महेश ..सख्खा पाठीराखा
(भावांमधील ओलावा असणारं अतूट नातं)
______________________________
डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
25/03/2021
सख्खा भाऊ म्हटलं की भांडणही येतातच ...पण एकमेकाच्या क्षमतेचा आदर करण्याचा आम्हा दोघांचा नैसर्गिक स्वभाव असल्याने लहानपणापासूनच अनेक लुटूपुटूच्या भांडणानंतर सुद्धा आनंद महेश ची जोडी असंच म्हटलं जातं यातच आमच्या दोघांमध्ये अतूट विश्वासाचं नातं आहे हे सर्व नातेवाईकांना नक्की माहित आहे.स्वाभाविकपणे आमच्या दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे अगदी दिसण्यापासून ते अगदी रिलेशन संदर्भातील कल्पने पर्यंत. लहानपणी आम्ही एकत्र क्रिकेट खेळताना आम्हाला एका टीम मध्ये कधीच कुणी सहन केलं नाही जोपर्यंत आनंद आणि महेश विरुद्ध टीम मध्ये राहत नाहीत तोपर्यंत खेळायला मजा येत नाही हे सर्वच आमच्या आंबेकर मित्रमंडळींना माहिती होतं, .....परंतु एखादा महत्त्वाचा विषय हाताळायचा असे असेल तर सर्वांनाच माहीत होतं आई अण्णा नंतर आनंद महेश हे एक मताने निर्णय घेऊन तो तडीस नेण्याची नक्कीच जबाबदारी घेतात ...मग तो घरगुती विषय असेल की सार्वजनिक विषय असेल मग आमची एकी सर्वानाच माहिती आहे.
लहानपणापासून महेश तसा अबोल... जास्त जबाबदारी न घेणारा माझ्या मागेमागे राहणारा असंच सर्वाना माहिती होता पण .. .आज एम एस इ बी मध्ये मॅनेजर पोस्ट आहे ...7000 सदस्य असलेल्या विद्युत कर्मचारी पतसंस्थेचा निवडून आलेला संचालक आहे...बांद्रा ऑफिस कर्मचारी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे.
अभ्यासा मधील त्याची एकाग्रता माझ्यापेक्षा अफाट होती म्हणूनच सातवी ला स्कॉलरशिप मध्ये आला सातवी मध्ये असताना त्याची आणि माझी फाटाफूट झाली तो माईकडे शिक्षणासाठी गुहागर ला गेला आणि मी एकटाच आंबेडला होतो.. माझ्या दहावीनंतर मी रत्नागिरी मध्ये राहायला गेलो आणि तो आंबेड मध्येच राहून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण सुट्टी मध्ये परत आमची क्रिकेटची मॅच रंगायची ...ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी रत्नागिरी मध्ये राहिलो आणि महेश नोकरीनिमित्त पनवेल- नंतर मुंबईला गेला तसं पाहिलं तर आमचं एकत्र राहणे फारच कमी होतं. एकमेकांमधील ओढ मात्र अफलातून कायमच राहिली कालांतराने महेशला रत्नागिरीला बदली करून येणे सहज शक्य होतं परंतु मोठी बहीण बेबी हीच्या सल्ल्यानुसार आम्ही कायम लांब राहावं म्हणजे म्हणजे दोघांमधील असलेलं प्रेम.. आदर ..समजूतदारपणा हा टिकून राहील आणि दोघेही चांगली प्रगती कराल …. आणि तसंच झालं.
यामध्ये तिच्या पत्नीचा म्हणजे पूर्वाचा सुद्धा मोठा वाटा आहे... आमच्या निर्णयात ती कधीच आक्षेप घेत नाही ...की माझी पत्नी सुध्दा ...त्यांना माहीत आहे आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही.
एक किस्सा आठवती जो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. मी एम ए साठी कोल्हापूरला असताना युनिव्हर्सिटी मध्ये कुलगुरु हटाव मोहिमेमुळे आमची परीक्षा दोन वेळा पुढे गेली... यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी हताश झालो होतो… माझं तर स्वप्नच मुळी प्राध्यापक होण्याच होतं ..या परीक्षा अनिश्चित असल्यामुळे मलासुद्धा जबरदस्त प्रेशर आलं होतं. आमच्याच रत्नागिरीतील एक मित्र परीक्षेमध्ये प्रेशरमुळे आजारी पडला होता. ही घटना माझ्या डोक्यामध्ये भीती तयार करत होती आणि माझ्याही भविष्याबद्दल प्रचंड भीती वाटू लागली .. लँडलाईनवरुन घरी फोन केला फोनवर महेश होता मला सुचतच नव्हतं इकडची तणावाची परिस्थिती मला पेलवत नव्हती... आणि मी फोन वर रडायला लागलो... मला काय होतंय हे मला सांगता येत नव्हतं फोन ठेवल्यानंतर घरात काय झालं मला माहिती नाही ...पण दुसऱ्या दिवशी महेश कोल्हापूरला आला आणि मला आंबेडला घेऊन गेला.
मी आठ दिवस राहिलो थोडा नॉर्मल झालो आणि मग पुन्हा अभ्यास सुरू केला कोल्हापूरचे मित्र हरीष आणि अमर माझ्या हॉस्टेलवर रहायला आले मी सावरलो होतो. नंतर मला चांगले मार्क मिळाले ...प्राध्यापक झालो ...पण तो क्षण आवरण्यासाठी महेश नसता तर कदाचित आज मी प्राध्यापक होऊ शकलो नसतो… करिअरची दिशा बदलली असती परंतु माझ्या स्वप्नातील प्रोफेशन मी पूर्ण झालं नसतं तर कदाचित आज मी इतका नैसर्गिकपणे जगत आहे तर कदाचित मी जगू शकलो नसतो... म्हणूनच महेश च्या वाढदिवसानिमित्त ही घटना आवर्जून आठवली .
अशीच एक महत्वपूर्ण घटना 2015 रोजी योगायोगाने महेश 25 मार्च रोजी आंबेडला होळीनिमित्त आला होता गायत्री ..प्रकाश ..जयश्री.. होते.. सरप्राईज वाढदिवस साजरा झाला आणि मग नात्यातील मैत्री कायम एकत्र राहण्यासाठी... जीवदानी परिवाराची याच दिवशी स्थापना झाली आज जवळजवळ तीस .. बत्तीस लोक आर्थिक सुरक्षितते पासून भावनिक आणि मानसिक आधाराची भक्कम विश्वास असणारी जीवदानी सारखी व्यवस्था करायला सुद्धा महेश महत्त्वपूर्ण घटक आहे लोकांचं म्हणणं माझ्यापर्यंत आणण्याचं महेश नेहमीच काम करत असतो कारण त्याला माहित आहे की, मी एकदा एखादं ठरवलं की हट्टाने पूर्ण करण्याचं ...मग मागेपुढे बघत नाही .. मग माणसं दुखावली जातात .. मला कोणी मागे वाईट बोलू नये म्हणून महेश सतत माझ्याशी भांडत असतो चांगलं करण्याचं सोडून दे.. अगोदर तुझ्याबद्दल कोणाला गैरसमज होऊ नये हे लक्षात घे.. पण माझं वेगळंच असतं चांगलं काम करण्यासाठी मला कोणी वाईट म्हटलं तरी चालतं … पण ते काम झालं पाहिजे यामध्ये आम्हा दोघांमध्ये कायमच वाद होत असतात पण या वादात सुद्धा प्रचंड आपुलकीचा ओलावा असतो. असा भक्कम पाठिंबा असणारा भाऊ आयुष्यात असणे माझ्या भाग्याचं लक्षण आहे. असेच प्रेम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
८ टिप्पण्या:
महेशचे परफेक्ट वर्णन.मी तुम्हां दोघांनाही लहानपणापासून ओळखते. माझ्यापेक्षा तुम्ही वयाने लहान पण नात्याने मामा. मी लग्न होऊन आली पण मामा भाचीचे नाते भले दूरचे का असेना ते अजूनही तुम्ही दोघे टिकवून आहात.महेश अबोल, मितभाषी आहे पण माणूस म्हणून दिलखुलास व्यक्तिमत्व. कायम समजून घेणारा. महेश तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद.- कविता किशोर आंबेकर (उर्मिला)
हे नाते निरंतर एकमेकांच्या प्रेमात राहो!! महेश गोड आहे, अगदी महाविद्यालयापासून मी त्याला पाहिलंय.आनंदी, हसरा व प्रेमळ!!
खूप छान
अतिशय सुंदर ..दोघा भावांचे प्रेम असेच वृद्धींगत होवो...भावंडात काही विचार मतभेद असू शकतात परंतु यासर्वांवर पांघरून घालून आम्ही सुद्धा असेच एकमेकांना सांभाळून घेत असतो..शेवटी एकमेकांबद्दल असणारे प्रेम हेच महत्वाचे..!!
तुम्ही दोघे नात्याने मला मामा लागत असले तरी तुम्ही दोघेही मला चांगल्या मित्राप्रमाणे वागणूक देता, मला पण तुम्ही दोघे जण माझे चांगले मार्गदर्शक वाटता, आणि आंबेड मधील क्रिकेट मी कधीच विसरू शकत नाही. तुमचे नाते हे दोन भावां पेक्षा जास्त दोन जिवलग मित्रांसारखे आहे,महेश मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा��������
खुप छान दादा महेश दादा आहेचं असा
महेश आंबेकर....
आनंद.... आता डॉ. आनंद सर..
पण आनंद दादा कधी म्हणालो नाही... कारण आपण पाठीराखे असल्यामुळे लहानपणापासून एकत्र खेळायला.. आणि कुठेही जायचं असेल तर एकत्र.... त्यामुळे *दादा* नावाचं अंतर राहिलं नाही आणि कळलं ही नाही... आणि तु थोडा मोठा झाल्यावर दादा म्हण असा आग्रही केला नाही... आणि कदाचित यामुळेच लहानपणा पासून आपण मित्रासारखे राहिलो....
कोणतीही व्यक्तीरेखा टिपण्यात तुझा हातखंडा आहे... कारण जे वास्तव पणे अनुभवलेले क्षण आहेत तेच नैसर्गिकरित्या उत्तम मांडतोस....तसंच आपल्या नात्यावर छान लिहिलं आहेस 👏👏🙏
जीवन जगत असताना खुप काही घटना काही प्रसंग सहजपणे घडत असतात....
पण ते लक्षात ठेऊन तु व्यक्त केल्यामुळे उजाळा मिळाला ☺️... व्यक्त होणे..ही तुझी कला आणि उपजत गुण.. हाच तुझा strong point...
... मी उघडपणे व्यक्त होत नाही.. कदाचित हा माझा उपजत गुण असेल.... पण भावना त्याच असतात... की आपलं नातं कायम चांगलं राहिलं पाहिजे.. म्हणूनच कधी कधी दडपण येतं की आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग हा सकारात्मक च राहिला पाहिजे...
मला मनापासून नेहमी एवढंच वाटतं... आई वडिलांचे संस्कार म्हणून आपण आतापर्यंत छान राहतोय.... जसं व्यक्तिगत आयुष्यात आपल्या काही गुणांमुळे काही लोक आपल्याकडे आदर्श म्हणुन पाहतात... तसंच आपलं भावांचं नातं एक आदर्श म्हणून राहिलं पाहिजे...... एवढं मनोबल, संयम कायम राहो,.. ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏😊😊🙏🙏
तुमची जोडी अशीच सलामत राहो...... बबन आंबेकर
टिप्पणी पोस्ट करा