महाराजा....30 वर्षांचे मैत्रीपर्व
----------------------------------------
प्रा.आनंद आंबेकर
14/06/2020
----------------------------------------
आयुष्यात मैत्री कधी सांगून होत नाही...किंव्हा आजपासून आपली मैत्री संपली. असं सांगून संपत नाही ...आणि सांगून मैत्री संपते ती मैत्रीच नसते.
1991 ते 2020 अश्या 30 वर्षांच्या अभेद्य मैत्रीच्या ग्रुपमध्ये 11 मित्र आणि आता परिवार (आई वडील,बायको मुलं)सुद्धा. हे एक-एक करून 11 मित्र व्हायला 3 वर्ष लागली.
2005 पासून गेली 15 वर्ष महाराजा मैत्रीची आठवण म्हणून आमच्याच गोगटे कॉलेज मध्ये *महाराजा करंडक* हा इव्हेंट मॅनेजमेंटचा करंडक प्रायोजित करतो. जो आजच्या कॉलेजच्या स्टूडेंटचे स्वप्न झालं आहे.. यावर्षी आपल्या क्लासने महाराजा करंडक मिळवायचा म्हणून कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ग्रुप करायला सुरूवात करतात. पण तो करंडक मिळविण्यासाठी सॉलिड ग्रुप असावा लागतो... त्यात बॉंडिंग असावं लागतं ... तरच हा करंडक मिळतो.
पण मुळात माझ्या महाराजा ग्रुपच बॉंडिंग सुरु व्हायला 1991 पासून सुरुवात झाली.
मी 1990 ला रत्नागिरीत आलो. 1 वर्ष दहावीच्या अभ्यासाचं टेन्शनमुळे सुनील सावंत पोलीस लाईन मधील मित्रा व्यतिरिक्त कोणीच मित्र नव्हता. सुनीलच्या आईच म्हणणं होतं मी फाटक ज्युनियर कॉलेजला जावं कारण तुझ्यासारख्या सरळ मुलाचं गोगटेमध्ये काही खरं नाही. तेव्हा मला कळलं नव्हतं पण जेव्हा कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सिनियर पोरांनी *शाळा* (आता त्याला रॅगिंग म्हणतात) घ्यायला सुरुवात केली होती.माझ्यावर कधी झाली नाही ..पण आपला स्ट्रॉंग ग्रुप असणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं .कॉलेजमध्ये तुफिल पटेल मित्र झाला ..पण तो कोतवड्या गावातून 20 एक किलोमीटर वरून यायचा त्यामुळे लगेच घरी जायचा.
नवीन कॉलेज.. नवीन पॅशन आपली बॉडी सॉलिड असायला पाहिजे ...पोलीस लाईन मधील पोरं पोलीस भरतीसाठी माळनाक्यावर जिम मध्ये जायचे मी पण जायला सुरुवात केली. आणि तिथेच महाराजा ग्रुप जमायला सुरुवात झाली. *हेमंत मांडवकर* (सद्या भूमिअभिलेख ऑफिसमध्ये काम करतो)आणि *राजू जाधव*(सद्या काय करतो हे सांगता येणार नाही ..पण हा काही करत असतो अगदी आमदारकीला पण उभा होता) हे एसटी कॉलनीतून दोघे जीममध्ये यायचे त्यांना मी बघायचो म्हटलं ही आपल्या क्लास मधीली पोरं दिसत आहेत.
एकदा किस्साच झाला... आम्ही सकाळी खुप लवकर जायचो म्हणून जीमचे दिनकर सर कधी पाहिलेच नव्हते. ते एक दिवस अचानक सकाळी लवकर आले .. बाकी पोरं कुजबुजु लागली ...एरव्ही मस्ती करणारी पोरं शिस्तीत व्यायाम करायला लागली .मी नवखा असल्याने त्यांना घाबरून जास्तच व्यायाम केला. तेव्हा काही वाटलं नाही पण दुसऱ्या दिवशी पूर्ण अंग सुजल होतं. त्याच्या पुढे 8 दिवस जीममध्ये काही जाणं शक्यच नव्हतं . कॉलेजला हेमंतला हळूच विचारलं दिनकर सर येतात कारे सकाळी ...तो म्हणाला नाही रे ते फक्त त्याच दिवशी लवकर आले होते. मग मला अंगाला सूज आल्याचा किस्सा सांगितला तो हसून मेला ...मग आमची दोस्ती झाली.. राजू जिम मध्ये सिरीयसली व्यायाम करायचा ...पुढे जाऊन तो कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट झाला.पण माझ्या आणि हेमंतच्या ऊंगल्या सुरू असायच्या.माझं एसटी कॉलनीत जाणं वाढलं ...बरेच दिवस गेलो नाही तर हेमंत आणि राजूची आई रागवायची कुठे गेला होतास इतके दिवस म्हणून ...
अचानक एक काळा गॉगल घालून साधा मुलगा वर्गात आला तो म्हणजे *सचिन सावंत* (सद्या अनेक बँकांचे रिकव्हरीचे काम करतो )तो खूपच साधा असल्याने वात्रट पोरं (पम्या घोसाळे, गुरू शिवलकर आणि इतर)त्याला टार्गेट करत होती ..मग तो माझ्या जवळ बसायला लागला.
हळू हळू एव्हढी मैत्री झाली की FY ते TY नंतर त्यांच्या घरीच पेइंगगेस्ट म्हणून रहायला गेलो कारण भाऊजींची बदली राजापूरला झाली होती. सचीनचा माझ्यावर एव्हढा जीव होता की ... एकदा त्यांच्या आईने मला रूम खाली करायला सांगितला तर हा चवथाळला ...आनंद गेला तर मी पण घर सोडणार . आईचा राग कमी झाला ..आणि आज प्रत्येक सुखदुःखात मी सावंत फॅमिलीत असतोच. यादरम्यान *राजश्री बंदरकर* (नगरसेवक होती सद्या भाजप महिला शहर प्रमुख आहे) आम्हा सर्वांची मैत्रीण झाली. तिची अचानक आई देवाघरी गेल्याने आमचं घरी जाण सुरू झालं. मग आम्ही तिची काळजी घेऊ लागलो.
बारावीत ट्रिपचा विषय सुरू झाला. तेव्हा विद्यार्थीच आयोजक असायचे मोठे मोठे बॅनर लागायचे .प्रशांत सुर्वे आणि *बिपीन शिवलकर*( भाजपा एकनिष्ठ लीडर आणि यशस्वी उद्योजक विशेष म्हणजे राजश्रीशी लग्न होऊन यशस्वी संसार करत आहेत) नी मला आयोजक म्हणून आपल्या सोबत घेतलं. बिपीनची व्यवहारातुन मैत्री सुरू झाली आणि आज 30 वर्ष अनेक आर्थिक व्यवहारात आम्ही दोघे एकमेकांचे जामीनदार असतो एवढा विश्वास वाढला आणि कायम आहे.
सिनियर कॉलेजमध्ये आल्यावर ऍडमिशनचा फॉर्म भरताना विनोद घाडीचा(दुर्दैवाने अपघाताने हयात नाही) मित्र म्हणून *राजा घाग* (सद्या नाचणे ग्रामपंचायत मध्ये जबाबदार कर्मचारी आहे)शी ओळख झाली. राजा मितभाषी पण मैत्रीला एकदम पक्का.वर्गापेक्षा कट्ट्यावर वेळ जाऊ लागला.मनोरंजनचा हुकमी एक्का म्हणून बाळा म्हणजेच प्रशांत बापर्डेकर(सद्या गद्रे मरिन कंपनीत परचेस मॅनेजर आहे.)हवासा वाटायला लागला.
...अचानक एक मुलगा कट्ट्यावर कॉमर्सच्या पोरांची तक्रार घेऊन आला मग मी आणि राजू बघायला गेलो ...तर आम्ही बाजूलाच .. त्या पोराला यानेच ठोकून काढलं तो होता *सुजित कीर* (व्यवसायाने वकील पण शिवसेनेत मोठा नेता ..प्रदेश युवा सेना सदस्य आहे). आता शांत असतो पण नेहमीच वेगळं करण्यात धाडसी ...त्याच्या कल्पना ऐकूण आम्हाला घाम फुटतो. FY ला विद्यार्थी निवडणूका झाल्या त्यामध्ये माझ्या विरोधी उभा असलेला *दैवत कडगावे* (सद्या स्कुल मध्ये शारीरिक शिक्षक या अगोदर सहारा कंपनी लोणावळा येथे काम करत होता) आणि जोडगुळी *संदेश कीर* (हा काय करतो ते फक्त तोच सांगू शकतो..काही वर्षे कँपनी कॅन्टीन चालवायचा) याची "महाराजा एन्ट्री" जबरदस्त होती. निवडणूका होऊन गॅदरिंगचे दिवस सुरू झाले होते. अचानक बातमी आली FY च्या CR आनंद आंबेकर वरून तेलीआळी नाक्यावर मारामारी झाली... म्हटलं आम्ही काही केलं नाही ..भानगड केली कोणी ..सुजित तर त्यावेळी पावसला रहायचा.. नंतर कळलं आमचा कट्ट्यावर ग्रुप वाढायला लागला होता याबद्दल नाक्यावर SY ची पोरं चर्चा करत होती ..FY च्या आनंद आंबेकरला ठोकायला पाहिजे ....हे दैवतनी ऐकलं आणि झाली बाचाबाची होऊन मारामारी झाली होती (तो मित्र नव्हता पण FY चं स्पिरीट म्हणून भानगड..) गॅदरिंग मध्ये FY च्या पोरांना टार्गेट करायचं असा प्लॅन होता ..पण आम्ही हाणून पाडला यातच दैवत आणि संदेश मित्र झाले.मी-हेमंत पार्टटाईम जॉब म्हणून STD मध्ये काम करायला लागलो.. तिथे *सतीश नाईक* (सद्या idea कँपनीत टेक्निकल जॉब करतो) नंतर पुढच्यावर्षी कॉलेजला ऍडमिशन घेतलं.
11 जण 11 टोकाच्या स्वभावाचे कोणाचं कोणी ऐकणं नाही ..जो तो राजा सारखं राहणार म्हणूनच महाराजा नांव ठेवलं आणि कायम राहिलं. आजही जबरदस्त मतभेद असतात ...पण प्रसंग आला की तुटून पडतात . 3 महिन्यांपूर्वी हेमंतचा बाईक वरून अपघात झाला तर त्याचं कुटुंब बाजूलाच अक्खा महाराजा परिवार झटत होता ...संदेश आजारी पडला तर हॉस्पिटलमध्ये आमचीच गर्दी ... माझं कार अपघात झाला तेव्हा हे सर्व हजर.. अश्या वेळी आमची घरची माणसं रिलॅक्स असतात ..हे अगदी आत्ताचं ..पण
आमची सर्वांची लग्न ठरवण्यात सुद्धा महाराजा ग्रुप यजमान म्हणून काम करत होता.
.. आता 11 मित्र नव्हे तर 11 परिवार एकत्र असतात.
२७ टिप्पण्या:
तुम्ही सदैव असेच एकत्र राहोत व निरनिराळे उपक्रम करोत हिच सदिच्छा....
वा... आनंद...फोटो बघून आठवणी जाग्या झाल्या..असाच लिहीत राहा...
सौ सोनाली संदेश सावंत (सोनाली बापट)
आनंद आणि महाराजा चे सर्व परिवार सदस्य यांचं आधी अभिनंदन कारण आज काल जोड्या टिकत नाही लग्नानंतर दोन चार वर्षातच विभक्त होतात तिथे महाराजा ने तीस वर्ष एकत्र काढली आणि इवलेसे लावलेले रोप आज वटवृक्ष झालाय आणि आम्ही ही या परिवाराचे सदस्य आहोत याचा गर्व नाही तर माज आहे आम्हाला
असाच आपला महाराजा परिवार वाढत जाओ आणि जगाच्या अंता पर्यंत आपल्या महाराजा च नाव त्रिखंडात गाजत रा हो हिच बाप्पांचे चरणी प्रार्थना
सर्वांसाठी आदर्श ठरेल असा हा मित्रपरिवार ...९५ alwys rocks
आपली विद्यार्थिनी - यशश्री पावसकर
सर तुम्ही 'अनुभवांचं देणं' पुस्तक रुपात आणा.
सर बढ़िया लेखन, अनुभवों के साथ।सटीक शब्द रचना।आप लिखते रहे और हम आपको पढ़ते रहे।
आपली मैत्री अशीच सदैव टिकून राहावी हिचं परमेश्वरा कडे प्रार्थना मस्त आनंद आपलाच मित्र इर्शाद सागवेकर 3
खुपच छान सर ़ तुम्ही या लेखानाच पुस्तक प्रकाशित करा ़
गुरु शिवलकरमुळे आपल्या या ग्रुपशी त्यावेळी आमचा (मी आणि मंदार मोरे) संबंध आला होता. आम्ही त्यावेळी फाटक हायस्कूलला ज्युनिअर कॉलेजला होतो आणि तुम्ही सिनियर कॉलेज म्हणजे गोगटे कॉलेजला होतात. पण आमचा बराचसा वेळ हा तुमच्याबरोबरच कॉलेजच्या कट्टय़ावर गेलाय. लायब्ररीत चणे शेंगदाणे खाणे, कॉलेजच्या छतावरती स्कीटची प्रॅक्टिस करण या गोष्टी अनुभवल्या आहेत. आमचा गोगटे कॉलेजशी काही संबंध नसताना गुरु शिवलकर बरोबर आम्ही तुमच्या या ग्रुप बरोबर असायचो.
राजेंद्र पवार
राहुल आठल्ये. अनामिक मैत्रीने जोडलेले नाते असेच अखंडित राहो हीच सदिच्छा.
महेश मिलके
खूप छान लिहिले आहेस ,
कॉलेज चे दिवस समोर आले
दिलखुलास लेखन, सुजित दादांचा किस्सा 100 पैकी100 मार्क😄
सागर कोळी
व्यक्तीगत कृतीला खऱ्या अर्थाने पारिपूर्णता सामाजिक मान्यतेने शक्य होते. व्यक्तिगत क्रिया आणि अनेक समाज सदस्यांची उत्तरादाखल दिलेली प्रतिक्रिया यातूनच सामाजिक जीवन बहरते.आपण विद्यार्थी दशेपासून याला दिलेले प्राधान्य यामुळेच एवढा मोठा मित्रपरिवार शक्य झाला. हेच खरे सामाजिक जीवन जो समाजशास्त्राचा आत्मा आहे.(थोडक्यात तुम्ही खऱ्या अर्थाने समाजशास्त्र जगता) तुळशिदास रोकडे.
बहुत सुंदरता से लेखन।अनुभव सटीक।
खुप छान ग्रुप आहे.
अशीच मैत्री कायम राहू दे..
मामा खूप छान लिहिलं आहे अशीच मैत्री राहू दे.
असं म्हणतात की,''सगळी नाती परमेश्वर आपण जन्माला येण्याआधीच निर्धारित करतो पण 'मैत्री' हे असं एकमेव नातं आहे जे आपलं आपल्यालाच निवडता येतं,निर्माण करता येतं.''
आपली मैत्री अशीच कायम अतूट आणि अभंग राहावी एवढीच इच्छा.......!
-श्रद्धा हळदणकर
महाराजा नावातच एक दम आहे,दरारा आहे,ताकद आहे,ऐकी आहे खूप छान 11 मित्र 11 परिवार एक मजबूत संघ आहे तुम्ही सगळे असेच एकत्र राहा एकमेकांना आधार दया, महाराजा ग्रुप ला अनेक शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
खूप छान . मैत्री बाबत छानपणे भावना व्यक्त केल्यास. महाराजा ग्रुप असाच एकत्र राहो.
व्वा, क्या बात है!! तुमची मैत्री अगणित काळापर्यंत टिकेल यात शंका नाही...
खूप छान, ओघवत्या शैलीतील लेखन. असेच लिहीत रहा.
खूप छान लिहिलं आहे सर, तुमची मैत्री अशीच चिरकाल टिको ही ईश्र्वर चरणी प्रार्थना, तुमची मैत्री ही आदर्श मैत्री आहे... मैत्री म्हणजे फक्त सुखात मदतीचा हात देणे नाही तर दुःखात कोणाचाही हात न सोडणे म्हणजे मैत्री आणि तुम्ही ती शिद्दा केली आहे..तुमची मैत्री ही आदर्श मैत्री आहे... सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा...
१४ जून, २०२० रोजी ९:३३ म.पू.
अनामित अनामित नी म्हटले...
खूप छान लिहिलं आहे सर, तुमची मैत्री अशीच चिरकाल टिको ही ईश्र्वर चरणी प्रार्थना, तुमची मैत्री ही आदर्श मैत्री आहे... मैत्री म्हणजे फक्त सुखात मदतीचा हात देणे नाही तर दुःखात कोणाचाही हात न सोडणे म्हणजे मैत्री आणि तुम्ही ती शिद्दा केली आहे..तुमची मैत्री ही आदर्श मैत्री आहे... सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा...
१५ जून, २०२० रोजी ४:५३ म.पू.
आनंद खूपच सुंदर. यामुळेच महाराजा परिवाराची एक वेगळीच ओळख निर्माण होईल
आनंद सर खूपच सुंदर.पुन्हा एकदा काॅलेजचे दिवस आठवले. काही आठवणी ताज्या झाल्या. असेच लिहीत रहा. खूप खूप शुभेच्छा.
🤔
*"मैत्री" म्हणजे कुंडली न पाहता, ज्योतिषाला न विचारता,*
*किती गुण जमतात याचा विचार न करता, साध्य असाध्य न बघता गुण व दोषासहीत स्विकारलेल आणि कुठलाही गैरसमज न करता आजीवनअबाधित राहणारे अतुट स्नेह बंधन होय.*
*"मैत्री" म्हणजे अडचणीत नेहमी भक्कम पाठीशी उभ राहणार आणि*
*"मी आहे ना" अस नात व आनंदी राहण्यासाठीच मैत्रिच हे एकच औषध होय..*
❤️ *फ्रेंडशिप डे च्या माझ्या सर्व मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..* ❤️
संदेश कीर
आनंदा,
मित्रा खुपच छान लिहीलसं,
आपल्या कॉलेज कट्टयावरच्या खुपशा उठाठेवींच्या आठवणी ताज्या झाल्या.
त्या Diamond Day's आठवणींवरची धुळ जराशी जरी झटकली तरी पुर्ण दिवस प्रफुल्लीत होऊन जातो.
मित्रा,तुझं एक वाक्य मला कायम आठवत, आपण मित्र खुप दिवसांनी अगदी खुप वर्षांनीसुद्धा भेटलो आणी बोलायला कुठून सुरुवात करू किंवा काय बोलू हा संभ्रम जोपर्यंत पडत नाही. तोपर्यंत आपली मैत्री चिरतरुण आहे असे समजावे.
दि आपली मैत्री अशीच चिरतरुण राहो हिच इश्वरचरणी प्रार्थना,
सतिश नाईक
टिप्पणी पोस्ट करा