बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

प्रितीच्या हास्या पलिकडचे जीवन …

प्रितीच्या हास्या पलिकडचे जीवन …


डॉ.आनंद आंबेकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी

दिनांक- 25 ऑगस्ट 2021


----------------------------------------------------------------


घराच्या बाहेर असलो तरी घरातून हास्याचे फवारे उडत असले की लक्षात यायचं की ...प्रीतीची मैफिल बसलेली आहे. हसण्याठी विषय कोणताही असो त्यामध्ये जोरजोरात हसायचं आणि असलेल्या विषयाची मांडणी करायची... ऐकणारा माणूस केवळ मनोरंजन म्हणून ऐकत असतो.

…..परंतु या हास्यापलीकडचे जीवन फारच कमी लोकांना माहिती असायचं. प्रीती माझी भाची .. बहिणी कडूनच खळखळून हसण्याचा वारसा मिळाला माईला (बहिण) 35 व्या वर्षात संधिवाताचा त्रास सुरू झाला आणि खडतर जीवन सुरू झाले तिच्या जखमा कायम ओल्या असायच्या परंतु जीवन जगण्याची ताजेपणा कायम होता ...अगदी तिच्या मृत्यूपर्यंत कधीच हरवला नव्हता. तीच झेरॉक्स कॉपी म्हणजे प्रीती वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून आईच्या आजारपणामुळे कधी या दोन मुलींना म्हणजे दीप्ती आणि प्रीती तारुण्यामध्ये कधी आल्याच नाहीत बालपणातून जबाबदारीच्या ओझ्याखाली कायम दिसल्या. अल्लडपणा केला नाही... तरुण मुलगी म्हणून लक्ष ठेवावे लागले नाही ...दीप्ती दहावीनंतर हॉस्टेलला राहायला गेली तर प्रीती माझ्याकडे राहायला आली.. कॉलेज जीवन सुरू असताना थोडे मजेशीर दिवस होते... पण आईचं आजारपण सुरू होतं त्यातच स्वतःचं उच्च शिक्षण पूर्ण केले. एम ए इंग्लिश करून बीएड केलं ...पण व्यवस्थित नोकरी मिळाली नाही


....जीवनसंघर्ष तर या मुलीच्या पाचवीला पूजलेला ...कॉलेज पूर्ण झालं ..नोकरी सुरू झाली ..आणि  वडिलांचा अपघाती मृत्यू झाला.. घरामध्ये आजारी आई..बहीण  नोकरीनिमित्ताने… आणि लग्नानंतर मुंबईत असल्याने वडिलांची जागा तिलाच घ्यावी लागली.अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या ...एक धक्का सावरत नाही तर ..

वडिलांच्या मृत्यूनंतर आईचाही मृत्यू झाला संपूर्ण आकाश कोसळले...उध्दवस्त होणं काय ते डोळ्यासमोर बघत होतो... प्रीती माझ्याकडे राहायला आली ...तब्बल आठ महिने प्रीतीला जवळून बघत होतो. पत्नीच्या दूरदृष्टीमुळे आमच्या घरी प्रीतीला ठेवणं अतिशय योग्य निर्णय होता ...निर्मनुष्य घरांमध्ये ...आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे ती एकटी घरामध्ये राहणं महाभयंकर होतं.


        माईच्या जाण्यापूर्वी एक घटना आठवते माईच्या घरी अभिषेक हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता अभिषेक म्हणजे पुतण्या(मुंबईचा प्रकाश भाऊचा मुलगा ) अभिषेकचा अचानक फोन आला माईच्या पायातून पूर्ण रक्त येते आहे .. आणि माई डोळे मिटायला लागली आहे.. संपूर्ण बाथरूम मध्ये रक्त सांडले होते ..अभिषेक थर थर कापत बोलत होता ..घसा कोरडा झाला होता ..फोनवरच संभाषण ऐकून आम्हाला सुचत नव्हतं .. माईच्या पायाच्या जखमा साफ करत असताना अचानक रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव होऊ लागला 

.व्हेरिकोज वेनमुळे मोठ्या मोठ्या जखमा झाल्या होत्या. गौरी आणि मी तातडीने माईच्या घरी गेलो.. माईची अवस्था बघून ..थरकाप उडाला होता ..प्रतिक्रिया द्यायला सुद्धा वेळ नव्हती तिला जगवणं एवढाच डोळ्यासमोर विषय होता... प्रीती नवनिर्माण कॉलेजला कामाला होती ती क्लास रूम मध्ये असल्यामुळे फोन लागत नव्हता तिला फोन लावण्यात आम्ही वेळ सुद्धा घालवला नाही.108 वर अँबुलन्स साठी फक्त दोन वेळा प्रयत्न केला .. माईला चादरीमध्ये गुंडाळून कसं बसं  माझ्या फोरव्हीलर मध्ये टाकले शेजारचे गुर्जर डॉक्टर देवासारखे भेटले होते ते पण गाडीत बसले ..माईला अनिता वहिनी च्या मांडीवर ठेवले ...गौरी तिची टू व्हीलर घेऊन सुसाट वेगाने सिव्हील हॉस्पिटलला अगोदर गेली मी गाडी चालवत असताना माईच्या श्वासाकडे लक्ष होतं … काही सांगता येत नव्हतं…. तोपर्यंत अभिषेकने प्रीती ला फोन केला त्याला गाडी व्यवस्थित चालवता येत नव्हती परंतु प्रीतीला घेऊन आला गडबडीमध्ये नाचणी ग्रामपंचायत समोर  दोघांचा ॲक्सिडेंट झाला स्वतःच्या जखमांकडे लक्ष न देता प्रीती माईला बघायला आली सुदैवानी माई वाचली होती…

 परंतु या संपूर्ण घटनेमध्ये आम्ही सगळेच देवाचे आभार मानत होतो..  परंतु काही दिवसांतच माईची तब्येत परत बिघडली तिला मुंबईध्ये दीप्ती, पूर्वा, महेश, ज्योती वहिनी, भाई ,सर्व पुतणे आणि सदैव सोबत आई होती ऑपरेशन झालं पण तरीही सेप्टिक होऊन  त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. माई गेल्यानंतर प्रीतीचे आठ महिने अतिशय खडतर होते श्रवण आणि आर्या या दोघांच्या लुडबुडीमुळे ती फ्रेश असायची खळखळून हसत बोलायची परंतु त्या हास्या मागील तिचं जीवन अतिशय खडतर होतं … बेबी (बहीण) देवळेकर भाऊ , दिप्ती निलेश आणि जीवदानी परिवार यांचा पाठिंबा होता ..सुदैवाने प्रशांतसारख्या अतिशय मनमिळावू जोडीदारामुळे जीवनात बहर आला आणि आता  खूप गोड मुलगी झाली आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊन सुद्धा चांगल्या नोकरीच्या शोधात अजूनही खडतर जीवन सुरूच आहे..रखडलेल्या जीवनाला निखळ हास्याची जोड मिळावी ही श्री चरणी प्रार्थना .


९ टिप्पण्या:

Prashant Nevrekar म्हणाले...

खुप छान बायको मिळाली आहे असंच मामा तुमचं आशीर्वाद कायम राहुदे

सागर पोकळे म्हणाले...

प्रीती कडून एक शिकण्यासारखं आहे की, कितीही प्रसंग वाईट येऊदेत त्याला कसं सामोरे जायचे,हसत खेळत त्यावर सोलुशन कसं solv करायचे. प्रीती तू अशीच हसत खेळत रहा, आणि सर्वाना हसत खेळत ठेवशील यावर ठाम विश्वास आहे. Happy birthday

Unknown म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
आनंद नेवरेकर म्हणाले...

प्रीतीमधील समंजसपणा आणि आदरातिथ्य स्वभाव हा नेहमीच माझ्या आणि माझ्या पत्नीच्या स्मरणात राहील.
प्रितीने आपल्या आयुष्यात यशाची उंच भरारी घ्यावी व आपले ध्येय साकार करण्यास देवाने बळ द्यावे हेच मागणे.

प्रीतीला तिच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

आनंद नेवरेकर

Unknown म्हणाले...

नमस्कार मी प्रा.राहुल पवार
प्रिती चा BEd मधिल मित्र,
तुम्ही या साठी जे शिर्षक निवडले ते किती समर्पक आहे याची कल्पना आहे मला....
आम्ही जेव्हा बी एड ला होतो तेव्हा तेव्हा ना केव्हा प्रिती च्या आईची भेट व्हायची कधी प्रीती त्यांना वॉकर ने चालवायला आणायची तर कधी आम्ही त्या बाजूला गेलो तर घरी फेर फटका मारायचो आईच्या डोळ्यात नेहमी कुटूंबाबद्दलची काळजी दिसून यायची.
प्रीतीचा संघर्ष रोज पाहत होतो, आम्ही हॉस्टेल लाईफ एन्जॉय करत होतो तर प्रिती बाबांचा डब्बा, आईचं जेवण आणि बदलेला बी एड चा अभ्यासक्रम यावर तारेची कसरत करत होती....
आमच्या एवढे सोप नक्कीच नव्हते तीच शिक्षण तरीही आमच्या पेक्षा चढ्या टक्क्यांनी ती बी एड झाली.
बाबांचा अपघात नंतर आम्ही भेटायला ही गेलो फार इच्छा असली तरी मित्र म्हणून आधार देण, आत्मविश्वास जागा ठेवणे या पलिकडे काही करू शकलो नाही..
आई वडील नसणे याच दु:ख माझ्या सारख्या मित्र जास्त समजू शकतो दोघांच्या वाट्याला पालकांचे दु:ख आलं असलं तरी मुलगी म्हणून ती ज्या पद्धतीने यातुन उभी राहिली त्याला लाख लाख सलाम आहेत...
प्रीत कितीतरी जीवन संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना तु नेहमीच आदर्श राहशील... आपल्या मित्र परिवारात अशी एक झाशीची राणी आहे जिने परिस्थिती समोर गुडघे टेकले नाही याचा नेहमीच अभिमान राहिलं
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... हा हास्याचा खळखळाट असाच सदैव वाहता राहू दे 🙏🏻🙏🏻

Unknown म्हणाले...

माईच्या दोन्ही लेकी .... माईसारख्याच... सदैव हसतमुख...wish u all the best dear Priti and good luck for future endeavour👍😍

Unknown म्हणाले...

नमस्कार....! मी सोमेश्वर चव्हाण.मला ही पोस्ट बि. एड. च्या गुरुपवर वाचायला मिळाली. मी, राहुल,बि. एड्. चे मित्र आहोत. राहुल सोबत मला प्रतीच्या घरी जाण्याचा एकदा योग आला.. प्रितीच्या बाबांनी मला विचारल तुमच नाव काय? मी सांगीतल सोमेश्वर. ते म्हणाले हो आमचेकडे जवळच हे गाव आहे. पण तुमच नाव काय? पुन्हा तोच प्रश्न. आणि माझ तेच उत्तर. बराच वेळ आमच्या दोघांमधील हा श्रावनातील ऊन पावसाच्या खेळासारखा प्रश्न उत्तरांचा खेळ चालु राहीला. हसत सगळेच होते पण समजत मलाच नव्हतं की बाबा माझी मस्करी करताहेत. प्रितीने सांगितले राहुद्याना बाबा. त्याला इथल गाव माहिती नाही. तो मराठवाडय़ातील आहे. मग मात्र माझ्या लक्षात आलं. अरे ईथे तर हास्याचा झरा आहे. सुख शोधायला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. लिहीन्यात काही चुकल तर माफ कर. तुला तुझ्या कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप. तु कधीच मागे होणारी नाहीस. मराठी पाऊल पडते पुढे.........!

Nilesh Sadashiv Kadwadkar म्हणाले...

Anand Mama khup chaan Lilha aahe, Priti we r always proud of you..👌👌

Unknown म्हणाले...

खूप छान लेख आहे सर👌🏻👌🏻शीर्षक सुद्धा सुंदर👍🏻👌🏻

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...