पाहिले. प्रथम कमांक प्राप्त राजेश वराडकर यांनी गणपती विसर्जनावेळी पाण्याचे उडणारे फवारे आणि त्यातूनही स्पष्टपणे दिसणारी गणेशाची मूर्तीने परीक्षकांचे मन वेधून घेतले. तर द्वितीय कमांक शैलेश इंगळे यांनी गणेशाभोवती केलेली सजावट हेच आकर्षण होते. तर तृतीय कमांक शरद पाटील यांनी कोरोना योध्दे अर्थात पोलिस गणेशविसर्जनावेळी गणरायासमोर नतमस्तक होऊन कोरोना लढ्याशी दोन हात करण्यासाठी शक्ती दे अशापकारचे काढलेले छायाचित्र लक्षणीय होते.
चळवळ म्हटली की लोकांचा सर्वच स्तरावर सहभाग आवश्यक असतो म्हणूनच जाणीवपूर्वक सह प्रायोजक घेणे ही नेहमीची पॉलीसी असणार आहे....
या स्पर्धेचे सह प्रायोजक
समाधान पारकर (अध्यक्ष, पी ए एस फाऊंडेशन, मुंबई,), स्वाती देवळेकर (अध्यक्षा, पारिजात फाऊंडेशन, मुंबई), बीपिन शिवलकर (संचालक, महाराजा फाऊंडेशन, रत्नागिरी) होते.
या स्पर्धेचे टेकनिकल काम प्रा.शुभम पांचाळ यांनी पाहिले तर प्रचारक म्हणून संकेत आंबेकर, राजेंद्र पवार, समृद्धी गांधी, तन्मय सावंत यांनी उत्तम काम पाहिले स्पर्धा आयोजन प्रा. आनंद आंबेकर (संघटक, युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन, रत्नागिरी) यांनी केले होते.
*राजेश वराडकरची अशीही कलेसाठी समर्पकता*
वाय फा गणेशोत्सव स्पर्धा 2020 मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या श्री राजेश वराडकर , दादर -मुंबई यांनी पारितोषिकांची रोख रक्कम नस्विकारता वाय फा (युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन) च्या सांस्कृतिक चळवळी साठी देणगी दिली आहे .तसेच वाय फा च्या कामात सक्रिय होण्याचा मानस व्यक्त केला आहे. वाय फा संघटक प्रा.आनंद आंबेकर आणि राजेश वराडकर यांच्या झालेल्या फोन वरील संभाषणातून वाय फा च्या ध्येय धोरणात बाबत चर्चा केली आणि वराडकर वाय फाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि हा निर्णय घेण्यात आला.
राजेश वराडकर यांच्या अश्या प्रोत्साहनाबद्दल संपूर्ण वा फा संघटक परिवार त्याचे मनापासून आभारी आहे.
गणेशोत्सव स्पर्धेमधून एकत्र आलेल्या फोटोलव्हर्स साठी पुढील उपक्रम
दर 15 दिवसांनी एक विषय देऊन फोटो एकत्रित प्रदर्शित केले जातील यासाठी प्रसन्न महाडिक हे आपले प्रचारक असतील
प्रसन्न हे अतिशय टॅलेंटेड फोटोग्राफर आहेत
नियम असे असतील
1)एक व्यक्ती दिवसाला जास्तीतजास्त 5 फोटो पाठवू शकेल
2) फोटोसोबत स्वतःचे नाव , गाव, प्रोफेशन टाकणे अनिवार्य आहे
3) फोटो कुठे काढला , आणि कसा काढला उदा. मोबाईल (कोणता, मोड कोणता) कॅमेरा (कोणता,सेटिंग कोणते)
आपण सर्व फोटो च्या माध्यमातून *संवाद* साधणार आहोत म्हणुन एव्हढे डिटेल्स गरजेचे आहेत.
Yfaa ही एक सांस्कृतिक चळवळ आहे*Express your soul*
आपले ब्रीद वाक्य आहे
भविष्यात अजून वेगवेगळ्या कलांचे असेच संघटन आणि संवर्धन केले जाणार आहे.
गणेशोत्सव सुपर 30 फोटो आणि रिझल्ट युट्युब लिंकची खाली शेअर करत आहे
७ टिप्पण्या:
ह्या yfaa group च्या स्पधेमुळे मला एक वेगळा अनुभव मिळाला ऑनलाईन work कराहायला मिळालं. आंबेकर सरांमुळे नवी energy मिळाली . एक वेगळा आणि कमाल अनुभव मिळाला .
Thank you sir😇
खरतर गोगटे कॉलेज ला आल्यापासून आम्ही एक गोष्ट सातत्याने शिकलो ती म्हणजे निस्वार्थी पणे काम करत राहा प्रवाहाप्रमाणे वाहत राहा आणि काही ठरवू नका की मला हेच करायचं आहे मला अमुख अमुखच व्हायचं आहे. त्या मुळे आम्ही प्रत्येक क्षेत्र आजमावून बघितली आणि त्याच्या मध्यातून खूप चतुरस्त्र ज्ञान घेता आलं. पण या साठी लागले अचुक संधी आणि मोटीव्हेशन अशाच प्रकारची संधी आम्हला इथे मिळाली खरंतर फोटोग्राफी ची आवड होती पण कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला कुठे काय जमेल बाकीचे खूप भारी करत असणार. पण या माध्यमातून एक नवीन प्रेरणा मिळाली की नाही आपण सुद्धा करू शकतो ,म्हणून खरच खूप धन्यवाद समाधान सर आंबेकर सर आणि टीम. अशी फक्त एका कलाकाराला ठिणगी हवी असते जी या माध्यमातून बऱ्याच हौशी कलाकारांना मिळेल . असेच नाविन्यपूर्ण उपक्रम अनेक दर्जेदार कलाकार घडवणार यात काही शंका नाही . याचं श्रेय yfaa ला जात नक्कीच . प्रत्येक कलाकाराने यात हिरीरी ने भाग घ्यावा अस माझं मत आहे. भविष्यात ही चळवळ खूप मोठी होणार आहे. त्या साठी आपण प्रयत्नशील आहोत.
एक सुंदर अनुभव म्हणजे वाईफा ने भारावलेली हि स्पर्धा . आपण घरात बसून सुद्धा हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला आणि त्याच दरम्यान घेतलेली हि स्पर्धा म्हणजे सुवर्ण संधी. मला तांत्रिक बाजू सांभाळताना बाप्पाच्या एवढ्या सुंदर मूर्ती आणि देखावे बघून मन तृप्त झालं. वायफा चा मेम्बर असल्याचा मला अभिमान वाटतो.
शुभम पांचाळ
वायफा रत्नागिरी
सगळ्यांना नम्र विनन्ती आहे कि त्यांनी आमच्या ह्या कार्याला साथ देताना आम्ही आणखी प्रगती करावी म्हणून सरांच्या ब्लॉग ला फॉलो करा
शुभम पांचाळ
वायफा रत्नागिरी
खुप छान सर....! अशा प्रकारच्या अनेक चळवळी तुमच्या हातुन घडतचं जातील. 👌👌👌
शैलेश ...आज पुन्हा एकदा द्वितीय क्रमांक मिळून दाखवून दिलंस की जे काम करा ...मन लावून करा
शुभम तू वाय फा चा महत्वाचा मेम्बर आहेस तू विद्यार्थी असल्यापासून गेली 10 कामाची निष्ठा काय असते ते तू सिद्ध केलं आहेस
टिप्पणी पोस्ट करा