स्वप्न दाखणारी बहीन ..
प्रा.डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
20 नोव्हेंबर 2020
---------------------------------------------------------------
रत्नमाला म्हणजे बेबी ...माझ्या पेक्षा सहा वर्षांनी मोठी बहीण ...पण तिचं शिक्षण करण्यासाठी ती आठवीमध्ये असतानाच रत्नागिरीमध्ये महिला विद्यालय येथे शिकायला गेली आणि तिथेच हॉस्टेलमध्ये राहायची त्यामुळे आम्ही बहीण आणि भाऊ म्हणून ज्या पद्धतीने आम्ही राहायला पाहिजे होते ...भांडायला पाहिजे होते ….तसं कधी झालंच नाही पण ती बारावीला असताना ती आंबेडला रहायला आली आणि मी सातवीला होतो कॉलेजचा अभ्यास करायची बेबीची अजब सवय होती.
तिला नाटक ऐकायची सवय होती एकदा " तरुण तुर्क म्हातारे अर्क " हे मधुकर तोरडमल यांचे नाटक ऐकत होती मी सुद्धा अगदी तन्मयतेने ऐकत होतो .. त्या नाटकात बिनधास्त कॉलेजची मुलं आणि त्याचे प्रताप ऐकत होतो ...याच वेळी नकळत पहिलं स्वप्न पाहिलं गेलं की ...आपण कॉलेजला जायचं .. दंगामस्ती करायची ...बेबी दाखवलेले दुसरे स्वप्न म्हणजे तिची मैत्रीण मनीषा पाटणे आमच्या घरी कधी कधी आमच्या घरी यायची ती खुप छान दिसायची मी बेबीला म्हणायचो ती मनीषा ताई किती छान दिसते ..बेबी म्हणाली तुला छान छान मुली आवडतात तर तुला कॉलेजला जावे लागेल ...मित्र मैत्रिणी कराव्या लागतील ... मी पण मनात ठरवलं की आपण कॉलेजला जायचं आणि मैत्रीचा ग्रुप असण्याची एक आवड निर्माण झाली.ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः कॉलेजला आल्यानंतर केल्या ...नाटकात काम केलं.. कॉलेजचे मित्र मंडळ तयार केलं आणि कॉलेजच्या मजा-मस्ती साठी स्वतः ट्रिप.. कार्यक्रमांचं आयोजन करायला लागलो ही नकळतपणे मी बेबीमुळे पाहिलेली स्वप्न पूर्ण करत होतो.
जॉब संदर्भात सुद्धा असंच झालं बेबीला ट्रेझरी ऑफिस मधला तो किस्सा आठवतोय .. ट्रेझरी ऑफिस चा माणूस आमच्या घरी आला आणि सांगितले की तुमच सिलेक्शन झाल आहे.
मलाही वाटलं की आपण सुद्धा चांगलं करायचं की लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे …गोगटे कॉलेजमधून फोन आला की माझं सिलेक्शन झाले आहे तेव्हा बेबीच्या जॉबच्या एंट्री ची आठवण झाली होती .
माझ्याच कॉलेजला हजर झालो होतो बेबीने दाखवलेलं मला स्वप्न पूर्ण झालं होतं.
"आपण खूप छान काम करायचं तुम्हाला नक्की विचारणार" हा बोध घेतला होता.
बेबीने फ्लॅट घेतला आणि त्यानंतर स्वतंत्र घर बांधल घर पाहिल्यानंतर माझ्याही मनात असं वाटायला लागलं की आपण सुद्धा स्वतःच्या घरात रहायला पाहिजे ... गार्डन करायला पाहिजे ...आणि दोनच वर्षात मी सुद्धा मी घर घेतलं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं बेबी आवर्जून कौतुकाने माझा नेहमी उल्लेख करते माझ्या भाच्यांचा आयडॉल करून ठेवला आहे.
खेडमध्ये राहत असताना शिवतर रोड वरती एक स्वामी समर्थ मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सर्व भक्तगणांचा एक खुप छान ग्रुप बेबी आणि भाऊजी आमचे देवळेकर यांनी तयार केलाय त्यांची फॅमिली पाहून मी पण बेबीला म्हटलं बेबी आपण पण आपल्या फॅमिलीचा ग्रुप करायला पाहिजे आणि काही वर्षातच आम्ही आमच्या मैत्रीपूर्ण असलेल्या भावंडांचा एक जीवदानी ग्रुप केला आणि ..एक फॅमिली साठी सपोर्ट सिस्टिम तयार झाली
अशा प्रत्येक वेळेला बेबीने स्वप्न दाखवण्याचे काम केलं आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सतत त्याच्या मागे लागलो ती स्वप्न बघत असताना येणाऱ्या अडचणी बेबी माझ्याशी चर्चा करायची परंतु अडचणी पेक्षा किती समाधान आहे... किती सुख मिळतं या गोष्टींमध्ये हे सांगायचे त्यामुळे अडचणींना मात करण्याची ताकद तयार करायची म्हणूनच आज बेबीच्या वाढदिवसाला एवढं आवर्जून सांगेन की मी खूप समाधानी आहे मी खूप नशीबवान आहे की मला स्वप्न दाखवणारी बहीण आहे.
२ टिप्पण्या:
नात्याने जरी मावशी असली तरी तिला आम्ही दीदी म्हणतो का तर तिला मावशी म्हटलेलं आवडत नव्हत अस मम्मी सांगायची .तिच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे कायम आनंदी कस राहायचं, कटकासरीत सुद्धा आवडी निवडी कशा जपयाच्या ,हसत सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या यात तिला काकांची साथ कायमच असते .ती आज ट्रेझरी अधिकारी या पदावर काम करत असली तरी ती कधीच त्याचा मोठेपणा करत नाही .मम्मी गेल्यावर आणि ती असताना सुद्धा तिने कायमच आम्हा दोन बहिणींना खूप आधार दिला आहे .मला कायमच अस वाटत की ती माय मरो अन मावशी जगो या उक्ती ला साजेशी अशीच ती आहे. आम्ही दोघी तिच्याशी मनमोकळेपणाने कधीही गप्पा मारू शकतो अगदी एखाद्या मैत्रिणी प्रमाणे.अशा आमच्या चिरतरुण दिदीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हुद्दा हा जबाबदारी घेण्यासाठी असतो ...रुबाबदारीसाठी दाखवण्यासाठी नव्हे हे बेबीने ड्रेझरी ऑफिसर असून किती सामान्य राहता येत हे आम्हाला शिकवलं
टिप्पणी पोस्ट करा