सचिन सावंत : स्वतंत्र विचाराचा..पण भावनिक मित्र
प्रा.डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
11 डिसेंबर 2020
--------------------------------
--------------------------------
सचिनला पाहिल्यावर तो वरकरणी अतिशय साधा ...थोडं भूजल व्यक्तिमत्व वाटतं ..पण मनातून अतिशय ठाम.. स्वतंत्र विचाराचा आणि सगळ्यात महत्वाचं खूपच भावनिक मित्र. आयुष्यात अशी अनेक व्यक्तिमत्व येतात की त्यांच्याशी आपण ठरवून मैत्री करू शकत नाही ...ठरवून संबंध ठेवू शकत नाही ...एक अनाहुतपणे आपल्या आयुष्यात येतात आणि आयुष्यभर त्यांचा सहवास राहतो . आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण कायम सोबत राहणार्या त्या काही ठराविक लोकांमध्ये सचिन आहे.
सचिनची आणि माझी मैत्री ती कधी दिखाव्याची नव्हती किंवा कधी मेन्टेन करावं लागलं नाही. परंतु सचिन माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा मित्र. महाराजा परिवारातला अतिशय जवळचा आणि सर्वांमध्ये अतिशय आपुलकीचं स्थान असणारा सचिन. अकरावीला असताना थोडं महिनाभर लेट आलेला ..डोळ्या वरती काळा गॉगल घातलेला … अतिशय बुजरा मुलगा वर्गामध्ये एंट्री करतो आणि पाठीमागच्या पोरांना मस्करीचा विषय मिळतो .
मी तिसऱ्या-चौथ्या रांगेत बसायचो आणि तो पुढच्या बेंचवर येऊन हळूच बसला ... मधल्या सुट्टी मध्ये त्याची काही पोरं मस्करी करायला लागले ..पण का कुणास ठाऊक त्याच वेळेला त्याच्याबद्दल अतिशय आपुलकी वाटली आणि मग तूफील पटेल ,मी आणि सचिन सोबत बसायला लागलो. त्याचे शब्द काही आठवत नाहीत ...फार कमी बोलायचा .. पण आता महाराजा ग्रुप तयार झाल्यानंतर सचिनचा मिस्कील स्वभाव सगळ्यांनाच मजा देऊन जातो.. एखाद्या ट्रीपमध्ये ...एखाद्या भेटीमध्ये सचिन नसेल तर त्याची आठवण नक्की निघते….म्हणजे त्या गॉगलवाल्या सचिन पासून आजच्या सचिन पर्यंत एवढा मोठा बदल झालेला आहे.
बारावीनंतर मला भाऊजींची बदली झाल्यामुळे रत्नागिरीत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला
.,जेव्हा सचिनला कळलं की मला रत्नागिरी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तेव्हा सचिन सहज म्हणाला … अरे माझ्या घरी येऊन राहा ..मला थोडं वेगळं वाटलं पण बाकीच्या मित्रानी सांगितलं की, त्याच्याकडे मुलं पेइंगेस्ट म्हणून राहतात पॉलिटेक्निक च्या शेजारी घर असल्यामुळे हे नेहमीच आहे त्यांच्यासाठी .मी फार विचार न करता त्याच्याकडे रहायला लागलो. काकी -काका -नितीन सोबत आता त्यांच्यासोबत मीसुद्धा राहायला लागलो. आजी-आजोबा असताना पण त्याना काहीच वाटलं नाही की हा परका मुलगा आहे अगदी घरासारखे रहायचे. एकदा मला गाडी शिकवण्यासाठी गाडी घेतली आणि गेटवर आदळली ..माझ्याकडून गाडीचे नुकसान झाले होते. सचीनइतका दिलदार मित्र की आम्ही गपचुप दुरुस्ती करून आणली घरात कळू नये म्हणून सर्व काळजी घेतली
सिनियरला आल्यानंतर सॉरी खुप बदलली होती फार उशिराने गाडी घेऊन जायचे... त्याचा स्वभावात खूपच बदल झाला होता. त्याच्यातून परीक्षेचा फॉर्म भरायचा राहिला होता आणि ही गोष्ट आमच्या काकीला कळली…, काकीला मी आपल्या मुलासारखा वाटत असल्यामुळे माझ्यावर येवढि रागवली की ..रागाने बोलली ..तुला आम्ही पेइंस्ट म्हणून ठेवला नाही आहे. माझ्या मुलासारखा आहेस मग सचिन चा फॉर्म भरला गेला नाही तर तू का नाही लक्ष दिलं. ... आणि माझ्याकडून ही दुर्लक्ष झालं होतं काकीचा पारा चढला होता रागान बोलून गेली की... तू निघून गेलास तरी चालेल ...सचिन पटकन बोलला जर आनंदला घरातून बाहेर काढलंस तर मी सुद्धा घरातून बाहेर पडेन आणि तो ठाम होता.
लहानपणापासूनच सचिनचा स्वभाव माहिती असल्यामुळे काकीने नरमाईने घेतलं आणि मी घरातच राहिलो आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याच्या घरी तीन वर्ष होतो. अपेक्षा घरातील व्यक्ति म्हणूनच राहत होतो आजी-आजोबा ,काका काकी , नितीन सगळे मनापासून माझ्यावरती प्रेम करायचे आपुलकीने वागायचे … पण या सर्वांचा दुवा होता तो म्हणजे सचिन.
मी एम ए ला कोल्हापूरला शिकायला गेलो पण मध्ये आल्यावरती सचिनच्या घरी भेटीसाठी जायचो. लेक्चरर म्हणून जॉईन झाल्यानंतर काकीला नेहमी भेटाव म्हणून मी मुद्दामहून मी काकीकदंबआरडी काढली होती.
अनेक लोक परिस्थितीबद्दल तक्रारी करण्याच्या मूड मध्ये जास्त असतात ...त्याच्यामुळे झालं नाही … यांच्यामुळे अडचण आली अश्या सबबी देत असतात परंतु सचिन याबाबत फार अजब व्यक्तिमत्व तो कधीच कोणाला दोष देत नाही आलेल्या परिस्थितीमध्ये आनंदी राहणं... दिलखुलास राहणं मजेशीर राहणं. असं सचिनला बघून कधी कधी त्याचा हेवा वाटतो. तो बँकेमध्ये रिकवरी म्हणून काम करतो ... प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे कित्येक वर्ष एकच काम करत आहे. त्याच काम फिरतीच असतं …,पण कधीही थकवा जाणवत नाही ..बॉस बद्दल तक्रार जाणवत नाही … घरातल्या अनेक अडचणी होत्या परंतु कधी मित्रांशी कधी डिस्कस करताना दिसला नाही आपल्या परीने जेवढे शक्य असेल तेवढे लढायचं नाही तर सोडून द्यायचं. सचिनच्या या स्वभावामुळे सचिनला अतिशय खूप कमी मित्र आहेत परंतु अतिशय जवळचे मित्र आहेत.
मधल्या काळामध्ये सचिनला ड्रिंक करायची सवय लागली होती मी कोल्हापूरला शिकत असताना अचानक सुजित किरचा निरोप आला… म्हणाला सचिनना जरा बघून ये..तो काय फार दिवस जिवंत राहील असे वाटत नाही. … आणि आम्ही भेटायला गेलो सुजीतला त्याचा अतिशय राग पण आला होता आणि त्याची अवस्था बघून भीती वाटत होती. याच गोष्टीने खूप ओरडला आणि कानाखाली पण मारली हरामखोरा तुला वाईट सवय सोडायला काय होते. आम्ही त्याला समजवल परमेश्वर कृपेने थोड्या दिवसात असं जाणवलं की त्यांनी पूर्णपणे आपली ड्रिंक सवय सोडून दिली होती... इतकच नव्हे तर अल्कोहोलिक ऍनिमिक संघटनेतर्फे ड्रिंक करणाऱ्या लोकांना जागृती करण्यासाठी सुद्धा काम करायला लागला होता. अनेक वर्ष त्याचे अशेच मित्र होते. ड्रिंक्स करू नये म्हणून जागृतीचे काम करत होते
आज सचिनचा वाढदिवस आहे ...पण आम्हाला नवीन जन्म घेतलेला सचीन दिसतो.
३ टिप्पण्या:
आनंद मस्तच रे.
खूपच सुंदर लिखाण आहे.मित्राच्या सर्व कडू गोड आठवणी समर्पक शब्दात व्यक्त करणे छानच जमलंय ����
खूपच सुंदर लिखाण आहे.मित्राच्या सर्व कडू गोड आठवणी समर्पक शब्दात व्यक्त करणे छानच जमलंय ����
टिप्पणी पोस्ट करा