उल्हास सप्रे ...एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती
● प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
18 ऑगस्ट 2020
----------------------------------------------------
उल्हास म्हणजे ...1993 पासून सतत समोर येणारी व्यक्ती ...मित्र आणि वेगवेगळ्या जबाबदारीतून येणारं व्यक्तिमत्व ...सुरुवात झाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयमध्ये आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक परंतु अनेक ठिकाणी आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर असायचो … तुम्हाला आश्चर्य वाटेल असा किस्सा सांगतो सुरुवात झाली 1994 कॉलेजच्या सांस्कृतिक महोत्सवमध्ये याचा सहभाग …. 1993 म्हणजे गेल्यावर्षी ग्यादरिंग बंद ...इलेक्शन बंद ...मग महाविद्यालयाने विद्यापीठांच्या नियमानुसार सांस्कृतिक महोत्सव करायचे ठरवले …. काय मजा नव्हती कारण महोत्सव होता दिवसाचा आणि आमचं ग्यादरिंग व्हायचं रात्रीचं इलेक्शन नसल्यामुळे नेतृत्व मानायची पद्धत संपली होती ….तरीही ही काही ग्रुप करून सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे ठरले हेमंत वणजू आणि काही सायन्स ग्रुपनी महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट आयोजित करत होते कॉलेजच्या मुलांना ही स्पर्धा कशी असते तेही माहित नव्हतं ...त्यांना स्पर्धक मिळत नव्हते... एफ वाय ला असताना 1993 ला मी विद्यार्थी प्रतिनिधी होतो त्यामुळे मुलांना एकत्र करून नियोजन करणं हे नेहमीच झाले होतं. पर्सनॅलिटी कॉन्टॅस्टचे आयोजकांपैकी धावत पळत महाराजा ग्रुपच्या कट्ट्यावर आला आणि म्हणाला आम्हाला स्पर्धक मिळत नाहीयेत तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता का ? मी म्हटलं आम्ही कोणत्या अँगलनी पर्सनॅलिटी कॉन्टॅक्टमध्ये सहभागी होऊ शकतो असं वाटतं …, पण दैवत काय ऐकायला तयार नव्हता ...तो म्हणतोय तर उतरायचं ...दैवत कोणत्या भावनेने स्पर्धेत उभा राहिला हे त्याचं त्यालाच माहिती ...पण मी मित्र आहेत तर आपण पण जायचं असआपलं सूत्र... 22 नंबर हॉलमध्ये गेल्यावरती पाहिलं तर उल्हास हिरवा शर्ट त्याच्यावरती पांढरा शुभ्र टाय घालून उभा होता
….नाकासमोर जाणारा मित्र इथे कसा काय ?
अशाप्रकारे बऱ्याच वेळेला अंदाज येत नाही की उल्हास हा नेमका कुठे जाऊ शकतो.
मी 1999 कॉलेज मध्ये गोगटे कॉलेजला प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि त्याच दरम्यान जीजीपीएस मध्ये शिक्षक म्हणून उल्हास रुजू झाला अगदी संस्थेचा लाईफ मेम्बर झाला काही वर्षानी बघतोय तर हा प्राणी आमच्या BMS च्या वर्गात शिकवायला ...
नाही बाबा हा उल्हास काही करू शकतो….
थोड्या दिवसांनी ऐकलं तर याने जीपीएस सुद्धा सोडलं आणि मुकुल माधव च्या शाळेमध्ये हजर झाला
त्यानंतर ऐकलं तीही शाळा त्यांनी सोडली आणि
माने इंटरनॅशनल स्कूल मध्ये हजर झाला
आज तो तिथेच प्राचार्य म्हणून काम करत आहे अभिमान वाटतो त्याचा …
अशाप्रकारे उल्हासशी बोलणं व्हायचं परंतु त्यांची अनेक ठिकाणी अशी अचानक उपस्थिती दिसायची आणि अचंबित करायचा ...
असचं एकदा रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये समाजवादी लोकांचा एक मोठा राष्ट्रीय विचार मंच भेटीला आला होता... अभिजीत हेगशेट्ये हे त्याच्यामधील सक्रिय कार्यकर्ते … तिथे जाऊन पाहिलं तर उल्हास तिथे हजर मला मोठं आश्चर्य वाटलं कारण उल्हास प्राचार्य देव यांचा भाचा आणि एकदम समाजवादी … थोडं कोडं पडलं पण अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितलं उल्हास सप्रे खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे काम सुद्धा खूप छान आहे ..मी मनात म्हटलं असू शकतो कारण हा प्राणी 1993 पासून असेच धक्के देत आहे ..हा माणूस काय करू शकतो काही सांगता येत नाही
95 मध्ये आल्यानंतर हा माणूस बऱ्याच वेळी समाजवादी विचारांच्या पोस्ट टाकायचा मग मी त्याला व्यक्तिगत समजवल हा मित्रांचा ग्रूप आहे आपले इथे विचार प्रकट न केलेल बरं... तो शांत बसला पण काही लोकांनी त्याला टार्गेट केलं आणि तो कंटाळून ग्रुप मधून बाहेर पडला सविस्तर भेटलो आणि त्याला समजावलं विचार... संघटना ... खूप झाल्या आता. एक मित्र म्हणून चांगले संघटन असायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपले व्यक्तिगत संघटन नक्की जपावं पण 95 मध्ये फक्त मित्र असावा. आंबा ट्रिपमुळे उल्हास एवढा फेवरेट झाला की ...त्यांच्या व्यक्तीमत्वाची खुप पैलू दिसायला लागले आहेत.
एक मिश्किल उल्हास ….
एक खवय्या उल्हास….
95 मध्ये अनेक वेळेला वैचारिक मतभेद झाले की
ऊत्तम भूमिका ठाम भूमिका घेतो …
... असा हा उल्हास आज त्याचा वाढदिवस आहे त्याच्या स्वतंत्र विचारसरणीच्या स्वभावाला आयुष्यभर त्याने जपावं ….
अश्या या अनमोल मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!
१९ टिप्पण्या:
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सप्रे सर 💐🎂
खूप छान....!
उल्हास सप्रेसर म्हणजे रत्नागिरीतील असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्व...
Happy birthday Ulhas sir .Anand tuz likhan nehmi pramane uttam
सुदर आणि मुद्देसूद मांडणी
सुंदर लिखाण। सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।
Identify,notify, express in typical words, n avail to read for others in simple and lucid language is one of the best skill which is inculcated in you.
Thank you
उल्हास शांत आणि संयमी व्यक्तीमत्त्व.प्रश्नाकडे,व्यवस्थाकडे, चिकीत्सकपणे पहाण्याची त्यांची वृत्ती. त्यांचा सर्वात चांगला गुण जो मला खूप भावला.तो म्हणजे ते आपले म्हणणे कधीच इतरावर लादत नाहीत.विरोध सुध्दा शांततामय मार्गाने करावा.यावर विश्वास असणारं व्यक्तीमत्त्व.वाढदिवसानिमीत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
उल्हास शांत आणि संयमी व्यक्तीमत्त्व.प्रश्नाकडे,व्यवस्थाकडे, चिकीत्सकपणे पहाण्याची त्यांची वृत्ती. त्यांचा सर्वात चांगला गुण जो मला खूप भावला.तो म्हणजे ते आपले म्हणणे कधीच इतरावर लादत नाहीत.विरोध सुध्दा शांततामय मार्गाने करावा.यावर विश्वास असणारं व्यक्तीमत्त्व.वाढदिवसानिमीत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
Mast lihile Anand .....Happy birthday Ulhas
छान लिहीले आहेस आनंद
Anand agdi perfect lihilays..👌🏻Happy Birthday ulhas
सुंदर आनंद आज तुझ्यामुळे उल्हास सरांचे नवे पैलू समजले
Ulhas is my cousin. He is a versatile teacher. I know him as a person who worked for ANIS with interest. His command over English is praiseworthy. Misal is weak point of both of us. Teaching is our passion. Nice and brilliant personality. Thorough gentleman he is.
Ulhas is my cousin. He is a versatile teacher. I know him as a person who worked for ANIS with interest. His command over English is praiseworthy. Misal is weak point of both of us. Teaching is our passion. Nice and brilliant personality. Thorough gentleman he is.
I know Sapre sir since my school days... He was teacher in G.G.P.S school .. but I was not fortunate enough to learn from him as he left school till then ... but also heard my seniors praising him .... tyanchya baddal agdi sunder lekh lihla ahe tumhi Ambekar sir... ani tyancha vyaktimatva agdi chan mandla ahe ...
Sayali Surve
सुंदर लिखाण
💐👌
Casinos in Malta - Filmfile Europe
Find the best Casinos in Malta including bonuses, deccasino games, games and the kadangpintar history of games. We cover all apr casino the main filmfileeurope.com reasons to visit Casinos 출장안마 in
टिप्पणी पोस्ट करा