शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला 

डॉ. आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी

दिनांक - ३० डिसेंबर २०२३

_____________________________________________

सुनील दादा एक आगळं वेगळं रसायन….    

 पुढचा माणूस जसा येईल तसा दादा त्याच्यासोबत वागायचा …थोरा मोठ्या लोकांसमोर आज्ञाधारक ..मित्रांसोबत दंगेखोर मित्र …लहानांसोबत अल्लडपणे वागणारा दादा .. अगदी गेल्याच वर्षीच्या महापुरुष प्रीमियर लीग मध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू म्हणून दादा लहान मुलांसारखा वावरत होता आणि  कोणालाच दादाबद्दल अवघडल्यासारखे वाटत नव्हते .57 वर्षाचा दादा 17 वर्षाच्या मुलांसोबत खेळकरपणे खेळत होता. म्हणूनच दादाची एक्झीट  चटका लावून गेली.

    चार दिवसापूर्वी मुलाचे थाटामाटात लग्न केलं जबाबदारीचा बाप म्हणून वागत असताना… अनिल दादासोबत बालमित्रासारखा ताशाचा ठेका घेत होता …तेवढ्यात जबाबदारीने येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होता …कसं काय सगळं विसरता येईल.

  मैत्री कशी जपावी हे त्यानेच शिकवलं ...

      आंबेडमध्ये असताना अनिल सुनील अशी मैत्री आम्ही कायमच बघत होतो अनुभवत होतो. रत्नागिरीत आल्यावर साळवी भाऊ आणि दादा मैत्रीमध्ये रमणारा बघत होतो. दादा वयाने मोठा असल्याने सतत त्याच्याकडे बघून मैत्री जपण्याचा छंद लागला. 

      अगदी लहानपणी मी 10 ..12 वर्षाचा असताना नवरात्र उत्सव आला की चोगल्यांच्या  घरात म्हणजे  राजारामआजोबांच्या घरात कोणीच नसायचं मग वाडीतील सगळी तरुण मंडळी त्यांच्या घरात नऊ दिवस ठाण मांडून असायची.मोठ्या पोरांची मोठी पार्टी म्हणजे शिरा करणे आणि आम्ही लहान  पोरं त्यांच्या पाठीमागून फिरायचं ..रात्रीच्या वेळी कलिंगडच्या फडात जाणं मनसोक्त कलिंगड खाणं ..दुपारच्या वेळेला नदीच्या डोहात डुबकी मारणं …याची कमालीची भीती असायची पण सुनील दादा आहे ना मग बिंदास त्याच्यासोबत जायचं आणि घरातले लोक सुद्धा निर्धास्त असायचे.

    कोणताही मजेचा प्रसंग असू दे सुनील दादा असायचा..कोणताही वाईट प्रसंग असला सुनील दादा असायचा ..कोणत्याही खेळाचा कार्यक्रम असला की सुनील दादा असायचा ..अशी वारंवार सवय झालेला दादा आता कुठे भेटणार.. कोणावर विश्वास ठेऊन निर्धारस्थपणे पाठीमागे जायचं …असं मलाच नव्हे तर सर्व आंबेकरवाडीतील पोरांना प्रश्न पडला आहे.

    कामातील एकनिष्ठता काय असते हे त्याच्याकडून शिकायचे...

      दादा आंबेड मध्ये रोजगार हमी योजने च्या प्रोजेक्टवर कामाला लागला मुकादम म्हणून काम करत असताना लमानी लोकांकडून काम करून घेणे जिक्रीचे असायचे. पण दादा अतिशय खुबीने काम करून घ्यायचा ..इतकच काय तर रात्री तेच कामगार भल्या मोठ्या भाकऱ्या आणि मटणाचा बेत करून  जंगी पार्टी असायचा आम्ही बऱ्याच वेळेला त्या पार्टीत सामील व्हायचो .. दादा नंतर जॉबला लागला तो कर्ला मच्छीमार सोसायटीमध्ये त्यामुळे आंबेड आणि संगमेश्वर याच्या पलीकडे रत्नागिरीमध्ये कर्ला गाव दादा मुळेच आपुलकीचे वाटायचे  तिथल्या मच्छीमार बांधवांची अतिशय घनिष्ठ संबंध सुरू झाले.. जिकडे जाईल तिकडे मैत्री करायचा.  त्यानंतर एस टीमध्ये  जॉब लावल्यावर तो कमी भेटायला लागला ..पण सणासुदीला कायमच तो असायचा एस टीच्या मित्रांचे मुळे दादा ने लहानपणीच अक्षत आणि सिद्धीला नवोदय स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवले उच्च शिक्षण घेतले म्हणूनच त्या दोघांमध्ये कमालीची शिस्त आलेली दिसते.दादा कधी बाबा सारखा वागताना दिसलाच नाही  मित्रा सारखा वागलाचा म्हणूनच पोरं जबाबदार झालीत. लता म्हणजे त्यांची बायको माझ्या सख्ख्या मावशीची मुलगी परंतु दादाच्या आपुलकीमुळे ती सख्खी मावस बहीण असूनही बऱ्याच वेळेला परकी वाटायची

बालपणीचा आदर्श दादा ...

     आम्ही लहान असताना दादा क्वचितच स्वतःच्या घरी झोपायचा नाही तर कायमच आमच्या सोबत असायचा इतकं सख्य नातं बघायला मिळणे सुदैवाचे आम्ही ...दादा आईला मावशी आणि अण्णाना दादा म्हणायचा.महेश आणि मी कायमच त्याच्या प्रभावाखाली असायचो ..दादा जसं करायचं तसं करण्याचा प्रयत्न करायचो .पण त्याचे धाडस त्याची मैत्री करण्याचा कमालीचा प्रामाणिकपणा आम्ही थोडाफार कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. काही गाव आणि तिथली माणसं केवळ सुनील दादामुळे आपुलकीची झाली ..  केळ्ये माजगांवातील मावशी .. ते सर्व केळकर बंधू ..त्यात शशी दादा फेवरेट .. जयगड म्हटल की शरद चव्हाण फेवरेट..नात्यातील इतके सारे मित्र त्याच्यामुळे निर्माण झाले .. त्याच्या नंतर माझेच नव्हेत तर त्याचा पुतण्या सनी आणि राजेश ही सर्व नाती जपणाना दिसतात .. मैत्री जपताना दिसतात.

     आज दादा वर लिहिताना असा दुर्दैवी प्रसंग यावा  असे वाटले नव्हते .

 काही माणसं त्याच्या सहवासाने लक्षात राहतात 

...तर दादा सारखी माणसं त्यांच्या मैत्री जपण्याच्या कलेने लक्षात राहतील. 

   कधीही नभरणारी पोकळी ठेऊन गेलास दादा …

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

युथ फेस्टिवल.. भारावलेली 30 वर्षे

  युथ फेस्टिवल... भारावलेली 30 वर्षे 
      आज प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर भेटले आणि फ्लॅश बॅक सुरू झाला ......युथ फेस्टिवल साठी 1993 मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी तर्फे ग्रूप इव्हेंट मध्ये काहीतरी करायचं ठरले… पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा एकत्रित गोगटे जोगळेकर महाविद्यालय मध्ये स्पर्धा झाली.  त्यामध्ये आमच्या कॉलेजतर्फे समूहगीत गायन.. एकांकिका या दोन इव्हेंट साठी सहभाग घेतला.  दोन्ही इव्हेंटमध्ये सिलेक्शन झालं नाही.  पण मुकअभिनय एक वेगळाच नाट्या मधील कलाप्रकार आम्ही बसवत होतो संकल्पना आणि दिग्दर्शन प्रा.विजयकुमार रानडे करत होते. वैभव मांगले, सोनाली बापट ,बिपिन शिवलकर असे आम्ही ठराविक कलाकार एकत्र येऊन तंदूर कांड वरती मूक अभिनय इव्हेंट बसवत होतो.  महाविद्यालयातून प्रथमच हा कलाप्रकार करत असल्याने तो कसा सादर करतात तेही आम्हाला माहीत नव्हते. मुंबईचे सर्व संघ स्किन टाइट ब्लॅक किंवा व्हाईट कपडे घालून सज्ज होते. आमच्याकडे ते कपडेच नव्हते त्यांनी तोंडाला पांढरा रंग लावला म्हणून आम्ही लावला. अशी सर्व गंमत होती विद्यार्थी दशेतील होती.आम्ही विदयार्थी असताना परीक्षक म्हणून विजय पाटकर होते.आमचे अतिशय सुमार सादरीकरण झाले होते .विजय पाटकर त्यांच्या बोलण्यात या ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवे हीच कळ कळ दिसतं होती. आम्ही खुप खजील झालो. 

     1999 मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी या स्वतःच्याच कॉलेजला प्राध्यापक म्हणून हजर झाल्यानंतर  2003 आणि 2004 मध्ये मुकभिनयचे लिखाण आणि दिग्दर्शन करून  कास्य पदक पटकावले. या आनंदापेक्षा….आज 2023 मध्ये तीस वर्षानंतर पुन्हा  विजय पाटकर एकांकिकेची परीक्षक म्हणून भेटले .. आज मी विद्यापीठाचा मॅनेजमेंट कमिटी सदस्य म्हणून त्यांच्याशी सहज गप्पा मारता येत होत्या.त्यांना  30 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला . .. आणि ते अवाक झाले. पण तीच तळमळ आजही विजय पाटकर यांच्यामध्ये युथ फेस्टिवलसाठी  दिसत होती .दोन एकांकिकेच्या मधल्या वेळात खूप हळव्या मनाने नवीन मुलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे ..चांगले थेटर मिळायला पाहिजे असे आवर्जून सांगत होते.निलेश सावे आल्यानंतर त्यांनी हे आपले विचार पुन्हा त्याच्याशी काकुळतीने मांडले सावे सरांनी ग्रामीण भागातल्या मुलांचा लक्षणीय सहभाग आवर्जून सांगितला ..या दोघांच्या संभाषणात मी तर फक्त शांतपणे अंतर्मनामध्ये गेल्या 30 वर्षाचा हिशोब करत होतो .काय ते दिवस होते ..काय ती ऊर्जा होती आपण स्वतः स्टेज वरती न जाता सुद्धा तीच ऊर्जा तीच हुरहूर कशी काय जिवंत राहू शकते…असा आश्चर्यचकित होऊन स्वतःकडेच बघत होतो ..पण विजय पाटकर सारख्या अत्यंत यशस्वी कलाकाराला सुद्धा युथ फेस्टिवल भारावून टाकून परीक्षक म्हणून अखंड दोन दिवस दहा दहा तास तरुणांमध्ये बसण्याची कोण ऊर्जा देते ?  शेवटी कलेसंदर्भात असलेली प्रामाणिक इच्छा हीच सर्वांना एकत्र आणते.


      विनोद जगताप मोठ्या आजाराने त्रस्त असून सुद्धा स्वतःचे निष्ठावंत असिस्टंट असून सुद्धा मेकअप रूममध्ये आवर्जून उपस्थित असतो हे पण तीस वर्ष सतत भेटणारी लोक ज्याने मला सुद्धा मूक अभिनय मध्ये तोंडाला रंग लावला होता.ही विनोदला कोण उर्जा देते .. रंगदेवता नक्की सामर्थ्य पुरवते अशीच प्रचिती येते. संजय तोडणकर सारखा असाच एक हरहुन्नरी कलाकार लाईट संदर्भात अतिशय शांतपणे मार्गदर्शन करणारा आजही 30 वर्षानंतर तितक्याच नम्रपणे नवीन विद्यार्थांना समजून घेणारा संजय दादा कुठली ऊर्जा घेऊन येतो असा प्रश्न पडतो. 


      विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल निलेश सावेने 25 वर्षे पूर्ण केली परंतु विद्यार्थी दशेपासून त्यांनी सुद्धा तीस वर्ष विरार सारख्या भागातून येऊन मुंबई वरती राज्य करतोय ही ऊर्जा कुठून येते साहजिकच प्रामाणिक कलेवरतील प्रेमापोटी येते. फार मोठे आर्थिक हिशोब नकरता केवळ कले संदर्भात भावनिक प्रेमापोटी ही सर्व मंडळी काम करताना दिसतात .. कधी कधी प्राध्यापक डोकावतो .. सांगतो किती वर्ष युथ करणार आहेस ..पण पुन्हा कलाकार प्रभावी होऊन .. विजय पाटकर .. निलेश सावे .. विनोद जगताप .. संजय तोडणकर सारख्या लोकांच्या संगती मध्ये त्यांच्या निस्सीम कलेवरील प्रेमामध्ये प्राध्यापक हरतो आणि कलाकार जिंकतो…

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

सनकी पर्सनॅलिटी मधील सेन्सिटिव्ह पर्सन ...प्रा.उदय बामणे

सनकी पर्सनॅलिटी मधील सेन्सिटिव्ह पर्सन 

(प्रा.उदय अरविंद बामणे)


● डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

दिनांक: 3 ऑक्टोबर 2020

-----------------------------

      22 नोव्हेंबर 1999 मध्ये मी गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून हजर झालो. राहण्याची जागा नव्हती... देव सरांनी कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहण्याचा सल्ला दिला आणि नवीन मित्रमंडळी मिळाली ...सुरुवातीला मी एकटाच एका वेगळ्या रूम मध्ये रहात होतो आणि दुसऱ्या रूममध्ये किरण धांडोरे ..उदय बामणे आणि काही प्राध्यापक सहकारी रहात होते ...सहाजिकच मला सीनियर होते म्हणून त्यांची हळूहळू ओळख झाली. 2001 ला किरण धांडोरेचे लग्न झाल्यावर किरण स्वतंत्र रहायला लागला ….आणि खऱ्या अर्थाने आमच्या दोघांचा एकत्र प्रवास सुरू झाला 2001 ते 2002 (माझं लग्न होईपर्यंत) हे वर्षभर आम्ही एकत्र होतो एका रूम मध्ये रूम पार्टनर होता..उदय अतिशय गुड आणि सनकी स्वभावाचा आणि मला तर सहज मोकळं व्हायला आवडतं... जसे आजही तुमच्याशी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त होतो तसे... काही मित्र नेहमी सांगतात... अरे काय एवढं सगळं व्यक्त करतोस... मला वैयक्तिक मोकळं झालं की मला छान वाटतं ..आणि ज्यामध्ये आनंद वाटत असेल तर ... काही अनुभव शेअर करायला काय हरकत आहे...आणि हलकं वाटतं …

एकदा कॉलेजवरून आल्यावर माझी टेप सुरू झाली ...उदय कुठल्यातरी विचारात होता...आणि त्याची सनकली …...आणि भस्कन माझ्या अंगावर ओरडला ... तुझं नेहमीच पुरान मला काय सांगत जाऊ नकोस ….मी एकदम वरमलो आणि गप्प झालो आणि पूर्ण दिवसभर आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही ….माझं सकाळचं कॉलेज असायचं साडेसातला आणि उदयचं साडेदहाला ….मला खूप वाईट वाटलं होतं पण माझा मूर्खपणा माझ्या लक्षात आला होता ...आपली ओळख किती ? आणि आपण किती पर्सनल बोलावं ? याची जाणीव झाली... मी एका चिठ्ठीवर लिहून ठेवले ...सॉरी याच्यानंतर तुझ्याशी काही पर्सनल गोष्टी शेअर नाही करणार ….आणि मी कॉलेजला निघून गेलो … त्यांनी चिठ्ठी वाचली पण... त्याच्या वरती काही स्पष्टीकरण नाही ….चर्चा नाही...आम्ही नॉर्मल वागायला लागलो ...आपल्या मर्यादा सांभाळून वागायला लागलो... पण त्यानंतर प्रत्येक महत्वाच्या प्रसंगामध्ये उदय कायम सावलीसारखा सोबत असतो.....

मला टू व्हीलर सुद्धा चालवता येत नव्हती … पहिली टू व्हीलर सुद्धा उदयच्या वाढदिवसाला घेतली होती…. उदय शिकवायला असायचा अनेकांना तर उदयचीच गाडी वाटायची कारण गर्दीतुन तो पुढे मी मागे बसायचो ...माझं लग्न ठरत होतं ...तेव्हा आवर्जून सांगितलं की, ही मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे. किरण, देवेंद्र ,सत्यशील आम्ही सर्व एकत्र होतो... माझा वैयक्तिक महाराजा ग्रुप आयोजकांच्या भूमिकेत होता …आयुष्याच्या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी उदयने आपलं ठाम मत मांडले होते त्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यायला मदत झाली होती ..त्यामुळे घरामध्ये उदयचे विशिष्ट स्थान आहे ...खरं म्हणजे अजून एक संदर्भ होता ... माझ्या मोठ्या बहीणच्या (बेबी म्हणजेच स्वाती देवळेकर )ट्रेझरीच्या ऑफिसमध्ये उदयचे वडील साहेब होते आणि बामणे साहेबांबद्दल आमच्या घरात आदराचे स्थान होते. त्यामुळे उदयबद्दल घरामध्ये आपुलकीचे स्थान होते.


2004 मध्ये महाराजा करंडक इव्हेंट मॅनेजमेंट करंडक सुरू करत होतो ...इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे वेगळीच कल्पना होती ...पण तेव्हा ही उदय सोबत होता सायन्स विभागाचा कॉमेडी शो चा इव्हेंट एरेंज केला होता … प्रत्येक राऊंडला त्याराउंड चा विजेता सांगत होतो ..तीन राऊंडला मिळून अंतिम विजेता जाहीर करायचा होता...विद्यार्थ्यांना उत्सुकता वाढली होती...रिझल्ट तयार करायला उशीर होत होता ..उदय रिझल्ट करायला बसला होता ...माझ्या लक्षात आलं की ऑडियन्स गडबड करायला लागला आहे ...मी थेट स्टेजवर जाऊन ...आणि अंतिम विजेता आहे …. योगेश चव्हाण असं जाहीर केलं...   रिझल्ट तयार करीत असलेला उदयने  तिखट नजरेने माझ्याकडे पाहिलं... माझ्या लक्षात आलं की ...याचा पारा चढला आहे ...पण माझा रिझल्ट चुकला नव्हता ... आम्ही दोघेही विरुद्ध स्वभावाची असलो तरी एकमेकांच्या क्षमतेला आम्ही रिस्पेक्ट घ्यायला लागलो होतो ….


2005 मध्ये GJC 95 फॅमिली असा मोठा उद्देश ठेऊन ग्रुप काढायचा निर्णय घेतला... दहा वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आणायचे होते ...मित्र म्हणून आपण एकत्र येऊ शकतो का ? असे अनेक प्रश्न होते ...स्नेहसंमेलन ही जुनी संकल्पना आहे पण आपण एक लाईफ टाईम सपोर्ट सिस्टीम म्हणून कशी करता येईल याची चर्चा सतत उदयशी बोलायचो..  सकारात्मक प्रतिसाद देणारा  पहिला व्यक्ती होता तो म्हणजे.. उदय मग आम्ही एकत्र जमायला लागलो विवेक देसाईला मी कल्पना सांगितली…  उदय बामणे, विवेक देसाई आणि मी  कल्पना राबवली.. घरोघरी जाऊन मित्रांचे फॉर्म भरून घेतले..आणि गेली 15 वर्ष ही मित्रांची सपोर्ट सिस्टीम अविरत सुरू आहे ...2015 ला व्हाट्सएपच्या माध्यमातून ग्रुप बनवला तेव्हा पासून बिपीन बंदरकर सतत सोबत आहेच पण....पहिली हिम्मत उदयने दिली होती …

2006 मध्ये उदयने गोगटे कॉलेज सोडून डी बी जे कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला ...खुप वाईट वाटत होतं पण उदय स्वतःच्या घरात जाणार होता... आपला आवडता मित्र म्हणून आपल्या सोबत राहावं असं वाटत होतं ... त्याला ही इच्छा नव्हती .. खरं म्हणजे उदयची  जन्मभूमी आणि कर्मभूमी रत्नागिरी...  आजही गोगटे बाबत उदय हळवा आहे ...मध्ये मध्ये म्हणतो की परत मला रत्नागिरीत यायचं आहे. महत्वाचे म्हणजे आज उदय स्वतःच्या फॅमिली(आई आणि भाऊ) सोबत आहे हाच आनंद आहे. तो चिपळूणला गेला पण मैत्रिमधील ओलावा अजिबात कमी झाला नाही ....अनेक महत्त्वाच्या प्रसंगात आम्ही एकत्र असतोच ...


 2007 ला  मी मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवाच्या जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त झालो ... आणि पहिलेच व्यवस्थापन डीबीजे कॉलेजला..उदय डीबीजेत असल्याने मी रिलॅक्स होतो आणि परत एकदा माझ्या आयुष्यातील नवीन जबाबदारीची सुरुवात उदय सोबतकरणार होतो ...उदय सोबत असल्याने मला अनेक गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावं लागायचं नाही ...आणि माझी काम सुरळीतपणे होत होती ...आज जिल्हा समन्वयक म्हणून 14 झाली पण..व्यवस्थापनाची सुरुवात उदय सोबत केली होती. समवयस्क पण विद्यापीठ जबाबदारीच्या कामात भिन्नता असली तरी आमच्या मर्यादा सोडून कधीच वागलो नाही ... चिपळूण ला असेल तर हक्काने उदच्याच घरी रहतो ... मग खूप गप्पा होतात ...मनापासून शेअरिंग होतं ..पुन्हा एकदा ताजे व्हायला होते.




उदयच लग्न पूजा सोबत झालं.. अतिशय साधी सरळ आणि सेंसिटीव्ह पत्नी त्याला मिळाली होती..उदय वर वर सनकी दिसला तरी उदय आतून किती हळवा आहे हे आम्ही खूप चांगले अनुभव घेतले होते त्यामुळे पूजा सारखी पत्नी मिळून तो अतिशय चांगले जीवन जगत आहे... मधल्या काळात संजू जाणं (त्याचा भाऊ) मृत्युमुखी होणं मनाला खूप चटका लागला होता... मी त्याला भेटायला गेलो होतो ...आणि आम्ही सोबत आहोत असा मी आवर्जून सांगितलं होतं … त्याप्रसंगातुन सावरायला खुप वर्षे गेली होती ...उदय आणि पूजाच्या आयुष्यात अभिराज(त्याचा मुलगा) येणं आयुष्यात पालवी येण्यासारखं आहे.


   2016 ला युवा महोत्सवाचा ताण वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयाचे विभाजन केलं आणि दोन जिल्हा समन्वयक तयार करायचे होते ..उत्तर रत्नागिरीसाठी आवर्जून उदयच नाव सहसमन्वयक म्हणून हक्काने सुचवलं... किती विश्वास तयार झाला होता आणि एकमेकांमध्ये यायचा प्रत्यय होता ..आणि उदय ती जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभासळत आहे ...अगदी नजरेत एकमेकावर विश्वास ठेवणाऱ्या मित्रांचा अनमोल ठेवा जपण्यासाठी एक मित्र मला मिळाला त्याबद्दल देवाचा मी खूप आभारी आहे... तुम्ही बोलून व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या कृतीतुन फॉलो करणारी माणसं आपल्या आयुष्यात असतील तर जीवन जगताना खूप मजा येते आणि अशा मित्राचा आज वाढदिवस आहे.... त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा!!! 


आज 2022 ...




उदय चा वाढदिवस साजरा करताना एक आगळा आनंद होत आहे स्वभावाने ओपन नसलेला माझा मित्र ओपन हार्ट सर्जरी करून आज पुन्हा नवीन आयुष्य जगत आहे.... खरं म्हणजे उदयच्या आयुष्यात चढउतार खूप जवळून पाहिले आहेत ...त्याचा हळवेपणा त्याची ..स्थिरता खूप खोलवर चटका लावणारी असते. उदय आजारी आहे अशी बातमी आली त्यावेळी सर्व मित्रांतर्फे फक्त मीच फोन करावा असे डॉ.घन:शाम साठेने आवर्जून सांगितलं .. वरवर खूप मोठ मॅनेजमेंट करतो.. कणखरपणा दाखवतो ..परंतु यावेळी उदयची चौकशी करताना प्रत्येक फोनच्या वेळी काय बोलायचं ...कसं विचारायचं यावेळी काय रिप्लाय येईल ...याची प्रचंड भीती मनात असायची परंतु त्याचे भाऊ कणखरपणे पाठीमागे होते परंतु आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे यावेळी उदय ची बायको म्हणजेच पूजा ही वेगळीच कणखर भूमिकेत असताना दिसत होती ... याचे मनस्वी खूप समाधान झाले आणि यामुळेच आज उदय ओपन हार्ट सर्जरी होऊन सुद्धा जबरदस्त कमबॅक केले आहे त्याच्या जोडीला अभिराज त्याचा मुलगा टॉनिक चे काम करीत आहे.उदय परत कॉलेजला हजर झाला याचा खूप आनंद झाला. 


    मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवासाठी उदय ची जबाबदारी तशीच राहू द्या तो पुढच्या वर्षी 100% चांगली जबाबदारी सांभाळेल असे निलेश सावेना मी आणि डॉक्टर राजेंद्र मोरे (आमचा मित्र उत्तर रत्नागिरी झोनचा जिल्हा समन्वयक) आम्ही विश्वास व्यक्त केला. मित्रा सोबत एवढं आत्मविश्वासाने राहणं म्हणजे 50 शीच्या उंबरठयावर मैत्रीतील ओलावा असण्याचं जिवंत उदाहरण होतं. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी उदयला उदंड शुभेच्छा देऊन थांबतो पुन्हा एकदा उदयची मस्ती.. तोच मिश्किल पणा आणि हळवेपणा आयुष्यात अनुभवता येणार आहे हीच परमेश्वराची कृपा आहे.

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

देव सर -मॅनेजमेंट गुरू

देव सर - मॅनेजमेंट गुरू 

डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

दिनांक- 12-01-2022

=============================


      देव सर अनेकांना वेगवेगळ्या रुपात दिसले ...अगदी सुरुवातीला महाविद्यालय आयुष्यामध्ये अतिशय उत्तम वक्ते म्हणून  अनेक स्पर्धांमध्ये वक्तृत्वाच्या.. वादविवादाच्या स्पर्धेत उतरायचे आणि आपला ठसा उत्तम वक्ता म्हणून विद्यार्थिदशेपासूनच सुरुवात केली.

     महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यानंतर एन एस एस प्रोग्राम ऑफिसर म्हणून अतिशय उत्तम काम केले आणि त्यांचे विद्यार्थी आजही आम्ही देव सरांचे विद्यार्थी म्हणून आवर्जून अभिमानाने सांगतात.

      महाविद्यालयामध्ये प्राचार्य झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम आणि कोर्सेस सुरु केले कालांतराने विद्यापीठांच्या अनेक कमिट्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला अगदीं NAAC सारख्या राष्ट्रीय स्तरावरील कमिटीवर वर्ष निवृत्त झाल्यावर सुद्धा काम केले.

     भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास किर या महाविद्यालयासाठी भरघोस देणगी देऊन शैक्षणिक क्षेत्रात आपले दायित्व दाखवून दिले.महाराष्ट्रभर अनेक कॉलेजचे मार्गदर्शक म्हणून सक्रिय मार्गदर्शन केले.

     अनेक राजकीय पक्षांचे ते प्रत्यक्ष मार्गदर्शक म्हणून काम करत होते. आप्पांच्या (जोशी)सोबत काम करत असताना पतसंस्थेच्या निर्मितीसाठी उत्तम आर्थिक नियोजक म्हणून त्यांनी काम केले आणि कुसुमताई पतसंस्थेची निर्मिती करण्यात मोठा वाटा होता. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एकोणीस वर्षाच्या प्राचार्य म्हणून कारकिर्दीत अत्यंत उत्तुंग भरारी मारणाऱ्या घटना काळात झाल्या. अनेक अकॅडेमीक लीडर  सरांच्या दूरदृष्टीमुळे तयार केले.महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर कला क्रीडा शैक्षणिक सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी भरारी मारण्याची पहिल्यांदा सवय लावणारे प्राचार्य म्हणून नक्कीच देव सरांकडे पाहिले जाते. 

      माझ्या माय लाईफ या ब्लॉगमध्ये देव सरांबद्दल मी घेतलेला अनुभव तुमच्याशी मी शेअर करत आहे. महाविद्यालयामध्ये शिकत असताना शेवटच्या वर्षात आणि एन एस एस चा बेस्ट लीडर चा पुरस्कार सरांच्या हस्ते घेण्याचा सन्मान प्राप्त झाला ..1995 सरांचे  प्राचार्य म्हणून पहिले वर्ष आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून माझे शेवटचे वर्ष .जून 1999 ला मी आठल्ये सप्रे महाविद्यालय ,देवरुख येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो.टिळक ग्रंथालयामध्ये वाचन करण्यासाठी जात असताना  मिस्त्री हायस्कूलच्या कोपऱ्या वरती देव सर सहज भेटले त्यांच्या स्टाईलमध्ये विचारलं... काय करतोस रे  मी म्हटलं सर मी देवरूख कॉलेजला जॉईन झालो आहे.  तुझ्या पोस्ट ची काय पोझिशन आहे म्हटलं ..मी म्हटलं समाजशास्त्रच्या पटवर्धन सरांच्या लिव्ह व्हॅकनशीच्या काळात काम करत आहे... बर ठीक आहे तुझा एक अर्ज देऊन ठेव आपल्या कॉलेजला फाउंडेशनकोर्स साठी आपल्याकडे पोस्ट आहे..  म्हटलं माझा समाजशास्त्र विषय आहे ..सर म्हणाले ते मी बघतो तू फक्त अर्ज देऊन ठेव.सरांचा आदेश आल्यावर ती मी अर्ज देऊन ठेवला .दिवाळीच्या सुट्टीच्या काळात मुलाखत घेण्यासाठी आलेल्या विद्यापीठ पॅनलला मी कसा ऍक्टिव्ह आहे आणि आमचा विद्यार्थी आहे असे आवर्जून सांगितले.माझे विद्यापीठाच्या नियमानुसार सिलेक्शन झाले आणि मी कॉलेजला हजर झालो.हजर होताना ची गंमत खूपच छान आहे... दिवाळी संपल्यावर ती मी देवरुख कॉलेजला जॉइन झालो. पहिल्याच दिवशी सकाळी रजिस्टार पेडणेकर यांचा  देवरूख कॉलेजला फोन आला.. अरे तू महाविद्यालयात आलाच नाहीस ..मी म्हटलं मी देवरूख कॉलेजला आहे. पेडणेकर म्हणाले तुझं सिलेक्शन झाले फाउंडेशन कोर्ससाठी..  थोड्यावेळाने देव सरांचा स्वतः फोन आला सरांना साधेपणाने म्हटलं  इथे काय होणार..सर म्हणाले  ते मी बघतो ..तू  जॉईन व्हायला ये मी निमूटपणे संध्याकाळी चार वाजता हजर झालो. आज केवळ सरांच्या प्रोत्साहनामुळे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काम करत आहे.

   गोगटे कॉलेजमध्ये नवीन असताना देशभक्तीपर समूह गाण्याची स्पर्धा घेतली होती मी सरांच्या शेजारीच हॉस्टेलला राहत होतो अचानक एका सरांनी भरपूर एन्ट्री दिल्या आणि वेळेचे नियोजन चुकलं स्पर्धा झाल्यानंतर नेहमीच्या स्टाईलने सरांनी खूप झापलं.. माझा चेहरा रडवेला झाला होता.. सरांना म्हटलं ते माझेच सर होते आणि त्यांनी अचानक एंट्री दिल्यानंतर मला नाही म्हणता आले नाही. त्यावेळी देव सरांनी मॅनेजमेंटचा एक मूलमंत्र दिला तो म्हणजे मॅनेजमेंटमध्ये  सगळ्यात महत्त्वाचं  नाही बोलायला शिकले पाहिजे.आता तू विद्यार्थी नाहीस तर प्राध्यापक झाला आहेस.हा ..नाही  तुझ्या आयुष्याला खूप उपयोगी पडणार आहे...आजही  मला मॅनेजमेंट करताना नाही म्हणताना सरांची  आठवण येते.  सरांबद्दल खूप प्रसंग आहेत परंतु आज त्यांच्या जाण्याने सर्वांच्याच  डोळ्यासमोर असे प्रसंग येत असतील ..त्यानी घडवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची आठवण येत असेल ..एक माजी विद्यार्थी म्हणून माझी भावपूर्ण श्रद्धांजली ...आपल्या आठवणी नक्की दिला .. 

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

अप्पा - कौटुंबिक शिक्षक

अप्पा - कौटुंबिक शिक्षक 


डॉ. आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

दिनांक : ५ सप्टेंबर २०२१

 

----------------------------------------------------------------



योगायोगाचा आज शिक्षक दिन आणि आजच अप्पांचा स्मृतीदिन अप्पा म्हणजे माझे मोठे काका. त्यांचं अस्तित्व कायमच सामाजिक आणि कौटुंबिक एकतेकडे राहिलेले आहे. लहानपणापासून त्यांनी दिलेले अध्यात्मिक आणि सामाजिक धडे अजूनही गिरवत आहे…. अप्पा म्हणजे बाळकृष्ण धोंडू आंबेकर माझ्या वडिलांचे तीन नंबर भाऊ राहायला विक्रोळी पार्क साईट,मुंबई  नोकरीनिमित्त हिंदुस्तान फेरेडो कंपनी मध्ये कार्यरत होते.त्यांचे जीवन चार भावांच्या कुटुंबा एवढेच न राहता संपूर्ण आंबेकर कुटुंब एकत्र ठेवण्याची नेहमीच धडपड होती. त्याचबरोबर मुंबईमध्ये राहत असताना विक्रोळी पार्क साईट मध्ये गुरुदत्त मंडळाची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम केले. ऐंशीच्या दशकात एखाद्या मंडळांमध्ये व्यायाम शाळा काढणं ...नियमित अध्यात्मिक कार्यक्रम राबवणे ...महिलांसाठी कार्यक्रम राबवणे असे मी जवळून पाहिलेला उपक्रम होते. हिंदुस्तान फेरेडो कंपनी मध्ये काम करत असताना कामगारांच्या प्रश्नांसाठी युनियनचे कार्यकर्ते म्हणून सतत कार्यरत राहिलेले आप्पा दिसत होते. अगदी जिवावर बेतणारे प्रसंग आले होते. गावामध्ये अंधश्रद्धे मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेणारे अप्पा कायमच डोळ्यासमोर येतात आणि विस्कटलेल्या कुटुंबाला एकत्र करण्यासाठी सतत झटत असणारे अप्पा सर्वांनाच आपल्या निर्णयांमध्ये असावेत असा आग्रह असायचा.अशा आदर्श कुटुंब शिक्षकाला मनापासून आदरांजली!!!

   1984 च्या दरम्यान आंबेकर कुटुंबाची आधार व्यक्ती म्हणून अप्पांकडे पाहिलं जायचं ...महापुरुष मंदिर हे सर्वांच्याच श्रद्धेचे ठिकाण परंतु अनेक वर्ष फक्त चौथऱ्यावर उत्सव व्हायचे. लोकांमध्ये एक मोठा अंधश्रद्धेचा पगडा होता की महापुरुष मंदिर जो कोणी बांधायला घेतो तो या जगात राहत नाही.. त्याचा मृत्यू होतो अप्पांनी आपल्या वैयक्तिक थारली गुरुजी यांचे मार्गदर्शन घेऊन मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला अनेक लोकांनी घाबरवलं ...परंतु अप्पांसोबत राजाराम आंबेकर ..पांडुरंग आंबेकर आणि माझे वडील यांचा कायम नैतिक पाठिंबा असायचा असे मला लहानपणी दिसायचे कदाचित या पलीकडेही लोक होते ही असतील परंतु माझ्या दहा बारा वर्षाच्या वयानुसार हीच मंडळींसोबत मंदिर बांधण्याच्या गप्पा मारताना दिसायचे. मंदिराला मूर्त रूप आणताना खूप अंधश्रद्धेची अनाकलनीय भीती होती त्याच्यावर मात करत 1985 ला मंदिर बांधून झाले.

    2003 मध्ये जेव्हा मोठं आणि स्लॅपची मंदिर बांधकाम करायचे ठरले त्यावेळेला मी स्वतःहून आंबेड स्थानिक जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्षपद घेतले यापूर्वी किंवा त्यानंतर नंतर मी कधीच आंबेकर मंडळांमध्ये जबाबदारीचे काम घेतले नाही. परंतु अप्पांच्या निस्वार्थी नेतृत्वाची मनावरती खोलवर भावना होते म्हणूनच ही जबाबदारी घेऊ शकलो आणि उत्तम समाधानकारक नेतृत्व केल्याचे सर्वांकडून शब्बासकी मिळाली हा माझ्या कौटुंबिक शिक्षकाकडून घेतलेला सामाजिक पहिला वसा.

     1987 च्या दरम्यान शिवसेना युनियन कामगार युनियन जोरदार काम करायला सुरू झालं होतं त्यामध्ये अग्रेसर असणारे जनार्दन निवळेकर म्हणजेच माझ्या आत्तेचे पती यांच्यासोबत सतत पाठिंबा देणाऱ्या अप्पा कायम दिसायचे. युनियनचा लढा एवढा तीव्र झाला की जनार्दन निवळेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला सोबत असणाऱ्या अप्पांच्या पायावरती वार झाले ..अप्पानी युनियनच्या कामाला राम राम ठोकला म्हणूनच की काय मनसेची स्थापना झाल्यानंतर सामाजिक राजकीय काम करण्याची ऊर्मी असताना मित्रांचा आग्रह असतानाही कधीच जवाबदारीचे पद घेतले नाही ..फक्त काम करत राहिलो म्हणून कधीच राजकीय पेचप्रसंगात अडकलो नाही की कुठल्या राजकीय पक्षांशी वैर झाले नाही उलट चांगले संबंध ठेवून राहण्यासाठी कायमच सगळ्यांना आग्रह करण्याची मानसिकता तयार झाली.. कारण अप्पांच्या प्रसंगातून हा कायमच धडा घेतला होता.

      1990 मध्ये अप्पांनी स्वतःच्या अनिल, बबन आणि अरुण या तीन मुलांसाठी नोकरीऐवजी व्यवसाय करण्याच्या आग्रहाने अप्पांनी विक्रोळी पार्क साईडला एक दुकान बांधले आणि व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 1991 ला जागतिकीकरण झाल्यानंतर सर्वांनाच कळले की आता नोकरी मध्ये आयुष्याची स्थिरता मिळणार नाही तर व्यवसायामध्येच आहे. आपण व्यवसायामध्ये उतरले पाहिजे अप्पांच्या या दूरदृष्टी निर्णयाचा आता खूप अभिमान वाटतो. परंतु तेव्हा कोणालाच कळत नव्हते अप्पांनी गुजरातींच्यासमोर मसाल्याचे दुकान काढून कशी काय स्पर्धा करू शकतात असा अनेकांना प्रश्न पडला होता.  पण आज व्यवसाय करणे काळाची गरज आहे हे सर्वांनाच पटले आहे.     अप्पानी व्यवसायिक दृष्टीचा दिलेला धडा कायमच मी कुटुंब आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बिंबवत असतो. 

    एकदा घरामध्ये धार्मिक कार्य होते मला समईची वात करण्यासाठी अप्पांनी सांगितलं मी त्यांचे अनुकरण करून बनवली. वात दोन वाती एकत्र करून समईमध्ये लावायची असते कारण त्याला एक आध्यात्मिक कथा सांगितली होती... कथा मला आठवत नाही पण दोन वाती एकत्र करून समई लावायचा धडा अजूनही पप्पांची आठवण करून देतो. धार्मिक कार्य सुद्धा अंधश्रद्धा बाळगून करू नये असे त्यांचे नेहमी म्हणणे असायचे. कुटुंबाचे अकरा भाऊ एकत्र ठेवण्यासाठी त्यानी केलेली धडपड कायम दिसायची म्हणूनच 2002 ला अप्पाचे निधन झाल्यानंतर 2005 पासून  21 भावांना एकत्र घेऊन काम करायचे धाडस करू शकलो यावर्षी घराचे नूतनीकरण करण्याचे धाडस सुद्धा केवळ अप्पांनी दिलेल्या कुशल आणि पारदर्शक नेतृत्वचा धडा आयुष्यभर समोर येतो अशा आयुष्यव्यापी  शिक्षकाला मानाचा मुजरा !!!! 

  


बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

प्रितीच्या हास्या पलिकडचे जीवन …

प्रितीच्या हास्या पलिकडचे जीवन …


डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

दिनांक- 25 ऑगस्ट 2021


----------------------------------------------------------------


घराच्या बाहेर असलो तरी घरातून हास्याचे फवारे उडत असले की लक्षात यायचं की ...प्रीतीची मैफिल बसलेली आहे. हसण्याठी विषय कोणताही असो त्यामध्ये जोरजोरात हसायचं आणि असलेल्या विषयाची मांडणी करायची... ऐकणारा माणूस केवळ मनोरंजन म्हणून ऐकत असतो.

…..परंतु या हास्यापलीकडचे जीवन फारच कमी लोकांना माहिती असायचं. प्रीती माझी भाची .. बहिणी कडूनच खळखळून हसण्याचा वारसा मिळाला माईला (बहिण) 35 व्या वर्षात संधिवाताचा त्रास सुरू झाला आणि खडतर जीवन सुरू झाले तिच्या जखमा कायम ओल्या असायच्या परंतु जीवन जगण्याची ताजेपणा कायम होता ...अगदी तिच्या मृत्यूपर्यंत कधीच हरवला नव्हता. तीच झेरॉक्स कॉपी म्हणजे प्रीती वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून आईच्या आजारपणामुळे कधी या दोन मुलींना म्हणजे दीप्ती आणि प्रीती तारुण्यामध्ये कधी आल्याच नाहीत बालपणातून जबाबदारीच्या ओझ्याखाली कायम दिसल्या. अल्लडपणा केला नाही... तरुण मुलगी म्हणून लक्ष ठेवावे लागले नाही ...दीप्ती दहावीनंतर हॉस्टेलला राहायला गेली तर प्रीती माझ्याकडे राहायला आली.. कॉलेज जीवन सुरू असताना थोडे मजेशीर दिवस होते... पण आईचं आजारपण सुरू होतं त्यातच स्वतःचं उच्च शिक्षण पूर्ण केले. एम ए इंग्लिश करून बीएड केलं ...पण व्यवस्थित नोकरी मिळाली नाही


....जीवनसंघर्ष तर या मुलीच्या पाचवीला पूजलेला ...कॉलेज पूर्ण झालं ..नोकरी सुरू झाली ..आणि  वडिलांचा अपघाती मृत्यू झाला.. घरामध्ये आजारी आई..बहीण  नोकरीनिमित्ताने… आणि लग्नानंतर मुंबईत असल्याने वडिलांची जागा तिलाच घ्यावी लागली.अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या ...एक धक्का सावरत नाही तर ..

वडिलांच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाला संपूर्ण आकाश कोसळले...उध्दवस्त होणं काय ते डोळ्यासमोर बघत होतो... प्रीती माझ्याकडे राहायला आली ...तब्बल आठ महिने प्रीतीला जवळून बघत होतो. पत्नीच्या दूरदृष्टीमुळे आमच्या घरी प्रीतीला ठेवणं अतिशय योग्य निर्णय होता ...निर्मनुष्य घरांमध्ये ...आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे ती एकटी घरामध्ये राहणं महाभयंकर होतं.


        माईच्या जाण्यापूर्वी एक घटना आठवते माईच्या घरी अभिषेक हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता अभिषेक म्हणजे पुतण्या(मुंबईचा प्रकाश भाऊचा मुलगा ) अभिषेकचा अचानक फोन आला माईच्या पायातून पूर्ण रक्त येते आहे .. आणि माई डोळे मिटायला लागली आहे.. संपूर्ण बाथरूम मध्ये रक्त सांडले होते ..अभिषेक थर थर कापत बोलत होता ..घसा कोरडा झाला होता ..फोनवरच संभाषण ऐकून आम्हाला सुचत नव्हतं .. माईच्या पायाच्या जखमा साफ करत असताना अचानक रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव होऊ लागला 

.व्हेरिकोज वेनमुळे मोठ्या मोठ्या जखमा झाल्या होत्या. गौरी आणि मी तातडीने माईच्या घरी गेलो.. माईची अवस्था बघून ..थरकाप उडाला होता ..प्रतिक्रिया द्यायला सुद्धा वेळ नव्हती तिला जगवणं एवढाच डोळ्यासमोर विषय होता... प्रीती नवनिर्माण कॉलेजला कामाला होती ती क्लास रूम मध्ये असल्यामुळे फोन लागत नव्हता तिला फोन लावण्यात आम्ही वेळ सुद्धा घालवला नाही.108 वर अँबुलन्स साठी फक्त दोन वेळा प्रयत्न केला .. माईला चादरीमध्ये गुंडाळून कसं बसं  माझ्या फोरव्हीलर मध्ये टाकले शेजारचे गुर्जर डॉक्टर देवासारखे भेटले होते ते पण गाडीत बसले ..माईला अनिता वहिनी च्या मांडीवर ठेवले ...गौरी तिची टू व्हीलर घेऊन सुसाट वेगाने सिव्हील हॉस्पिटलला अगोदर गेली मी गाडी चालवत असताना माईच्या श्वासाकडे लक्ष होतं … काही सांगता येत नव्हतं…. तोपर्यंत अभिषेकने प्रीती ला फोन केला त्याला गाडी व्यवस्थित चालवता येत नव्हती परंतु प्रीतीला घेऊन आला गडबडीमध्ये नाचणी ग्रामपंचायत समोर  दोघांचा ॲक्सिडेंट झाला स्वतःच्या जखमांकडे लक्ष न देता प्रीती माईला बघायला आली सुदैवानी माई वाचली होती…

 परंतु या संपूर्ण घटनेमध्ये आम्ही सगळेच देवाचे आभार मानत होतो..  परंतु काही दिवसांतच माईची तब्येत परत बिघडली तिला मुंबईध्ये दीप्ती, पूर्वा, महेश, ज्योती वहिनी, भाई ,सर्व पुतणे आणि सदैव सोबत आई होती ऑपरेशन झालं पण तरीही सेप्टिक होऊन  त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. माई गेल्यानंतर प्रीतीचे आठ महिने अतिशय खडतर होते श्रवण आणि आर्या या दोघांच्या लुडबुडीमुळे ती फ्रेश असायची खळखळून हसत बोलायची परंतु त्या हास्या मागील तिचं जीवन अतिशय खडतर होतं … बेबी (बहीण) देवळेकर भाऊ , दिप्ती निलेश आणि जीवदानी परिवार यांचा पाठिंबा होता ..सुदैवाने प्रशांतसारख्या अतिशय मनमिळावू जोडीदारामुळे जीवनात बहर आला आणि आता  खूप गोड मुलगी झाली आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊन सुद्धा चांगल्या नोकरीच्या शोधात अजूनही खडतर जीवन सुरूच आहे..रखडलेल्या जीवनाला निखळ हास्याची जोड मिळावी ही श्री चरणी प्रार्थना .


सोमवार, ३१ मे, २०२१

GJC 95 ऑनलाईन स्नेहसंमेलन 2021

GJC 95 ऑनलाईन स्नेहसंमेलन 2021

उल्हास सप्रे
मुख्याध्यापक
माने इंटरनॅशनल स्कुल, रत्नागिरी
--------------------------------

GJC95चे पहिले ऑनलाईन स्नेहसंमेलन

       काल रविवारी ( ३० मे२०२१) संध्याकाळी साडेचार वाजता मी एका उद्घोषणेने वेगळ्याच विश्वात गेलो -  सोनालीच्या सुरेल आवाजातील ती  उद्घोषणा होती, " १००.१ मीटर्स आणि  सतराशे साठ किलोहर्टझ् वर आपण जमलो आहोत....." 
         काही दिवसांपूर्वी आनंदने  ग्रुपवर एक मेसेज पोस्ट केला  आणि त्याच्या सवयीनुसार मला तोच पर्सनल मेसेजही  टाकला - " आपण ऑनलाइन स्नेहसंमेलन घेतोय..." मी फक्त 👍👍 केलं. तसा  आनंदचा चिवटपणे ( हा नेतृत्वाचा अत्यावश्यक गुण)  पुन्हा मेसेज: " तू काय सादर करशील?"  माझ्या अंगात कोणतीही कला नाही ,मग मी त्यातल्या त्यात विचार केला, आपण शीळ  वाजवू शकतो.  खरं तर आपल्याकडे शीळ वाजवण्याला फारशी प्रतिष्ठा नाही . जणू शीळ  वाजवणारी लोक रिकामटेकडेपणे, रोडरोमियोसारखे सतत मुलींकडे पाहून शिट्या वाजवत असणार असा एक लुक देतात हो ! 😰

           संघटनाबांधणी याबाबत आनंदने अनौपचारिकपणे एमबीए केले आहे. गांधीजींबाबत असं म्हटलं जायचं की त्यांनी सर्व लोकांना प्रेरित करता येईल अशा छोट्या, साध्या कल्पना राबवल्या-  जसे मूठभर मीठ हातात घेऊन सत्याग्रह असेल किंवा चरखा चालवणे, खादी घालणे इ. यातून , sense of participation तयार होतो आणि उपक्रमांमुळे संघटना टिकून राहते. ( अनेक ग्रूपवर गुड मॉर्निंग / HBD/ कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा यापलीकडे काही घडत नाही.😌) तसेच आनंद  नावाचा उत्साहाचा झरा हा दर महिन्या-दोन महिन्यांनी नवनवीन कल्पना घेऊन मिशनरी उत्साहाने समोर येतो... मग ते मंथएन्ड गेट- टुगेदर असो की परिचारिकांसाठी कार्यक्रम.  चेष्टा- टिंगल-टवाळी -अनुत्साह  त्याला रोखू शकत नाही. पुलंच्या नारायणच्या अंगात जसं लग्न संचारायचं तस्सं !😀 एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार !!   विविध व्हाट्सअप ग्रुप बनवणं, विविध ऑनलाईन- ऑफलाइन कार्यक्रम, त्याच्यासाठी पुन्हा फोन करणे ,मेसेज करणे , गैरसमज दूर करणे ..... ( कधी तर मला वाटतं की आनंद पंतप्रधान असता तर लोकांनी जीएसटी, नोटाबंदी , गेल्यावर्षीचा अचानक लॉकडाऊन या  सा-याला  विनातक्रार सहकार्य केलं असतं ! 😂 )   हे सारं तो सतत करत राहतो ....या साऱ्याचा दृश्यपरिणाम म्हणजे कालही त्याने मला बरोब्बर सव्वाचारला फोन केला," उल्हास, जॉईन होतोयसं  ना? "        
             परवा मोबाईलवर नीटसा सराव न जमल्यामुळे काल मी सुट्टीच्या दिवशीही लॅपटॉप आणि ड्यूअल स्ट्रॉंग नेटवर्क मिळवण्यासाठी आमच्या शाळेचे ऑफिस गाठले. (बघा,  रविवारी देखील शाळेत जावे लागले). गेलं वर्षभर झूम मिटींगला क्लिक करून जॉईन होणे एवढं अंगवळणी पडलंय की पटकन हे विविध गुणदर्शन गुगल मीटवर आहे हेच विसरायला झालं. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरेनुसार एका मोठ्या आकारात काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळीकडे लक्ष वेधून करण्यात आली. ( कलाकार- संध्या सावंत) 👌👌 त्यानंतर जया आणि सोनाली यांची प्रार्थना. साधी प्रार्थना म्हणायची तरी त्यामागे चार-पाच जणांच्या ६-७ सूचना होत्या हे विशेष.😀 
                 यानंतर संजू साळवीला अभिवादन करण्यासाठी एक खास प्रेझेंटेशन करण्यात आले. ( क्रेडिट - आनंद- अस्मिता)  तसं संजू आणि मी‌ यांची फार घसट नव्हती.  परंतु माझ्या लग्नाआधी बायकोसोबत मी संजूच्या गाडीतळावरील फोटो स्टुडिओत एक फोटोही काढला होता. संजूच्या फोटो स्टुडिओ नावदेखील मेमरीज ! पण अवलिया कलाकार म्हणून संजू चांगला ओळखीचा झाला. जेव्हा जेव्हा रत्नागिरीत एखाद्या कार्यक्रमात भेट झाली, तेव्हा तो नावाने ओळखायचा. ( प्रचंड मोठ्या लोकसंग्रहाला नावाने ओळखणे यात शरद पवार अत्यंत माहीर आहेत, हे आठवलं) . तो अकाली जाण्याआधी  जेमतेम २० दिवस आधी  बिपीनच्या 'सयाजी' बंगल्यावर आमची भेट झाली. तेव्हाही राहुल आठल्ये आणि मी एकत्र प्रवेश करताच तो उद्गारला ," या मास्तर लोक!" संजूची गाणी आणि 'कसक'ने पुन्हा काळजाचा ठाव घेतला.  
              क्रिकेटमध्ये तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर दर्जेदार बॅट्समन खेळतो , तसं स्वप्निल मुरकरचे ' सच मेरे यार है' झाले. सूरज आणि प्रभाकर यांनी केरळ किनाऱ्यावर मान्सून येऊन ठाकला, हे लक्षात घेऊन पावसाला आळवणी करणा-या कविता म्हटल्या , त्याचा  तत्काळ परिणाम पहा-  रत्नागिरीत काल रात्री दोन तास गडगडाटी पाऊस पडला! 😝😝 याबद्दल त्यांना आता  सर्वांना कांदा भजी खिलवण्याची शिक्षा दिली पाहिजे! 😋😋 महाकवी कालिदासानंतर ढगांमध्ये मेघदूत कोणाला जाणवले तर तो म्हणजे सूरज ( हा *सूरज* ढगांमागे जाणारा *सूर्य*  नाही) 

            सूरज या ब्लॅकबेल्टधारक कराटेपटूचा हवेत पंच जोरदार असला तरी त्याची पावसाला गवसणी अत्यंत हळुवार ,कोमल , नाजूकसाजूक होती. प्रभाकरने तर सध्या सतत कानावर पडणाऱ्या पॉझिटिव्हिटीचे उत्तम उदाहरण दाखवले.👍 GJC 95ला कनेक्ट होताना मी गणेशगुळ्याच्या पिकनिकला गेलो होतो ते प्रभाकरच्या टाटा टिगोरमधून हे आठवले. 
          स्क्रीनवरील छोट्याछोट्या विंडोपेन्समध्ये लक्ष वेधून घेत होता एक स्क्रीन - तो जणू काही एक स्टुडिओ होता - एवढेच नव्हे तर प्रकाशयोजनाही अशी होती की आनंद, राजू आणि स्वप्नील यांच्या डोक्यावर जणूकाही प्रभामंडल -  आभा ( aura) पसरलेले दिसत होते.🙏 मिलिंदचे कॅसियोवादन 🎹 मनाला तल्खली देऊन गेले.‌ विनायकच्या शीळवादनावर सब कुछ किशोर असा छाप होता आणि सर्वांनाच त्याने ताल धरायला/ गुणगुणायला भाग पाडले. मला थोडंफार जमणा-या शीळवादनातील उस्ताद भेटल्याचा आनंद होता.
आनंदनेही  'एक प्यार का नगमा है' सहज सादर केले. *गायक आनंद, गीतकार संतोष आनंद  म्हणजे आनंदी आनंद* !! ( आणि मी उल्हास !!!😝) 

            रश्मीने तर  संगीतसाधना 🎤चालू ठेवलीय, त्याचाच परिपाक म्हणजे तिचा कालचा परफॉर्मन्स. हवा के झोके आज...   जया आणि मी  कॉलेजला तीन वर्षे इंग्रजीचे क्लासमेट्स. परवा सरावाच्या वेळी तिने ९६साली इंग्रजी डिपार्टमेंटल सेंडऑफलादेखील मी  शीळ वाजवून गाणे म्हटले होते, याची आठवण करून दिली.  माझी मामेबहीण प्रज्ञा देवने अतिशय सुंदर शास्त्रीय नृत्य केले. ती आणि रश्मी यांनी कॉलेज सोडताना त्यांचे वय तेथेच गोठवून त्या बाहेर पडल्या आहेत असे वाटते !😀 ( हलकेच घेणे) कालच सकाळी आम्हा भावंडांचीपण एक ( *अर्थात*) झूम मीटिंग झाली, त्यावेळीदेखील सर्वांनी सांगितले की प्रज्ञाची दहावीला बसलेली मुलगी आणि प्रज्ञा या दोघीही सोळा वर्षांच्याच वाटतात ! )  आता भाऊ म्हणून मी सांगतो की प्रज्ञा केवळ छान नाचते असं नाही तर नाचवतेही !😂😂 निवी आणि ईशान्वी या फेसबुक व युट्यूबवर जबरदस्त लोकप्रिय मायलेकींच्या नृत्याप्रमाणे प्रज्ञाने व्हीडिओ पोस्ट करायचा विचार करायला हरकत नाही. 
              GJC 95च्या पहिल्या ऑनलाईन गॅदरिंगमध्ये कविता, नृत्य ,इंस्ट्रुमेंटल, रांगोळी ,गाणी,शीळ वादन ,एकपात्री असे विविध प्रकार यामुळे रंगत आली. *ख-या अर्थाने विविध गुणदर्शन ! Variety Entertainment Programme* !! 

       कैलासला सर्वजण गझलकार म्हणून प्रामुख्याने ओळखतात. मात्र त्याने सुरुवातीला वात्रटिका (हास्य कविता)  सादर करून थोडेसे आश्चर्यचकित केले.  हे म्हणजे राहुल द्रविडने  विश्वचषकात टॉन्टन येथे श्रीलंकेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन शतक झळकावले किंवा परवा परवा चेन्नईत रोहित शर्मा आयपीएलच्या टी-20 सामन्यातदेखील अगदी कूर्मगतीने खेळत होता-  म्हणजे आपल्या नैसर्गिक वृत्तीला मुरड घालून, ते आठवलं.  प्लेइंग टू गॅलरी नाही ! अर्थात कैलासने वात्रटिका सादर करत असताना सर्वांना हसवलं पण  प्रियाला तर  हसू इतकं अनावर होत होते, ते का हे समजले नाही. 😝( श्री. गणराज सावंत यांना विचारलं पाहिजे.) 
              जयाने 'दिल है के मानता नहीं  ... ' म्हणून सर्वांना आपल्या दहावी - बारावीच्या वेळी रीलीज झालेल्या फिल्मची आठवण करून दिली. मधूनेही गाणी चांगली म्हटली, तिचं कोकणी गाणं मला अधिक आवडलं. आनंद जसा समाजसंघटक तसा बिपीन राजकारणातील संघटक आणि उत्तम क्रिकेटपटू एवढीच मला माहिती होती परंतु त्याने गायकीचापण उत्तम नमुना पेश केला. 
              सर्वात कौतुक करावे लागेल ते म्हणजे निवेदिका सोनाली सावंतचं ! तिने तर ऑनलाईन कार्यक्रम असतानादेखील आकाशवाणीच्या एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत जाऊन निवेदन -सूत्रसंचालन सुरू करावे त्या सहजतेने संपूर्ण कार्यक्रमाचा डोलारा सांभाळला. अर्थात उत्तम तांत्रिक सहाय्य अस्मिता आणि हेमंत यांचे होते. त्यांचे संसारात sync उत्तम असल्यामुळे या तांत्रिक गोष्टीत त्याचेच प्रतिबिंब पडले यात नवल ते काय ? 😀 मी मेडले पद्धतीने हिंदी  गाण्यांचे शीळ वाजवत सादरीकरण केले. माझ्या ऑफिसमधल्या प्रकाशयोजनेमुळे मला कायम असा फील येत होता की आपल्याला चंद्राची एकच बाजू प्रकाशित दिसत असते तसं माझ्या अर्ध्या  चेहऱ्यावर प्रकाश दिसत होता. सोनालीने तर  फुलराणीमधला प्रवेश अतिशय सुंदर सादर केला. एकदम भक्ती बर्वे व अमृता सुभाष यांची आठवण आली. श्रीराम लागूंनी *वाचिक अभिनय* पुस्तक लिहिले ते आठवलं.  Voice modulation व शब्दफेक जबरदस्त होते. 👌👌 मूळ कार्यक्रमपत्रिकेनुसार सोनालीचा कार्यक्रम आधी आणि मग माझं शीळवादन होते. प्रत्यक्षात सोनालीने माझ्यानंतर सादर केलं, हे फारच बरं झालं. कारण ती सारखं म्हणत होती ,  "मास्तर, तुला शिकवीन चांगलाच धडा..... " हे ऐकून मला तर शीळ वाजवताना कापरं भरलं असतं.
            शलाकाने  छान गाणं म्हटलं. तिचा तो परफॉर्मन्स 'हम भी तो है' या कार्यक्रमात मी पूर्वी आपल्या 22 नंबर हॉलमध्येही लाईव्ह ऐकला होता ते आठवलं. अस्मितानेही छान गाणं‌ म्हटलं. 'मला जे गाणं आवडतं, जमतं ते पुरूष आवाजात असलं म्हणून काय झालं! '   हा आत्मविश्वास आणि मोकळेपणा महत्त्वाचा .👍 राजू जाधवचं गाणं मला कॉलेज डेजपासून माहित आहे. हमखास वन्स मोअर घेणारा कलाकार. या कार्यक्रमात तसा गलका झाला नाही कारण हेमंतकडे सेटिंग्जची बटणे होती. ( कोणी म्हणालं की रश्मीने‌ डोळे‌ वटारले तरी प्रत्येक जण आपण चुकून अनम्यूट तर नाही ना याची खात्री करायचा!😀) 
सर्वात शेवटी मला विशेष कौतुक करावं वाटते की जवळपास तीन तास ज्यांनी आपला बहुमोल वेळ खर्च करून केवळ प्रोत्साहन देण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी उपस्थिती दर्शविली. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही तरी केवळ आपले मित्र मैत्रिणींबद्दल वाटणाऱ्या प्रेमापोटी हे सर्व हजर होते . 👍👍 संपूर्ण कार्यक्रमभर ३० ते ४०  प्रेक्षक हजर रहात होते. हा आकडा फार मोठा नसला तरी,  गर्दी नसली तरी दर्दी होते असे म्हणता येईल. 
       थिएटरमध्ये सिनेमाचे पहिले गाणे सुरू झाले की आलेपाकाच्या वडीचा तुकडा मोडावा तसं.. किंवा शाळांच्या गॅदरिंगमध्ये इंग्रजी नाटक सुरू झाले की हमखास वेफर्स पिशव्यांचा आवाज येतो , तसं काही झालं नाही.  मात्र दीड दोन तासांनी    कोणी कॅमे-यासमोर‌ चहा- कॉफी पित होते, कोणी तोंडात चकलीचा वा बर्फीचा तुकडा टाकत होते...  सर्व वाट्या, बोल्स -चमचे स्क्रीनसमोर दिसू लागले. मी शाळेत असल्याने माझी पंचाईत झाली! 😰)  
           आनंदने टिपीकल संघटक या नात्याने कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाकडून धावता आढावा वसूल केला. मला बोलताना तो म्हणाला, "उल्हास, शिटी वाजवून तुझे पोट दोन सेंटिमीटरने आत आलेले असेल ...."  अरे,  हे काय,  म्हणजे आता मिलिंद आणि सुरजच्या  जोडीने वाढीव पोटाशी माझे नावपण  जोडले गेले... ! कमाल आहे बुवा!! 😀
- उल्हास सप्रे
( टीप : १. मैत्रीचा ग्रूप असल्याने सर्वांचा एकेरी उल्लेख आहे. गैरसमज नसावा. मला  ग्रूपवर 'सर' म्हणताच  प्रचंड ऑकवर्ड वाटते.
२. सर्वच कार्यक्रम छान झाले. कुणाचा नजरचुकीने उल्लेख राहिला असेल तर क्षमस्व. )
95 स्नेहसंमेलन 

प्रा.कैलास गांधी
दापोली अर्बन बँक सायन्स कॉलेज ,दापोली
------------------------------
ऑनलाइन स्नेहसंमेलन आणि माझा सहभाग


गेले काही दिवस किंबहुना काही महिने मी ज्या मनस्थितीतून जात होतो त्याच मनस्थितीतून अनेक जण जात आहेत.  म्हणजे आपला दिनक्रम तर आपण पार पडतो आहोत.  पण पण या मध्ये कुठला उत्साह नाही कुठली स्फूर्ती  नाही,  काहीतरी नवीन करावं अशी उर्मी देखील नाही. हा कालखंड कधी संपेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही आणि कदाचित काळाकडे देखील याचं ठाम आणि ठोस उत्तर नाही.  यामुळे आपण आणखी किती दिवस किती महिने, किती वर्ष अशा स्थितीत जगणार आहोत हे फार मोठे प्रश्नचिन्ह आहे. खरे तर माझ्यासारख्या लिखाण करणाऱ्यांसाठी  हा भरपूर मोकळा वेळ उपलब्ध करून देणारा कालखंड होता.  पण पण डोक्यात अनेक कल्पना, विषय, प्रतिमा आणि शब्द घोंगावत असताना  देखील लिखाण होत नव्हतं. दोनच गेले काही दिवस किंबहुना काही महिने मी ज्या मनस्थितीतून जात होतो त्याच मनस्थितीतून अनेक जण जात आहेत.  म्हणजे आपला दिनक्रम तर आपण पार पडतो आहोत.  पण पण या मध्ये कुठला उत्साह नाही कुठली स्फूर्ती  नाही,  काहीतरी नवीन करावं अशी उर्मी देखील नाही. हा कालखंड कधी संपेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही आणि कदाचित काळाकडे देखील याचं ठाम आणि ठोस उत्तर नाही.  यामुळे आपण आणखी किती दिवस किती महिने, किती वर्ष अशा स्थितीत जगणार आहोत हे फार मोठे प्रश्नचिन्ह आहे. खरे तर माझ्यासारख्या लिखाण करणाऱ्यांसाठी  हा भरपूर मोकळा वेळ उपलब्ध करून देणारा कालखंड होता.  पण पण डोक्यात अनेक कल्पना, विषय, प्रतिमा आणि शब्द घोंगावत असताना  देखील लिखाण होत नव्हतं. दोनच दिवसांपूर्वी मी एक गझल लिहिली आणि पोस्ट देखील केली. 

लाख शक्यता प्रचंड आशावादी होत्या 
परंतु त्याही फार तणावाखाली होत्या 

ठोस शाश्वती कुठे कुणाची उरली होती 
सर्व व्यवस्था होत्या पण, पर्यायी होत्या 

सर्व आकडे कुठे लपवण्यासाठी होते ?
काही संख्या चक्क दिखाव्यासाठी होत्या 

अनेक वर्षे निरोप सुद्धा आला नाही 
आज बातम्या त्यांच्या गावोगावी होत्या 

काही फक्त मिथकांवर अवलंबून होते 
उरलेल्यांच्या आशा देवावरती होत्या 

मृत्युचे भय याच भितीने पळून जाईल 
इतक्या चिंता आज उपाशीपोटी होत्या 

ही दुनियेची एकमात्र हतबलता नाही 
या आधीही अशाच काही नोंदी होत्या 

प्रगल्भ त्यांना दुनियेनेच बनवले आहे 
कुठे समस्या जन्मताच मुत्सद्दी होत्या ?

कुणीच का काळाची बाजू मांडत नाही ?
एकजात का एकतर्फी तक्रारी होत्या ?


अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या ...  हुरूप वाढला आणि गोठलेली लेखणी पुन्हा एकदा सुरू झाली.  यामध्येच घडलेली एक आनंदाची गोष्ट म्हणजे आनंद आंबेकर याचा फोन आला आणि त्याने ही ऑनलाईन गेट-टुगेदर ची संकल्पना सांगितली.  खूप छान संकल्पना वाटली.  ऑनलाइन कार्यक्रम करताना अनेक अडचणी येऊ शकतात याची जाणीव होती मात्र अनेक वर्षानंतर अनेक जणांना ऐकता येईल, पहाता  येईल  जुन्या आठवणींना उजाळा मिळेल याची खात्री होती. आजचा कार्यक्रम अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम होता. माझ्यासारख्या आळशी माणसाला तयारीचा त्रास नव्हता. मात्र इतर जणांसाठी खूप तयारी आवश्यक होती. सर्वजणांनी खूप तयारी करून आजच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली. काही तांत्रिक कारणामुळे मी थोडा उशिरा जॉईन झालो यामुळे काही जणांचे सादरीकरण  मला अनुभवता आले नाही. याची कार्यक्रम संपल्यानंतर चुटपुट मात्र लागून राहिली. ग्रुप मधले अनेक जण मला ओळखत होते की नाही हे माहीत नाही. काही जणांना मी ही ओळखत नव्हतो.  कार्यक्रमानंतर  सर्वजणांना  एकमेकांची ओळख निश्चित झालेली असेल. आजवर झालेल्या कार्यक्रमांना आणि गेट-टुगेदरना मी येऊ शकलो नव्हतो त्यामुळे हा पडदा उघडलेला नव्हता. 

 ज्यांना मी मिस केलं त्यांच्याबद्दल लिहिता येणार नाही मात्र त्यांनीही कार्यक्रमात निश्चित बहार आणली असणार...
सोनालीचे अत्यंत ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन,  हेमंत आणि अस्मिताने सांभाळलेली तांत्रिक बाजू, आनंदची संकल्पना, नियोजन लाजवाब होते. जया सामंतने गायलेले 'दिल है के मानता नही' त्या काळात घेवून गेले. मी दुर्दैवाने भक्ती बर्वेंची 'ती फुलराणी' पाहिलेली नाही पण अमृता सुभाषच्या 'ती फुलराणी' च्या चक्क तालमी  पाहिल्या होत्या. आठवण सोनालीने करून दिली. उल्हास सप्रेने वाजवलेली शिट्टी वरची आणि बहारदार होती.  मधू कदमने साऊंड ट्रॅक शिवाय गायलेली गाणी अप्रतिम, अस्मिताने देखील गाण्याचा चांगलाच सराव केल्याचे तिच्या सादरीकरणानंतर जाणवले. शलाकाने गायलेले सनम तेरी कसम मस्त होते. बीपीनने गाताना चांगलाच ठेका धरायला लावला. राजूचे गाणे नेहमीप्रमाणे ढासू होते. आनंद, राजू आणि स्वप्नीलने शेवट सुद्धा सुंदर गेला.  संजूची आठवण मात्र आता सुद्धा येत आहे. हे कुणीतरी निळू फुले,अशोक सराफ  यांची मिमिक्री केली असती...तर   खातू नाट्यमंदिर च्या स्टेजवर संजू उभा आहे हे असा भास झाला असता....  धन्यवाद सगळ्यांचे....


शुक्रवार, २८ मे, २०२१

जीना इसी का नाम है.....

जीना इसी का नाम है …. 


डॉ.आनंद आंबेकर 

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय 

रत्नागिरी 

दिनांक 28 मे 2021 

_______________________________


माझ्या "माय लाईफ" या ब्लॉग मध्ये आज पहिल्यांदाच मी वेगळ्या शैलीत लिहीणार आहे.

गेले एक वर्ष आपण कोरोना महामारी काळात अनेक गोष्टीने त्रस्त आहोत... कोणाला आरोग्याचा प्रश्न आहे ….कोणाला आर्थिक प्रश्न आहे आणि त्यामुळे अनेक असे सामाजिक प्रश्न तयार झाले आहेत.भयाचे साम्राज्य आहे. यावर मात करून जी लोकं जीवनाचा आनंद घेतात त्यांना बघून सहज एक वाक्य मनात येत ते म्हणजे ….जीना इसी का नाम है 

आलेल्या परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाची दिशा बदलण्यासंदर्भामध्ये अनेक लेख ...व्हिडिओ आपल्याला वाचायला..बघायला मिळतात परंतु त्रयस्थ लोकांचे अनुभव बघत असताना त्याच्या पाठीमागे एक तात्विक किंवा वैचारिक भावना असते पण आपल्या जवळच्या मित्रमंडळी कोरोना काळात लढा देऊन आनंदी जगण्याचा जो मंत्र देतात ते बघून तिकडे वैचारिक पद्धतीने बघत नाही... तर आपण भावनिक पद्धतीने त्यांच्याकडून ऊर्जा घेतो... मोटिव्हेशन घेतो आणि आज या लेखामध्ये तुम्हाला मी माझ्या जवळच्या मित्रांकडून घेतलेल्या मोटिव्हेशन मधून सहज ओठावरती येतं ...जीना इसी का नाम है 

       गेल्या 2020 च्या मार्च महिन्यापासून कोविडचा थरार सुरू झाला ...पण जोपर्यंत आपल्या जवळ घडत नाही तोपर्यंत काही वाटत नाही. परंतु जुलै 2020 महिन्यामध्ये आमचा कॉलेज मित्र संजीव साळवी याचे  कोरोनामुळे निधन झाल्यानंतर कोरोना आमच्या सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण करू लागला. 95 मित्रमंडळी मधील असे अनेक मित्र मंडळी आपल्यावर आलेल्या प्रसंगाला फाईट करून स्वतः आनंदी राहत आहेत आणि इतरांना आनंद देत आहेत. अशाच काही मित्र-मैत्रिणींचा संदेश म्हणजेच जीना इसी का नाम है …..    

      मित्रमंडळींना जवळून वाचण्याचा (आपण पुस्तक वाचतो...माणसं का नाही? ) प्रसंग आला तो म्हणजे 95 फॅमिलीचे ऑनलाइन स्नेहसंमेलन. त्यानिमित्ताने मेसेज केले... अनेकांशी बोललो आणि 30 मे 2021 ला ऑनलाइन स्नेहसंमेलन घ्यायचं ठरलं. स्नेहसंमेलन ठरवण्याचे कारण सुद्धा जाणीवपूर्वक आहे ..आज सर्वजण अत्यंत विदारक स्थितीमध्ये जगत आहेत. काही मित्रांनी अतिशय पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला ...तर काही प्रसंगामध्ये गुरफटलेले आहेत...मित्रांच्या अश्या  अनेक घटना डोळ्यासमोर आल्या की, जे मित्र स्वतः प्रसंगांमध्ये आहेत वाईट प्रसंगांमध्ये आहे परंतु तरीही स्नेहसंमेलन करण्यासाठी आग्रही आहेत. त्याचं जीवन पाहिल्यानंतर असंच म्हणावे लागेल... जीना इसी का नाम है 

    खरं म्हणजे माझ्या घरी सुद्धा माझी पत्नी नेहमी शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी जाते ...घरामध्ये खूप टेन्शनचे वातावरण असतं ...लहान मुलं आहेत … परंतु तरीही मध्ये मध्ये तिला आणि आम्हाला रिलॅक्स वाटण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. यातूनच एक ऊर्जा मिळते एकत्र असल्याचा भास होतो... आणि त्यामध्येच एक सकारात्मकता येते.

   आज आपण पाहिलं तर कोरोनाच्या मृत्यु मध्ये सर्वाधिक आकडा प्रेशरमुळे मृत्यू झाल्याचा दिसून येतो. म्हणूनच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक मित्रांशी बोलणं झालं ...मित्र सध्या कोणत्या वाईट स्थितीत जात आहेत... तरीही आपण स्वतः आनंदी राहून इतर सर्वांना आनंद देण्यासाठी झटत आहेत ….जीना इसी का नाम है 

बिपिन बंदरकर..

  अत्यंत जिवलग मित्र.. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्याची आई देवाज्ञा झाली ...आठ दिवसापूर्वी त्याचे चुलत भाऊ त्याच्यापेक्षा लहान असलेले कोरोणाचे बळी झाले  पण तरीही स्नेहसंमेलन असा विषय आल्यावर बीपीनने लगेच सांगितले, ऑनलाईन मिटिंग घेऊया आणि प्लॅन करूया…. स्वतःवर प्रसंग असून सुद्धा ते बाजूला ठेवले. शिवसेनेचा रत्नागिरी शहर प्रमुख म्हणून सतत लोकांना मदत करत असतो आणि तरीही मित्रांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी कायमच आघाडीवर असतो. मग म्हणावं लागतं…. जीना इसी का नाम है 


विवेक देसाई... 

    आज स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहे घरामध्ये विलगीकरण मध्ये राहत आहे ..पण स्नेहसंमेलनाचा विषयी आल्यावर त्याचा मित्र स्वप्नील मुरकर जो स्वतः जिल्हा परिषद मध्ये कोरोनामध्ये काम करतोय त्याला गाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विवेकने स्वप्निलला आवर्जून आग्रह केला आणि मला फोन करण्यासाठी सांगितला की, जेणेकरून त्यांनी सहभाग घ्यावा. खरं म्हणजे अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर शॉकमध्ये जातात. पण स्वतः पॉझिटिव्ह असताना मित्रांना आनंद देण्यासाठी एक पाऊल कायमच पुढे असतो यालाच म्हणतात ….जीना इसी का नाम है


सोनाली सावंत….

गेली दोन-तीन वर्ष तिचे पती घरी आजारी आहेत अर्थार्जनाची मोठी जबाबदारी स्वतःकडे आहे. पण तरीही आपले स्वतःचे दुःख बाजूला ठेवून अनेक व्यवसायांमध्ये नवीन नवीन अनुभव घेत आहे. इतरलोकांना आनंद देण्यासाठी सोनाली कायम पुढाकार घेत आहे. अनेकांना आर्थिक मदत देण्यासाठी स्वतः पत्रकार असल्याने लोकांना आवाहन करत आहे.फायटर म्हणजे काय हे तिला बघून वाटतं कळतं .. जीना इसी का नाम है 


प्रभाकर कांबळे...

जिल्हा परिषद ऑफिसमध्ये कोविडची ड्युटी करत असताना स्वतः पॉझिटिव्ह आहे परंतु स्नेहसंमेलन मध्ये मी 100% माझ्या कविता वाचणार आहे. असा सांगणारा प्रभाकर नक्कीच हिम्मत देतो.नॉर्मल असूनही भीतीच्या सावटाखाली राहणाऱ्यां लोकांसाठी एक उत्तम मोटिव्हेशन आहे.


राजेश जाधव…

एक चांगला गायक म्हणून मित्रांमध्ये कायमच फेवरेट आहे स्नेहसंमेलन असले की त्याचे गाणे असावे असा सर्वांचा आग्रह असतो. दोन-तीन दिवस ऑनलाइन प्रॅक्टिसला आला नाही म्हणून फोन केला तर कळलं..त्यांची पत्नी आजारी असल्याने ट्रीटमेंट सुरू आहे. पत्नी हॉस्पिटलमध्ये नर्स  आणि पोलीस पाटील असल्याने सतत लोकांच्या मदतीसाठी हे दोघे लोकांच्या संपर्कात असतात. कायमच कोरोना होण्याची भीती असते...पण तरीही सतत मदत करत आणि मित्रांमध्ये हसत खेळत राहणारा  राजूला पाहिल्यानंतर वाटतं ...जीना इसी का नाम है 

      सर्वांच्या सकारात्मक व्यवहारामुळे आपल्यामध्ये आलेली नकारात्मकता सहज निघून जाते कोरोनाच्या  भीतीने ग्रासलेल्या लोकांसाठी या सगळ्या लोकांचा एक आदर्श घेणे गरजेचे आहे आपण कितीही दुःखात असलो तरी त्याचा बाऊ नकरता आज आलेला क्षण आनंदाने जगत राहिला पाहिजे म्हणजेच ….

जीना इसी का नाम है

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

निलेश सावे ...उत्तम मोटिव्हेटर

निलेश सावे ...उत्तम मोटिव्हेटर 


डॉ.आनंद आंबेकर     

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

दिनांक : 9 एप्रिल 2021

------------------------------------------–--------------------



  "माय लाईफ"  या माझ्या  ब्लॉग मधील आज सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल आज लिहिण्याची संधी मिळत आहे. ही व्यक्ती आयुष्यात आली नसती तर कदाचित मी इतक्या सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगू शकलो नसतो. खरं पाहिलं तर निलेश सावे हे आयुष्यात खूप वेगवेगळ्या रोलमध्ये माझ्या समोर आले... त्यामुळे त्यांना विद्यापीठाचा अधिकारी.. मित्र ...सहकारी असं काय म्हणावं असा एक मोठा प्रश्न आहे.  पण मला निर्विवादपणे आणि  नम्रपणे असं सांगायचं आहे की निलेश सावे माझ्या आयुष्यातील  महत्त्वाचे मोटीव्हेटर आहेत. त्यांचे मोटिव्हेशन मिळाले नसते तर मी फारच लिमिटेड आयुष्यामध्ये राहिलो असतो.

   पहिली भेट आमची प्रतिस्पर्धी म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये 1995 मध्ये झाली. जेव्हा मी गोगटे कॉलेजचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करत होतो आणि सावे सर विद्यापीठाचे नॅशनल टीमचे मेंबर म्हणून अतिशय आत्मविश्वासाने आमच्या समोर आले होते.

    त्यानंतर 2001 मध्ये मी गोगटे कॉलेजचा प्राध्यापक  प्रतिनिधी आणि सावे सर  मुंबई विद्यापीठाचे समन्वयक म्हणून समोरासमोर भेट झाली. फारशी ओळख नव्हती परंतु त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीला प्रभावित झालो होतो.

    त्यानंतर अतिशय महत्वाचे वळण आयुष्याला दिले ते वर्ष म्हणजे 2006 जेव्हा आबासाहेब मराठे महाविद्यालय राजापूरमध्ये युथ फेस्टिवलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आदेश बांदेकर आले होते..रयत संस्थेचे महाविद्यालय असल्याने उद्घाटन सोहळा फारच दिमाखदार पद्धतीने सुरू होता... पाहुणे यायला उशीर होत होता ..तस तशी सावे सरांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता वाढत होती ..कारण 17 एकांकिका एका दिवसात होणार कशा ? तसेच 23  स्किट  होणार कशी ? अशे  मोठे प्रश्न समोर होते . मी स्वतः जाऊन सरांना विनंती केली तुमची हरकत नसेल तर स्किट स्पर्धा दुसऱ्या क्लासमध्ये  वेगळ्या रूम मध्ये घेऊया का ... गरज असेल तर मी मॅनेजमेंट करतो..  सरांनी लगेच होकार दिला .. जवळजवळ बारा वाजता उद्घाटन समारंभ संपला त्यानंतर स्पर्धा सुरू झाली आणि सरांच्या योग्य निर्णयामुळे सहा वाजता स्पर्धा संपली ...तिथेच मॅनेजमेंट संदर्भात सावे सर आणि माझे संबंध विश्वासाचे वाढायला लागले.

 दुसऱ्याच वर्षी 2007 मध्ये सरांचा फोन आला आणि जिल्हा समन्वयक म्हणून काम कराल का अशी विचारणा केली... मला तर भर दुपारी चांदणे पाहिल्यासारखे वाटत होते ... मी लगेच हो म्हणून टाकले आणि जिल्हा समन्वयक म्हणून कारकीर्द सुरू झाली. ही जबाबदारी मिळणे,  माझ्या  आत्मसन्मानासाठी अत्यंत गरजेचे होते. कारण 1993 ते 1996 मध्ये विद्यार्थी असताना एफ वाय ला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर ते  टी वाय ला एन एस एस चा बेस्ट लीडर ऍवॉर्ड मिळाला होता... म्हणजे अतिशय सन्मानाने महाविद्यालयीन जीवन गेले होते.  पण 1999 ला महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर वेगळेच महाविद्यालय दिसू लागले. काम तर खूप करत होतो विद्यापीठांमध्ये बक्षीस सुद्धा लेखक-दिग्दर्शक म्हणून मिळाला लागली होती.  त्याच धर्तीवर 2004 ला महाराजा करंडक सुरू करून विद्यापीठ स्पर्धांमध्ये स्पर्धा जिंकण्याची व्यवस्था सुरु केली... परंतु महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी घ्यायला 2012 पर्यंत वाट पाहायला लागले. त्यामुळे माझ्या कल्पना राबवण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागायचे ..आमची  स्पर्धा मुंबईच्या मुलांसोबत असायची आणि माझ्या कॉलेजच्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये ते स्पिरीट तयार करण्याचं मोठं काम होतं ...यामध्ये महाविद्यालयातून सहकार्य घेणे कठीण व्हायचे अशा वेळेला अनाहूतपणे सावे सरांनी जिल्हा समन्वयक जबाबदारी दिल्याने एक आत्मसन्मान वाढला आणि आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.

    2008 मध्ये ज्या शाहीर अमर शेख हॉलमध्ये आदराने स्पर्धा करायचं स्वप्न होते त्या स्टेजवरती आयोजक म्हणून बसण्याचा सन्मान सावे सरांनीच मिळवून दिला….कॉलेज सुरू होताच पहिली मिटिंग होती ..आम्ही स्टेजवर होतो सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रतिनिधी आमच्या समोर बसले होते.

 सावे सर माईक वरती होते ...मी स्टेजवरती होतो तरीसुद्धा त्यांच्याकडे आदराने बघत होतो ते काय बोलत आहेत….. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना कसे मोटिव्हेट करत आहेत शांतपणे ऐकत होतो. सोबत संचालक मृदुल निळे होते. प्रत्येक झोनचे जिल्हा समन्वयक जाहीर केले रायगड जिल्हा समन्वयक जाहीर झाल्यानंतर ….

सरांनी आणखी एक परत मोठा धक्का दिला …सरांनी डायरेक्ट जाहिर केलं 

या वर्षापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणून प्राध्यापक आनंद आंबेकर म्हणून काम बघतील. मी तर शॉक झालो... पण सावे सरांची शॉक देण्याची पद्धत मला माहिती असल्यामुळे छोटी स्माईल केली आणि गप्प बसलो. सभा संपल्यानंतर शांतपणे म्हणाले... सगळं जमेल तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका ...मी काहीही प्रश्न विचारले नाही आणि त्यानंतर पुढील तीन वर्ष दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळत होतो.असा विश्वास  ठेवणारा व्यक्ती म्हणून सावे सर माझ्या आयुष्यात सहाजिकच मोठी देणगी आहे.

     2017 ला सुद्धा मुंबईतून असाच फोन आला आणी म्हणाले ...या वर्षाचे इंटरनॅशनल युथ फेस्टिवल साठी तुम्हाला टीम मॅनेजर म्हणून जायचं आहे.. विशेष म्हणजे आम्ही कोणी नसणार आहोत. विद्यार्थी ..विद्यापीठ स्टाफ आणि तुम्ही असणार आहात.

 सरांची शॉक देऊन जबाबदारी देण्याची सवय झाली होती म्हणूनच आशियातील सर्व देशातील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसमोर  मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सावे सरांचे खूप मोठे योगदान होते. सावे सरांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे ते कधीच दुसऱ्याच्या कमजोरीचे कधीच भांडवल करत नाहीत उलट पुढच्या व्यक्तिमध्ये कोणता गुण आहे त्याला मोटिव्हेट करतात. कोणी आत्मविश्वास तोडला तर माफ करायच आणि पुढे जायचं हा त्यांचा जबरदस्त गुण आहे.  अतिशय उत्तम मोटिव्हेटर  म्हणून... आयुष्यभर सहकारी म्हणून ... उत्तम माणूस मित्र लाभणे माझे भाग्य समजतो...  सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..  भावी वाटचालीसाठी शुभेच्छ !!!!!!

बुधवार, ३१ मार्च, २०२१

डॉ.राजीव सप्रे ..एक अवघड गणित

डॉ.राजीव सप्रे ..एक अवघड गणित


डॉ. आनंद आंबेकर 

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

------------------------------------------------------



राजीव सप्रे म्हणजे एक अवघड गणिती कोडं... कधीच कुणाला कळणार नाही की  सप्रे सर नेमके कसे आहेत.

 मला तर अनेक वेगवेगळ्या रूपा मध्ये.. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिसले ...अनुभवले .

सुरुवात झाली 2004 मध्ये ज्यावेळी ते विज्ञान शाखेचे उपप्राचार्य होते जोगळेकर महाविद्यालय मध्ये पहिल्यांदाच विद्यापीठाच्या स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून एक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. त्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुळात "डेज"असायचे परंतु ते केवळ मनोरंजन हा उद्देश ठेवून केले जायचे परंतु देव सरांनी विश्वास ठेवून विद्यापीठाच्या स्पर्धांचं आयोजन.. नियोजन कसं असतं यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी देव सरांनी मला आठ दिवस ड्युटी लिव्ह देऊन मुंबईचे महोत्सव पाहण्यासाठी पाठवलं ते पाहून आल्यानंतर प्रथमच विद्यापीठाच्या स्पर्धांची तयारी करण्यासाठी एक महोत्सव आयोजित केला त्यासाठी व्यवस्थापन स्पर्धा अशी वेगळी कल्पना माझ्या डोक्यात आली आणि ती सर्वप्रथम सप्रे सरांना सांगितली. त्यांना ती कल्पना इतकी आवडली की त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला सायन्स विभागाचे उपप्राचार्य असताना संपूर्ण सायन्स फॅकल्टी वरती लक्ष दे... प्रॅक्टिकल चे काय प्रॉब्लेम आले तर मी बाकीच्यांना समजवतो आणि खऱ्या अर्थाने सरांच्या काळापासून विज्ञान शाखेचे विद्यार्थी व्यवस्थापन स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धेकडे वळले त्यासाठी मला त्या विद्यार्थ्यांना घेऊन छोटेखानी पिकनिक काढावी लागतील त्यासाठीसुद्धा  सरांनी सपोर्ट केला आणि उदयास आली "महाराजा करंडक व्यवस्थापन स्पर्धा" या गोष्टीला ...या संकल्पनेला आत्ता सतरा वर्षे झाली पण या स्पर्धेचा पहिला पाठिंबा दिला तो  सप्रे सरानी.  स्पर्धा पाहण्यासाठी स्वतः थांबायचे पण सोबत आपली लहान मुलगी सायली जी शाळेत शिकत  होती तिला सुद्धा घेऊन आले होते … आणि सायली कॉलेजमध्ये आल्यानंतर सायलीने स्वतः महाराजा करंडक साठी भाग घेतला होता . यातूनच सरांची व्यवस्थापनाकडे बघण्याची आणि जपण्याची दृष्टी दिसून येते.


दुसरा पाठिंबा असा होता की एका पातळीवरती महाविद्यालय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यशस्वी व्हायला लागले होते अशावेळी त्यांचे मित्र संजय मिस्त्री म्हणजेच सध्याचे महाराष्ट्र कार्टूनिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष 2006- 2007 च्या दरम्यान सप्रे सरांनी त्यांच्याशी बोलणं केलं आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना आमंत्रण दिलं त्यांच्या येण्याने पुढल्याच वर्षी महाविद्यालयाला कार्टूनिंग मध्ये सर्वप्रथम विद्यापीठाचे मेडल मिळालं 


सरांचं आणखीन एक वेगळे रूप म्हणजे ते स्वतः चांगलं गाण्यासाठी प्रयत्न करत होते स्टाफ वेल्फेअर ची जबाबदारी असल्याने त्यांनी मला एक गाण्याचा प्रोग्राम अरेंज कर म्हणून आवर्जून सांगितलं आणि त्यांनी स्वतः सुद्धा सहभाग घेतला होता त्यावेळेला अनेकांना सप्रे सरांना स्टेजवर  पाहून आश्चर्य वाटलं होतं ...जीपीएल म्हणजेच गोगटे प्रिमियर लीग अशी अफलातून संकल्पना आणून महाविद्यालयातील शिपायापासून प्राचार्य पर्यंत सगळ्यांच्या टीम बनवल्या आणि क्रिकेटच्या मॅच रंगल्या त्याच्यामध्ये सप्रे सरांचा कायमच सक्रिय सहभाग असायचा आणि हा सिनियर माणूस क्रिकेट खेळायला उतरलाय म्हणजे इतर सीनियर आणि आमच्या सारख्या ज्युनियर माणसाला सुद्धा उत्साह वाटायचा.

आणखीन एक अफलातून सरांचे रूप खवय्ये अशी त्यांची ओळख .बापू गवाणकर आणि आम्ही मडक्यातमध्ये शिजवले जाणारे म्हणजे मोंगा/पोपटी पार्टी करण्यासाठी सर स्वतः उत्स्फूर्त सहभाग देतात  वेगळ काहीतरी खाण्यामध्ये त्यांचा कायमच अग्रेसर सहभाग असतो. सगळ्या लोकांना म्हणजे शिपाई ..प्राध्यापक ..क्लार्क.. आमचे बाहेरची मित्र सुद्धा त्यांच्या सोबत एन्जॉय करतात.

 सरांचं संशोधन हा एक आवडीचा विषय माझ्याकडे सायन्स विभागाचे फाउंडेशन कोर्स असल्यामुळे  त्या शाखेचे विद्यार्थी प्रकाशात आणणं माझ्या आवडीचं काम आणि त्या विद्यार्थ्यांना सर आवर्जून आपल्या संशोधन प्रेझेन्टेशन साठी सहभागी करायचे मी आवर्जून सांगायचे की तू दिलेली मुलं मला खूप उपयोगी पडतात ...अगदी इतकच नव्हे तर प्रेझेंटेशन्स  चांगली असणारी कॉमर्स फॅकल्टीची मुस्सरत मुल्ला नावाची मुलगी संशोधनासाठी घेतली आणि तिला सुद्धा राज्यस्तरापर्यंत पारितोषिक मिळवून दिलं... चांगलं काम करण्यासाठी भेदभाव करू नये हा बोध मला त्यांच्याकडूनच मिळाला.

 वैयक्तिक पातळीवर बोलताना त्यांच्यासोबत कधीच परकेपणाचे वाटले नाही कारण ते कायमच मित्राच्या भूमिकेमध्ये असतात आणि आम्हाला कम्फर्टेबल ठेवतात म्हणूनच सरांसारखा ज्येष्ठ परंतु मित्रासारखा सहकारी आज निवृत्त होतोय खरं म्हणजे सर चांगल्या कामासाठी कधीच निवृत्त होऊ शकत नाही... परंतु गोगटे-जोगळेकरच्या व्यवस्थापनातून आज शुभेच्छा घेऊन नवीन कामासाठी नेहमीच अग्रेसर असतील यात काही शंका नाही सरांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा


शुक्रवार, २६ मार्च, २०२१

महेश ..सख्खा पाठीराखा

महेश ..सख्खा पाठीराखा 

(भावांमधील ओलावा असणारं अतूट नातं)

______________________________

डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

25/03/2021


सख्खा भाऊ म्हटलं की भांडणही येतातच ...पण एकमेकाच्या क्षमतेचा आदर करण्याचा आम्हा दोघांचा नैसर्गिक स्वभाव असल्याने लहानपणापासूनच अनेक लुटूपुटूच्या भांडणानंतर सुद्धा आनंद महेश ची जोडी असंच म्हटलं जातं यातच आमच्या दोघांमध्ये अतूट विश्वासाचं नातं आहे हे सर्व नातेवाईकांना नक्की माहित आहे.स्वाभाविकपणे आमच्या दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे अगदी दिसण्यापासून  ते अगदी रिलेशन संदर्भातील कल्पने पर्यंत. लहानपणी आम्ही एकत्र क्रिकेट खेळताना आम्हाला एका टीम मध्ये कधीच कुणी सहन केलं नाही जोपर्यंत आनंद आणि महेश विरुद्ध टीम मध्ये राहत नाहीत तोपर्यंत खेळायला मजा  येत नाही हे सर्वच आमच्या आंबेकर मित्रमंडळींना माहिती होतं, .....परंतु एखादा महत्त्वाचा विषय हाताळायचा असे असेल तर सर्वांनाच माहीत होतं आई अण्णा नंतर आनंद महेश हे एक मताने निर्णय घेऊन तो तडीस नेण्याची  नक्कीच जबाबदारी घेतात ...मग तो घरगुती विषय असेल की सार्वजनिक विषय असेल मग आमची एकी  सर्वानाच माहिती आहे.

लहानपणापासून महेश तसा अबोल... जास्त जबाबदारी न घेणारा माझ्या मागेमागे राहणारा असंच सर्वाना माहिती होता पण .. .आज एम एस इ बी मध्ये मॅनेजर पोस्ट आहे ...7000 सदस्य असलेल्या विद्युत कर्मचारी पतसंस्थेचा निवडून आलेला संचालक आहे...बांद्रा ऑफिस कर्मचारी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे.

 अभ्यासा मधील त्याची एकाग्रता माझ्यापेक्षा अफाट होती म्हणूनच सातवी ला स्कॉलरशिप मध्ये आला सातवी मध्ये असताना त्याची आणि माझी फाटाफूट झाली तो माईकडे शिक्षणासाठी गुहागर ला गेला आणि मी एकटाच आंबेडला होतो.. माझ्या दहावीनंतर मी रत्नागिरी मध्ये राहायला गेलो आणि तो आंबेड मध्येच राहून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण सुट्टी मध्ये परत आमची क्रिकेटची मॅच रंगायची ...ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी रत्नागिरी मध्ये राहिलो आणि महेश नोकरीनिमित्त पनवेल- नंतर मुंबईला गेला तसं पाहिलं तर आमचं एकत्र राहणे फारच कमी होतं. एकमेकांमधील ओढ मात्र अफलातून कायमच राहिली  कालांतराने महेशला रत्नागिरीला बदली करून येणे सहज शक्य होतं परंतु मोठी बहीण बेबी हीच्या सल्ल्यानुसार आम्ही कायम लांब राहावं म्हणजे म्हणजे दोघांमधील असलेलं प्रेम.. आदर ..समजूतदारपणा हा टिकून राहील आणि दोघेही चांगली प्रगती कराल …. आणि तसंच झालं.

यामध्ये तिच्या पत्नीचा म्हणजे पूर्वाचा सुद्धा मोठा वाटा आहे... आमच्या निर्णयात ती कधीच आक्षेप घेत नाही ...की माझी पत्नी सुध्दा ...त्यांना माहीत आहे आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. 

 एक किस्सा आठवती जो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. मी एम ए साठी कोल्हापूरला असताना युनिव्हर्सिटी मध्ये कुलगुरु हटाव मोहिमेमुळे आमची परीक्षा दोन वेळा पुढे गेली... यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी हताश झालो होतो…  माझं तर स्वप्नच मुळी प्राध्यापक होण्याच होतं ..या परीक्षा अनिश्चित असल्यामुळे मलासुद्धा जबरदस्त प्रेशर आलं होतं. आमच्याच रत्नागिरीतील एक मित्र परीक्षेमध्ये प्रेशरमुळे आजारी पडला होता. ही घटना माझ्या डोक्यामध्ये भीती तयार करत होती आणि माझ्याही भविष्याबद्दल प्रचंड भीती वाटू लागली .. लँडलाईनवरुन घरी फोन केला फोनवर महेश होता मला सुचतच नव्हतं इकडची तणावाची परिस्थिती मला पेलवत नव्हती... आणि मी फोन वर रडायला लागलो... मला काय होतंय हे मला सांगता येत नव्हतं फोन ठेवल्यानंतर घरात काय झालं मला माहिती नाही ...पण दुसऱ्या दिवशी महेश कोल्हापूरला आला आणि मला आंबेडला घेऊन गेला.

 मी आठ दिवस राहिलो थोडा नॉर्मल झालो आणि मग पुन्हा अभ्यास सुरू केला कोल्हापूरचे मित्र हरीष आणि अमर माझ्या हॉस्टेलवर रहायला आले मी सावरलो होतो. नंतर मला चांगले मार्क मिळाले ...प्राध्यापक झालो ...पण तो क्षण आवरण्यासाठी महेश नसता तर कदाचित आज मी प्राध्यापक होऊ शकलो नसतो…  करिअरची दिशा बदलली असती परंतु माझ्या स्वप्नातील प्रोफेशन मी पूर्ण झालं नसतं तर कदाचित आज मी इतका नैसर्गिकपणे जगत आहे तर कदाचित मी जगू शकलो नसतो... म्हणूनच महेश च्या वाढदिवसानिमित्त ही घटना आवर्जून आठवली .


अशीच एक महत्वपूर्ण घटना  2015 रोजी योगायोगाने महेश 25 मार्च रोजी आंबेडला होळीनिमित्त आला होता गायत्री ..प्रकाश ..जयश्री.. होते.. सरप्राईज वाढदिवस साजरा झाला आणि मग नात्यातील मैत्री कायम एकत्र राहण्यासाठी... जीवदानी परिवाराची याच दिवशी स्थापना झाली आज जवळजवळ तीस .. बत्तीस लोक आर्थिक सुरक्षितते पासून भावनिक आणि मानसिक आधाराची भक्कम विश्वास असणारी जीवदानी सारखी व्यवस्था करायला सुद्धा महेश महत्त्वपूर्ण घटक आहे लोकांचं म्हणणं माझ्यापर्यंत आणण्याचं महेश नेहमीच काम करत असतो कारण त्याला माहित आहे की, मी एकदा एखादं ठरवलं की हट्टाने पूर्ण करण्याचं ...मग मागेपुढे बघत नाही .. मग माणसं दुखावली जातात ..  मला कोणी मागे वाईट बोलू नये म्हणून महेश सतत माझ्याशी भांडत असतो चांगलं करण्याचं सोडून दे.. अगोदर तुझ्याबद्दल कोणाला गैरसमज होऊ नये हे लक्षात घे..  पण माझं वेगळंच असतं चांगलं काम करण्यासाठी मला कोणी वाईट म्हटलं तरी चालतं … पण ते काम झालं पाहिजे यामध्ये आम्हा दोघांमध्ये कायमच वाद होत असतात पण या वादात सुद्धा प्रचंड आपुलकीचा ओलावा असतो. असा भक्कम पाठिंबा असणारा भाऊ आयुष्यात असणे माझ्या भाग्याचं लक्षण आहे. असेच प्रेम राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

" परिचारिका " कोविड योध्दाला पुस्तकरूपी सलाम

" परिचारिका "

कोविड योद्धाला पुस्तकरूपी सलाम


डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी

दिनांक : 6 जानेवारी 2021

----------------------------------------------------------------



" रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका "

या पीएच.डी.संशोधन अध्ययनाचे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी दोन शब्द पुस्तक निर्मिती बद्दल ...कोविड योद्धाची भूमिका सर्वांसमोर आणण्यासाठी असंख्य लोकांनी सहकार्य केले आहे त्याच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक दोन शब्द ... तर पुस्तक प्रकाशनाला आवर्जून मान्यवर उपस्थित होते त्याच्या प्रतिक्रिया सदर ब्लाँगमध्ये व्यक्त करणार आहे.कोविडकाळात प्रकर्षाने परिचारिकांची भूमिका समजून आली म्हणून हा प्रपंच ... 


मनोगत 

माझ्या पहिल्या पुस्तकाचे मनोगत लिहिताना एक लेखक म्हणून खूप आनंद होत आहे." रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका" या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला 2006 मध्ये ज्यावेळीं गडिंहीग्लज मध्ये डॉ.प्रभाकर द्राक्षे सर यांच्याकडे मी पहिल्यांदा एक संशोधक विद्यार्थी म्हणून गेलो आणि एम फिल साठी काय अभ्यासक्रम घेऊ शकतो अशी सुरुवात झाली. सुरुवातीला माझ्या डोक्यामध्ये एखाद्या कम्युनिटीचा स्टडी करायचा विचार चालू होता परंतु द्राक्षे सरांनी गप्पा मारायला सुरुवात केल्यावर  त्यांच्या लक्षात आलं की माझ्या कुटुंबांमध्ये  परिचारिका महिला खुप आहेत. सरांनी सुद्धा एक परिचरिकेवर एक अत्यंत आत्मीयतेने अभ्यास करून लेख लिहिला होता. त्यामुळे परिचारिका विषय घ्यावा असे वाटू लागले.पीएचडी च्या मार्गदर्शिका डॉ.उषा पाटील यांनी सुद्धा " परीतक्त्या " यावर संशोधन अध्ययनाचे  पुस्तक लिहिले होते. त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं आणि त्या क्षणी वाटलं की आपल्या पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर  आपण सुद्धा " परिचारिका " या विषयावर  पुस्तक लिहायचं.


      या पुस्तकाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भावनिक पातळीवर जास्त विचार केलेला आहे. तसं पाहिलं तर वरवर आपल्याला व्यावसायिक भूमिकांचा अभ्यास आहे असा दिसेल परंतु परिचारिकांच्या भावनिक कोषाचा येथे भरपूर विचार केलेला आहे आणि त्यामध्ये असलेले तात्विक मुद्दे पूर्णपणे  तत्वज्ञानावर आधारित आहेत  हे मुद्दे सर्वांना पुस्तक वाचताना आदर्श रूप वाटतील. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे संपूर्ण समाजातील सगळ्या वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शक होईल अशा पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. प्रकरण-2 मध्ये शारीरिक स्वच्छता आणि शारीरिक तपासणी याचा अत्यंत आदर्श रूप लिखाण केलेले आहे म्हणजेच केवळ परिचारिकांच्या भूमिकांचा अभ्यास न करता आपल्या प्रत्येक घरांमध्ये आपल्याला उपयोगी पडेल अशी शारीरिक जोपासण्यासाठी इथे प्रकरण तयार केलेला आहे. 

      परिचारिका यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये भारतीय कालखंडामध्ये समाजसेवी गरजेतून व्यावसायिक सुरुवात कशी झाली याची मांडणी केली आहे तसेच पाश्चिमात्य देशात युध्द काळामध्ये गरज म्हणून सुरू झालेली परिचर्या व्यवस्था आधुनिकतेकडे कश्याप्रकारे वळली याचे विवेचन केले आहे यामध्ये फ्लॉरेन्स नाईनडेंगेल च्या कर्तृत्ववाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो.


     पुस्तक लिहिण्यासाठी सात आरोग्यखात्यातील पुस्तक लेखकांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यात आला आहे तर भारतातील तेरा विविध विद्यापिठामध्ये संशोधन झालेल्या अध्ययनाचा गोषवारा मांडण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथनाचा आनंद घेता येणार आहे.

    अध्ययन करण्यापुर्वी सतत निरीक्षक करत असताना  आजूबाजूला अनेक परिचारिकांच्या जीवनातील घटना निरीक्षल्या गेल्या त्यातून खरी लिखाणाची उमेद निर्माण झाली अनेक घटना तर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत  नियमित बघण्यातील परिचारिका किती सामान्यपणे आपलं जीवन जगताना दिसतात पण थोडं त्याच्या आयुष्यात डोकावल्या नंतर किती असामान्य काम करतात याची प्रचिती आली. त्यामुळे संशोधन लिखाणात ललीत लिखाणाचा आनंद घेता येणार आहे.

   सहकारी परिचारिकांशी सहकार्य घेताना देताना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ऑर्डर घेताना त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी व्यवहार करताना परिचारिकेचा संघर्ष होताना दिसतो तोच संघर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुद्धा होत असतो आपल्यालाही अशा अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात अशा वेळेला परिचारिकांच्या भूमिका टॉपिक तुम्हाला वाचताना आपल्या भूमिकांची नक्की जाणीव होईल आणि स्वतःच्या  आयुष्यासाठी सुद्धा हे वाचन उपयोगी पडेल असे मला आवर्जून सांगायचे आहे 

हे केवळ पीएचडीच्या चिकित्सक अभ्यासाचे पुस्तक नाही तर प्रत्येक व्यक्तीला अनेक भूमिका पार पाडताना जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाचे निराकरण कसे करावे यासाठी हे " रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका "  हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकते.

--------------------------------

पुस्तक खरेदी करण्यासाठी विशेष सवलती 

मूळ मूल्य : 220 /

कोविड काळात वाचकांसाठी मूल्य : 200/-

परिचारिकांसाठी विशेष मूल्य : 180/- 

संपर्कासाठी नंबर : 9422372009 

--------------------------------


ऋनानुबंध 


"रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांची भूमिका"

 हे पुस्तक लिहिण्यासाठी मला अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सहकार्य केले आहे परंतु सर्वप्रथम ज्यांचे ऋण मी मानू इच्छितो त्या आहेत 100 शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिका  ज्यांनी आपला अमूल्य वेळ आणि वेळा बरोबर अत्यंत मनापासून संवाद साधला त्यामुळेच या विषयासंदर्भात आपुलकी निर्माण झाली. माझी पत्नी गौरी आणि दोन मुलं आर्या आणि श्रवण यांचा मनापासून ऋणी आहे ,  कारण कौटुंबिक अपेक्क्षांची तडजोड करून पुस्तक लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर माझी आई बहीण स्वाती देवळेकर तिचे पती सुधीर देवळेकर आणि भाऊ महेश त्याची पत्नी पूर्वा त्यांच्या भावनिक पाठिंब्यामुळेच मी पुढची वाटचाल करू शकलो. 



 कोल्हापूर मध्ये काम करण्यासाठी येणार म्हटलं की माझा अत्यंत जवळचा मित्र अमर हिलगे आणि कुटुंबातील सर्वच सदस्य आपुलकीने वागतात म्हणून येणारा तणाव कमी व्हायचा अमर तर मी कोल्हापूरला येणार म्हटलं की शिवाजी पुलावर  वाट बघत बसतो आणि आम्ही संपूर्ण काम होईपर्यंत त्माझ्यासोबत राहतो त्या सहवासाची किंमत करता येणार नाही. 

        खरं पाहिलं तर एक टायपिंग करणारा माणूस मित्र कधी होऊन जातो कळलंच नाही.  मैत्रीपूर्ण सल्ले देणे किंवा मैत्रीपूर्ण भावनिक आधार देणे हे श्रीकांत देसाईला ( नंदू ) अत्यंत खुबीने जमते म्हणूनच त्याचे प्रोत्साहन पुढच्या कामासाठी मला उपयोगी पडत असते.

       रत्नागिरीतील वैयक्तिक मित्रांपैकी बिपिन शिवलकर आणि बिपिन बंदरकर या दोघांचा अतिशय खंबीर पाठिंबा असतो आणि मला अत्यंत गरजेचा असतो.त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे कामाला सतत उमेद येते.

      वैचारिक पातळीवर मला सतत पाठिंबा देणारे माझे प्राध्यापक मित्र डॉ.राजेंद्र मोरे, उदय बामणे या दोघांच्या सतत विचारपूर्वक संभाषणातून माझ्या कामाला सतत प्रोत्साहन मिळत असते ते इतर कॉलेजमध्ये प्राध्यापक असले तरी माझें समवयस्क  असल्याने सतत त्यांचा वैचारिक पाठिंबा असतो. प्राध्यापक शुभम पांचाळ आणि भक्ती दळवी  यांनी अतिशय  आशयपूर्ण  मुखपृष्ठ तयार केले आहे शुभम हा खरं म्हणजे माझा विद्यार्थी.. नंतर झाला माझा सहकारी प्राध्यापक आणि आज तो  क्रिएटिव्ह काम करण्यासाठी सतत सहकार्य करणारा सोबती झाला आहे.

       पुस्तकाची तयारी करण्यासाठी माझ्या मार्गदर्शिका डॉ.उषा पाटील या सतत मला प्रोत्साहित करत राहिल्या आणि उत्तम पुस्तक होण्यासाठी अजून काय करता येईल याचा सतत पाठपुरावा घेतला .

     महाविद्यालयातील सहकार्‍यांमध्ये समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे,प्रा.शिवजी उकरंडे आणि सहकारी सचिन सनगरे यांचीही सतत प्रोत्साहन असते. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर सुखटणकर हे केवळ महाविद्यालयाचे प्रशासक  नराहता माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी आदर्श  काम कसे करू शकतो याचे सतत  मार्गदर्शन करत असतात, सहकारी मित्र बापू गवाणकर , प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी, डॉ.मकरंद साखळकर, यांचेही सतत प्रोत्साहन असते. 

     आरोग्य विभागातील कै. डॉ. दिलीप मोरे आज ते असते तर खूप खुष झाले असते मला सतत आपुलकीच्या ..वडीलधारीच्या हक्काने सतत मला मार्गदर्शन करत असायचे त्याचबरोबर डॉ. शिवदिप किर यांच्याशी मैत्रीपूर्ण संभाषणातून मोलाचे मार्गदर्शन मिळत गेले  ते स्वतः मेडिकल कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत अल्याने त्यामुळे या पुस्तकासाठी त्यांच्या संभाषणाचा अत्यंत उपयोग झाला आहे.दूरदर्शन सह्याद्रीचे माजी निर्माता श्री जयु भाटकर यांचे सतत आदर्श काम करण्यासाठी मार्गदर्शन असते. 

     रत्नागिरीतील पत्रकार अरुण आडिवरेकर, राजेश कळंबटे, जान्हवी पाटील,समीर शिगवण,अनघा निकम , शोभना कांबळे, मेहरूनिसा नाकडे,  आणि  रत्नागिरी खबरदारचे संपादक आणि जिवलग मित्र हेमंत वणजु यांचे पुस्तक निर्मितीसाठी  सतत पाठिंबा आहे

     शेवटी मी असा उल्लेख करीन की, हे पुस्तक संपूर्ण परिचारिकांच्या आयुष्यात केवळ मार्गदर्शक न होता शासन पातळीवर ती त्याची नोंद घेण्यासाठी मला माझे राजकीय मित्र आदरणीय शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांचे मार्गदर्शन असते  त्यांच्या पाठिंब्याची कायम हमी असते. 

    . 

--------------------------------


मान्यवरांचे आशीर्वाद


" रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांच्या भूमिका " डॉ.आनंद आंबेकर यांच्या पीएच.डी. संशोधनावर पुस्तक निर्मिती करण्यात आली , या पुस्तकाच्या सोहळ्यासाठी आरोग्य क्षेत्रातील मान्यवर , मित्र परिवार अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 2011 पासून गेली नऊ वर्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे डॉ. उषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद आंबेकर यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 100 शासकीय आणि 50 खाजगी रुग्णालयातील परिचारिकांची मुलाखत घेऊन अध्ययन केले. संपुर्ण भारतातील सोळा विद्यापीठातील परिचारिका अभ्यासकांच्या पीएच.डी. अध्ययनाचा गोषवारा घेऊन सदर अध्ययन करताना " भूमिका संघर्ष " या प्रमुख संकल्पनेवर सदर अध्ययन केले. 

 महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुस्तकाची पहिली प्रत देऊन त्यांच्या घेतल्या आणि पुढील परिचारिका वेलफेअर साठी सहकार्याची ग्वाही दिली.सदर भेटीसाठी रत्नागिरी खबरदार चे संपादक श्री.हेमंत वणजू यांनी विशेष सहकार्य केले.सोबत मित्र राजा साळवी आणि मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समनव्यक श्री निलेश सावे , रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री प्रदीप तथा बंड्या साळवी उपस्थित होते

   डॉ.आनंद आंबेकर यांनी प्रास्ताविक करताना आवर्जून सांगितले की तीन वर्षे फिल्ड वर्क करताना अनेक अनुभव सर्वासोबत सांगितले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंग आलेले सांगितले. डॉ.अलिमियाँ परकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आवर्जून सांगितले की, डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे समाजाभिमुख शिक्षणाला चालना मिळेल तसेच परिचारिका या माझ्या वैद्यकीय क्षेत्राच्या कणा आहेत असे आवर्जून सांगितले.

     रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कोविड काळात परिचारिका समाजाच्या किती महत्वाचा घटक आहेत हे जगासमोर आले आहे, आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या अध्ययनामुळे परिचारिकाच्या  आयुष्याला शास्त्रीय दृष्टीने पाहता येईल. 

     माजी आमदार आणि यश फौंडेशन नर्सिंग कॉलेज अँड मेडिकल रिसर्चचे संस्थापक बाळासाहेब माने यांच्या  रत्नागिरीतील पहिल्या नर्सिंग कॉलेजच्या  चॅलेंजीग गोष्टी कथित केल्या आणि डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत असलेल्या वैयक्तिक संबंधाबद्दल आवर्जून उल्लेख केला.


     

 संगमेश्वरी रक्तामुळे जास्तीतजास्त सामाजिक भान आहे की काय असे मिश्किल व्यक्तव्य करत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री.,अभिजित हेगशेट्ये यांनी डॉ.आनंद आंबेकर विद्यार्थीदशेपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे आवर्जून उल्लेख केला. 

     आत्मनिर्भर होण्यासाठी महिलेने संघटित होण्याची आणि समाजातील सर्वच क्षेत्रात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे यासाठी परिचारकाचा प्रत्यक्ष फिल्ड मधील डॉ.आनंद आंबेकर यांचे अध्ययन परिचारिका आत्मनिर्भर होण्यासाठी नक्की उपयोगी पडेल असे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले .

   डॉ.आनंद आंबेकर गोगटे महाविद्यालयाच्या सर्वच आघाडीवर अग्रेसर असतात त्यांच्या ऊर्जेचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो असे जाणीवपूर्वक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.


  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनी असे सांगितले की,विद्यापीठातील 800 कॉलेजचे समन्वयक म्हणून काम करताना डॉ.आनंद आंबेकर यांचे वेगळेपण कायम दिसत असते, आम्ही दोघे स्वतःच्या कॉलेज दशेपासून युवा महोत्सव मध्ये सक्रिय होती तिथं पासून त्यांची प्रामाणिक धडपड दिसून येते.


बिपीन बंदरकर,जयु भाटकर,डॉ.निधी पटवर्धन, रवींद्र केतकर, हेमंत पाडगावकर,बाळा पावसकर विशेष उपस्थित होते.

पुस्तकाच्या सुबक मुखपृष्ठ तयार केल्याबद्दल प्रा. शुभम पांचाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


  कार्यक्रमाला डॉ.आनंद आंबेकर यांचा महाराजा परिवार आणि  95 परिवार आवर्जून उपस्थित होता, अनेक आजी माजी विद्यार्थी आयोजकांच्या भूमिकेत असलेले दिसत होते, तसेच प्राध्यापक समूहाचा मनस्वी परिवार उपस्थित होता तसेच अनेक मित्र आणि आई चंद्रभागा, पत्नी गौरीं आणि परिवारातील सभासदांबरोबर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील विणा लेले आणि मुग्धा सोहनी या आजी माजी मेट्रन  आणि परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष स्नेहा बने आवर्जून उपस्थित होत्या. साक्षी कॅटर्स च्या साक्षी आंबेकर आणि स्वप्नील केळशिकर, साई मंगल कार्यालयाचे मंदार दळवी यांनी उत्तम सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा.आरती पोटफोडे यांनी केले कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ.आनंद आंबेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.




मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...