देव सर - मॅनेजमेंट गुरू
डॉ.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय
रत्नागिरी
दिनांक- 12-01-2022
=============================
देव सर अनेकांना वेगवेगळ्या रुपात दिसले ...अगदी सुरुवातीला महाविद्यालय आयुष्यामध्ये अतिशय उत्तम वक्ते म्हणून अनेक स्पर्धांमध्ये वक्तृत्वाच्या.. वादविवादाच्या स्पर्धेत उतरायचे आणि आपला ठसा उत्तम वक्ता म्हणून विद्यार्थिदशेपासूनच सुरुवात केली.
महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यानंतर एन एस एस प्रोग्राम ऑफिसर म्हणून अतिशय उत्तम काम केले आणि त्यांचे विद्यार्थी आजही आम्ही देव सरांचे विद्यार्थी म्हणून आवर्जून अभिमानाने सांगतात.
महाविद्यालयामध्ये प्राचार्य झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम आणि कोर्सेस सुरु केले कालांतराने विद्यापीठांच्या अनेक कमिट्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला अगदीं NAAC सारख्या राष्ट्रीय स्तरावरील कमिटीवर वर्ष निवृत्त झाल्यावर सुद्धा काम केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास किर या महाविद्यालयासाठी भरघोस देणगी देऊन शैक्षणिक क्षेत्रात आपले दायित्व दाखवून दिले.महाराष्ट्रभर अनेक कॉलेजचे मार्गदर्शक म्हणून सक्रिय मार्गदर्शन केले.
अनेक राजकीय पक्षांचे ते प्रत्यक्ष मार्गदर्शक म्हणून काम करत होते. आप्पांच्या (जोशी)सोबत काम करत असताना पतसंस्थेच्या निर्मितीसाठी उत्तम आर्थिक नियोजक म्हणून त्यांनी काम केले आणि कुसुमताई पतसंस्थेची निर्मिती करण्यात मोठा वाटा होता. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एकोणीस वर्षाच्या प्राचार्य म्हणून कारकिर्दीत अत्यंत उत्तुंग भरारी मारणाऱ्या घटना काळात झाल्या. अनेक अकॅडेमीक लीडर सरांच्या दूरदृष्टीमुळे तयार केले.महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर कला क्रीडा शैक्षणिक सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी भरारी मारण्याची पहिल्यांदा सवय लावणारे प्राचार्य म्हणून नक्कीच देव सरांकडे पाहिले जाते.
माझ्या माय लाईफ या ब्लॉगमध्ये देव सरांबद्दल मी घेतलेला अनुभव तुमच्याशी मी शेअर करत आहे. महाविद्यालयामध्ये शिकत असताना शेवटच्या वर्षात आणि एन एस एस चा बेस्ट लीडर चा पुरस्कार सरांच्या हस्ते घेण्याचा सन्मान प्राप्त झाला ..1995 सरांचे प्राचार्य म्हणून पहिले वर्ष आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून माझे शेवटचे वर्ष .जून 1999 ला मी आठल्ये सप्रे महाविद्यालय ,देवरुख येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो.टिळक ग्रंथालयामध्ये वाचन करण्यासाठी जात असताना मिस्त्री हायस्कूलच्या कोपऱ्या वरती देव सर सहज भेटले त्यांच्या स्टाईलमध्ये विचारलं... काय करतोस रे मी म्हटलं सर मी देवरूख कॉलेजला जॉईन झालो आहे. तुझ्या पोस्ट ची काय पोझिशन आहे म्हटलं ..मी म्हटलं समाजशास्त्रच्या पटवर्धन सरांच्या लिव्ह व्हॅकनशीच्या काळात काम करत आहे... बर ठीक आहे तुझा एक अर्ज देऊन ठेव आपल्या कॉलेजला फाउंडेशनकोर्स साठी आपल्याकडे पोस्ट आहे.. म्हटलं माझा समाजशास्त्र विषय आहे ..सर म्हणाले ते मी बघतो तू फक्त अर्ज देऊन ठेव.सरांचा आदेश आल्यावर ती मी अर्ज देऊन ठेवला .दिवाळीच्या सुट्टीच्या काळात मुलाखत घेण्यासाठी आलेल्या विद्यापीठ पॅनलला मी कसा ऍक्टिव्ह आहे आणि आमचा विद्यार्थी आहे असे आवर्जून सांगितले.माझे विद्यापीठाच्या नियमानुसार सिलेक्शन झाले आणि मी कॉलेजला हजर झालो.हजर होताना ची गंमत खूपच छान आहे... दिवाळी संपल्यावर ती मी देवरुख कॉलेजला जॉइन झालो. पहिल्याच दिवशी सकाळी रजिस्टार पेडणेकर यांचा देवरूख कॉलेजला फोन आला.. अरे तू महाविद्यालयात आलाच नाहीस ..मी म्हटलं मी देवरूख कॉलेजला आहे. पेडणेकर म्हणाले तुझं सिलेक्शन झाले फाउंडेशन कोर्ससाठी.. थोड्यावेळाने देव सरांचा स्वतः फोन आला सरांना साधेपणाने म्हटलं इथे काय होणार..सर म्हणाले ते मी बघतो ..तू जॉईन व्हायला ये मी निमूटपणे संध्याकाळी चार वाजता हजर झालो. आज केवळ सरांच्या प्रोत्साहनामुळे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काम करत आहे.
गोगटे कॉलेजमध्ये नवीन असताना देशभक्तीपर समूह गाण्याची स्पर्धा घेतली होती मी सरांच्या शेजारीच हॉस्टेलला राहत होतो अचानक एका सरांनी भरपूर एन्ट्री दिल्या आणि वेळेचे नियोजन चुकलं स्पर्धा झाल्यानंतर नेहमीच्या स्टाईलने सरांनी खूप झापलं.. माझा चेहरा रडवेला झाला होता.. सरांना म्हटलं ते माझेच सर होते आणि त्यांनी अचानक एंट्री दिल्यानंतर मला नाही म्हणता आले नाही. त्यावेळी देव सरांनी मॅनेजमेंटचा एक मूलमंत्र दिला तो म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाही बोलायला शिकले पाहिजे.आता तू विद्यार्थी नाहीस तर प्राध्यापक झाला आहेस.हा ..नाही तुझ्या आयुष्याला खूप उपयोगी पडणार आहे...आजही मला मॅनेजमेंट करताना नाही म्हणताना सरांची आठवण येते. सरांबद्दल खूप प्रसंग आहेत परंतु आज त्यांच्या जाण्याने सर्वांच्याच डोळ्यासमोर असे प्रसंग येत असतील ..त्यानी घडवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची आठवण येत असेल ..एक माजी विद्यार्थी म्हणून माझी भावपूर्ण श्रद्धांजली ...आपल्या आठवणी नक्की दिला ..
४ टिप्पण्या:
भावपूर्ण श्रद्धांजली !
देव सर ग्रेट होते. त्यांच्या अचानक जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या कुटूंबियांस यातून सावरण्याची व दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रध्दांजली🙏
Casino Table Games - MapYRO
Casino 계룡 출장샵 Table Games. Casino Table Games. Casino 동두천 출장마사지 Table Games. Casino Table Games. Casino Table Games. Casino Table Games. Casino 파주 출장마사지 Table Games. Casino Table Games. Casino 전주 출장안마 Table Games. 여수 출장안마 Casino Table
👌🏻👍🏻 भावपूर्ण श्रद्धांजली देव सर🙏🏻💐
टिप्पणी पोस्ट करा