बुधवार, १० जून, २०२०

लाईफपार्टनर


लाईफ पार्टनर 
--------------------------------
आनंद आंबेकर
10/6/2020
--------------------------------
ती ...18 वर्षांपूर्वी आयुष्यात आली. कशी आली ? जशी प्रत्येकाच्या आयुष्यात येते तशीच ती आली.आई अण्णांचा लग्नासाठी सतत पाठपुरावा.माई, बेबी (बहिणी)चा सततचा आग्रह त्यात दोन वर्षांनी लहान पण मित्रांसारखा भाऊ महेश याचं ही लग्नाचं वय झालेलं दोन्ही भाऊ सेटल्ड असल्याने उशीर करण्याचे कारण नव्हते .तिचा स्वभाव आणि माझा स्वभाव म्हणजे दोन टोक असली तरी मध्य साधता साधता 18 वर्ष गेली. काय जादू आहे या नात्यात कुणास ठाऊक. आठवतो  तो दिवस ....
18 वर्षा पूर्वी संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर ती आणि तिचे पालक गावचं (आंबेड) घर बघायला येणार होते. माझ्यासोबत मित्र होते.किरण आणि उदय .मी अगोदर मालवणला जाऊन आलो होतो. पण निर्णय झाला नव्हता .. स्टेशनवर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ..चेहऱ्यावर जबाबदारीचे भाव . किरण  सहज बोलून गेला बोलून गेला.. आनंद आता जमलं तुझ लग्न. उदय सहसा प्रतिक्रिया नदेणारा पण म्हणाला चांगली फॅमिली आहे.  मला तर काय सुचतच नव्हतं ..मला वाटतं अरेंज मॅरेज करणाऱ्याची अवस्था अशीच असते...." होऊ दे एकदाचं ". माझा महाराजा परिवार (कॉलेज मित्र)तर यजमानाच्या भूमिकेत होता. कॉलेजचं सांस्कृतिक मंडळ जोरदार सेलिब्रेशन मूड मध्ये होते .. नातेवाईक आपआपल्या जबाबदाऱ्या नसांगता पार पाडत होते. लग्न झाल्यानंतर  नर्स असल्याने हॉस्पिटल बदलीमुळे नवीन जिल्हा ..नवीन कार्यपद्धती ..नवीन रिलेशन आणि नवीन संसार . कधी आंबेडच्या जबाबदाऱ्या  टाळल्या नाहीत ...कधी माझा मित्र परिवार परका मानला नाही ... माझ्या इतर ऍक्टिव्हिटीच्या जबाबदाऱ्यामध्ये अडथळे आणले नाहीत. दोन मुलं झालीत ..एव्हढ्या जबाबदाऱ्या सांभाळून सुदधा आम्ही दोघांनीही लग्न झाल्यानंतर दोन दोन शिक्षणाच्या पदव्याचा अभ्यास केला तीच लास्ट इयर ला असताना नर्सिंग ला ऍडमिशन झालं त्यामुळे BA राहिलं होत. ते पूर्ण केलं नंतर MA पूर्ण केलं...ते पण मराठी स्पेशल  मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून. मला MPhil. आणि PhD साठी सहकार्य केलं. खरं म्हणजे आम्ही दोघंही आपापल्या कॉलेजमध्ये असताना ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्टिव्ह होतो.
 ती NCC आणि स्पोर्ट्स मध्ये ऍक्टीव्ह असायची तर मी NSS आणि सांस्कृतिक मध्ये . 
स्वत:च्याच कॉलेजला जॉब मिळाल्याने आणि स्वभाव व्यस्त राहण्याचा असल्याने तिला नेहमीच घरच्या जबाबदाऱ्याचा ताण येतो ...पण ती करते ऍडजेस्ट 
ती आरोग्य विभागात नर्स असल्याने घरी नेहमीच आधार असतो .
एक प्रसंग असा की जो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही...अचानक एक दिवस पुतण्याचा (अभिषेक) फोन आला माईच्या पायातुन रक्तस्त्राव होऊन माई (माझी मोठी बहीण) बेशुद्ध होत आली आहे. बहिणीला संधिवात होता तिच्या पायाला मोठया जखमा होत्या.
माईच्या त्या प्रसंगात एव्हढ्या तत्परतेने हॉस्पिटलमध्ये तीने निर्णय घेतले  त्यामुळे तीचा जीव वाचला (दुर्दैवाने आज ती आमच्यात नाही) .हॉस्पिटलमध्ये माई जेव्हा शुद्धीत येत होती तेव्हा तीच नाव घेत जाबडत होती माईला बेशुद्ध अवस्थेत सुद्धा '' तिच्यावर" विश्वास होता. ..ती आहे गौरी.घरच्या लोकांचा इतका विश्वास नक्की मिळवला आहे.
पत्नीही  "अंश काळाची सखी आणि दीर्घ काळाची माता असते." हा निसर्गाचा नियम आहे ...पत्नीने मातेचे रूप घेतले की, मग दोघेही दबावात राहू शकतात. म्हणून  दोघे ही जबाबदारीच्या क्षेत्रात काम करताना लाईफपार्टनर ची लाईफफ़्रेंड झाले तर जीवन खुपच सहज आणि सुंदर होऊन जाते. यासाठी माझा कायम आग्रह असतो आणि तिचा पाठिंबा असतो.म्हणूनच ती घरात..नातेवाईकांमध्ये..मित्रांमध्ये..माझे व्यवसाय सहकारी फॅमिलीमध्ये सर्वांमध्ये सहज मिसळते. 
खरं म्हणजे आम्ही दोघे अतिशय विरुद्ध स्वभावाचे आहोत ... पण लाईफपार्टनर ची लाईफफ़्रेंड सूत्राने सहज जीवन जगायला मदत होत आहे.

२४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Lifepartner peksha lifefriend asane nehsmich uttam.

Unknown म्हणाले...

Ek number mama👍👍👌👌👌👌

बीना कळंबटे म्हणाले...

आंनद सर छान लिहिता असेच जीवनातील विविध नाती,प्रसंग,अनुभव यावर लिहा , तुम्हाला शुभेच्छा आणि हो.मैडम ना वाढदिवसाच्या शुभेच्छा


Unknown म्हणाले...

मस्त आनंद भाऊ तुमच्या सारख आणखी सर्वाणा पेरणा मीळू दे आयुष्यातील बारकावे लीहीण्याची त्याची सु:खद क्षण टीपुण ठेवण्याची...😄


सानिका सनी आबेकर

Sandesh keer म्हणाले...

Anand mastch re

Milind Mirkar म्हणाले...

Shubheccha mitra

प्रभाकर म्हणाले...

अवखळ आणि बेधुंद मनातील आठवणी आजही ताज्या ठेऊन आनंदाने जगत आहेस. त्या अवखळ आणि बेधुंद आठवणींचा कुंचला झाला. सलाम त्या कुंचल्याला आणि तुझ्या लाईफपार्टनरला.
-प्रभाकर रुक्मिणी राजाराम कांबळे,रत्नागिरी

Deepak म्हणाले...

Kupe chan kaka..🙂

irshad म्हणाले...

मस्त छान लेखणी

Unknown म्हणाले...

खूप छान लिहिलेस

RAKESH BHATKAR म्हणाले...

सुंदर व्यक्त झालयास

Nilesh Kadwadkar म्हणाले...

मामींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂🎂💐💐
खूप छान, Made for each other..👍

अम्रुता नार्वेकर म्हणाले...

खूप सुंदर लेख लिहिला आहे ़़़सर

हेमंत चोप्रा म्हणाले...

आनंदसर, फारच छान व्यक्त झाला आहेत आपल्या सहचारिणीबद्दल. तुमच्या शब्दशब्दातून गौरीवहिनींबद्दलचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त हिते आहे. तुमच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय निर्विवादपणे तुमच्या आईवडील आणि बहिणभावंडांबरोबर त्यांनाही जाते. आणि तुम्हिही ते फार मोठ्या मनाने मान्य केले आहात.

PRATIK KAMBLE म्हणाले...

प्रिय मामा,
फार सुंदर व्यक्त झालात, तुमच्या नात्याची गोष्ट हि अनेक नवदांपत्यांना प्रेरणा ठरू शकेल.
लाइफपार्टनर नव्हे तर लाइफटाइम फ्रेंड हि संज्ञा या लेखातली जमेची बाजू.
तुमचं नातं असंच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो हीच मंगल कामना.
- प्रतिक कांबळे

सिध्दार्थ बेंडके म्हणाले...

आनंद वर्णन छानच केल आहेस... खुप खुप शुभेच्छा...

Kiti म्हणाले...

Khup mast gouri ashich ahe.

Prashant Nevrekar म्हणाले...

खूप छान मामा.

प्रिया नेवरेकर म्हणाले...

खूप छान! आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देणारी जर कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे आपला life partner. अशा lifepartner बद्दल तुझ्या भावना खूप सहजपणे व्यक्त करून मामीला छान birthday gift दिलेस. असेच कायम made for each other रहा. असेच लिखाण सुरू ठेव म्हणजे आम्हालाही त्यातून प्रेरणा मिळते.

Nitin D. Arekar म्हणाले...

चांगलं लिहितोस,
शुभेच्छा!- नीतिन आरेकर

Rajesh... म्हणाले...

अप्रतीम सर

Shilpa म्हणाले...

Reply nice
Made for each other

Sapana Kadrekar म्हणाले...

लिखाण खूप छान आहे.

Umesh Ganesh Chiplunkar म्हणाले...

मामी बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे मामा तुझी खुप उत्तम जोडीदार आहे ती,सदैव हसरा चेहरा असतो तिचा सगळ्यांचा आपुलकीने पाहुणचार करते, तुम्ही दोघेही एकमेकास अनुरूप आहात असेच सुखाने संसार करा आणि तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला

मैत्री जपायला शिकवणारा दादा हरपला   डॉ. आनंद आंबेकर गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी दिनांक - ३० डिसेंबर २०२३ ___________________...